< इब्री 1 >

1 देव प्राचीन काळांमध्ये आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे अनेक वेळेस वेगवेगळ्या मार्गांनी बोलला,
神既在古时借着众先知多次多方地晓谕列祖,
2 परंतु या शेवटच्या दिवसात तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने पुत्राकरवीच विश्व निर्माण केले. (aiōn g165)
就在这末世借着他儿子晓谕我们;又早已立他为承受万有的,也曾借着他创造诸世界。 (aiōn g165)
3 पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांस त्यांच्या पापांपासून शुद्ध केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूला बसला.
他是 神荣耀所发的光辉,是 神本体的真像,常用他权能的命令托住万有。他洗净了人的罪,就坐在高天至大者的右边。
4 तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ झाला. त्याचे नावसुद्धा जे वारशाने त्यास मिळाले ते त्यांच्या नावापेक्षा श्रेष्ठ आहे.
他所承受的名,既比天使的名更尊贵,就远超过天使。
5 देवाने कोणत्याही देवदूताला म्हणले नाही कीः “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे?” आणि पुन्हा, ‘मी त्याचा पिता होईन, व तो माझा पुत्र होईल?’
所有的天使, 神从来对哪一个说: 你是我的儿子, 我今日生你? 又指着哪一个说: 我要作他的父, 他要作我的子?
6 आणि पुन्हा, देव जेव्हा त्याच्या पुत्राला जगामध्ये आणतो, तो म्हणतो, “देवाचे सर्व देवदूत त्यास नमन करोत.”
再者, 神使长子到世上来的时候,就说: 神的使者都要拜他。
7 देवदूताविषयी देव असे म्हणतो, “तो त्याच्या देवदूतांना वायु बनवतो, आणि त्याच्या सेवकांना तो अग्नीच्या ज्वाला बनवतो.”
论到使者,又说: 神以风为使者, 以火焰为仆役;
8 पुत्राविषयी तर तो असे म्हणतोः हे देवा, तुझे राजासन सदासर्वकाळासाठी आहे, आणि तुझे राज्य युगानुयुगीचे आहे आणि “तुझा राजदंड न्यायीपणाचा राजदंड आहे. (aiōn g165)
论到子却说: 神啊,你的宝座是永永远远的; 你的国权是正直的。 (aiōn g165)
9 नीतिमत्त्व तुला नेहमी प्रिय आहे. अनीतीचा तू द्वेष करतोस. म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझ्या सोबत्यांपेक्षा तुला आनंददायी तेलाचा अभिषेक केला आहे.”
你喜爱公义,恨恶罪恶; 所以 神,就是你的 神,用喜乐油膏你, 胜过膏你的同伴;
10 १० आणि हे प्रभू, सुरुवातीला तू पृथ्वीचा पाया घातलास, आणि आकाश तुझ्या हातचे काम आहे.
又说:主啊,你起初立了地的根基; 天也是你手所造的。
11 ११ ती संपुष्टात येतील पण तू सतत राहशील ते कापडासारखे जुने होतील.
天地都要灭没,你却要长存。 天地都要像衣服渐渐旧了;
12 १२ तू त्यांना अंगरख्यासारखे गुंडाळशील, तू त्यांना कपड्यासारखे बदलशील, पण तू नेहमी सारखाच राहशील, आणि तुझी वर्षे कधीही संपणार नाहीत.
你要将天地卷起来,像一件外衣, 天地就都改变了。 惟有你永不改变; 你的年数没有穷尽。
13 १३ तो कोणत्याही दूताला असे म्हणाला नाही, तुझ्या वैऱ्याला तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस.
所有的天使, 神从来对哪一个说: 你坐在我的右边, 等我使你仇敌作你的脚凳?
14 १४ सर्व देवदूत देवाच्या सेवेतील आत्मे नाहीत काय? आणि तारणाचा वारसा ज्यांना मिळेल त्यांना मदत करायला ते पाठवले जातात की नाही?
天使岂不都是服役的灵、奉差遣为那将要承受救恩的人效力吗?

< इब्री 1 >