< उत्पत्ति 46 >

1 इस्राएलाने, आपले जे काही होते त्याबरोबर प्रवासास सुरुवात केली आणि तो बैर-शेबास गेला. तेथे त्याने आपला बाप इसहाक याच्या देवाला अर्पणे वाहिली.
And Israel, setting out with all that he had, arrived at the Well of the Oath. And sacrificing victims there to the God of his father Isaac,
2 रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्राएलाशी बोलला, तो म्हणाला, “याकोबा, याकोबा.” त्याने उत्तर दिले, “काय आज्ञा?”
he heard him, by a vision in the night, calling him, and saying to him: “Jacob, Jacob.” And he answered him, “Behold, here I am.”
3 तो म्हणाला “मी देव आहे, तुझ्या बापाचा देव आहे. खाली मिसर देशास जाण्यास तू भिऊ नको, कारण मी तुझ्यापासून तेथे एक मोठे राष्ट्र तयार करीन.
God said to him: “I am the most strong God of your father. Do not be afraid. Descend into Egypt, for there I will make of you a great nation.
4 मी तुझ्याबरोबर खाली मिसरात जाईन, आणि मी तुला मिसरमधून पुन्हा आणीन. आणि योसेफ आपल्या हातांनी तुझे डोळे झाकील.”
I will descend with you to that place, and I will lead you back from there, returning. Also, Joseph will place his hands over your eyes.
5 मग याकोब बैर-शेबाहून उठला. इस्राएलाच्या मुलांनी आपला बाप, आपल्या स्त्रिया व मुले या सर्वांना फारोने पाठवलेल्या गाड्यांतून मिसरला आणले.
Then Jacob rose up from the Well of the Oath. And his sons took him, with their little ones and wives, in the wagons that Pharaoh had sent to carry the old man,
6 त्याच प्रमाणे त्यांनी आपली शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि कनान देशात त्यांनी मिळवलेले सर्वकाही मिसरला नेले; याप्रमाणे याकोब व त्याची संतती मिसर देशास आली.
along with all that he possessed in the land of Canaan. And he arrived in Egypt with all his offspring:
7 त्याने आपल्यासोबत आपली मुले व नातू, आपल्या मुली व नाती या सर्व संतानांना मिसरात नेले.
his sons and his grandsons, his daughters and all his progeny together.
8 इस्राएलाचे जे पुत्र त्याच्याबरोबर मिसरला गेले त्याची नावे अशी: याकोबाचा प्रथम जन्मलेला रऊबेन;
Now these are the names of the sons of Israel, who entered into Egypt, he with his children. The firstborn is Reuben.
9 रऊबेनाचे पुत्र हनोख आणि पल्लू आणि हेस्रोन आणि कर्मी;
The sons of Reuben: Hanoch and Pallu, and Hezron and Carmi.
10 १० शिमोनाचे पुत्र यमुवेल, यामीन, ओहाद, याकोन, जोहर आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल;
The sons of Simeon: Jemuel and Jamin and Ohad, and Jachin and Zohar, and Shaul, the son of a Canaanite woman.
11 ११ लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ व मरारी;
The sons of Levi: Gershon and Kohath, and Merari.
12 १२ यहूदाचे पुत्र एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह, (परंतु एर व ओनान हे कनान देशात मरण पावले. पेरेसाचे पुत्र हेस्रोन व हामूल),
The sons of Judah: Er and Onan, and Shelah, and Perez and Zerah. Now Er and Onan died in the land of Canaan. And sons were born to Perez: Hezron and Hamul.
13 १३ इस्साखाराचे पुत्र तोला, पुवा, लोब व शिम्रोन;
The sons of Issachar: Tola and Puvah, and Job and Shimron.
14 १४ जबुलूनाचे पुत्र सेरेद, एलोन व याहलेल
The sons of Zebulun: Sered and Elon and Jahleel.
15 १५ (याकोबाला लेआपासून पदन-अरामात झालेली सहा मुले व दीना ही मुलगी; त्याच्या कुटुंबात मुले आणि मुली मिळून तेहतीस जण होते),
These are the sons of Leah, whom she bore, along with his daughter Dinah, in Mesopotamia of Syria. All the souls of her sons and daughters are thirty-three.
16 १६ गादाचे पुत्र सिफयोन आणि हग्गी, शूनी आणि एसबोन, एरी, अरोदी, आणि अरेली;
The sons of Gad: Ziphion and Haggi, and Shuni and Ezbon, and Eri and Arodi, and Areli.
17 १७ आशेराचे पुत्र इम्ना आणि इश्वा, इश्वी, आणि बरीया, आणि त्याची बहीण सेराह; आणि बरीयाचे पुत्र हेबर व मलकीएल
The sons of Asher: Imnah and Jesua, and Jessui and Beriah, and also their sister Sarah. The sons of Beria: Heber and Malchiel.
18 १८ (जिल्पा जी लाबानने आपली मुलगी लेआ हिला दिली होती, तिच्यापासून झालेले हे सगळे याकोबाचे पुत्र होते. ती एकंदर सोळा माणसे होती),
These are the sons of Zilpah, whom Laban gave to his daughter Leah. And these she bore to Jacob: sixteen souls.
19 १९ याकोबाची पत्नी राहेल हिचे पुत्र योसेफ व बन्यामीन हे होते;
The sons of Rachel, the wife of Jacob: Joseph and Benjamin.
20 २० (योसेफास मिसर देशातील ओनचा याजक पोटीफर याची मुलगी आसनथ हिच्या पोटी मनश्शे व एफ्राईम हे पुत्र झाले),
And sons were born to Joseph in the land of Egypt, whom Asenath, the daughter of Potiphera, priest of Heliopolis, bore for him: Manasseh and Ephraim.
21 २१ बन्यामिनाचे पुत्र बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम आणि आर्द.
The sons of Benjamin: Bela and Becher, and Ashbel and Gera, and Naaman and Ehi, and Rosh and Moppim, and Huppim and Ard.
22 २२ (याकोबापासून राहेलीस झालेली ही मुले. सर्व मिळून ते सर्व चौदा जण होते),
These are the sons of Rachel, whom she bore to Jacob: all these souls are fourteen.
23 २३ हुशीम हा दान याचा मुलगा होता;
The sons of Dan: Hushim.
24 २४ नफतालीचे पुत्र यासहेल, गुनी, येसेर आणि शिल्लेम हे होते.
The sons of Naphtali: Jahzeel and Guni, and Jezer and Shillem.
25 २५ (लाबानाने आपली मुलगी राहेल हिला दिलेल्या बिल्हाचे याकोबापासून झालेले हे पुत्र. हे सर्व मिळून सात जण होते).
These are the sons of Bilhah, whom Laban gave to his daughter Rachel, and these she bore to Jacob: all these souls are seven.
26 २६ याकोबाच्या वंशातील जी माणसे मिसरमध्ये गेली ती याकोबाच्या मुलांच्या स्त्रिया सोडून सहासष्ट जण होती.
All the souls who went into Egypt with Jacob and who went out from his thigh, besides the wives of his sons, were sixty-six.
27 २७ योसेफास मिसर देशात झालेले दोन पुत्र मिळून एकंदर याकोबाच्या घराण्यातले सत्तर जण मिसर देशात होते.
Now the sons of Joseph, who were born to him in the land of Egypt, were two souls. All the souls of the house of Jacob, who went into Egypt, were seventy.
28 २८ याकोबाने प्रथम यहूदाला योसेफाकडे पाठवले; यहूदा गोशेन प्रांतात योसेफाकडे गेला त्यानंतर याकोब व त्याच्या परिवारातील सर्व मंडळी यहूदाच्या मागे गोशेन प्रांतात गेली.
Then he sent Judah ahead of himself, to Joseph, in order to report to him, and so that he would meet him in Goshen.
29 २९ योसेफास आपला रथ तयार करून आपला बाप इस्राएल याच्या भेटीस गोशेन प्रांतात त्यास सामोरा गेला. योसेफाने आपल्या पित्यास पाहिले तेव्हा त्याने त्याच्या गळ्यास मिठी मारली व त्याच्या गळ्यात गळा घालून तो बराच वेळ रडला.
And when he had arrived there, Joseph harnessed his chariot, and he went up to meet his father at the same place. And seeing him, he fell upon his neck, and, amid embraces, he wept.
30 ३० मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मात्र मला शांतीने मरण येवो, मी तुझे तोंड पाहिले आहे, आणि तू जिवंत आहेस हे मला समजले आहे.”
And the father said to Joseph, “Now I will die happy, because I have seen your face, and I am leaving you behind alive.”
31 ३१ मग योसेफ आपल्या भावांना व आपल्या वडिलाच्या घरच्या सर्वांना म्हणाला, “मी जाऊन फारोला सांगतो की, ‘माझे भाऊ व माझ्या वडिलाच्या घरातील सर्व मंडळी हे कनान देश सोडून येथे माझ्याकडे आले आहेत.
And he said to his brothers and to all his father’s house: “I will go up and report to Pharaoh, and I will say to him: ‘My brothers, and my father’s house, who were in the land of Canaan, have come to me.
32 ३२ माझ्या वडिलाच्या घरचे सर्वजण मेंढपाळ आहेत, ते त्यांची शेरडेमेंढरे व गुरेढोरे पाळत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे तेथे जे काही होते ते सर्व घेऊन आले आहेत.’
And these honorable men are pastors of sheep, and they have the task of feeding the flock. Their cattle, and herds, and all that they were able to hold, they have brought with them.’
33 ३३ जेव्हा फारो राजा तुम्हास बोलावून विचारील, ‘तुम्ही काय काम धंदा करता?’
And when he will call you and will say, ‘What is your work?’
34 ३४ तेव्हा तुम्ही असे सांगा, ‘आम्ही सर्व मेंढपाळ आहोत. हा आमचा पिढीजात धंदा आहे. आमच्या आधी आमचे वाडवडील हाच धंदा करीत होते.’ मग फारो तुम्हास गोशेन प्रांतात राहू देईल. मिसरी लोकांस मेंढपाळ आवडत नाहीत.”
You will respond, ‘Your servants are pastors of honor, from our infancy even to the present time, both we and our fathers.’ Now you will say this so that you may be able to live in the land of Goshen, because the Egyptians detest all pastors of sheep.”

< उत्पत्ति 46 >