< उत्पत्ति 5 >
1 १ आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य निर्माण केला त्या दिवशी त्याने आपल्या प्रतिरूपाचा म्हणजे आपल्यासारखा तो केला.
2 २ त्यांना नर व नारी असे उत्पन्न केले. त्यांना आशीर्वाद दिला व त्यांना निर्माण केले त्या वेळी त्यांना आदाम हे नाव दिले.
3 ३ आदाम एकशे तीस वर्षांचा झाल्यावर त्यास त्याच्या प्रतिरूपाचा म्हणजे त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले;
4 ४ शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशे वर्षे जगला आणि या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
5 ५ अशा रीतीने आदाम एकंदर नऊशें तीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
6 ६ शेथ एकशे पाच वर्षांचा झाल्यावर त्यास अनोश झाला
7 ७ अनोश झाल्यानंतर शेथ आठशेसात वर्षे जगला, त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
8 ८ शेथ एकंदर नऊशेंबारा वर्षे जगला, मग तो मरण पावला.
9 ९ अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्यास केनान झाला;
10 १० केनान झाल्यानंतर अनोश आठशेपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
11 ११ अनोश एकंदर नऊशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
12 १२ केनान सत्तर वर्षांचा झाल्यावर तो महललेलाचा पिता झाला;
13 १३ महललेल झाल्यावर केनान आठशेचाळीस वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
14 १४ केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला, नंतर तो मरण पावला.
15 १५ महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर तो यारेदाचा पिता झाला;
16 १६ यारेद जन्मल्यानंतर महललेल आठशेतीस वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
17 १७ महललेल एकंदर आठशे पंचाण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
18 १८ यारेद एकशे बासष्ट वर्षांचा झाल्यावर तो हनोखाचा पिता झाला;
19 १९ हनोख झाल्यावर यारेद आठशे वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
20 २० यारेद एकंदर नऊशें बासष्ट वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
21 २१ हनोख पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास मथुशलह झाला;
22 २२ मथुशलह जन्मल्यावर हनोख तीनशे वर्षे देवाबरोबर चालला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
23 २३ हनोख एकंदर तीनशे पासष्ट वर्षे जगला;
24 २४ हनोख देवाबरोबर चालला, आणि त्यानंतर तो दिसला नाही, कारण देवाने त्यास नेले.
25 २५ मथुशलह एकशेसत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर लामेखाचा पिता झाला.
26 २६ लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशे ब्याऐंशी वर्षे जगला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
27 २७ मथुशलह एकंदर नऊशें ऐकोणसत्तर वर्षे जगला. त्यानंतर तो मरण पावला.
28 २८ लामेख एकशेब्यांऐशी वर्षांचा झाल्यावर तो एका मुलाचा पिता झाला.
29 २९ लामेखाने त्याचे नाव नोहा ठेवून म्हटले, परमेश्वराने भूमी शापित केली आहे तिच्यापासून येणाऱ्या कामात आणि आमच्या हातांच्या श्रमात हाच आम्हांला विसावा देईल.
30 ३० नोहा झाल्यावर लामेख पाचशे पंचाण्णव वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
31 ३१ लामेख एकंदर सातशे सत्याहत्तर वर्षे जगला. नंतर तो मरण पावला.
32 ३२ नोहा पाचशे वर्षांचा झाल्यावर त्यास शेम, हाम व याफेथ नावाचे पुत्र झाले.