< इब्री 11 >
1 १ विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा आहे.
Now, faith is the confidence of things hoped for, and the conviction of things not seen.
2 २ विश्वासाच्या बाबतीत आमच्या पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली.
By this, the ancients obtained reputation.
3 ३ विश्वासाने आपल्याला समजते की, देवाच्या शब्दाने विश्व निर्माण झाले; म्हणजे ज्या गोष्टी दिसतात त्या दृश्य गोष्टींपासून झाल्या नाहीत. (aiōn )
By faith, we understand that the worlds were formed by the word of God; so that the things which were seen, were not made of things which do appear. (aiōn )
4 ४ विश्वासाने, हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगले बलिदान देवाला अर्पण केले; त्याद्वारे तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली कारण देवाने त्याच्या अर्पणाविषयी साक्ष दिली आणि त्याद्वारे तो मरण पावला असताही अजूनही बोलतो.
By faith Abel offered to God a better sacrifice than Cain, on account of which he was commended as righteous; God testifying in favor of his oblations: and so, by it, though dead he still speaks.
5 ५ हनोखाला मरणाचा अनुभव घेऊ नये म्हणून, त्यास विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले; आणि तो कोठे सापडला नाही, कारण देवाने त्यास नेले. त्यास लोकांतरी नेण्यापूर्वी त्याच्याविषयी अशी साक्ष देण्यात आली की, तो देवाला संतोषवीत असे.
By faith Enoch was translated, that he might not see death, and was not found, because God had translated him; for, before his translation, it was testified that he pleased God.
6 ६ पण विश्वासाशिवाय त्यास संतोषवणे अशक्य आहे, कारण जो त्याच्याकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे आणि जे त्यास झटून शोधतात त्यांना प्रतिफळ देणारा आहे.
But without faith it is impossible to please God. For he who comes to God, must believe that he is, and that he is a rewarder of them who diligently seek him.
7 ७ विश्वासाने, नोहाने, पूर्वी कधी न दिसलेल्या गोष्टींविषयी त्यास सूचना मिळाल्याप्रमाणे, आदराने भय धरून, आपले कुटुंब तारण्यासाठी विश्वासाने तारू बांधले; आणि त्याद्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणार्या नीतिमत्त्वाचा तो वारीस झाला.
By faith, Noah, when he received a revelation concerning things not yet seen, being seized with religious fear, prepared an ark for the salvation of his family; by which he condemned the world, and became an heir of the righteousness which is by faith.
8 ८ विश्वासाने, अब्राहामाने, त्यास जे ठिकाण वतन मिळणार होते तिकडे जाण्यास त्यास बोलवण्यात आले तेव्हा आज्ञा मानली. तो कोठे जाणार होता हे त्यास माहीत नसताना तो निघाला.
By faith, Abraham, when called to go out into a place which he should afterward receive as an inheritance, obeyed, and went out, not knowing whither he was going.
9 ९ विश्वासाने, तो वचनदत्त देशात, जणू परदेशात प्रवासी म्हणून राहिला; आणि त्याच वतनात त्याचे जोडीचे वारीस इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर तो डेर्यात वस्ती होती.
By faith, he sojourned in the land of promise, as in a foreign land, dwelling in tents with Isaac and Jacob, the joint heirs of the same promise:
10 १० कारण, ज्याचा योजणारा व बांधणारा देव आहे अशा नगराची अब्राहाम वाट पाहत होता.
for he expected the city having foundations, whose builder and maker is God.
11 ११ विश्वासाने, सारेलाही, ती स्वतः वयातीत झाली असता गर्भधारणेची क्षमता मिळाली; कारण ज्याने वचन दिले त्यास तिने विश्वसनीय मानले.
By faith, also, Sarah herself received strength for the conception of seed, and brought forth, when past the time of life; because she judged him faithful who had promised.
12 १२ म्हणून केवळ एकापासून आणि अशा मृतवत झालेल्या पासून संख्येने आकाशातील तार्यांप्रमाणे, समुद्राच्या किनार्यावरील वाळूप्रमाणे असंख्य संतती निर्माण झाली.
And, therefore, there sprang from one who was dead, in this respect, a race, as the stars of heaven in multitude, and as the sand, which is on the sea-shore, innumerable.
13 १३ हे सगळे विश्वासात टिकून मरण पावले; त्यांना वचनांची प्राप्ती झाली नव्हती. पण त्यांनी ती दुरून बघून त्यांना वंदन केले आणि त्यांनी मानले की, आपण पृथ्वीवर परके आणि प्रवासी आहोत.
All these died in faith, not having received the promises. For, seeing the things promised, afar off, and embracing them, they confessed that they were strangers and pilgrims in the land.
14 १४ कारण, असे जे म्हणतात ते स्वतःचा देश मिळवू पाहत आहेत हे ते दाखवतात.
Now they who speak such things, plainly declare that they earnestly seek a country.
15 १५ आणि खरोखर, ते ज्या देशातून निघाले होते त्याचा ते विचार करीत असते, तर तिकडे परत जाण्याची संधी त्यांना मिळाली असती.
For truly, if they had remembered that from which they came out, they might have had an opportunity to return it.
16 १६ पण आता, ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची इच्छा धरतात, ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणून घेण्यास देवाला त्यांची लाज वाटत नाही कारण त्याने त्यांच्यासाठी एक नगर तयार केले आहे.
But, indeed, they strongly desired a better country; that is, a heavenly. Therefore, God is not ashamed of them--to be called their God; because he has prepared for them a city.
17 १७ अब्राहामाने, त्याची परीक्षा केली जात असता विश्वासाने, इसहाकाचे अर्पण केले; म्हणजे, ज्याने वचने स्वीकारली होती तो आपला एकुलता एक मुलगा अर्पिला.
By faith, Abraham, when tried, offered up Isaac; he who had received the promises offered up his only begotten,
18 १८ त्याच्याविषयी हे म्हणले होते की, ‘इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील.’
concerning whom it was said, that "In Isaac shall thy seed be called";
19 १९ तरी, देव त्यास मरण पावलेल्यातून उठवायलादेखील समर्थ आहे असे त्याने मानले. तो त्यास तेथून, जणू लाक्षणिक अर्थाने, परतही मिळाला.
reasoning that God was able to raise him even from the dead; from whence, indeed, he received him in a figure.
20 २० इसहाकाने, याकोबाला व एसावाला येणार्या गोष्टींविषयी विश्वासाने, आशीर्वाद दिला.
By faith, Isaac blessed Jacob and Esau, with respect to things to come.
21 २१ याकोबाने मरतेवेळी योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने, आशीर्वाद दिला व आपल्या काठीच्या टोकावर टेकून नमन केले.
By faith, Jacob, when dying, blessed each of the sons of Joseph, and worshiped, bowing on the top of his staff.
22 २२ विश्वासाने, योसेफाने, मरतेवेळी, इस्राएलाच्या संतानाच्या निघण्याविषयी सूचना केली व आपल्या अस्थींविषयी आज्ञा दिली.
By faith, Joseph, when dying, made mention concerning the departing of the children of Israel, and gave commandment concerning his bones.
23 २३ विश्वासाने, मोशे जन्मल्यावर, त्यास त्याच्या आई-वडीलांनी तीन महिने लपवून ठेवले; कारण मूल सुंदर आहे हे त्यांनी बघितले व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही.
By faith, Moses, when born, was hid three months by his parents, because they saw that he was a beautiful child, and were not afraid of the king's commandment.
24 २४ मोशेने, विश्वासाने, तो मोठा झाल्यावर फारोच्या कन्येचा मुलगा म्हणवण्याचे नाकबूल केले.
By faith, Moses, when he was grown up, refused to be called the son of Pharaoh's daughter;
25 २५ पापांची क्षणिक सुखे भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे त्याने पसंत केले,
choosing rather to suffer evil with the people of God, than to have the temporary fruition of sin,
26 २६ आणि ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे हे मिसरातील भांडारापेक्षा मोठे धन मानले; कारण श्रमांबद्दल मिळणाऱ्या वेतनावर त्याची दृष्टी होती.
esteeming the reproach of Christ greater riches than the treasures of Egypt; for he looked forward to the retribution.
27 २७ विश्वासाने राजाच्या क्रोधाला न भिता त्याने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्य आहे त्यास पाहत असल्याप्रमाणे तो ठाम राहिला.
By faith, he left Egypt, not being afraid of the wrath of the king. For he courageously persevered, as perceiving the invisible God.
28 २८ विश्वासाने त्याने वल्हांडण व रक्तसिंचन हे विधी पाळले, ते ह्यासाठी की, प्रथम जन्मलेल्यांना मारणार्याने त्यांना शिवू नये.
By faith, he appointed the passover, and the sprinkling of the blood; that he who destroyed the first-born, might not touch them.
29 २९ विश्वासाने ते तांबड्या समुद्रामधून, कोरड्या जमिनीवरून गेल्याप्रमाणे गेले व मिसरी तसे करण्याच्या प्रयत्नात बुडून मरण पावले.
By faith, they passed through the Red Sea, as by dry land, which the Egyptians attempting to do, were drowned.
30 ३० विश्वासाने, त्यांनी सात दिवस, यरीहोच्या तटासभोवती फेऱ्या घातल्यावर ते तट पडले.
By faith, the walls of Jericho fell down, having been encompassed seven days.
31 ३१ विश्वासाने राहाब वेश्या ही अवज्ञा करणार्या इतरांबरोबर नाश पावली नाही; कारण तिने शांतीने हेरांचे स्वागत केले होते.
By faith, Rahab, the harlot, was not destroyed with the unbelievers, having received the spies in peace.
32 ३२ आता मी अधिक काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन आणि इफ्ताह, तसेच दावीद व शमुवेल आणि संदेष्टे यांच्याविषयी मी सांगू लागलो तर मला वेळ अपुरा पडेल.
And what shall I say more? for the time would fail me, to speak of Gideon, and Barak, and Samson, and Jepthah, and David, also, and Samuel, and the prophets--
33 ३३ विश्वासाने त्यांनी राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरली, वचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली.
who, through faith, subdued kingdom, wrought righteousness, obtained promises, stopped the mouths of lions,
34 ३४ त्यांनी अग्नीची शक्ती संपवली, तलवारीच्या धारेपासून ते निभावले, अशक्तपणात सशक्त झाले, युद्धात पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली.
quenched the strength of fire, escaped the edges of the sword, grew strong from sickness, became valiant in battle, overturned the camps of the aliens.
35 ३५ कित्येक स्त्रियांना त्यांचे मरण पावलेले, पुन्हा जिवंत होऊन, परत मिळाले आणि कित्येकांनी अधिक चांगले पुनरुत्थान मिळवण्यास आपली सुटका न पतकरल्यामुळे त्यांचे हाल हाल करण्यात आले.
Women received their dead by a resurrection, and others were tortured, not accepting deliverance, that they might obtain a better resurrection.
36 ३६ आणखी दुसर्यांनी टवाळक्यांचा व तसाच फटक्यांचा, शिवाय बेड्यांचा व बंदिवासाचा अनुभव घेतला.
And others had trial of mockings and scourgings; and, moreover of bonds and imprisonment.
37 ३७ त्यांना दगडमार केला गेला, त्यांना करवतीने कापले, त्यांची परीक्षा केली गेली, ते तलवारीने मारले गेले आणि दुरावलेले, नाडलेले व पीडलेले होऊन ते मेंढरांची व शेरड्यांची कातडी पांघरून भटकले.
They were stoned, they were sawn asunder, they were tempted, they died by the slaughter of the sword, they went about in sheep skins, and in goat skins, being destitute, afflicted, maltreated;
38 ३८ जग त्यांच्यासाठी लायक नव्हते ते रानांमधून, डोंगरांमधून, गुहांमधून व जमिनीमधील खंदकामधून फिरत राहिले.
of these the world was not worthy: they wandered in deserts, and mountains, and in caves, and holes of the earth.
39 ३९ या सर्वांनी विश्वासाद्वारे साक्ष मिळवली असे असता त्यांना वचन प्राप्त झाले नाही.
Now, all these, though commanded on account of faith, did not receive the promise,
40 ४० कारण ते आपल्याशिवाय पूर्ण केले जाऊ नयेत अशी देवाच्या दृष्टीपुढे आपल्यासाठी अधिक चांगली गोष्ट होती.
God having provided something better for us, that they, without us, should not be made perfect.