< उत्पत्ति 9 >

1 नंतर देवाने नोहाला व त्याच्या मुलांना आशीर्वाद दिला आणि म्हटले, “फलदायी व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी भरून टाका.
त्यसपछि परमेश्‍वरले नोआ र तिनका छोराहरूलाई आशिष् दिनुभयो र भन्‍नुभयो, “फल्‍दै-फुल्दै, वृद्धि हुँदै र पृथ्वीमा भरिँदै जाओ ।
2 पृथ्वीवरील प्रत्येक जिवंत प्राणी, आकाशातील प्रत्येक पक्षी, जमिनीवर सरपटणारे सर्व प्राणी आणि समुद्रातील सर्व मासे ह्यांच्यावर तुमचे भय व धाक राहील; ते तुमच्या कह्यात दिले आहेत.
जमिनमा चलहल गर्ने हरेक जीवित प्राणी, आकाशका हरेक पक्षी, जमिनमा घस्रने हरेक जन्तु र समुद्रका सबै माछामाथि तिमीहरूको डर र त्रास रहनेछ । ती तिमीहरूका हातमा सुम्पिएका छन् ।
3 प्रत्येक हालचाल करणारा प्राणी हा तुमचे अन्न होईल. जशा मी हिरव्या वनस्पती दिल्या आहेत, तसेच आता सर्वकाही तुम्हास देत आहे.
हरेक चलहल गर्ने प्राणी तिमीहरूका निम्ति भोजन हुनेछन् । मैले तिमीहरूलाई हरिया वनस्पतिहरू दिएजस्तै अब म तिमीहरूलाई सबै थोक दिन्छु ।
4 पण ज्यामध्ये त्याचे जीवन म्हणजे रक्त आहे, ते मांस तुम्ही खाऊ नये.
तर तिमीहरूले मासु त्यसको प्राण दिने रगतसमेत नखाओ ।
5 परंतु तुमच्या रक्तासाठी, जे रक्त तुमचे जीवन आहे, त्याबद्दल मी आवश्यक भरपाई घेईन. प्रत्येक प्राण्याच्या हातून मी ती घेईन. मनुष्याच्या हातून, म्हणजे ज्याने आपल्या भावाचा खून केला आहे त्याच्या हातून, त्या मनुष्याच्या जिवाबद्दल मी भरपाईची मागणी करीन.
तर तिमीहरूको प्राण दिने रगतको साटो म लेखा लिनेछु । हरेक पशुबाट म प्राणको साटो लिनेछु । आफ्नो भाइको हत्या गर्ने हरेक मानिसको हातबाट म त्यस मानिसको प्राणको साटो लिनेछु ।
6 जो कोणी मनुष्याचे रक्त पाडतो, त्याचे रक्त मनुष्याकडून पाडले जाईल, कारण देवाने मनुष्यास त्याच्या प्रतिरूपाचे बनवले आहे.
जसले मानिसको रगत बगाउँछ मानिसद्वारा नै त्यसको रगत बगाइनेछ, किनकि परमेश्‍वरले मानिसलाई आफ्नै स्वरूपमा बनाउनुभयो ।
7 तुम्ही मात्र फलदायी आणि बहुगुणित व्हा, सर्व पृथ्वीवर विस्तारा, आणि तिच्यावर बहुगुणित व्हा.”
तिमीहरूचाहिँ पृथ्वीमा फल्दै-फुल्दै, वृद्धि हुँदै, फैलँदै जाओ ।”
8 मग देव नोहाला व त्याच्या मुलांना म्हणाला,
त्यसपछि परमेश्‍वरले नोआ र तिनका छोराहरूलाई यसो भन्‍नुभयो,
9 “माझे ऐका! मी तुमच्याशी व तुमच्या नंतर तुमच्या वंशजाशी एक करार स्थापन करतो,
“मेरो कुरा सुन! तिमीहरू र तिमीहरूपछि आउने तिमीहरूका सन्तानहरू, तिमीहरूसँगै भएका हरेक जीवित प्राणी अर्थात्
10 १० आणि तुमच्याबरोबर असलेले सर्व जिवंत प्राणी, म्हणजे तुमच्याबरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी, गुरेढोरे, आणि पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी त्यांच्याशीही एक करार स्थापित करतो.
पक्षीहरू, पालिने पशुहरू र जहाजबाट बाहिर आउनेदेखि पृथ्वीमा भएका हरेक जीवित प्राणीसित म मेरो करार स्थापित गर्दै छु ।
11 ११ अशा प्रकारे मी तुमच्याशी करार स्थापित करतो की, यापुढे पुराच्या पाण्याने पृथ्वीवरील सर्व देह पुन्हा कधीही नष्ट केले जाणार नाहीत व पुन्हा कधीही पुराने पृथ्वीचा नाश होणार नाही.”
जलप्रलयको पानीद्वारा फेरि सबै प्राणी नष्‍ट गरिनेछैनन् भनी म मेरो करार तिमीहरूसित स्थापित गर्दछु । पृथ्वीलाई सर्वनाश गर्ने जलप्रलय फेरि कहिल्यै आउनेछैन ।
12 १२ देव म्हणाला, “मी माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये, व तुमच्याबरोबर जे सर्व जिवंत जीव आहेत त्यांच्यामध्ये भावी पिढ्यानपिढ्यासाठी हा करार केल्याची निशाणी हीच आहे.
परमेश्‍वरले भन्‍नुभयो, “पुस्तौँको निम्ति मेरो र तिमीहरूसाथै हरेक जीवित प्राणीसित मैले जुन करार बाँध्दै छु, त्यसको चिन्ह यही हुन्छ
13 १३ मी ढगात मेघधनुष्य ठेवले आहे; ते सर्व पृथ्वी व माझ्यामध्ये केलेल्या कराराची निशाणी आहे.
कि मैले बादलमा इन्द्रेणी राखेको छु, र यो मेरो र पृथ्वीको बिचमा करारको चिन्ह हुनेछ ।
14 १४ मी जेव्हा पृथ्वीवर ढग आणीन तेव्हा तुम्हास ढगात मेघधनुष्य दिसेल,
मैले पृथ्वीमाथि बादल फिँजाउँदा जब इन्द्रेणी देखा पर्छ
15 १५ नंतर मी ते पाहीन तेव्हा मी तुमच्याशी व पृथ्वीवरील सर्व देहातल्या जिवंत प्राण्यांशी केलेल्या माझ्या कराराची मला आठवण होईल, या कराराप्रमाणे पुराच्या पाण्याने पृथ्वीवरील सर्व देहाचा पुन्हा कधीही नाश करणार नाही.
तब म मेरो करारलाई सम्झनेछु जुन करार मेरो र तिमीहरूसाथै हरेक जीवित प्राणीको बिचमा बाँधिएको छ । जलप्रलयले फेरि कहिल्यै सबै प्राणीलाई सर्वनाश गर्नेछैन ।
16 १६ मेघधनुष्य ढगात राहील आणि जो सर्वकाळचा करार देव आणि पृथ्वीवरील सर्व देहातले जिवंत प्राणी यांच्यामध्ये आहे त्याची आठवण म्हणून मी त्याकडे पाहीन.”
परमेश्‍वर र पृथ्वीमा रहेका सबै जीवित प्राणीबिच बाँधिएको नित्य रहिरहने कराको सम्झना गर्नलाई म बादलमा देखा पर्ने इन्द्रेणीलाई हेर्नेछु ।”
17 १७ नंतर देव नोहाला म्हणाला, “हे मेघधनुष्य माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व देहांमध्ये स्थापित केलेल्या कराराची निशाणी आहे.”
तब परमेश्‍वरले नोआलाई भन्‍नुभयो, “मेरो र पृथ्वीमा भएका सबै जीवित प्राणीको बिचमा मैले स्थापित गरेको करारको चिन्ह यही हो ।”
18 १८ नोहाबरोबर त्याचे पुत्र तारवाबाहेर आले; त्यांची नावे शेम, हाम व याफेथ अशी होती. आणि हाम हा कनानाचा पिता होता
जहाजबाट बाहिर निस्केर आएका नोआका छोराहरू शेम, हाम र येपेत थिए । हाम कनानका पिता थिए ।
19 १९ हे नोहाचे तीन पुत्र होते, आणि यांच्यापासूनच सर्व पृथ्वीवर लोकविस्तार झाला.
यी तिन जना नोआका छोराहरू थिए, र यिनीहरूबाट नै समस्त पृथ्वी भरियो ।
20 २० नोहा शेतकरी बनला, आणि त्याने एक द्राक्षमळा लावला.
नोआ किसान हुन लागे, र तिनले दाखबारी लगाए ।
21 २१ तो थोडा द्राक्षरस प्याला आणि तो धुंद झाला. तो त्याच्या तंबूत उघडा-वाघडा पडला होता.
दाखमद्य पिएर तिनी मात्तिए । तिनी आफ्नो पालमा नाङ्गै पल्टिरहेका थिए ।
22 २२ तेव्हा कनानाचा पिता हाम याने आपला पिता उघडा-वागडा पडलेला असल्याचे पाहिले व त्याने तंबूच्या बाहेर येऊन ते आपल्या भावांना सांगितले.
तब कनानका पिता हामले आफ्ना पिताको नाङ्गोपन देखे र बाहिर आएर दुवै दाजुलाई बताइदिए ।
23 २३ मग शेम व याफेथ यांनी एक कपडा घेतला व तो आपल्या खांद्यावर ठेवून ते पाठमोरे तंबूत गेले. अशा प्रकारे त्यांनी आपल्या पित्याची नग्नता झाकली; पाठमोरे असल्यामुळे ती त्यांना दिसली नाही.
त्यसैले, शेम र येपेतले एउटा लबेदा लिएर त्यसलाई काँधमा हाले अनि पछिल्तिर सर्दै गएर तिनीहरूका पिताको नाङ्गोपन ढाकिदिए । तिनीहरूको अनुहार अर्कोपट्टि फर्केकाले तिनीहरूले आफ्ना पिताको नाङ्गोपन देखेनन् ।
24 २४ जेव्हा नोहा नशेतून जागा झाला, तेव्हा आपला धाकटा मुलगा हाम याने काय केले हे त्यास समजले.
नोआ आफ्नो मद्यको लतबाट उठेपछि तिनका कान्छा छोराले तिनलाई के गरेका थिए भनी तिनलाई थाहा भयो ।
25 २५ तेव्हा नोहा म्हणाला, “कनान शापित होवो, तो आपल्या भावाच्या गुलामातील सर्वांत खालचा गुलाम होवो.”
त्यसैले तिनले भने, “श्रापित होस् कनान । त्यो आफ्ना दाजुहरूका कमाराहरूका पनि कमारा होस् ।”
26 २६ तो म्हणाला, “शेमाचा देव परमेश्वर धन्यवादित असो. कनान त्याचा सेवक होवो.
तिनले यसो पनि भने, “शेमका परमेश्‍वर यहोवे धन्यका होऊन्, र कनान त्यसको कमारो होस् ।
27 २७ देव याफेथाचा अधिक विस्तार करो, आणि शेमाच्या तंबूत तो त्याचे घर करो. कनान त्यांचा सेवक होवो.”
परमेश्‍वरले येपेतको क्षेत्र वृद्धि गर्नुभएको होस् र त्यसले शेमका पालहरूमा बास गरून् । कनान त्यसका कमारा होस् ।”
28 २८ पूरानंतर नोहा तीनशे पन्नास वर्षे जगला;
जलप्रलयपछि नोआ तिन सय पचास वर्ष बाँचे ।
29 २९ नोहा एकूण नऊशें पन्नास वर्षे जगला; मग त्यानंतर तो मरण पावला.
नोआको जम्मा उमेर नौ सय पचास वर्ष भयो, अनि तिनी मरे

< उत्पत्ति 9 >