< उत्पत्ति 49 >
1 १ त्यानंतर याकोबाने आपल्या सर्व मुलांना आपल्याजवळ बोलावले, तो म्हणाला, “माझ्या मुलांनो, माझ्याजवळ या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल, ते मी तुम्हास सांगतो.”
Yakup oğullarını çağırarak, “Yanıma toplanın” dedi, “Gelecekte size neler olacağını anlatayım.
2 २ “याकोबाच्या मुलांनो, तुम्ही सर्व एकत्र या आणि ऐका, तुमचा बाप इस्राएल याचे ऐका.
“Yakupoğulları, toplanın ve dinleyin, Babanız İsrail'e kulak verin.
3 ३ रऊबेना, तू माझा पहिलाच म्हणजे थोरला मुलगा आहेस. पुरुष म्हणून माझ्यात असलेल्या शक्तीचा तू पहिला पुरावा आहेस, तू सर्वांपेक्षा अधिक शक्तीवान व सर्वांपेक्षा अधिक अभिमान वाटावा असा आहेस.
“Ruben, sen benim ilk oğlum, gücümsün, Kudretimin ilk ürünüsün, Saygı ve güç bakımından en üstünsün.
4 ४ परंतु तुझ्या भावना पुराच्या पाण्याच्या अनावर व चंचल लाटांप्रमाणे आहेत. कारण तू आपल्या वडिलाच्या पलंगावर गेलास व त्याच्या बिछान्यावर जाऊन तो अशुद्ध केलास.”
Ama su gibi oynaksın, Üstün olmayacaksın artık. Çünkü babanın yatağına girip Onu kirlettin. Döşeğimi rezil ettin.
5 ५ “शिमोन व लेवी हे सख्खे भाऊ आहेत. या दोन भावांना तलवारीने लढण्याची आवड आहे.
“Şimon'la Levi kardeştir, Kılıçları şiddet kusar.
6 ६ माझ्या जिवा, त्यांच्या गुप्त मसलतींमध्ये गुंतू नको; त्यांच्या गुप्त बैठकांमध्ये सामील होऊ नको, त्यांचे हे बेत माझ्या जिवाला मान्य नाहीत. त्यांनी त्यांच्या रागाच्या भरात पुरुषांची कत्तल केली. आपल्या रागाने बैलांच्या पायांच्या शिरा तोडल्या.
Gizli tasarılarına ortak olmam, Toplantılarına katılmam. Çünkü öfkelenince adam öldürdüler, Canları istedikçe sığırları sakatladılar.
7 ७ त्यांचा राग शाप आहे, ते अति रागाने वेडे होतात. तेव्हा अतिशय क्रूर बनतात. मी त्यांना याकोबात विभागीन, ते सर्व इस्राएल देशभर पसरतील.
Lanet olsun öfkelerine, Çünkü şiddetlidir. Lanet olsun gazaplarına, Çünkü zalimcedir. Onları Yakup'ta bölecek Ve İsrail'de dağıtacağım.
8 ८ यहूदा, तुझे भाऊ तुझी स्तुती करतील. तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील. तुझ्या पित्याची मुले तुला लवून नमन करतील.
“Yahuda, kardeşlerin seni övecek, Düşmanlarının ensesinde olacak elin. Kardeşlerin önünde eğilecek.
9 ९ यहूदा सिंहाचा छावा आहे. माझ्या मुला, तू शिकारीपासून वरपर्यंत गेलास. तो खाली वाकला आहे, तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे. त्यास उठवण्याचे धाडस कोण करील?
Yahuda bir aslan yavrusudur. Oğlum benim! Avından dönüp yere çömelir, Aslan gibi, dişi bir aslan gibi yatarsın. Kim onu uyandırmaya cesaret edebilir?
10 १० शिलो येईपर्यंत यहूदाकडून राजवेत्र जाणार नाही, किंवा अधिकाराची काठी त्याच्या पायामधून निघून जाणार नाही. राष्ट्रे त्याच्या आज्ञा पाळतील.
Sahibi gelene kadar Krallık asası Yahuda'nın elinden çıkmayacak, Yönetim hep onun soyunda kalacak, Uluslar onun sözünü dinleyecek.
11 ११ तो त्याचा तरुण घोडा द्राक्षवेलीस, आणि त्याचे शिंगरु खास द्राक्षवेलीस बांधेल. त्याने त्याचे वस्त्र द्राक्षरसात आणि आपला झगा द्राक्षांच्या रक्तात धुतला आहे.
Eşeğini bir asmaya, Sıpasını seçme bir dala bağlayacak; Giysilerini şarapta, Kaftanını üzümün kızıl kanında yıkayacak.
12 १२ त्याचे डोळे द्राक्षरसापेक्षा अधिक लालबुंद होतील. त्याचे दात दूधापेक्षा अधिक सफेद होतील.
Gözleri şaraptan kızıl, Dişleri sütten beyaz olacak.
13 १३ जबुलून समुद्र किनाऱ्याजवळ राहिल. तो जहाजासाठी सुरक्षित बंदर होईल. त्याच्या जमिनीची हद्द सीदोन नगरापर्यंत असेल.”
“Zevulun deniz kıyısında yaşayacak, Liman olacak gemilere, Sınırı Sayda'ya dek uzanacak.
14 १४ “इस्साखार बळकट गाढव आहे. तो मेंढवाड्यांच्यामध्ये दबून बसला आहे.
“İssakar semerler arasında yatan güçlü eşek gibidir;
15 १५ आपले विसावा घेण्याचे ठिकाण चांगले आहे, आपला देश आनंददायक आहे असे त्याने पाहिले, आणि मग जड बोजा वाहून नेण्यास व अगदी गुलामाप्रमाणे काम करण्यास तो तयार झाला.
Ne zaman dinlenecek iyi bir yer, Hoşuna giden bir ülke görse, Yüklenmek için sırtını eğer, Angaryaya katlanır.
16 १६ इस्राएलाचा एक वंश या नात्याने दान आपल्या लोकांचा न्याय करील.
“Dan kendi halkını yönetecek, Bir İsrail oymağı gibi.
17 १७ तो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सापाप्रमाणे, वाटेच्या कडेला पडून असलेल्या भयंकर नागाप्रमाणे होईल. तो घोड्याच्या टाचेला दंश करील. त्यामुळे घोडेस्वार घोड्यावरून मागे कोसळेल.
Yol kenarında bir yılan, Toprak yolda bir engerek olacak; Atın topuklarını ısırıp Atlıyı sırtüstü düşüren bir engerek.
18 १८ हे परमेश्वरा, तुझ्याकडून उद्धार होण्याची मी वाट पाहत आहे.
“Ben senin kurtarışını bekliyorum, ya RAB.
19 १९ गाद-लुटारूंची टोळी त्याच्यावर हल्ला करेल, परंतु तो त्यांच्या पार्श्वभागावर हल्ला करून त्यांना पळवून लावील.
“Gad akıncıların saldırısına uğrayacak, Ama onların topuklarına saldıracak.
20 २० आशेराचे अन्न समृद्ध होईल आणि तो राजाला योग्य असे शाही अन्नपदार्थ पुरवील.
“Zengin yemekler olacak Aşer'de, Krallara yaraşır lezzetli yiyecekler yetiştirecek Aşer.
21 २१ नफताली मोकळ्या सुटलेल्या हरीणीप्रमाणे आहे. त्याचे बोलणे गोड असेल.
“Naftali salıverilmiş geyiğe benzer, Sevimli yavrular doğurur.
22 २२ योसेफ हा फलदायी फाट्यासारखा आहे. तो ओढ्याकाठी वाढणाऱ्या द्राक्षवेलीसारखा आहे. त्याच्या फांद्या भिंतीवर चढून पसरल्या आहेत.
“Yusuf meyveli bir dal gibidir, Kaynak kıyısında verimli bir dal gibi, Filizleri duvarların üzerinden aşar.
23 २३ तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला. आणि त्यास तीर मारले व त्यास त्रास दिला.
Okçular acımadan saldırdı ona. Düşmanca savurdular oklarını üzerine.
24 २४ तरी त्याचे धनुष्य मजबूत राहील, आणि त्याचे बाहु कुशल होतील याकोबाचा सामर्थ्यवान देव, मेंढपाळ, इस्राएलाचा खडक याजकडून त्याच्या हातांना शक्ती मिळते.
Ama onun yayı sağlam, Kolları esnek çıktı; Yakup'un güçlü Tanrısı, İsrail'in Kayası, Çobanı olan Tanrı sayesinde.
25 २५ कारण तुझ्या बापाचा देव, जो तुला मदत करील, आणि सर्वशक्तिमान देवामुळे, जो तुला वरून आकाशाचे आशीर्वाद, खाली खोल दरीचे आशीर्वाद देवो, तसेच स्तनांचा व गर्भाशयांच्या उपजांचा आशीर्वाद तो तुला देवो.
Sana yardım eden babanın Tanrısı'dır, Her Şeye Gücü Yeten Tanrı'dır seni kutsayan. Yukarıdaki göklerin Ve aşağıdaki denizlerin bereketiyle, Memelerin, rahimlerin bereketiyle O'dur seni kutsayan.
26 २६ तुझ्या बापाचे आशीर्वाद माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादापेक्षा मोठे होतील, अथवा सर्वकाळ टिकून राहणाऱ्या डोंगरांपासून प्राप्त होणाऱ्या इच्छित वस्तुंहून श्रेष्ठ होतील. ते योसेफाच्या मस्तकावर, जो आपल्या भावांमध्ये राजपुत्र त्याच्या मस्तकावर आशीर्वाद असे राहतील.
Babanın kutsamaları ebedi dağların nimetlerinden, Ebedi tepelerin bolluğundan daha yücedir; Yusuf'un başı üzerinde, Kardeşleri arasında önder olanın üstünde olacak.
27 २७ बन्यामीन हा भुकेला लांडगा आहे. तो सकाळी आपले भक्ष्य मारून खाईल, आणि संध्याकाळी तो लूट वाटून घेईल.”
“Benyamin aç kurda benzer; Sabah avını yer, Akşam ganimeti paylaşır.”
28 २८ हे सर्व इस्राएलाचे बारा वंश होत. त्यांच्या वडिलाने आशीर्वाद देऊन त्यांना म्हटले ते हेच. त्याने प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे आशीर्वाद दिला.
İsrail'in on iki oymağı bunlardır. Babaları onları kutsarken bunları söyledi. Her birini uygun biçimde kutsadı.
29 २९ मग त्याने त्यांना आज्ञा दिली आणि त्यांना म्हणाला, “मी आता माझ्या लोकांकडे जात आहे. एफ्रोन हित्ती ह्याच्या शेतातील गुहेत माझ्या पूर्वजांबरोबर मला पुरावे,
Sonra Yakup oğullarına şu buyrukları verdi: “Ben ölmek, halkıma kavuşmak üzereyim. Beni Kenan ülkesinde atalarımın yanına, Mamre yakınlarında Hititli Efron'un tarlasındaki mağaraya, Makpela Tarlası'ndaki mağaraya gömün. İbrahim o mağarayı mezar yapmak üzere Hititli Efron'dan tarlasıyla birlikte satın almıştı.
30 ३० ती गुहा कनान देशात मम्रेजवळील मकपेलाच्या शेतात आहे, आपल्या घराण्याला पुरण्याची जागा असावी म्हणून अब्राहामाने ते शेत एफ्रोन हित्ती याच्याकडून विकत घेतले.
31 ३१ अब्राहाम व त्याची पत्नी सारा, यांना त्या गुहेत पुरले आहे; इसहाक आणि त्याची पत्नी रिबका यांनाही तेथेच पुरले आहे; आणि माझी पत्नी लेआ हिलाही मी तेथेच पुरले आहे.
İbrahim'le karısı Sara, İshak'la karısı Rebeka oraya gömüldüler. Lea'yı da ben oraya gömdüm.
32 ३२ ते शेत व ती गुहा हेथी लोकांकडून विकत घेतलेली आहे.”
Tarla ile içindeki mağara Hititler'den satın alındı.”
33 ३३ आपल्या मुलांशी हे बोलणे संपवल्यानंतर याकोबाने आपले पाय पलंगावर जवळ ओढून घेतले व मरण पावला, आणि तो आपल्या पूर्वजांकडे गेला.
Yakup oğullarına verdiği buyrukları bitirince, ayaklarını yatağın içine çekti, son soluğunu vererek halkına kavuştu.