< इब्री 11 >

1 विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा आहे.
A vjera je već neko imanje onoga čemu se nadamo, uvjerenost u zbiljnosti kojih ne vidimo.
2 विश्वासाच्या बाबतीत आमच्या पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली.
Zbog nje stari primiše svjedočanstvo.
3 विश्वासाने आपल्याला समजते की, देवाच्या शब्दाने विश्व निर्माण झाले; म्हणजे ज्या गोष्टी दिसतात त्या दृश्य गोष्टींपासून झाल्या नाहीत. (aiōn g165)
Vjerom spoznajemo da su svjetovi uređeni riječju Božjom tako te ovo vidljivo ne posta od nečega pojavnoga. (aiōn g165)
4 विश्वासाने, हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगले बलिदान देवाला अर्पण केले; त्याद्वारे तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली कारण देवाने त्याच्या अर्पणाविषयी साक्ष दिली आणि त्याद्वारे तो मरण पावला असताही अजूनही बोलतो.
Vjerom Abel prinese Bogu bolju žrtvu nego Kain. Po njoj primi svjedočanstvo da je pravedan - Bog nad njegovim darovima posvjedoči - po njoj i mrtav još govori.
5 हनोखाला मरणाचा अनुभव घेऊ नये म्हणून, त्यास विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले; आणि तो कोठे सापडला नाही, कारण देवाने त्यास नेले. त्यास लोकांतरी नेण्यापूर्वी त्याच्याविषयी अशी साक्ष देण्यात आली की, तो देवाला संतोषवीत असे.
Vjerom Henok bi prenesen da ne vidi smrti te iščeznu jer ga je prenio Bog. Doista, prije prijenosa primio je svjedočanstvo da omilje Bogu.
6 पण विश्वासाशिवाय त्यास संतोषवणे अशक्य आहे, कारण जो त्याच्याकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे आणि जे त्यास झटून शोधतात त्यांना प्रतिफळ देणारा आहे.
A bez vjere nemoguće je omiljeti Bogu jer tko mu pristupa, vjerovati mora da postoji i da je platac onima koji ga traže.
7 विश्वासाने, नोहाने, पूर्वी कधी न दिसलेल्या गोष्टींविषयी त्यास सूचना मिळाल्याप्रमाणे, आदराने भय धरून, आपले कुटुंब तारण्यासाठी विश्वासाने तारू बांधले; आणि त्याद्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणार्‍या नीतिमत्त्वाचा तो वारीस झाला.
Vjerom Noa, upućen u ono što još ne bijaše vidljivo, predano sagradi korablju na spasenje svoga doma. Time osudi svijet i postade baštinikom vjerničke pravednosti.
8 विश्वासाने, अब्राहामाने, त्यास जे ठिकाण वतन मिळणार होते तिकडे जाण्यास त्यास बोलवण्यात आले तेव्हा आज्ञा मानली. तो कोठे जाणार होता हे त्यास माहीत नसताना तो निघाला.
Vjerom pozvan, Abraham posluša i zaputi se u kraj koji je imao primiti u baštinu, zaputi se ne znajući kamo ide.
9 विश्वासाने, तो वचनदत्त देशात, जणू परदेशात प्रवासी म्हणून राहिला; आणि त्याच वतनात त्याचे जोडीचे वारीस इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर तो डेर्‍यात वस्ती होती.
Vjerom se kao pridošlica naseli u obećanoj zemlji kao u tuđini, prebivajući pod šatorima s Izakom i Jakovom, subaštinicima istog obećanja,
10 १० कारण, ज्याचा योजणारा व बांधणारा देव आहे अशा नगराची अब्राहाम वाट पाहत होता.
jer iščekivaše onaj utemeljeni Grad kojemu je graditelj i tvorac Bog.
11 ११ विश्वासाने, सारेलाही, ती स्वतः वयातीत झाली असता गर्भधारणेची क्षमता मिळाली; कारण ज्याने वचन दिले त्यास तिने विश्वसनीय मानले.
Vjerom i Sara unatoč svojoj dobi zadobi moć da začne jer vjernim smatraše Onoga koji joj dade obećanje.
12 १२ म्हणून केवळ एकापासून आणि अशा मृतवत झालेल्या पासून संख्येने आकाशातील तार्‍यांप्रमाणे, समुद्राच्या किनार्‍यावरील वाळूप्रमाणे असंख्य संतती निर्माण झाली.
Zato od jednoga, i to obamrla, nasta mnoštvo poput zvijezda na nebu i pijeska nebrojena na obali morskoj.
13 १३ हे सगळे विश्वासात टिकून मरण पावले; त्यांना वचनांची प्राप्ती झाली नव्हती. पण त्यांनी ती दुरून बघून त्यांना वंदन केले आणि त्यांनी मानले की, आपण पृथ्वीवर परके आणि प्रवासी आहोत.
U vjeri svi su oni umrli, a da nisu zadobili obećanja, već su ih samo izdaleka vidjeli i pozdravili priznavši da su stranci i pridošlice na zemlji.
14 १४ कारण, असे जे म्हणतात ते स्वतःचा देश मिळवू पाहत आहेत हे ते दाखवतात.
Doista, koji tako govore, jasno očituju da domovinu traže.
15 १५ आणि खरोखर, ते ज्या देशातून निघाले होते त्याचा ते विचार करीत असते, तर तिकडे परत जाण्याची संधी त्यांना मिळाली असती.
Dakako, da su mislili na onu iz koje su izišli, imali bi još prilike vratiti se u nju.
16 १६ पण आता, ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची इच्छा धरतात, ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणून घेण्यास देवाला त्यांची लाज वाटत नाही कारण त्याने त्यांच्यासाठी एक नगर तयार केले आहे.
Ali sada oni čeznu za boljom, to jest nebeskom. Stoga se Bog ne stidi zvati se Bogom njihovim: ta pripravio im je Grad.
17 १७ अब्राहामाने, त्याची परीक्षा केली जात असता विश्वासाने, इसहाकाचे अर्पण केले; म्हणजे, ज्याने वचने स्वीकारली होती तो आपला एकुलता एक मुलगा अर्पिला.
Vjerom Abraham, kušan, prikaza Izaka. Jedinca prikazivaše on koji je primio obećanje,
18 १८ त्याच्याविषयी हे म्हणले होते की, ‘इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील.’
kome bi rečeno: Po Izaku će ti se nazivati potomstvo! -
19 १९ तरी, देव त्यास मरण पावलेल्यातून उठवायलादेखील समर्थ आहे असे त्याने मानले. तो त्यास तेथून, जणू लाक्षणिक अर्थाने, परतही मिळाला.
uvjeren da Bog može i od mrtvih uskrisiti. Zato ga u predslici i ponovno zadobi.
20 २० इसहाकाने, याकोबाला व एसावाला येणार्‍या गोष्टींविषयी विश्वासाने, आशीर्वाद दिला.
Vjerom baš u pogledu budućnosti Izak blagoslovi Jakova i Ezava.
21 २१ याकोबाने मरतेवेळी योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने, आशीर्वाद दिला व आपल्या काठीच्या टोकावर टेकून नमन केले.
Vjerom Jakov, umirući, blagoslovi oba sina Josipova i duboko se prignu oslonjen na vrh svojega štapa.
22 २२ विश्वासाने, योसेफाने, मरतेवेळी, इस्राएलाच्या संतानाच्या निघण्याविषयी सूचना केली व आपल्या अस्थींविषयी आज्ञा दिली.
Vjerom Josip na umoru napomenu ono o izlasku sinova Izraelovih i dade zapovijed o svojim kostima.
23 २३ विश्वासाने, मोशे जन्मल्यावर, त्यास त्याच्या आई-वडीलांनी तीन महिने लपवून ठेवले; कारण मूल सुंदर आहे हे त्यांनी बघितले व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही.
Vjerom su Mojsija netom rođena tri mjeseca krili njegovi roditelji jer vidješe da je djetešce lijepo i nisu se bojali kraljeve naredbe.
24 २४ मोशेने, विश्वासाने, तो मोठा झाल्यावर फारोच्या कन्येचा मुलगा म्हणवण्याचे नाकबूल केले.
Vjerom Mojsije, već odrastao, odbi zvati se sinom kćeri faraonove.
25 २५ पापांची क्षणिक सुखे भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे त्याने पसंत केले,
Radije izabra biti zlostavljan zajedno s Božjim narodom, nego se časovito okoristiti grijehom.
26 २६ आणि ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे हे मिसरातील भांडारापेक्षा मोठे धन मानले; कारण श्रमांबद्दल मिळणाऱ्या वेतनावर त्याची दृष्टी होती.
Većim je bogatstvom od blaga egipatskih smatrao muku Kristovu jer je gledao na plaću.
27 २७ विश्वासाने राजाच्या क्रोधाला न भिता त्याने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्य आहे त्यास पाहत असल्याप्रमाणे तो ठाम राहिला.
Vjerom napusti Egipat, ne bojeći se bijesa kraljeva, postojan kao da Nevidljivoga vidi.
28 २८ विश्वासाने त्याने वल्हांडण व रक्तसिंचन हे विधी पाळले, ते ह्यासाठी की, प्रथम जन्मलेल्यांना मारणार्‍याने त्यांना शिवू नये.
Vjerom je obavio pashu i škropljenje krvlju da Zatornik ne dotakne prvenaca Izraelovih.
29 २९ विश्वासाने ते तांबड्या समुद्रामधून, कोरड्या जमिनीवरून गेल्याप्रमाणे गेले व मिसरी तसे करण्याच्या प्रयत्नात बुडून मरण पावले.
Vjerom prođoše Crvenim morem kao po suhu, što i Egipćani pokušaše, ali se potopiše.
30 ३० विश्वासाने, त्यांनी सात दिवस, यरीहोच्या तटासभोवती फेऱ्या घातल्यावर ते तट पडले.
Vjerom zidine jerihonske padoše nakon sedmodnevnoga ophoda.
31 ३१ विश्वासाने राहाब वेश्या ही अवज्ञा करणार्‍या इतरांबरोबर नाश पावली नाही; कारण तिने शांतीने हेरांचे स्वागत केले होते.
Vjerom Rahaba, bludnica, ne propade zajedno s nepokornicima jer s mirom primi uhode.
32 ३२ आता मी अधिक काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन आणि इफ्ताह, तसेच दावीद व शमुवेल आणि संदेष्टे यांच्याविषयी मी सांगू लागलो तर मला वेळ अपुरा पडेल.
I što još da kažem? Ta ponestat će mi vremena, počnem li raspredati o Gideonu, Baraku, Samsonu, Jiftahu, Davidu, pa Samuelu i prorocima,
33 ३३ विश्वासाने त्यांनी राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरली, वचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली.
koji su po vjeri osvojili kraljevstva, odjelotvorili pravednost, zadobili obećano, začepili ralje lavovima,
34 ३४ त्यांनी अग्नीची शक्ती संपवली, तलवारीच्या धारेपासून ते निभावले, अशक्तपणात सशक्त झाले, युद्धात पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली.
pogasili žestinu ognja, umakli oštrici mača, oporavili se od slabosti, ojačali u boju, odbili navale tuđinaca.
35 ३५ कित्येक स्त्रियांना त्यांचे मरण पावलेले, पुन्हा जिवंत होऊन, परत मिळाले आणि कित्येकांनी अधिक चांगले पुनरुत्थान मिळवण्यास आपली सुटका न पतकरल्यामुळे त्यांचे हाल हाल करण्यात आले.
Žene su po uskrsnuću ponovno zadobile svoje pokojne. Drugi pak, stavljeni na muke, ne prihvatiše oslobođenja da bi ih zapalo bolje uskrsnuće.
36 ३६ आणखी दुसर्‍यांनी टवाळक्यांचा व तसाच फटक्यांचा, शिवाय बेड्यांचा व बंदिवासाचा अनुभव घेतला.
Drugi su opet iskusili izrugivanja i bičeve, pa i okove i tamnicu.
37 ३७ त्यांना दगडमार केला गेला, त्यांना करवतीने कापले, त्यांची परीक्षा केली गेली, ते तलवारीने मारले गेले आणि दुरावलेले, नाडलेले व पीडलेले होऊन ते मेंढरांची व शेरड्यांची कातडी पांघरून भटकले.
Kamenovani su, piljeni, poubijani oštricom mača, potucali se u runima, u kozjim kožusima, u oskudici, potlačeni, zlostavljani -
38 ३८ जग त्यांच्यासाठी लायक नव्हते ते रानांमधून, डोंगरांमधून, गुहांमधून व जमिनीमधील खंदकामधून फिरत राहिले.
svijet ih ne bijaše dostojan - vrludali po pustinjama, gorama, pećinama i pukotinama zemaljskim.
39 ३९ या सर्वांनी विश्वासाद्वारे साक्ष मिळवली असे असता त्यांना वचन प्राप्त झाले नाही.
I svi oni po vjeri, istina, primiše svjedočanstvo, ali ne zadobiše obećano
40 ४० कारण ते आपल्याशिवाय पूर्ण केले जाऊ नयेत अशी देवाच्या दृष्टीपुढे आपल्यासाठी अधिक चांगली गोष्ट होती.
jer Bog je za nas predvidio nešto bolje da oni bez nas ne dođu do savršenstva.

< इब्री 11 >