< उत्पत्ति 47 >

1 योसेफ फारोकडे जाऊन म्हणाला, “माझा बाप माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबातील सर्व मंडळी कनान देशातून त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे सर्वकाही घेऊन येथे आले आहेत. ते गोशेन प्रांतात आहेत.”
וַיָּבֹא יוֹסֵף וַיַּגֵּד לְפַרְעֹה וַיֹּאמֶר אָבִי וְאַחַי וְצֹאנָם וּבְקָרָם וְכׇל־אֲשֶׁר לָהֶם בָּאוּ מֵאֶרֶץ כְּנָעַן וְהִנָּם בְּאֶרֶץ גֹּֽשֶׁן׃
2 त्याने आपल्याबरोबर फारोसमोर जाण्यासाठी आपल्या भावांपैकी पाच जणांना घेतले आणि त्यांची ओळख करून दिली.
וּמִקְצֵה אֶחָיו לָקַח חֲמִשָּׁה אֲנָשִׁים וַיַּצִּגֵם לִפְנֵי פַרְעֹֽה׃
3 फारो राजा त्याच्या भावांना म्हणाला, “तुम्ही काय धंदा करता?” ते म्हणाले, “आम्ही आपले दास मेंढपाळ आहोत आणि आमचे पूर्वजही मेंढपाळच होते.”
וַיֹּאמֶר פַּרְעֹה אֶל־אֶחָיו מַה־מַּעֲשֵׂיכֶם וַיֹּאמְרוּ אֶל־פַּרְעֹה רֹעֵה צֹאן עֲבָדֶיךָ גַּם־אֲנַחְנוּ גַּם־אֲבוֹתֵֽינוּ׃
4 ते फारोला पुढे म्हणाले, “कनान देशात फारच भयंकर व कडक दुष्काळ पडला आहे. तेथे एकाही शेतात तुमच्या दासांच्या कळपांसाठी हिरवे गवत किंवा हिरवा चारा राहिलेला नाही म्हणून आम्ही या देशात तात्पुरते राहण्यास आलो आहोत. आम्ही आपणांस विनंती करतो की आम्हास गोशेन प्रांतात राहू द्यावे.”
וַיֹּאמְרוּ אֶל־פַּרְעֹה לָגוּר בָּאָרֶץ בָּאנוּ כִּי־אֵין מִרְעֶה לַצֹּאן אֲשֶׁר לַעֲבָדֶיךָ כִּֽי־כָבֵד הָרָעָב בְּאֶרֶץ כְּנָעַן וְעַתָּה יֵֽשְׁבוּ־נָא עֲבָדֶיךָ בְּאֶרֶץ גֹּֽשֶׁן׃
5 मग फारो योसेफाला म्हणाला, “तुझा बाप व तुझे भाऊ तुझ्याकडे आले आहेत.
וַיֹּאמֶר פַּרְעֹה אֶל־יוֹסֵף לֵאמֹר אָבִיךָ וְאַחֶיךָ בָּאוּ אֵלֶֽיךָ׃
6 त्यांना राहण्याकरिता तू मिसर देशातील कोणतेही ठिकाण निवड. त्यांना उत्तम जमीन असलेला प्रदेश दे, त्यांना गोशेन प्रांतात वस्ती करून राहू दे. आणि त्याच्यात जर कोणी हुशार मनुष्य मनुष्ये तुला माहीत असतील तर मग त्यांना माझ्या गुराढोरांवर अधिकारी कर.”
אֶרֶץ מִצְרַיִם לְפָנֶיךָ הִוא בְּמֵיטַב הָאָרֶץ הוֹשֵׁב אֶת־אָבִיךָ וְאֶת־אַחֶיךָ יֵשְׁבוּ בְּאֶרֶץ גֹּשֶׁן וְאִם־יָדַעְתָּ וְיֶשׁ־בָּם אַנְשֵׁי־חַיִל וְשַׂמְתָּם שָׂרֵי מִקְנֶה עַל־אֲשֶׁר־לִֽי׃
7 मग योसेफाने याकोब त्याचा बाप याला आणले आणि फारोच्या समोर सादर केले. तेव्हा याकोबाने फारोस आशीर्वाद दिला.
וַיָּבֵא יוֹסֵף אֶת־יַֽעֲקֹב אָבִיו וַיַּֽעֲמִדֵהוּ לִפְנֵי פַרְעֹה וַיְבָרֶךְ יַעֲקֹב אֶת־פַּרְעֹֽה׃
8 मग फारोने याकोबाला विचारले, “तुमचे वय किती आहे?”
וַיֹּאמֶר פַּרְעֹה אֶֽל־יַעֲקֹב כַּמָּה יְמֵי שְׁנֵי חַיֶּֽיךָ׃
9 याकोबाने फारोस उत्तर दिले, “माझ्या कष्टमय जीवनाची वर्षे फक्त एकशे तीस वर्षे आहेत. परंतु माझ्या पूर्वजांइतके दीर्घ आयुष्य मला लाभले नाही.”
וַיֹּאמֶר יַעֲקֹב אֶל־פַּרְעֹה יְמֵי שְׁנֵי מְגוּרַי שְׁלֹשִׁים וּמְאַת שָׁנָה מְעַט וְרָעִים הָיוּ יְמֵי שְׁנֵי חַיַּי וְלֹא הִשִּׂיגוּ אֶת־יְמֵי שְׁנֵי חַיֵּי אֲבֹתַי בִּימֵי מְגוּרֵיהֶֽם׃
10 १० याकोबाने फारोला आशीर्वाद दिला व मग तो फारोपुढून निघून गेला.
וַיְבָרֶךְ יַעֲקֹב אֶת־פַּרְעֹה וַיֵּצֵא מִלִּפְנֵי פַרְעֹֽה׃
11 ११ योसेफाने फारोच्या आज्ञेप्रमाणे आपल्या बापाला व भावांना रामसेस नगरजवळील प्रांतातील उत्तम भूमी त्यांना रहावयास दिली.
וַיּוֹשֵׁב יוֹסֵף אֶת־אָבִיו וְאֶת־אֶחָיו וַיִּתֵּן לָהֶם אֲחֻזָּה בְּאֶרֶץ מִצְרַיִם בְּמֵיטַב הָאָרֶץ בְּאֶרֶץ רַעְמְסֵס כַּאֲשֶׁר צִוָּה פַרְעֹֽה׃
12 १२ आणि त्याने आपला बाप, आपले भाऊ व त्यांच्या कुटुंबाप्रमाणे, त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांच्या संख्येप्रमाणे भरपूर अन्नसामग्री पुरवली.
וַיְכַלְכֵּל יוֹסֵף אֶת־אָבִיו וְאֶת־אֶחָיו וְאֵת כׇּל־בֵּית אָבִיו לֶחֶם לְפִי הַטָּֽף׃
13 १३ त्या वेळी सर्व भूमीवर दुष्काळ तर फारच कडक पडला होता; अन्नधान्य कोठेच मिळत नव्हते. त्यामुळे मिसर व कनान देशातील जमीन दुष्काळामुळे उजाड झाली.
וְלֶחֶם אֵין בְּכׇל־הָאָרֶץ כִּֽי־כָבֵד הָרָעָב מְאֹד וַתֵּלַהּ אֶרֶץ מִצְרַיִם וְאֶרֶץ כְּנַעַן מִפְּנֵי הָרָעָֽב׃
14 १४ योसेफाने मिसर आणि कनान देशातील रहिवाशांना अन्नधान्य विकून त्यांच्याकडील सर्व पैसा गोळा केला. त्यानंतर योसेफाने तो पैसा फारोच्या राजवाड्यात आणला.
וַיְלַקֵּט יוֹסֵף אֶת־כׇּל־הַכֶּסֶף הַנִּמְצָא בְאֶֽרֶץ־מִצְרַיִם וּבְאֶרֶץ כְּנַעַן בַּשֶּׁבֶר אֲשֶׁר־הֵם שֹׁבְרִים וַיָּבֵא יוֹסֵף אֶת־הַכֶּסֶף בֵּיתָה פַרְעֹֽה׃
15 १५ काही काळाने मिसर व कनान देशातील लोकांचे पैसे संपून गेले, त्यामुळे मिसरचे लोक योसेफाकडे येऊन म्हणाले, “आम्हास अन्न द्या! आमचे सर्व पैसे संपले आहेत म्हणून आम्ही तुमच्यासमोरच का मरावे?”
וַיִּתֹּם הַכֶּסֶף מֵאֶרֶץ מִצְרַיִם וּמֵאֶרֶץ כְּנַעַן וַיָּבֹאוּ כׇל־מִצְרַיִם אֶל־יוֹסֵף לֵאמֹר הָֽבָה־לָּנוּ לֶחֶם וְלָמָּה נָמוּת נֶגְדֶּךָ כִּי אָפֵס כָּֽסֶף׃
16 १६ परंतु योसेफ म्हणाला, “जर तुमचे पैसे संपले आहेत, तर तुम्ही मला तुमची गुरेढोरे द्या आणि मग मी तुमच्या गुराढोरांच्या बदल्यात तुम्हास धान्य देईन.”
וַיֹּאמֶר יוֹסֵף הָבוּ מִקְנֵיכֶם וְאֶתְּנָה לָכֶם בְּמִקְנֵיכֶם אִם־אָפֵס כָּֽסֶף׃
17 १७ तेव्हा लोकांनी त्यांच्याकडील गुरेढोरे, शेरडेमेंढरे, घोडे, गाढवे आणि इतर जनावरे देऊन अन्नधान्य विकत घेतले. त्या वर्षात लोकांकडून गुरेढोरे घेऊन त्यांच्या बदल्यात योसेफाने त्यांना अन्नधान्य दिले.
וַיָּבִיאוּ אֶת־מִקְנֵיהֶם אֶל־יוֹסֵף וַיִּתֵּן לָהֶם יוֹסֵף לֶחֶם בַּסּוּסִים וּבְמִקְנֵה הַצֹּאן וּבְמִקְנֵה הַבָּקָר וּבַחֲמֹרִים וַיְנַהֲלֵם בַּלֶּחֶם בְּכׇל־מִקְנֵהֶם בַּשָּׁנָה הַהִֽוא׃
18 १८ परंतु त्या वर्षानंतर, पुढील वर्षी लोक योसेफाकडे जाऊन म्हणाले, “आमच्या धन्यापासून आम्ही काही लपवत नाही. आपणास माहीत आहे की, आमच्याकडे पैसे उरलेले नाहीत आणि आमची गुरेढोरेही धन्याची झाली आहेत. तेव्हा आमच्या धनाच्यासमोर आमची शरीरे व आमच्या जमिनी याशिवाय दुसरे काहीही उरलेले नाही.
וַתִּתֹּם הַשָּׁנָה הַהִוא וַיָּבֹאוּ אֵלָיו בַּשָּׁנָה הַשֵּׁנִית וַיֹּאמְרוּ לוֹ לֹֽא־נְכַחֵד מֵֽאֲדֹנִי כִּי אִם־תַּם הַכֶּסֶף וּמִקְנֵה הַבְּהֵמָה אֶל־אֲדֹנִי לֹא נִשְׁאַר לִפְנֵי אֲדֹנִי בִּלְתִּי אִם־גְּוִיָּתֵנוּ וְאַדְמָתֵֽנוּ׃
19 १९ तुमच्या डोळ्यांसमोर आम्ही का मरावे? आमचा व आमच्या जमिनीचाही नाश का व्हावा? परंतु जर आपण आम्हांला अन्नधान्य द्याल तर मग आम्ही आमच्या जमिनी फारोला देऊ आणि आम्ही त्याचे गुलाम होऊ. आम्हास बियाणे द्या म्हणजे आम्ही जगू, मरणार नाही आणि जमिनी ओस पडणार नाहीत.”
לָמָּה נָמוּת לְעֵינֶיךָ גַּם־אֲנַחְנוּ גַּם אַדְמָתֵנוּ קְנֵֽה־אֹתָנוּ וְאֶת־אַדְמָתֵנוּ בַּלָּחֶם וְנִֽהְיֶה אֲנַחְנוּ וְאַדְמָתֵנוּ עֲבָדִים לְפַרְעֹה וְתֶן־זֶרַע וְנִֽחְיֶה וְלֹא נָמוּת וְהָאֲדָמָה לֹא תֵשָֽׁם׃
20 २० तेव्हा मिसरमधील सर्व शेतजमिनी योसेफाने फारोसाठी विकत घेतल्या. मिसरी लोकांनी आपल्या शेतजमिनी फारोला विकल्या कारण दुष्काळ भयंकर तीव्र झाला होता.
וַיִּקֶן יוֹסֵף אֶת־כׇּל־אַדְמַת מִצְרַיִם לְפַרְעֹה כִּֽי־מָכְרוּ מִצְרַיִם אִישׁ שָׂדֵהוּ כִּֽי־חָזַק עֲלֵהֶם הָרָעָב וַתְּהִי הָאָרֶץ לְפַרְעֹֽה׃
21 २१ मिसरमधील एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या सर्व लोकांस त्याने फारोचे गुलाम केले.
וְאֶת־הָעָם הֶעֱבִיר אֹתוֹ לֶעָרִים מִקְצֵה גְבוּל־מִצְרַיִם וְעַד־קָצֵֽהוּ׃
22 २२ योसेफाने याजकांच्या मालकीच्या जमिनी मात्र विकत घेतल्या नाहीत. फारो याजकांना त्यांच्या कामाबद्दल पगार देत होता. त्या पैशातून ते आपणासाठी अन्नधान्य विकत घेत असत म्हणून त्यांच्यावर आपल्या जमिनी विकण्याची वेळ आली नाही.
רַק אַדְמַת הַכֹּהֲנִים לֹא קָנָה כִּי חֹק לַכֹּהֲנִים מֵאֵת פַּרְעֹה וְאָֽכְלוּ אֶת־חֻקָּם אֲשֶׁר נָתַן לָהֶם פַּרְעֹה עַל־כֵּן לֹא מָכְרוּ אֶת־אַדְמָתָֽם׃
23 २३ तेव्हा योसेफ लोकांस म्हणाला, “पाहा, मी फारोकरता तुम्हास तुमच्या जमिनीसह विकत घेतले आहे तर मी आता तुम्हास बियाणे देतो. ते तुम्ही शेतात पेरा.
וַיֹּאמֶר יוֹסֵף אֶל־הָעָם הֵן קָנִיתִי אֶתְכֶם הַיּוֹם וְאֶת־אַדְמַתְכֶם לְפַרְעֹה הֵֽא־לָכֶם זֶרַע וּזְרַעְתֶּם אֶת־הָאֲדָמָֽה׃
24 २४ परंतु हंगामाच्या वेळी तुमच्या उत्पन्नातील पाचवा हिस्सा फारोला दिलाच पाहिजे. बाकीचे चार हिस्से तुम्ही तुमच्यासाठी घ्यावेत. त्यातून पुढच्या वर्षाकरता तुम्ही बियाणे ठेवावे व बाकीच्या धान्याचा तुमच्या घरातील लहानथोरांस खाण्यासाठी उपयोग करावा.”
וְהָיָה בַּתְּבוּאֹת וּנְתַתֶּם חֲמִישִׁית לְפַרְעֹה וְאַרְבַּע הַיָּדֹת יִהְיֶה לָכֶם לְזֶרַע הַשָּׂדֶה וּֽלְאׇכְלְכֶם וְלַאֲשֶׁר בְּבָתֵּיכֶם וְלֶאֱכֹל לְטַפְּכֶֽם׃
25 २५ लोक म्हणाले, “आपण आम्हांला वाचवले आहे, म्हणून फारोचे गुलाम होण्यात आम्हांला आनंद आहे.”
וַיֹּאמְרוּ הֶחֱיִתָנוּ נִמְצָא־חֵן בְּעֵינֵי אֲדֹנִי וְהָיִינוּ עֲבָדִים לְפַרְעֹֽה׃
26 २६ त्या वेळी मग योसेफाने देशासाठी एक कायदा केला, तो आजपर्यंत चालू आहे; त्या कायद्याप्रमाणे जमिनीच्या उत्पन्नाचा पाचवा भाग फारोचा आहे. फारो मिसरमधील सर्व जमिनीचा मालक आहे. फक्त याजकांची जमीन फारोच्या मालकीची नाही.
וַיָּשֶׂם אֹתָהּ יוֹסֵף לְחֹק עַד־הַיּוֹם הַזֶּה עַל־אַדְמַת מִצְרַיִם לְפַרְעֹה לַחֹמֶשׁ רַק אַדְמַת הַכֹּֽהֲנִים לְבַדָּם לֹא הָיְתָה לְפַרְעֹֽה׃
27 २७ इस्राएल मिसरमध्ये गोशेन प्रांतात राहिला. त्याची संतती खूप वाढली व त्यांची भरभराट झाली. त्यांना मिसरमधील जमीन मिळाली व त्यांनी वतने केली आणि तेथे त्यांचे सर्वकाही चांगले झाले.
וַיֵּשֶׁב יִשְׂרָאֵל בְּאֶרֶץ מִצְרַיִם בְּאֶרֶץ גֹּשֶׁן וַיֵּאָחֲזוּ בָהּ וַיִּפְרוּ וַיִּרְבּוּ מְאֹֽד׃
28 २८ याकोब मिसरमध्ये सतरा वर्षे राहिला, तो एकशे सत्तेचाळीस वर्षांचा झाला.
וַיְחִי יַעֲקֹב בְּאֶרֶץ מִצְרַיִם שְׁבַע עֶשְׂרֵה שָׁנָה וַיְהִי יְמֵֽי־יַעֲקֹב שְׁנֵי חַיָּיו שֶׁבַע שָׁנִים וְאַרְבָּעִים וּמְאַת שָׁנָֽה׃
29 २९ इस्राएलाच्या मरणाचा काळ जवळ आला, म्हणून मग त्याने आपला मुलगा योसेफ याला आपणाजवळ बोलावले आणि तो त्यास म्हणाला, “तू जर माझ्यावर प्रेम करतोस तर माझ्या मांडीखाली तुझा हात ठेवून मला वचन दे की, मी जे सांगतो ते तू करशील आणि तू माझ्याशी खरेपणाने वागशील. मला मिसरामध्ये पुरू नको.
וַיִּקְרְבוּ יְמֵֽי־יִשְׂרָאֵל לָמוּת וַיִּקְרָא ׀ לִבְנוֹ לְיוֹסֵף וַיֹּאמֶר לוֹ אִם־נָא מָצָאתִי חֵן בְּעֵינֶיךָ שִֽׂים־נָא יָדְךָ תַּחַת יְרֵכִי וְעָשִׂיתָ עִמָּדִי חֶסֶד וֶאֱמֶת אַל־נָא תִקְבְּרֵנִי בְּמִצְרָֽיִם׃
30 ३० जेव्हा मी माझ्या वाडवडिलांसोबत झोपी जाईन, तेव्हा मला मिसरमधून बाहेर घेऊन जा आणि माझ्या पूर्वजांना जेथे पुरले आहे तेथे म्हणजे आपल्या वंशजांसाठी घेतलेल्या पुरण्याच्या जागेत मला मूठमाती दे.” योसेफाने उत्तर दिले, “तुम्ही मला जे करावयास सांगितले ते मी नक्की करीन.”
וְשָֽׁכַבְתִּי עִם־אֲבֹתַי וּנְשָׂאתַנִי מִמִּצְרַיִם וּקְבַרְתַּנִי בִּקְבֻרָתָם וַיֹּאמַר אָנֹכִי אֶֽעֱשֶׂה כִדְבָרֶֽךָ׃
31 ३१ मग याकोब म्हणाला, “तू माझ्याशी तशी शपथ वाहा.” तेव्हा तसे करण्याबद्दल योसेफाने शपथ वाहिली. मग इस्राएलाने आपले डोके मागे पलंगाच्या उशावर नम्रतेने खाली वाकून नमन केले.
וַיֹּאמֶר הִשָּֽׁבְעָה לִי וַיִּשָּׁבַע לוֹ וַיִּשְׁתַּחוּ יִשְׂרָאֵל עַל־רֹאשׁ הַמִּטָּֽה׃

< उत्पत्ति 47 >