< हबक्कूक 1 >
1 १ संदेष्टा हबक्कूक याला मिळालेले देववचन.
Brzemię, które widział prorok Habakuk.
2 २ “हे परमेश्वरा, मदतीसाठी मी किती वेळ आरोळी मारू, आणि तू ऐकणार नाहीस? जाचजुलमात व भयात मी तुला आरोळी मारली, पण तू मला वाचवत नाहीस!
PANIE, jak długo będę wołać, a nie będziesz wysłuchiwał? [Jak długo] będę krzyczeć do ciebie [o] krzywdzie, a nie będziesz wybawiał?
3 ३ तू मला अन्याय व अनर्थ का पाहायला लावतोस? नाश आणि हिंसा माझ्यासमोर आहेत; आणि भांडण व वाद उठतो!
Czemu dopuszczasz, abym patrzył na nieprawość i widział bezprawie? Zguba i przemoc są przede mną i znajduje się ten, który roznieca spory i niezgodę.
4 ४ ह्यास्तव नियमशास्त्र कमकुवत झाले आहे, आणि न्याय कोणत्याही वेळी टिकत नाही, कारण दुष्ट नितीमानाला घेरतो, त्यामुळे खोटा न्याय बाहेर येतो.”
Dlatego prawo jest naruszone, a nie ma już sprawiedliwości. Niegodziwy bowiem osacza sprawiedliwego, dlatego wydawane są błędne wyroki.
5 ५ “इतर राष्ट्रांकडे पाहा! त्यांचे परिक्षण करा, आणि आश्चर्याने विस्मित व्हा! कारण खचित मी तुमच्या दिवसात अशा काही गोष्टी करणार की, त्या तुम्हास सांगण्यात येतील तेव्हा तुमचा विश्वास बसणार नाही.
Spójrzcie na narody, zobaczcie i zdumiejcie się bardzo, gdyż dokonuję dzieła za waszych dni, w które nie uwierzycie, gdy wam o nim opowiedzą.
6 ६ कारण पाहा! मी खास्द्यांची उठावनी करतो, ते भयानक व उतावळे राष्ट्र आहे. जी घरे त्यांची नाहीत, त्यांचा ताबा घ्यायला ते पृथ्वीच्या विस्तारावरून चाल करीत आहेत.
Oto bowiem wzbudzę Chaldejczyków, naród srogi i gwałtowny; przejdą przez szerokość ziemi, aby posiąść cudze miejsca zamieszkania.
7 ७ ते दारूण व भयंकर आहेत, त्यांचा न्याय व त्यांचे वैभव ही त्यांच्यापासूनच पुढे जातात.
Straszni [są] i groźni. Sami ustalają swój sąd i swoją wielkość.
8 ८ त्यांचे घोडे चित्यांपेक्षा वेगवान आहेत आणि संध्याकाळच्या लांडग्यांपेक्षा जलद आहेत. त्यांचे घोडेस्वार दिमाखाने पुढे धावत जातात, आणि त्यांचे घोडेस्वार दूरून येतात, खाण्यासाठी घाई करणाऱ्या गरुडाप्रमाणे ते उडतात.
Ich konie są szybsze niż lamparty, dziksze niż wilki o zmierzchu. Ich jeźdźcy rozciągną się szeroko, ich jeźdźcy przybędą z daleka, przylecą jak orzeł spieszący się na żer.
9 ९ ते सर्व हिंसा करण्यास येतात, त्यांचा जमाव वाळवंटातील वाऱ्याप्रमाणे समोर जातो, आणि ते बंदिवानास वाळूप्रमाणे गोळा करतात!
Każdy z nich przybędzie dla łupu. Ich twarze będą zwrócone na wschód i zgromadzą jeńców jak piasek.
10 १० म्हणून ते राजांची थट्टा करतील, आणि राज्यकर्ते त्यांच्यासाठी केवळ चेष्टा असे आहेत! ते प्रत्येक दुर्गाला हसतात, कारण तो धुळीचा ढीग करून तो ताब्यात घेतात!
Będą szydzić z królów, a książęta [będą] u nich przedmiotem pogardy. Z każdej twierdzy będą się naśmiewać, usypią wały i zdobędą ją.
11 ११ मग ते वाऱ्याप्रमाणे सुसाट्याने पार जातील व दोषी होतील, त्यांचा असा समज आहे की आमचा पराक्रम आमचा देव आहे.”
Wtedy [jego] duch się odmieni, a wystąpi i zawini, [myśląc], że jego moc [pochodzi] od jego boga.
12 १२ “हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या पवित्रा, तू प्राचीनकाळापासून नाहीस काय? आम्ही मरणार नाही. परमेश्वरा तू त्यांना न्यायासाठी नेमले आहे, आणि हे खडका तू त्यांना शासन करण्यासाठीच स्थापिले आहे.
Czy ty nie jesteś od wieków, PANIE, mój Boże, mój Święty? [My] nie umrzemy. PANIE, postawiłeś ich na sąd. Ty, [nasza] Skało, przeznaczyłeś ich na karanie.
13 १३ तुझे डोळे इतके पवित्र आहेत की त्यांना दुष्टपणा पाहवत नाही, आणि तुझ्याने वाईटाकडे दृष्टी लावली जात नाही. मग जे विश्वासघाती आहेत त्यांच्याकडे तू का पाहतोस? जो आपल्याहून नीतिमान त्यास जेव्हा दुर्जन गिळून टाकतो तेव्हा तू का शांत राहतोस?
Twoje oczy są tak czyste, że nie możesz patrzeć na zło ani widzieć bezprawia. Czemu patrzysz na czyniących przewrotność? [Czemu milczysz], gdy niegodziwy pożera sprawiedliwszego niż on sam?
14 १४ तू लोकांस समुद्रातल्या माशांप्रमाणे केले आहेस, त्यांच्यावर अधिकारी नसलेल्या जीवांप्रमाणे ते आहेत.
[Czemu] czynisz ludzi jak ryby morskie, jak zwierzęta pełzające, które nie mają pana?
15 १५ ते त्या गळाने सर्वांना उचलून घेतात; ते आपल्या जाळ्यात त्यांना धरून घेतात आणि पागाने त्यांना गोळा करतात. त्यामुळे ते हर्ष करतात व मोठ्याने ओरडतात.
Wyciąga wszystkie wędką, zagarnia je swoim niewodem i gromadzi je w swojej sieci. Dlatego cieszy się i raduje.
16 १६ म्हणून ते आपल्या माशांच्या जाळ्याला यज्ञ अर्पण करतात आणि आपल्या पागापुढे धूप जाळतात. कारण त्यापासून त्यांना पुष्ट पशूंचा वाटा आणि त्यांचे अन्न म्हणजे चरबी असलेले मांस हे मिळते.
Dlatego składa ofiarę swemu niewodowi i pali kadzidło swojej sieci. Przez nie bowiem jego dział jest obfity i jego pożywienie bogatsze.
17 १७ तेव्हा ते त्यांचे जाळे रिकामे करतील काय? आणि कोणतीही दया न दाखविता, ते राष्ट्रांची कत्तल करीतच राहणार काय?”
Czy dlatego będzie zarzucać swoją sieć, by nieustannie zabijać narody bez litości?