< हबक्कूक 2 >

1 मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहिन आणि बुरुजावर पहारा करीन, आणि तो मला काय म्हणेल व माझ्या तक्रारीपासून मी कसा वळेन ते लक्षपूर्वक पाहीन.
我要站在守望所, 立在望楼上观看, 看耶和华对我说什么话, 我可用什么话向他诉冤。
2 परमेश्वराने मला उत्तर दिले आणि म्हटले, “मी तुला जो दृष्टांत दाखवतो, तो स्पष्टपणे पाट्यांवर लिहून ठेव अशासाठी की जो कोणी ते वाचतो त्याने धावावे!
他对我说:将这默示明明地写在版上, 使读的人容易读。
3 कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी अजून राखून ठेवला आहे, शेवटी तो बोलणार व फसवणार नाही, जरी त्यांने विलंब केला तरी, त्याची वाट पाहा! खचित तो येणारच आणि थांबणार नाही!
因为这默示有一定的日期, 快要应验,并不虚谎。 虽然迟延,还要等候; 因为必然临到,不再迟延。
4 पाहा! मनुष्याचा आत्मा गर्विष्ठ झाला आहे, आणि स्वत: च्या ठायीच तो सरळ नाही, परंतू न्यायी आपल्या विश्वासाने वाचेल.
迦勒底人自高自大,心不正直; 惟义人因信得生。
5 कारण द्राक्षरस तर विश्वासघात करणारा आहे, तो उन्मत्त तरूण पुरुष आहे आणि घरी राहत नाही. परंतू तो कबरेसारख्या आपल्या इच्छा वाढवतो, तो मृत्यूसारखा असतो, तो कधीच तृप्त होत नाही. तो आपल्याजवळ प्रत्येक राष्ट्र एकत्र करतो आणि आपल्यासाठी सर्व लोकांस एकत्र करतो. (Sheol h7585)
迦勒底人因酒诡诈,狂傲, 不住在家中, 扩充心欲,好像阴间。 他如死不能知足, 聚集万国,堆积万民都归自己。 (Sheol h7585)
6 सर्वच लोक त्याच्या विरुद्ध बोधकथा घेणार नाहीत काय, आणि त्यास म्हणीने टोमणे मारतील व म्हणतील. जो आपले नाही ते वाढवतो, त्यास हाय हाय! कारण किती वेळ तू घेतलेल्या प्रतिज्ञांचा बोजा वाढवशील?
这些国的民岂不都要提起诗歌并俗语讥刺他说: 祸哉!迦勒底人,你增添不属自己的财物, 多多取人的当头,要到几时为止呢?
7 तुला भेवाडणारे व तुझ्यावर कडक टीका करणारे असे अचानक उठणार नाहीत काय? तू त्यांच्यासाठी बली असा होशील.
咬伤你的岂不忽然起来, 扰害你的岂不兴起, 你就作他们的掳物吗?
8 कारण तू पुष्कळ राष्ट्रे लुटली आहेत, म्हणून त्या लोकांतले उरलेले तुला लुटतील, ते अशासाठी की, मनुष्याच्या रक्तामुळे, देश व गावे यांच्यावर केलेले जुलूम ह्यांमुळे त्या देशांतील व गावांतील लोक तुला लुटतील.
因你抢夺许多的国,杀人流血, 向国内的城并城中一切居民施行强暴, 所以各国剩下的民都必抢夺你。
9 ‘जो आपल्या घराण्यासाठी वाईट लाभ मिळवतो व त्याद्वारे अरीष्टांच्या हातातून सुटावे म्हणून आपले घरटे उंच स्थापितो, त्यास हाय हाय!’
为本家积蓄不义之财、 在高处搭窝、指望免灾的有祸了!
10 १० तू अनेक लोकांस मारलेस, त्यामुळे तू स्वत: च्या घरासाठी अप्रतिष्ठा तयार केली आहेस आणि आपल्या स्वत: च्या जिवा विरुद्ध पाप केले आहेस.
你图谋剪除多国的民,犯了罪, 使你的家蒙羞,自害己命。
11 ११ भिंतीतील दगडसुध्दा तुझ्याविरुध्द ओरडतील आणि तुझ्या घराचे वासे त्यांना उत्तर देतील.
墙里的石头必呼叫; 房内的栋梁必应声。
12 १२ ‘जो रक्ताने शहर बांधतो, आणि जो अन्यायाने गाव वसवितो त्यास हाय हाय!’
以人血建城、 以罪孽立邑的有祸了!
13 १३ त्या लोकांनी उभारलेले सर्व आगीत भस्मसात होईल, आणि राष्ट्रे केवळ व्यर्थतेसाठी थकतील, हे सैन्याच्या परमेश्वरा कडून घडून आले नाही काय?
众民所劳碌得来的被火焚烧, 列国由劳乏而得的归于虚空, 不都是出于万军之耶和华吗?
14 १४ तरीही जसे पाणी समुद्राला झाकते, तशी पृथ्वी परमेश्वराच्या गौरवाच्या ज्ञानाने भरेल.
认识耶和华荣耀的知识要充满遍地, 好像水充满洋海一般。
15 १५ ‘जी व्यक्ती आपल्या शेजाऱ्याला मद्य प्यायला लावते त्यास हाय हाय! तू आपले विष त्यामध्ये घालून त्यास मस्त करतो,’ ह्यासाठी की त्याचे नग्नपण पाहावे.
给人酒喝、又加上毒物、 使他喝醉、好看见他下体的有祸了!
16 १६ तू गौरवाने नाही तर अप्रतिष्ठेणे भरला आहेस! तू पण त्याची चव घे आणि आपली नग्नता प्रकट कर! परमेश्वराच्या उजव्या हातांतला प्याला तुझ्याकडे फिरत येईल, आणि तुझ्या सर्व गौरवावर अप्रतिष्ठा पसरवली जाईल.
你满受羞辱,不得荣耀; 你也喝吧,显出是未受割礼的! 耶和华右手的杯必传到你那里; 你的荣耀就变为大大地羞辱。
17 १७ लबानोनावर केलेला जुलूम तुला झाकेल आणि पशूंचा केलेला नाश तुला भयभीत करील. कारण मनुष्याचा रक्तपात व तेथील भूमीवर, शहरांवर, आणि त्यातील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम ह्यांमुळे असे होईल.
你向黎巴嫩行强暴与残害 惊吓野兽的事必遮盖你; 因你杀人流血, 向国内的城并城中一切居民施行强暴。
18 १८ मूर्तीकाराने कोरून केलेल्या मुर्तिंमध्ये त्यास काय लाभ? कारण जो कोणी त्यास कोरतो, किंवा ओतीव मूर्ती तयार करतो, तो खोटा शिक्षक आहे, कारण तो जेव्हा अशा मुक्या देवांना बनवतो तेव्हा तो स्वतःच्या हस्तकृतीवर विश्वास ठेवतो, जेव्हा तो अशा मुक्या देवांना बनवतो.
雕刻的偶像,人将它刻出来, 有什么益处呢? 铸造的偶像就是虚谎的师傅。 制造者倚靠这哑巴偶像有什么益处呢?
19 १९ जो लाकडांच्या मूर्तीस म्हणतो जागा हो! किंवा दगडांच्या मूर्तीस म्हणतो ऊठ! त्यास हाय हाय! या वस्तू शिकवतील काय? पाहा! ते सोन्याने आणि चांदीने मढवले आहेत, पण त्यामध्ये मुळीच श्वास नाही.
对木偶说:醒起! 对哑巴石像说:起来!那人有祸了! 这个还能教训人吗? 看哪,是包裹金银的,其中毫无气息。
20 २० परंतु परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरात आहे, सर्व पृथ्वी त्यापुढे स्तब्ध राहो!”
惟耶和华在他的圣殿中; 全地的人都当在他面前肃敬静默。

< हबक्कूक 2 >