< उत्पत्ति 40 >

1 या गोष्टीनंतर असे झाले की, फारो राजाचा प्यालेबरदार म्हणजे राजाला द्राक्षरस देणारा आणि आचारी यांनी आपल्या धन्याचा, मिसराच्या राजाचा अपराध केला.
Un pēc šīm lietām Ēģiptes ķēniņa dzēriena devējs un maizes cepējs apgrēkojās pret savu kungu, Ēģiptes ķēniņu,
2 फारो राजा त्याच्या या दोन अधिकाऱ्यांवर म्हणजे त्याचा मुख्य प्यालेबरदार व त्याचा मुख्य आचारी यांच्यावर संतापला.
Tā ka Faraons apskaitās par saviem diviem virsniekiem, par dzēriena devēju virsnieku un par maizes cepēju virsnieku.
3 आणि त्याने त्यांना पहारेकऱ्यांचा सरदाराच्या वाड्यात, योसेफ कैदेत होता त्या ठिकाणी, तुरुंगात टाकले.
Un viņš tos lika iemest cietumā, sargu virsnieka namā, turpat, kur Jāzeps bija saistīts.
4 तेव्हा पहारेकऱ्यांच्या सरदाराने त्या दोघाही अपराध्यांना योसेफाच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. ते दोघे काही काळपर्यंत कैदेत राहिले.
Un sargu virsnieks tiem iedeva Jāzepu, ka tas tiem kalpotu, un tie bija kādu laiku cietumā.
5 मिसरी राजाला प्याला देणारा व त्याचा आचारी हे तुरुंगात असताना, त्या दोघांनाही एकाच रात्री त्यांना लागू पडतील अशी स्वप्ने पडली.
Un tie abi vienā naktī sapņoja sapņus, katrs savu sapni, Ēģiptes ķēniņa dzēriena devējs un maizes cepējs, kas cietuma namā bija saistīti, - katrs sapnis bija savādi izstāstāms.
6 दुसऱ्या दिवशी सकाळी योसेफ त्यांच्याकडे गेला. तेव्हा पाहा, ते त्यास दुःखी असलेले दिसले.
Un Jāzeps no rīta pie tiem nāca un tos apraudzīja, un redzi, tie bija noskumuši.
7 तेव्हा, त्याच्या धन्याच्या वाड्यात जे फारोचे सेवक त्याच्या बरोबर कैदेत होते, त्यांना त्याने विचारले, “आज तुम्ही असे दुःखी का दिसता?”
Tad tas vaicāja Faraona virsniekus, kas pie tā bija cietumā, sava kunga namā, un sacīja: kāpēc jūsu vaigi šodien tik skumīgi?
8 ते त्यास म्हणाले, “आम्हा दोघांनाही रात्री स्वप्ने पडली, परंतु त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नाही.” योसेफ त्यांना म्हणाला, “स्वप्नांचा अर्थ सांगणे देवाकडे नाही काय? कृपया, आपापले स्वप्न मला सांगा.”
Un šie tam sacīja: mēs sapni esam sapņojuši un še nav neviena, kas mums to izstāsta. Un Jāzeps tiem atbildēja: vai izstāstīšanas nepieder Dievam? Teiciet jel man to.
9 तेव्हा राजाला प्याला देणाऱ्या प्यालेबरदाराने योसेफाला आपले स्वप्न सांगितले. तो म्हणाला, “मी माझ्या स्वप्नात पाहिले की, माझ्यासमोर एक द्राक्षवेल आहे.
Tad dzēriena devēju virsnieks Jāzepam izteica savu sapni un uz to sacīja: redzi jel, savā sapnī es redzēju vīnakoku savā priekšā.
10 १० द्राक्षवेलाला तीन फाटे होते. त्या फाट्यांना पाने फुटली व त्यास फुलवरा आला व नंतर त्याच्या घडास पिकलेली द्राक्षे आली.
Un tam vīnakokam bija trīs zari, un tas izplauka, viņa zaļums auga, ziedēja, un viņa ogas ienācās.
11 ११ फारो राजाचा प्याला माझ्या हातात होता. तेव्हा मी ती द्राक्षे घेतली आणि फारोच्या त्या प्याल्यात पिळली आणि द्राक्षरसाचा तो प्याला मी फारोच्या हातात दिला.”
Un Faraona biķeris bija manā rokā, un es ņēmu tās ogas un tās izspiedu Faraona biķerī un devu biķeri Faraona rokā.
12 १२ योसेफ त्यास म्हणाला, “तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी तुला उलगडून सांगतो. ते तीन फाटे म्हणजे तीन दिवस आहेत.
Tad Jāzeps uz to sacīja: šī ir viņa izstāstīšana, - tie trīs zari ir trīs dienas.
13 १३ तीन दिवसानी फारो राजा तुझे मस्तक उंचावील व तुला पुन्हा तुझ्या पूर्वीच्या कामावर परत घेईल. तू आतापर्यंत फारोच्या प्यालेबरदाराचे जे काम करीत होतास तेव्हाच्या त्या पहिल्या रीतीप्रमाणे तू फारोचा प्याला त्याच्या हातात देशील.
Pēc trim dienām Faraons tavu galvu paaugstinās un tevi iecels atkal tavā amatā, un tu dosi Faraonam biķeri viņa rokā pēc pirmaja ieraduma, kad tu biji viņa dzēriena devējs.
14 १४ परंतु तुझे चांगले होईल तेव्हा माझी आठवण कर, व कृपा करून फारोला माझ्यासंबंधी सांगून मला या तुरुंगातून बाहेर काढ.
Bet piemini mani, kad tev labi klāsies, un dari lūdzams žēlastību pie manis un piemini mani pie Faraona un dari, ka es topu izlaists no šā nama.
15 १५ कारण मला माझ्या इब्री लोकांच्या देशातून येथे पळवून आणले आहे. मी येथे तुरुंगात रहावे असा कोणाचा काहीच अपराध मी केला नाही.”
Jo es zagšus esmu nozagts no Ebreju zemes, un arī nekā ļauna neesmu darījis, ka tie mani bedrē iemetuši.
16 १६ स्वप्नाचा अर्थ चांगला आहे हे पाहून मुख्य आचाऱ्याने योसेफाला म्हटले, “मलाही एक स्वप्न पडले. आणि पाहा, माझ्या डोक्यावर भाकरीच्या तीन टोपल्या होत्या.
Un kad maizes cepēju virsnieks redzēja, ka tas labi bija izstāstījis, tad tas Jāzepam sacīja: man arī bija sapnis, un redzi, trīs maizes kurvji bija uz manas galvas.
17 १७ सगळ्यात वरच्या टोपलीत फारो राजासाठी भट्टीत भाजलेली सर्व प्रकारची पक्वान्ने होती, परंतु माझ्या डोक्यावरील त्या टोपलीतील पदार्थ पक्षी खात होते.”
Un virsējā kurvī bija no visāda Faraona ēdiena, kas ir beķera cepums, un putni ēda no tā kurvja uz manas galvas.
18 १८ योसेफाने उत्तर दिले, “तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी उलगडून सांगतो, त्या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस आहेत.
Tad Jāzeps atbildēja un sacīja. Šī ir viņa izstāstīšana, - tie trīs kurvji ir trīs dienas.
19 १९ तीन दिवसात फारो राजा तुझे शीर वर करून उडवून टाकील आणि तुला झाडाला टांगील आणि पक्षी तुझे मांस तोडून खातील.”
Un pēc trim dienām Faraons tavu galvu pacels un tevi pakārs karātavās un putni ēdīs tavu miesu no tevis.
20 २० तीन दिवसानंतर फारो राजाचा वाढदिवस होता. तेव्हा त्याने आपल्या सर्व सेवकवर्गाला एक मेजवानी दिली. त्या वेळी त्याने त्याचा आचारी आणि प्यालेबरदाराकडे त्याच्या इतर सेवकांपेक्षा अधिक लक्ष दिले.
Un notikās trešā dienā, Faraona dzimšanas dienā, ka viņš visiem saviem kalpiem dzīres darīja, un viņš paaugstināja dzēriena devēju virsnieka galvu un maizes cepēju virsnieka galvu starp saviem kalpiem,
21 २१ त्याने प्यालेबरदाराची सुटका केली व त्यास पुन्हा पूर्वीप्रमाणे त्याच्या कामावर ठेवले; आणि प्यालेबरदाराने पुन्हा एकदा प्याला फारो राजाच्या हातात दिला.
Un iecēla dzēriena devēju virsnieku atkal viņa vietā, un tas biķeri deva Faraonam rokā.
22 २२ परंतु, योसेफाने अर्थ सांगितला होता त्याप्रमाणेच त्याने आचाऱ्याला फाशी दिली.
Un maizes cepēju virsnieku viņš lika pakārt, - tā kā Jāzeps tiem bija izstāstījis.
23 २३ पण त्या प्यालेबरदाराला योसेफाची आठवण राहिली नाही. त्यास त्याचा विसर पडला.
Bet dzēriena devēju virsnieks nepieminēja Jāzepu, bet viņu aizmirsa.

< उत्पत्ति 40 >