< उत्पत्ति 45 >
1 १ आता मात्र योसेफाला आपल्याजवळ जे उभे होते त्या सर्व सेवकांसमोर दुःख रोखून धरता येईना. तो मोठ्याने रडला. तो म्हणाला, “येथील सर्व लोकांस येथून बाहेर जाण्यास सांगा.” तेव्हा तेथील सर्वजण निघून गेले. केवळ त्याचे भाऊच त्याच्यापाशी राहिले. मग योसेफाने आपली ओळख त्यांना दिली.
若瑟在眾侍從前不能再抑制自己,就喊說:「叫眾人離開我出去! 」這樣,若瑟使兄弟認出自己來時,沒有別人在場。
2 २ तो मोठ्याने रडला. मिसर देशाच्या लोकांनी व फारो राजाच्या घराण्यातील लोकांनीही त्याचे रडणे ऐकले.
他便放聲大哭,埃及人都聽到了,法郎朝廷也聽到了。
3 ३ मग योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी योसेफ आहे. माझा बाप अजून जिवंत आहे काय?” परंतु त्याचे भाऊ त्यास काही उत्तर देऊ शकले नाहीत. त्याच्या समोर ते फार घाबरले होते.
若瑟對兄弟們說:「我就是若瑟,我父親還在嗎﹖」他的兄弟們不能回答,因為在他面前都嚇呆了。
4 ४ तेव्हा योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी विनंती करतो जरा इकडे माझ्याजवळ या.” तेव्हा ते त्याच्या जवळ गेले. आणि तो त्यांना म्हणाला, “तुमचा भाऊ योसेफ मीच आहे. ज्याला तुम्ही मिसरी लोकांस विकले.
若瑟又對兄弟們說:「請你們近前來。」他們就上前去。若瑟說:「我就是你們賣到埃及的弟弟若瑟。
5 ५ आता त्यासाठी काही खिन्न होऊ नका किंवा आपल्या स्वतःवर संताप करून घेऊ नका. मी येथे यावे व त्यामुळे आपणा सर्वांचे प्राण वाचावेत ही देवाचीच योजना होती.
現在你們不要因為將我賣到這裏便自憂自責;這原是天主派遣我在你們以先來,為保全你們的性命。
6 ६ हा दुष्काळ आता दोन वर्षे पडला आहे आणि आणखी पाच वर्षे पेरणी किंवा कापणी होणार नाही.
地方上的饑荒纔過了第二年,還有五年,不能耕種,不能收割。
7 ७ देवाने मला तुमच्या आधी येथे पाठवले आहे, यासाठी की, तुमचा पृथ्वीवर बचाव होऊन तुम्ही शेष रहावे आणि तुम्हास जिवंत ठेवून तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी.
天主派遣我在你們以先來,是為給你們在地上留下後裔,給你們保全多人的性命。
8 ८ मला येथे पाठवण्यात तुमचा दोष नव्हता तर ही देवाची योजना होती. देवाने मला फारोच्या वडिलासमान केले आहे. त्यामुळे मी फारोच्या घरादाराचा धनी आणि सर्व मिसर देशाचा अधिकारी झालो आहे.”
所以叫我到這裏來的並不是你們,而是天主;是他立我作法郎之父,作他全家的主人,作全埃及地的總理。
9 ९ योसेफ म्हणाला, “तर आता ताबडतोब माझ्या बापाकडे जाण्यास निघा. त्यास सांगा की, तुमचा मुलगा योसेफ याने तुम्हास संदेश पाठवला आहे. देवाने मला अवघ्या मिसर देशाचा धनी केले आहे. तर माझ्याकडे खाली निघून या. उशीर करू नका.
你們急速上到我父親那裏,對他說:你的兒子若瑟這樣說:天主立我作了全埃及的主人,請你下到我這裏來,不要遲延。
10 १० तुम्ही माझ्याजवळ गोशेन प्रांतात राहा. आणि तुम्ही, तुमची मुले, नातवंडे तसेच तुमची शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि जे काही तुमचे आहे ते माझ्याजवळ राहील.
你和你的兒孫,以及你的羊群牲畜,並你一切所有,都可住在哥笙地,離我不遠,
11 ११ येणाऱ्या दुष्काळाच्या पाच वर्षात मी तुम्हास सर्व प्रकारचा पुरवठा करीन त्यामुळे तुम्हावर व तुमच्या कुटुंबावर सर्व काही गमावून गरीब होण्याची वेळ येणार नाही.
我好在那裏奉養你,免得你和你的眷屬,並你一切所有陷於貧乏,因為尚有五年饑荒。
12 १२ पाहा, माझे तोंड तुम्हाशी बोलत आहे हे तुमचे डोळे, व माझा भाऊ बन्यामीन याचे डोळे पाहत आहेत.
看你們和我的弟弟本雅明都親眼見到,是我親口在對你們說話。
13 १३ मिसर देशातील माझे वैभव आणि तुम्ही येथे जे जे पाहिले आहे त्यासंबंधी माझ्या बापाला सांगा. आता लवकर जाऊन माझ्या बापाला माझ्याकडे खाली घेऊन या.”
你們要將我在埃及的一切光榮,和你們親見的一切,都告訴我父親,儘速將我父親下到這裏來。」
14 १४ मग त्याने आपला भाऊ बन्यामीन याला मिठी मारली आणि गळ्यात पडून रडला, आणि बन्यामीनही त्याच्या गळ्यात पडून रडला.
說畢,便撲在他弟弟本雅明的頸上哭起來了,本雅明也伏在他頸上哭泣。
15 १५ मग त्याने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांचे मुके घेतले आणि तो रडला. यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलू लागले.
然後與眾兄弟親吻,抱著他們痛哭。這以後,他的兄弟們纔敢與他交談。
16 १६ “योसेफाचे भाऊ त्याजकडे आले आहेत” अशी बातमी फारो, त्याच्या घरची मंडळी व त्याचे सेवक यांना समजली त्यामुळे त्या सर्वांना आनंद झाला.
法郎朝廷聽說若瑟兄弟來了的消息,法郎和他的臣僕都很高興。
17 १७ तेव्हा फारो योसेफाला म्हणाला, “तुझ्या भावांना सांग की, ‘तुम्हास गरज असेल तेवढी अन्नसामग्री जनावरांवर लादून कनान देशास जा.
法郎便對若瑟說:「你對你的兄弟們說:你們應這樣做:備好牲口,立即往客納罕地去,
18 १८ तसेच तुमचा बाप आणि तुमच्या घरची सर्व मंडळी यांना घेऊन माझ्याकडे या. तुम्हास रहावयास मिसरमधील सर्वांत उत्तम प्रदेश मी देईन आणि तुमच्या घरातील मंडळी, यांना आमच्या येथे असलेले उत्तम पदार्थ खावयास मिळतील.’
接你們的父親和家眷到我這裏來,我願賜給你們埃及地最好的出產,使你們享受本地的肥物。
19 १९ तुला माझी आज्ञा आहे, तू त्यांना सांग की, ‘असे करा, तुमच्या स्त्रिया व तुमची मुले या सर्वांकरिता मिसर देशातून गाड्या घेऊन जा. तुमच्या वडिलांना घेऊन या.
你再吩咐他們說:你們應這樣做:從埃及帶些車輛去接你們的子女和妻子,並把你們的父親接來;
20 २० तुमची मालमत्ता व जे काही असेल त्याची चिंता करू नका, कारण मिसर देशामधील जे उत्तम ते सर्व तुमचेच आहे.’”
不要顧惜你們的物品,因為全埃及地最好的出品都歸你們享用。」
21 २१ तेव्हा इस्राएलाच्या मुलांनी तसे केले. योसेफाने त्यांना फारोने आज्ञा दिल्याप्रमाणे गाड्या दिल्या, आणि त्यांच्या प्रवासाकरिता भरपूर अन्नसामग्री दिली.
以色列的兒子們就這樣做了。若瑟依照法郎的吩咐,給了他們一些車輛和路上用的食糧;
22 २२ तसेच त्याने प्रत्येक भावाला एक एक पोशाख दिला व बन्यामिनाला पाच पोशाख आणि चांदीची तीनशे नाणी दिली.
又給了每人一套新衣,至於本雅明,卻給了他三百銀錢和五套新衣;
23 २३ त्याने आपल्या वडिलासाठीही या देणग्या पाठवल्या: धान्य, भाकरी, आणि इतर पदार्थांनी लादलेल्या दहा गाढवी त्याच्या वडिलाच्या प्रवासासाठी पाठवल्या.
同樣,給他父親送去十匹公驢,滿載埃及最好的出品,十匹母驢,滿載糧食麵餅,和為父親路上用的食品。
24 २४ मग योसेफाने आपल्या भावांना निरोप दिला आणि ते निघाले. तो त्यांना म्हणाला, “रस्त्यात एकमेकांशी भांडू नका.”
隨後打發他的兄弟們走了;當他們離別時,對他們說:「路上不要爭吵! 」
25 २५ अशा रीतीने त्याचे भाऊ मिसर सोडून कनान देशास आपला पिता याकोब याच्याकडे गेले.
若瑟的兄弟們由埃及上到客納罕,他們父親雅各伯那裏,
26 २६ त्यांनी आपल्या पित्यास सांगितले, “तुमचा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे आणि तो अवघ्या मिसर देशाचा अधिकारी आहे.” हे ऐकून त्याचे हृदय विस्मित झाले, कारण त्याचा त्यांच्यावर विश्वास बसला नाही.
告訴他說:「若瑟還活著,而且做了全埃及國的總理。」雅各伯聽了心中淡然,並不相信。
27 २७ परंतु त्यांनी त्यास योसेफाने सांगितलेल्या सर्व गोष्टी कळवल्या. मग योसेफाने त्यास मिसरला घेऊन जाण्यासाठी पाठवलेल्या गाड्या याकोबाने पाहिल्या, तेव्हा त्यांचा बाप याकोब संजीवित झाला.
及至他們將若瑟對他們所說的話,全講給他聽,他又看了若瑟打發來接他的車輛,他們的父親雅各伯的心神才甦醒過來。
28 २८ इस्राएल म्हणाला, “हे पुरेसे आहे. माझा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे. आता मी मरण्यापूर्वी त्यास जाऊन भेटेन.”
以色列於是說:「只要我兒若瑟還在,我就心滿意足了;在我未死以前,我該去見他一面。」