< इब्री 10 >

1 अशाप्रकारे, पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे. त्या सत्याचे ते खरे स्वरूप नाही, म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पील्या जाणाऱ्या त्याच त्याच यज्ञांनी जवळ येणाऱ्यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही.
วฺยวสฺถา ภวิษฺยนฺมงฺคลานำ ฉายาสฺวรูปา น จ วสฺตูนำ มูรฺตฺติสฺวรูปา ตโต เหโต รฺนิตฺยํ ทียมาไนเรกวิไธ รฺวารฺษิกพลิภิ: ศรณาคตโลกานฺ สิทฺธานฺ กรฺตฺตุํ กทาปิ น ศกฺโนติฯ
2 जर नियमशास्त्र लोकांस परिपूर्ण करू शकले असते तर यज्ञ अर्पण करण्याचे थांबले नसते का? कारण उपासना करणारे कायमचेच शुद्ध झाले असते आणि त्यानंतर पापांची भावना नसल्याने दोषी ठरले नसते.
ยทฺยศกฺษฺยตฺ ตรฺหิ เตษำ พลีนำ ทานํ กึ น นฺยวรฺตฺติษฺยต? ยต: เสวาการิเษฺวกกฺฤตฺว: ปวิตฺรีภูเตษุ เตษำ โก'ปิ ปาปโพธ: ปุน รฺนาภวิษฺยตฺฯ
3 परंतु त्याऐवजी ते यज्ञ वर्षानुवर्षे पापांची आठवण करून देतात.
กินฺตุ ไต รฺพลิทาไน: ปฺรติวตฺสรํ ปาปานำ สฺมารณํ ชายเตฯ
4 कारण बैलांच्या किंवा बकऱ्याच्या रक्ताने पाप नाहीसे होणे अशक्य आहे.
ยโต วฺฤษาณำ ฉาคานำ วา รุธิเรณ ปาปโมจนํ น สมฺภวติฯ
5 म्हणून ख्रिस्त जेव्हा या जगात आला, तेव्हा तो देवाला म्हणाला, “तुला यज्ञ व अर्पणे याची इच्छा नव्हती, त्याऐवजी तू माझ्यासाठी शरीर तयार केले.
เอตตฺการณาตฺ ขฺรีษฺเฏน ชคตฺ ปฺรวิเศฺยทมฺ อุจฺยเต, ยถา, "เนษฺฏฺวา พลึ น ไนเวทฺยํ เทโห เม นิรฺมฺมิตสฺตฺวยาฯ
6 होमार्पणांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला आनंद वाटला नाही.
น จ ตฺวํ พลิภิ รฺหไวฺย: ปาปคฺไหฺน รฺวา ปฺรตุษฺยสิฯ
7 ह्यावरून मी म्हणालो, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.”
อวาทิษํ ตไทวาหํ ปศฺย กุรฺเวฺว สมาคมํฯ ธรฺมฺมคฺรนฺถสฺย สรฺเค เม วิทฺยเต ลิขิตา กถาฯ อีศ มโน'ภิลาษเสฺต มยา สมฺปูรยิษฺยเตฯ "
8 वर उल्लेखल्याप्रमाणे तो म्हणाला, “यज्ञ, अन्नार्पणे, होमार्पणे व पापाबद्दलची अर्पणे, ह्यांची इच्छा तुला नव्हती व त्यामध्ये तुला संतोष नव्हता.” (जरी नियमशास्त्रानुसार ही अर्पणे करण्यात येतात.)
อิตฺยสฺมินฺ ปฺรถมโต เยษำ ทานํ วฺยวสฺถานุสาราทฺ ภวติ ตานฺยธิ เตเนทมุกฺตํ ยถา, พลิไนเวทฺยหวฺยานิ ปาปฆฺนญฺโจปจารกํ, เนมานิ วาญฺฉสิ ตฺวํ หิ น ไจเตษุ ปฺรตุษฺยสีติฯ
9 मग तो म्हणाला, “हा मी आहे! तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.” दुसरे स्थापावे म्हणून तो पहिले काढून टाकतो.
ตต: ปรํ เตโนกฺตํ ยถา, "ปศฺย มโน'ภิลาษํ เต กรฺตฺตุํ กุรฺเวฺว สมาคมํ;" ทฺวิตียมฺ เอตทฺ วากฺยํ สฺถิรีกรฺตฺตุํ ส ปฺรถมํ ลุมฺปติฯ
10 १० देवाच्या इच्छेनुसार येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह अर्पणाद्वारे आपण पवित्र करण्यात आलो आहोत.
เตน มโน'ภิลาเษณ จ วยํ ยีศุขฺรีษฺฏไสฺยกกฺฤตฺว: สฺวศรีโรตฺสรฺคาตฺ ปวิตฺรีกฺฤตา อภวามฯ
11 ११ प्रत्येक याजक तर दररोज सेवा करत आणि ज्यामुळे पाप नाहीसे होत नाही असे यज्ञ तो वारंवार अर्पण करतो.
อปรมฺ เอไกโก ยาชก: ปฺรติทินมฺ อุปาสนำ กุรฺวฺวนฺ ไยศฺจ ปาปานิ นาศยิตุํ กทาปิ น ศกฺยนฺเต ตาทฺฤศานฺ เอกรูปานฺ พลีนฺ ปุน: ปุนรุตฺสฺฤชนฺ ติษฺฐติฯ
12 १२ परंतु आपल्या पापांबद्दल सर्वकाळासाठी एकदाच ख्रिस्ताने अर्पण केले व तो आता देवाच्या उजवीकडे बसला आहे.
กินฺตฺวเสา ปาปนาศกมฺ เอกํ พลึ ทตฺวานนฺตกาลารฺถมฺ อีศฺวรสฺย ทกฺษิณ อุปวิศฺย
13 १३ आणि तेव्हापासून आपले वैरी नमवून आपले पादासन होईपर्यंत वाट पाहत आहे.
ยาวตฺ ตสฺย ศตฺรวสฺตสฺย ปาทปีฐํ น ภวนฺติ ตาวตฺ ปฺรตีกฺษมาณสฺติษฺฐติฯ
14 १४ कारण जे पवित्र केले जात आहेत त्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्वकाळासाठी पूर्ण केले.
ยต เอเกน พลิทาเนน โส'นนฺตกาลารฺถํ ปูยมานานฺ โลกานฺ สาธิตวานฺฯ
15 १५ पवित्र आत्माही याबाबत आपल्याला साक्ष देतो. पहिल्यांदा तो असे म्हणतो,
เอตสฺมินฺ ปวิตฺร อาตฺมาปฺยสฺมากํ ปกฺเษ ปฺรมาณยติ
16 १६ परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसानंतर त्यांच्याशी मी करार करीन तो हा; मी माझे नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन.”
"ยโต เหโตสฺตทฺทินาตฺ ปรมฺ อหํ ไต: สารฺทฺธมฺ อิมํ นิยมํ สฺถิรีกริษฺยามีติ ปฺรถมต อุกฺตฺวา ปรเมศฺวเรเณทํ กถิตํ, เตษำ จิตฺเต มม วิธีนฺ สฺถาปยิษฺยามิ เตษำ มน: สุ จ ตานฺ เลขิษฺยามิ จ,
17 १७ “आणि मी त्यांची पापे व अधर्म कृत्ये कधीही आठवणारच नाही.”
อปรญฺจ เตษำ ปาปานฺยปราธำศฺจ ปุน: กทาปิ น สฺมาริษฺยามิฯ "
18 १८ जेथे या पापांची क्षमा झाली आहे, तेथे पापाबद्दल अर्पण व्हायचे नाही.
กินฺตุ ยตฺร ปาปโมจนํ ภวติ ตตฺร ปาปารฺถกพลิทานํ ปุน รฺน ภวติฯ
19 १९ म्हणून बंधूनो, येशूच्या रक्ताद्वारे आपल्याला परमपवित्रस्थानात जाण्याचे धैर्य आहे.
อโต เห ภฺราตร: , ยีโศ รุธิเรณ ปวิตฺรสฺถานปฺรเวศายาสฺมากมฺ อุตฺสาโห ภวติ,
20 २० त्याने पडद्यामधून म्हणजे आपल्या स्वतःच्या देहातून, आपल्यासाठी ती नवीन व जिवंत वाट स्थापित केली आहे.
ยต: โส'สฺมทรฺถํ ติรสฺกริณฺยารฺถต: สฺวศรีเรณ นวีนํ ชีวนยุกฺตญฺไจกํ ปนฺถานํ นิรฺมฺมิตวานฺ,
21 २१ कारण देवाच्या घरावर आपल्याला महान असा मुख्य याजक मिळाला आहे.
อปรญฺเจศฺวรียปริวารสฺยาธฺยกฺษ เอโก มหายาชโก'สฺมากมสฺติฯ
22 २२ म्हणून आपली हृदये दुष्ट विवेकभावापासून मुक्त होण्यासाठी शिंपडलेली आणि आपले शरीर निर्मळ पाण्याने धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे.
อโต เหโตรสฺมาภิ: สรลานฺต: กรไณ รฺทฺฤฒวิศฺวาไส: ปาปโพธาตฺ ปฺรกฺษาลิตมโนภิ รฺนิรฺมฺมลชเล สฺนาตศรีไรศฺเจศฺวรมฺ อุปาคตฺย ปฺรตฺยาศายา: ปฺรติชฺญา นิศฺจลา ธารยิตวฺยาฯ
23 २३ आपल्याला जी आशा आहे तिला आपण घट्ट धरुन राहू कारण ज्याने आपल्याला अभिवचन दिले, तो विश्वासू आहे.
ยโต ยสฺตามฺ องฺคีกฺฤตวานฺ ส วิศฺวสนีย: ฯ
24 २४ आपण एकमेकांस समजून घेऊ व प्रीती आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ.
อปรํ เปฺรมฺนิ สตฺกฺริยาสุ ไจไกกโสฺยตฺสาหวฺฤทฺธฺยรฺถมฺ อสฺมาภิ: ปรสฺปรํ มนฺตฺรยิตวฺยํฯ
25 २५ आपण कित्येकाच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि देवाचा दिवस जवळ येत असताना अधीकाधीक उत्तेजन द्यावे.
อปรํ กติปยโลกา ยถา กุรฺวฺวนฺติ ตถาสฺมาภิ: สภากรณํ น ปริตฺยกฺตวฺยํ ปรสฺปรมฺ อุปเทษฺฏวฺยญฺจ ยตสฺตตฺ มหาทินมฺ อุตฺตโรตฺตรํ นิกฏวรฺตฺติ ภวตีติ ยุษฺมาภิ รฺทฺฤศฺยเตฯ
26 २६ सत्याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरसुद्धा जर आपण जाणूनबुजून पाप करीत राहिलो, तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही.
สตฺยมตสฺย ชฺญานปฺราปฺเต: ปรํ ยทิ วยํ สฺวํจฺฉยา ปาปาจารํ กุรฺมฺมสฺตรฺหิ ปาปานำ กฺฤเต 'นฺยตฺ กิมปิ พลิทานํ นาวศิษฺยเต
27 २७ पण जे देवाला विरोध करतात त्यांना भयंकर अशा न्यायनिवाड्याशिवाय व भयंकर अशा भस्म करणाऱ्या अग्नीशिवाय दुसरे काही शिल्लक राहिले नाही.
กินฺตุ วิจารสฺย ภยานกา ปฺรตีกฺษา ริปุนาศกานลสฺย ตาปศฺจาวศิษฺยเตฯ
28 २८ जो कोणी मोशेचे नियमशास्त्र नाकारतो त्यास दोघा किंवा तिघांच्या साक्षीच्या आधारे कसलीही दया न दाखविता मरणदंड होतो.
ย: กศฺจิตฺ มูสโส วฺยวสฺถามฺ อวมนฺยเต ส ทยำ วินา ทฺวโยสฺติสฺฤณำ วา สากฺษิณำ ปฺรมาเณน หนฺยเต,
29 २९ तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवले, कराराच्या ज्या रक्ताने त्यास पवित्र केले त्या रक्ताला अपवित्र ठरवले आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, तो मनुष्य किती अधिक दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हास वाटते?
ตสฺมาตฺ กึ พุธฺยเธฺว โย ชน อีศฺวรสฺย ปุตฺรมฺ อวชานาติ เยน จ ปวิตฺรีกฺฤโต 'ภวตฺ ตตฺ นิยมสฺย รุธิรมฺ อปวิตฺรํ ชานาติ, อนุคฺรหกรมฺ อาตฺมานมฺ อปมนฺยเต จ, ส กิยนฺมหาโฆรตรทณฺฑสฺย โยโคฺย ภวิษฺยติ?
30 ३० कारण त्यास ओळखतो तो म्हणतो, “सूड घेणे माझ्या हाती आहे; मी परतफेड करीन.” पुन्हा तो असे म्हणतो, “प्रभू आपल्या लोकांचा न्याय करील.”
ยต: ปรเมศฺวร: กถยติ, "ทานํ ผลสฺย มตฺกรฺมฺม สูจิตํ ปฺรททามฺยหํฯ " ปุนรปิ, "ตทา วิจารยิษฺยนฺเต ปเรเศน นิชา: ปฺรชา: ฯ " อิทํ ย: กถิตวานฺ ตํ วยํ ชานีม: ฯ
31 ३१ जिवंत देवाच्या हाती सापडणे किती भयंकर गोष्ट आहे.
อมเรศฺวรสฺย กรโย: ปตนํ มหาภยานกํฯ
32 ३२ ते पूर्व काळचे दिवस आठवा, जेव्हा नुकताच तुम्हास सुवार्तेचा प्रकाश प्राप्त होत असता, तेव्हा तुम्ही भयंकर दुःखे सोसली.
เห ภฺราตร: , ปูรฺวฺวทินานิ สฺมรต ยตสฺตทานีํ ยูยํ ทีปฺตึ ปฺราปฺย พหุทุรฺคติรูปํ สํคฺรามํ สหมานา เอกโต นินฺทาเกฺลไศ: เกาตุกีกฺฤตา อภวต,
33 ३३ काही वेळा जाहीरपणे तुमचा अपमान करण्यात आला आणि वाईट शब्द वापरण्यात आले, तर काही वेळा ज्यांना अशा रीतीने वागणूक मिळाली त्यांचे सहभागी व्हावे लागले.
อนฺยตศฺจ ตทฺโภคินำ สมำศิโน 'ภวตฯ
34 ३४ जे तुरूंगात होते त्यांना तुम्ही समदुःखी झाला आणि जे तुमच्याकडे होते ते तुमच्याकडून घेण्यात आले तरी तुम्ही आनंदी होता कारण तुमच्याजवळ अधिक चांगली व सर्वकाळ टिकणारी संपत्ती आहे, हे तुम्ही जाणून होता.
ยูยํ มม พนฺธนสฺย ทุ: เขน ทุ: ขิโน 'ภวต, ยุษฺมากมฺ อุตฺตมา นิตฺยา จ สมฺปตฺติ: สฺวรฺเค วิทฺยต อิติ ชฺญาตฺวา สานนฺทํ สรฺวฺวสฺวสฺยาปหรณมฺ อสหธฺวญฺจฯ
35 ३५ म्हणून धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे.
อเตอว มหาปุรสฺการยุกฺตํ ยุษฺมากมฺ อุตฺสาหํ น ปริตฺยชตฯ
36 ३६ तुम्ही धीर धरणे जरूरीचे आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करून त्याने तुम्हास दिलेल्या त्याच्या वचनाप्रमाणे तुम्हास प्रतिफळ मिळावे.
ยโต ยูยํ เยเนศฺวรเสฺยจฺฉำ ปาลยิตฺวา ปฺรติชฺญายา: ผลํ ลภธฺวํ ตทรฺถํ ยุษฺมาภิ ไรฺธรฺยฺยาวลมฺพนํ กรฺตฺตวฺยํฯ
37 ३७ पवित्र शास्त्र असे म्हणते; कारण अगदी थोडा वेळ राहीला आहे; “जो येणारा आहे, तो येईल, तो उशीर लावणार नाही.
เยนาคนฺตวฺยํ ส สฺวลฺปกาลาตฺ ปรมฺ อาคมิษฺยติ น จ วิลมฺพิษฺยเตฯ
38 ३८ माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल; आणि जर तो माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष होणार नाही.”
"ปุณฺยวานฺ ชโน วิศฺวาเสน ชีวิษฺยติ กินฺตุ ยทิ นิวรฺตฺตเต ตรฺหิ มม มนสฺตสฺมินฺ น โตษํ ยาสฺยติฯ "
39 ३९ परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यापैकी आपण नाही; तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहोत.
กินฺตุ วยํ วินาศชนิกำ ธรฺมฺมาตฺ นิวฺฤตฺตึ น กุรฺวฺวาณา อาตฺมน: ปริตฺราณาย วิศฺวาสํ กุรฺวฺวามเหฯ

< इब्री 10 >