< उत्पत्ति 40 >
1 १ या गोष्टीनंतर असे झाले की, फारो राजाचा प्यालेबरदार म्हणजे राजाला द्राक्षरस देणारा आणि आचारी यांनी आपल्या धन्याचा, मिसराच्या राजाचा अपराध केला.
मिश्रका राजाका पियाउने र पकाउनेले आफ्ना मालिकको विरुद्ध काम गरे ।
2 २ फारो राजा त्याच्या या दोन अधिकाऱ्यांवर म्हणजे त्याचा मुख्य प्यालेबरदार व त्याचा मुख्य आचारी यांच्यावर संतापला.
आफ्ना यी दुई अधिकार प्राप्त मुख्य पियाउने र पकाउनेसँग फारो क्रोधित भए ।
3 ३ आणि त्याने त्यांना पहारेकऱ्यांचा सरदाराच्या वाड्यात, योसेफ कैदेत होता त्या ठिकाणी, तुरुंगात टाकले.
उनले तिनीहरूलाई अङ्गरक्षकहरूका कप्तानको घरमा कैदमा राखे, जहाँ योसेफलाई पनि राखिएको थियो ।
4 ४ तेव्हा पहारेकऱ्यांच्या सरदाराने त्या दोघाही अपराध्यांना योसेफाच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. ते दोघे काही काळपर्यंत कैदेत राहिले.
अङ्गरक्षकहरूका कप्तानले योसेफलाई तिनीहरूको सेवा गर्ने जिम्मा दिए । तिनीहरू त्यस झ्यालखानामा केही समयसम्म रहे ।
5 ५ मिसरी राजाला प्याला देणारा व त्याचा आचारी हे तुरुंगात असताना, त्या दोघांनाही एकाच रात्री त्यांना लागू पडतील अशी स्वप्ने पडली.
ती झ्यालखानामा भएका मिश्रका राजाका पकाउने र पियाउने दुवैले एकै रात आ-आफ्नै सपना देखे, र ती दुवै सपनाका आ-आफ्नै अर्थ थिए ।
6 ६ दुसऱ्या दिवशी सकाळी योसेफ त्यांच्याकडे गेला. तेव्हा पाहा, ते त्यास दुःखी असलेले दिसले.
योसेफ बिहान तिनीहरूकहाँ आए र तिनीहरूलाई उदास देखे ।
7 ७ तेव्हा, त्याच्या धन्याच्या वाड्यात जे फारोचे सेवक त्याच्या बरोबर कैदेत होते, त्यांना त्याने विचारले, “आज तुम्ही असे दुःखी का दिसता?”
उनले आफ्ना मालिकका घरमा भएको झ्यालखानामा उनीसँगै भएका फारोका अधिकारीहरूलाई भने, “तपाईंहरू आज किन यति धेरै उदास देखिनुहुन्छ?”
8 ८ ते त्यास म्हणाले, “आम्हा दोघांनाही रात्री स्वप्ने पडली, परंतु त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नाही.” योसेफ त्यांना म्हणाला, “स्वप्नांचा अर्थ सांगणे देवाकडे नाही काय? कृपया, आपापले स्वप्न मला सांगा.”
तिनीहरूले उनलाई भने, “हामी दुवैले एउटा सपना देखेका छौँ र कसैले पनि त्यसको अर्थ खोल्न सकेको छैन ।” योसेफले तिनीहरूलाई भने, “के सबै अर्थहरू परमेश्वरका नै होइनन् र? कृपया, मलाई ती बताउनुहोस् ।”
9 ९ तेव्हा राजाला प्याला देणाऱ्या प्यालेबरदाराने योसेफाला आपले स्वप्न सांगितले. तो म्हणाला, “मी माझ्या स्वप्नात पाहिले की, माझ्यासमोर एक द्राक्षवेल आहे.
मुख्य पियाउनेले योसेफलाई आफ्नो सपना भने । तिनले उनलाई भने, “मेरो सपनामा मेरोअगि एउटा दाखको बोट थियो ।
10 १० द्राक्षवेलाला तीन फाटे होते. त्या फाट्यांना पाने फुटली व त्यास फुलवरा आला व नंतर त्याच्या घडास पिकलेली द्राक्षे आली.
त्यस दाखको बोटमा तिनवटा हाँगा थिए । जब त्यसमा टुसा पलायो, त्यसमा फूलहरू निस्किए र दाखका झुप्पाहरू पाके ।
11 ११ फारो राजाचा प्याला माझ्या हातात होता. तेव्हा मी ती द्राक्षे घेतली आणि फारोच्या त्या प्याल्यात पिळली आणि द्राक्षरसाचा तो प्याला मी फारोच्या हातात दिला.”
फारोको कचौरा मेरो हातमा थियो । मैले ती दाख लिएँ र फारोको कचौरामा निचरेँ, र त्यस कचौरालाई फारोका हातमा टक्र्याएँ ।”
12 १२ योसेफ त्यास म्हणाला, “तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी तुला उलगडून सांगतो. ते तीन फाटे म्हणजे तीन दिवस आहेत.
योसेफले तिनलाई भने, “यसको अर्थ यस्तो छ । तिनवटा हाँगा भनेको तिन दिन हो ।
13 १३ तीन दिवसानी फारो राजा तुझे मस्तक उंचावील व तुला पुन्हा तुझ्या पूर्वीच्या कामावर परत घेईल. तू आतापर्यंत फारोच्या प्यालेबरदाराचे जे काम करीत होतास तेव्हाच्या त्या पहिल्या रीतीप्रमाणे तू फारोचा प्याला त्याच्या हातात देशील.
तिन दिनभित्र फारोले तपाईंको शिर उच्च पार्नुहुनेछ र तपाईंलाई तपाईंको काममा पुनर्स्थापित गर्नुहुनेछ । तपाईं फारोका पियाउने हुनुहुँदाजस्तै तपाईंले फारोको कचौरालाई उहाँका हातमा टक्र्याउनुहुनेछ ।
14 १४ परंतु तुझे चांगले होईल तेव्हा माझी आठवण कर, व कृपा करून फारोला माझ्यासंबंधी सांगून मला या तुरुंगातून बाहेर काढ.
तर तपाईंको भलो हुँदा मलाई सम्झनुहोस्, र कृपया ममाथि दया देखाउनुहोस् । मेरो विषयमा फारोलाई बताएर मलाई यस झ्यालखानाबाट बाहिर निकालिदिनुहोस् ।
15 १५ कारण मला माझ्या इब्री लोकांच्या देशातून येथे पळवून आणले आहे. मी येथे तुरुंगात रहावे असा कोणाचा काहीच अपराध मी केला नाही.”
किनकि मलाई वास्तवमा हिब्रूहरूका देशबाट अपहरण गरी ल्याइएको थियो । यहाँ पनि यस झ्यालखानामा राखिनुपर्ने कुनै काम मैले गरेको छैन ।”
16 १६ स्वप्नाचा अर्थ चांगला आहे हे पाहून मुख्य आचाऱ्याने योसेफाला म्हटले, “मलाही एक स्वप्न पडले. आणि पाहा, माझ्या डोक्यावर भाकरीच्या तीन टोपल्या होत्या.
जब मुख्य पकाउनेले सपनाको अर्थ असल भएको देखे, उनले योसेफलाई भने, “मैले पनि एउटा सपना देखेको थिएँ । रोटीका तिनवटा टोकरी मेरो टाउकोमाथि थिए ।
17 १७ सगळ्यात वरच्या टोपलीत फारो राजासाठी भट्टीत भाजलेली सर्व प्रकारची पक्वान्ने होती, परंतु माझ्या डोक्यावरील त्या टोपलीतील पदार्थ पक्षी खात होते.”
सबैभन्दा माथिको टोकरीमा फारोका निम्ति सबै किसिमका पकाइएका खाने कुरा थिए, तर चराहरूले मेरो टाउकोमाथिको टोकरीबाट ती खाइदिए ।”
18 १८ योसेफाने उत्तर दिले, “तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी उलगडून सांगतो, त्या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस आहेत.
योसेफले जवाफ दिए, “यसको अर्थ यस्तो छ । तिनवटा टोकरी भनेको तिन दिन हो ।
19 १९ तीन दिवसात फारो राजा तुझे शीर वर करून उडवून टाकील आणि तुला झाडाला टांगील आणि पक्षी तुझे मांस तोडून खातील.”
तिन दिनभित्र फारोले तपाईंको शिर उठाएर तपाईंलाई रुखमा झुण्ड्याइदिनुहुनेछ । चराहरूले तपाईंको मासु खानेछन् ।”
20 २० तीन दिवसानंतर फारो राजाचा वाढदिवस होता. तेव्हा त्याने आपल्या सर्व सेवकवर्गाला एक मेजवानी दिली. त्या वेळी त्याने त्याचा आचारी आणि प्यालेबरदाराकडे त्याच्या इतर सेवकांपेक्षा अधिक लक्ष दिले.
त्यसपछिको तेस्रो दिन फारोको जन्म दिन थियो । तिनले आफ्ना सबै नोकरहरूका निम्ति भोजको आयोजना गरे । आफ्ना नोकरहरूका माझमा तिनले मुख्य पियाउने र मुख्य पकाउनेलाई उभ्याए ।
21 २१ त्याने प्यालेबरदाराची सुटका केली व त्यास पुन्हा पूर्वीप्रमाणे त्याच्या कामावर ठेवले; आणि प्यालेबरदाराने पुन्हा एकदा प्याला फारो राजाच्या हातात दिला.
तिनले मुख्य पियाउनेलाई उनको जिम्मेवारीमा पुनर्स्थापित गरिदिए, र उनले फेरि फारोका हातमा कचौरा टक्र्याए ।
22 २२ परंतु, योसेफाने अर्थ सांगितला होता त्याप्रमाणेच त्याने आचाऱ्याला फाशी दिली.
तर योसेफले तिनीहरूलाई अर्थ बताएझैँ फारोले मुख्य पकाउनेलाई झुण्ड्याइदिए ।
23 २३ पण त्या प्यालेबरदाराला योसेफाची आठवण राहिली नाही. त्यास त्याचा विसर पडला.
मुख्य पियाउनेले भने योसेफलाई सम्झेनन्, तर उनलाई बिर्सिहाले ।