< हबक्कूक 2 >
1 १ मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहिन आणि बुरुजावर पहारा करीन, आणि तो मला काय म्हणेल व माझ्या तक्रारीपासून मी कसा वळेन ते लक्षपूर्वक पाहीन.
I will climb my watchtower; I will take my place on the city wall. I will keep watch and see what he will say to me, how he will answer my grievances.
2 २ परमेश्वराने मला उत्तर दिले आणि म्हटले, “मी तुला जो दृष्टांत दाखवतो, तो स्पष्टपणे पाट्यांवर लिहून ठेव अशासाठी की जो कोणी ते वाचतो त्याने धावावे!
Then the Lord told me, Write down the vision, inscribe it on tablets, so it can be easily read.
3 ३ कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी अजून राखून ठेवला आहे, शेवटी तो बोलणार व फसवणार नाही, जरी त्यांने विलंब केला तरी, त्याची वाट पाहा! खचित तो येणारच आणि थांबणार नाही!
For the vision is for a future time, it is about the end and it does not lie. If it seems slow in being fulfilled, wait for it, for it will definitely come—it will not be delayed!
4 ४ पाहा! मनुष्याचा आत्मा गर्विष्ठ झाला आहे, आणि स्वत: च्या ठायीच तो सरळ नाही, परंतू न्यायी आपल्या विश्वासाने वाचेल.
Look at those who are proud! They do not live right. But those who live right do so through their trust in God.
5 ५ कारण द्राक्षरस तर विश्वासघात करणारा आहे, तो उन्मत्त तरूण पुरुष आहे आणि घरी राहत नाही. परंतू तो कबरेसारख्या आपल्या इच्छा वाढवतो, तो मृत्यूसारखा असतो, तो कधीच तृप्त होत नाही. तो आपल्याजवळ प्रत्येक राष्ट्र एकत्र करतो आणि आपल्यासाठी सर्व लोकांस एकत्र करतो. (Sheol )
In addition wealth provides no security. Those who are arrogant never have any peace; their greedy mouths are as wide open as the grave, and like death they are never satisfied. They gather nations like possessions, swallowing up many peoples. (Sheol )
6 ६ सर्वच लोक त्याच्या विरुद्ध बोधकथा घेणार नाहीत काय, आणि त्यास म्हणीने टोमणे मारतील व म्हणतील. जो आपले नाही ते वाढवतो, त्यास हाय हाय! कारण किती वेळ तू घेतलेल्या प्रतिज्ञांचा बोजा वाढवशील?
Won't all these peoples taunt them? They will ridicule them, saying, “What disaster is coming to you who pile up things that don't belong to you! You make yourselves rich by forcing debtors to pay! How long can you go on doing this?”
7 ७ तुला भेवाडणारे व तुझ्यावर कडक टीका करणारे असे अचानक उठणार नाहीत काय? तू त्यांच्यासाठी बली असा होशील.
Won't your debtors suddenly act? Won't they wake up to the situation and make you tremble? You will be plunder for them!
8 ८ कारण तू पुष्कळ राष्ट्रे लुटली आहेत, म्हणून त्या लोकांतले उरलेले तुला लुटतील, ते अशासाठी की, मनुष्याच्या रक्तामुळे, देश व गावे यांच्यावर केलेले जुलूम ह्यांमुळे त्या देशांतील व गावांतील लोक तुला लुटतील.
Because you have plundered many nations, those who are left will plunder you—for the human blood you have shed and the destruction you brought on lands and cities, and those who lived there.
9 ९ ‘जो आपल्या घराण्यासाठी वाईट लाभ मिळवतो व त्याद्वारे अरीष्टांच्या हातातून सुटावे म्हणून आपले घरटे उंच स्थापितो, त्यास हाय हाय!’
What disaster is coming to you who build houses through dishonest gain! You think you can place your “nest” so high it will be safe from disaster.
10 १० तू अनेक लोकांस मारलेस, त्यामुळे तू स्वत: च्या घरासाठी अप्रतिष्ठा तयार केली आहेस आणि आपल्या स्वत: च्या जिवा विरुद्ध पाप केले आहेस.
Your evil schemes have brought shame upon your families, by destroying many nations you have forfeited your own lives.
11 ११ भिंतीतील दगडसुध्दा तुझ्याविरुध्द ओरडतील आणि तुझ्या घराचे वासे त्यांना उत्तर देतील.
Even the stones in the wall cry out in condemnation, and the wooden rafters join in too.
12 १२ ‘जो रक्ताने शहर बांधतो, आणि जो अन्यायाने गाव वसवितो त्यास हाय हाय!’
What disaster is coming to you who build cities with bloodshed, who found cities built on wickedness!
13 १३ त्या लोकांनी उभारलेले सर्व आगीत भस्मसात होईल, आणि राष्ट्रे केवळ व्यर्थतेसाठी थकतील, हे सैन्याच्या परमेश्वरा कडून घडून आले नाही काय?
Hasn't the Lord Almighty decided that all such nations work for will be destroyed by fire, that they wear themselves out for nothing?
14 १४ तरीही जसे पाणी समुद्राला झाकते, तशी पृथ्वी परमेश्वराच्या गौरवाच्या ज्ञानाने भरेल.
For the earth will be filled with the knowledge of the Lord's glory as the waters fill the sea.
15 १५ ‘जी व्यक्ती आपल्या शेजाऱ्याला मद्य प्यायला लावते त्यास हाय हाय! तू आपले विष त्यामध्ये घालून त्यास मस्त करतो,’ ह्यासाठी की त्याचे नग्नपण पाहावे.
What disaster is coming to you who make your neighbors drunk! You force your cup of anger on them and make them drink so you may see them naked.
16 १६ तू गौरवाने नाही तर अप्रतिष्ठेणे भरला आहेस! तू पण त्याची चव घे आणि आपली नग्नता प्रकट कर! परमेश्वराच्या उजव्या हातांतला प्याला तुझ्याकडे फिरत येईल, आणि तुझ्या सर्व गौरवावर अप्रतिष्ठा पसरवली जाईल.
In turn you will be filled with shame instead of glory. Drink yourself and expose your nakedness! The cup the Lord holds in his right hand will be passed round to you and your glory will turn to shame.
17 १७ लबानोनावर केलेला जुलूम तुला झाकेल आणि पशूंचा केलेला नाश तुला भयभीत करील. कारण मनुष्याचा रक्तपात व तेथील भूमीवर, शहरांवर, आणि त्यातील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम ह्यांमुळे असे होईल.
As you destroyed the forests of Lebanon you will also be destroyed; you hunted the animals there, and now they will hunt you. For you shed human blood and you destroyed lands and cities, along with those who lived there.
18 १८ मूर्तीकाराने कोरून केलेल्या मुर्तिंमध्ये त्यास काय लाभ? कारण जो कोणी त्यास कोरतो, किंवा ओतीव मूर्ती तयार करतो, तो खोटा शिक्षक आहे, कारण तो जेव्हा अशा मुक्या देवांना बनवतो तेव्हा तो स्वतःच्या हस्तकृतीवर विश्वास ठेवतो, जेव्हा तो अशा मुक्या देवांना बनवतो.
What use is a wooden idol carved by human hands, or a metal image that teaches lies? What is the point of their makers trusting in their own handiwork, creating idols that can't speak?
19 १९ जो लाकडांच्या मूर्तीस म्हणतो जागा हो! किंवा दगडांच्या मूर्तीस म्हणतो ऊठ! त्यास हाय हाय! या वस्तू शिकवतील काय? पाहा! ते सोन्याने आणि चांदीने मढवले आहेत, पण त्यामध्ये मुळीच श्वास नाही.
What disaster is coming to you who say to something made of wood, “Wake up!” or to lifeless stone, “Get up!” Can it teach you anything? Look at it! It's covered with gold and silver, but there is no life inside it.
20 २० परंतु परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरात आहे, सर्व पृथ्वी त्यापुढे स्तब्ध राहो!”
But the Lord is in his holy Temple; let all the earth be silent in his presence.