< उत्पत्ति 48 >
1 १ या गोष्टीनंतर “त्याचा बाप आजारी असल्याचे” कोणी योसेफाला कळवले, म्हणून आपले दोन पुत्र मनश्शे व एफ्राईम यांना बरोबर घेऊन तो गेला.
這些事以後,有人告訴若瑟說:「你的父親病了。」若瑟遂帶了他的兩個兒子,默納協和厄弗辣因同去。
2 २ “योसेफ आपणास भेटावयास आला आहे” असे याकोबास कोणी सांगितले, हे कळवल्याबरोबर इस्राएलाने शक्ती एकवटली आणि बिछान्यावर उठून बसला.
人告訴雅各伯說:「你兒子若瑟來看你。」以色列遂勉強由床上坐起。
3 ३ मग याकोब योसेफास म्हणाला, “सर्वसमर्थ देवाने मला कनानातील लूज येथे दर्शन देऊन आशीर्वाद दिला.
雅各伯對若瑟說:「全能者天主曾在客納罕地路次顯現給我,祝福了我,
4 ४ देव म्हणाला, ‘मी तुला खूप संतती देईन व ती वाढवीन आणि मी तुला राष्ट्रांचा समुदाय करीन. आणि तुझ्यानंतर तुझ्या संतानाला हा देश कायमचा वतन म्हणून देईल.’
對我說:看! 我要使你繁殖增多,成為一大民族;我要將這地方賜給你未來的後裔,作為永久的產業。
5 ५ आणि आता, मी येथे मिसर देशास येण्यापूर्वी, मिसराच्या भूमीमध्ये जे तुझ्या पोटी जन्मलेले हे दोन पुत्र, माझे आहेत. तुझे हे दोन पुत्र मनश्शे व एफ्राईम हे आता रऊबेन व शिमोन यांच्याप्रमाणेच माझे होतील.
我未到埃及見你以前,你在埃及國所生的兩個兒子,由今起應歸於我;厄弗辣因和默納協屬我全如勒烏本和西默盎一樣。
6 ६ त्यांच्यानंतर तुला जी संतती होईल ती तुझी होईल; त्यांच्या वतनात त्यांची नावे त्यांच्या भावांच्या नावांखाली नोंदवण्यात येतील.
在他們以後所生的子女,盡歸於你;不過在分產業時,他們應歸他們兄弟的名下。
7 ७ परंतु पदन येथून मी येताना तुझी आई राहेल, एफ्राथापासून आम्ही थोड्याच अंतरावर असताना कनान देशात मरण पावली, त्यामुळे मी फार दुःखी झालो. तेव्हा एफ्राथच्या म्हणजे बेथलेहेमाच्या वाटेवर मी तिला पुरले.”
當我由帕丹回來時,在離厄弗辣大還有一段路程時,在路上你母親辣黑耳,就在我的悲痛中死在客納罕地,我就將她葬在去厄弗辣大,即白冷的路旁。」
8 ८ मग इस्राएलाने योसेफाच्या मुलांना पाहिले, तेव्हा इस्राएल म्हणाला, “हे कोणाचे आहेत?”
以色列看見若瑟的兒子,就問說:「他們是誰﹖」
9 ९ योसेफ आपल्या पित्यास म्हणाला, “हे माझे पुत्र आहेत. हे मला देवाने येथे दिले आहेत.” इस्राएल म्हणाला, “तुझ्या मुलांना माझ्याकडे आण म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”
若瑟回答父親說:「是天主在此地賜給我的兒子。」以色列說:「帶他們到我跟前來,我要祝福他們。」
10 १० इस्राएल अतिशय म्हातारा झाला होता आणि त्याची नजर मंद झाल्यामुळे त्यास चांगले स्पष्ट दिसत नव्हते. तेव्हा इस्राएलाने त्या मुलांना कवटाळून त्यांचे मुके घेतले.
以色列因年老眼目昏花,看不清楚;若瑟遂領他們到他跟前;他就口親他們,抱住他們。
11 ११ मग इस्राएल योसेफास म्हणाला, “मुला तुझे तोंड पुन्हा पाहावयास मिळेल असे वाटले नव्हते, पण देवाने तुझी व माझी भेट होऊ दिली. मला तुझी मुलेही पाहू दिली.”
以色列對若瑟說:「連見你的面我都沒有料到;現今,看,天主還使我見到了你的後裔。」
12 १२ मग योसेफाने आपल्या मुलांना इस्राएलाच्या मांडीवरून काढून घेतले. ते पुत्र इस्राएलासमोर उभे राहिले व त्यांनी त्यास लवून नमन केले.
若瑟遂由他父親膝間將孩子拉出來,俯伏在地下拜。
13 १३ योसेफाने मनश्शेला आपल्या डाव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या उजव्या हाती येईल असे व एफ्राईमाला आपल्या उजव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या डाव्या हाती येईल असे उभे केले.
然後若瑟又領他們兩個,右手領厄弗辣因到以色列左邊,左手領默納協到以色列右邊,到父親面前。
14 १४ परंतु इस्राएलाने आपला उजवा हात पुढे केला आणि एफ्राइमाच्या, म्हणजे जो धाकटा मुलगा होता त्याच्या डोक्यावर ठेवला आणि त्याचा डावा हात थोरल्याच्या म्हणजे मनश्शेच्या डोक्यावर ठेवला. त्याने त्याच्या हातांची अदलाबदल करून ते उजवेडावे केले.
以色列卻伸出右手,放在次子厄弗辣因的頭上,伸出左手放在長子默納協的頭上,故意交叉著自己的手。
15 १५ इस्राएलाने योसेफाला आशीर्वाद देऊन म्हटले, “ज्या देवासमोर माझे वडील, अब्राहाम व इसहाक चालले, ज्या देवाने माझ्या सर्व आयुष्यभर मला चालवले आहे,
遂祝福若瑟說:「願我的祖先亞巴郎和依撒格一生與之往來的天主,自我出生直到今日牧育我的天主,
16 १६ तोच मला सर्व संकटातून सोडवणारा माझा देवदूत होता, तोच या मुलांना आशीर्वाद देवो. आता या मुलांना माझे नाव व वडील अब्राहाम व इसहाक यांचे नाव देण्यात येवो. ते वाढून त्यांची पृथ्वीवर अनेक कुटुंबे, कुळे व राष्ट्रे होवोत.”
救我脫離一切禍患的使者,祝福這兩個孩童! 願我的名及我祖先亞巴郎和依撒格的名,賴他們流傳! 願他們在地上生育繁昌! 」
17 १७ आपल्या वडिलाने एफ्राईमाच्या डोक्यावर आपला उजवा हात ठेवला असे योसेफाने पाहिले तेव्हा त्यास ते आवडले नाही. तो हात एफ्राईमाच्या डोक्यावरून काढून मनश्शेच्या डोक्यावर ठेवावा म्हणून योसेफाने आपल्या बापाचा हात घेतला.
若瑟見他父親將右手放在厄弗辣因頭上,認為不對,便拿起父親的右手,由厄弗辣因頭上,移到默納協頭上,
18 १८ योसेफ आपल्या पित्यास म्हणाला, “असे नाही बाबा, कारण हा प्रथम जन्मलेला आहे. तुमचा उजवा हात याच्या डोक्यावर ठेवा.”
對父親說:「阿爸! 錯了;這個原是長子,應將你的右手放在他頭上。」
19 १९ परंतु त्याचा वडिलाने नकार दिला आणि म्हटले, “माझ्या मुला, मला माहीत आहे. होय, मला माहीत आहे की, तोसुद्धा महान होईल. परंतु धाकटा भाऊ त्याच्यापेक्षाही अधिक महान होईल आणि त्याची कुळे वाढून त्यांचा मोठा राष्ट्रसमूह निर्माण होईल.”
他的父親卻拒絕說:「我知道,我兒! 我知道,他也要成為一個民族,他也要昌盛;但他的弟弟卻比他更要昌盛,他的後裔要成為一大民族。」
20 २० त्या दिवशी इस्राएलाने त्या मुलांना या शब्दांत आशीर्वाद दिला, तो म्हणाला, “इस्राएल लोक आशीर्वाद देताना तुमची नावे उच्चारितील, ते म्हणतील, ‘देव तुम्हास एफ्राईमासारखा, मनश्शेसारखा आशीर्वाद देवो.’”
那一天他又這樣祝福他們說:「以色列將以你們祝福人說:願天主使你如厄弗辣因和默納協!」他又將厄弗辣因放在默納協前面。
21 २१ मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “पाहा, मी आता मरणार आहे. परंतु देव तुमच्या बरोबर राहील, तो तुम्हास तुमच्या पूर्वजांच्या देशात घेऊन येईल.
然後以色列對若瑟說:「看,我快要死;但天主必與你們同在,必領你們回到你們祖先的地方去。
22 २२ तुझ्या भावांपेक्षा तुला एक भाग अधिक देतो, मी स्वतः तलवारीने व धनुष्याने लढून अमोरी लोकाकडून जिंकलेला डोंगरउतार तुला देतो.”
現在我將由阿摩黎人手中,以我的刀劍弓矢奪得的那塊山地賜給你,使你比眾兄弟多得一分。」