< उत्पत्ति 39 >

1 योसेफाला खाली मिसरात आणले. फारो राजाचा एक मिसरी अधिकारी, संरक्षक दलाचा सरदार पोटीफर, याने त्यास इश्माएली लोकांकडून विकत घेतले.
約瑟被帶下埃及去。有一個埃及人,是法老的內臣-護衛長波提乏,從那些帶下他來的以實瑪利人手下買了他去。
2 परमेश्वर देव योसेफाबरोबर होता. तो यशस्वी पुरुष होता. तो आपल्या मिसरी धन्याच्या घरी राहत असे.
約瑟住在他主人埃及人的家中,耶和華與他同在,他就百事順利。
3 परमेश्वर देव त्याच्याबरोबर आहे आणि म्हणून जे काही तो करतो त्या प्रत्येक कामात परमेश्वर देव त्यास यश देतो, हे त्याच्या धन्याला दिसून आले.
他主人見耶和華與他同在,又見耶和華使他手裏所辦的盡都順利,
4 योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली. त्याने पोटीफराची सेवा केली. पोटीफराने योसेफाला आपल्या घराचा कारभारी केले आणि त्याचे जे काही स्वतःचे होते ते सर्व त्याच्या ताब्यात दिले.
約瑟就在主人眼前蒙恩,伺候他主人,並且主人派他管理家務,把一切所有的都交在他手裏。
5 तेव्हा त्याने आपल्या घरात आणि आपले जे काही होते त्या सर्वावर योसेफाला कारभारी केले तेव्हापासून परमेश्वराने योसेफामुळे त्या मिसऱ्याच्या घरास आशीर्वाद दिला. घरात व शेतीत जे काही पोटीफराच्या मालकीचे होते त्या सर्वावर परमेश्वराचा आशीर्वाद होता.
自從主人派約瑟管理家務和他一切所有的,耶和華就因約瑟的緣故賜福與那埃及人的家;凡家裏和田間一切所有的都蒙耶和華賜福。
6 पोटीफराने आपल्या घरादाराचा सर्व कारभार योसेफाच्या हवाली केला. तो जे अन्न खात असे, त्या पलीकडे कशाचाही तो विचार करत नव्हता. योसेफ फार देखणा व आकर्षक होता.
波提乏將一切所有的都交在約瑟的手中,除了自己所吃的飯,別的事一概不知。 約瑟原來秀雅俊美。
7 काही काळानंतर त्याच्या धन्याच्या पत्नीला योसेफाविषयी वासना निर्माण झाली. ती म्हणाली, “माझ्याबरोबर प्रेम कर.”
這事以後,約瑟主人的妻以目送情給約瑟,說:「你與我同寢吧!」
8 परंतु त्याने नकार दिला. तो त्याच्या धन्याच्या पत्नीला म्हणाला, “पाहा, घरात मी काय करतो याकडे माझा धनी लक्ष देत नाही आणि जे काही त्याचे आहे ते सर्व त्याने माझ्या ताब्यात सोपवले आहे.
約瑟不從,對他主人的妻說:「看哪,一切家務,我主人都不知道;他把所有的都交在我手裏。
9 या घरात माझ्यापेक्षा कोणीही मोठा नाही. तू त्याची पत्नी आहेस म्हणून तुझ्यावाचून त्याने माझ्यापासून काहीही राखून ठेवले नाही. असे असताना, देवाच्याविरूद्ध हे घोर पाप व मोठी दुष्टाई मी कशी करू?”
在這家裏沒有比我大的;並且他沒有留下一樣不交給我,只留下了你,因為你是他的妻子。我怎能作這大惡,得罪上帝呢?」
10 १० ती दररोज योसेफाबरोबर तेच बोलत असे, परंतु त्याने तिच्याबरोबर निजण्यास व प्रेम करण्यास नकार दिला.
後來她天天和約瑟說,約瑟卻不聽從她,不與她同寢,也不和她在一處。
11 ११ एके दिवशी योसेफ आपले काही काम करण्याकरता आतल्या घरात गेला. तो तेथे अगदी एकटाच होता व घरात दुसरे कोणीही नव्हते.
有一天,約瑟進屋裏去辦事,家中人沒有一個在那屋裏,
12 १२ तिने त्याचे वस्त्र धरून त्यास म्हटले “तू माझ्यापाशी नीज.” परंतु तो ते वस्त्र तिच्या हातात सोडून आतल्या घरातून बाहेर पळून गेला.
婦人就拉住他的衣裳,說:「你與我同寢吧!」約瑟把衣裳丟在婦人手裏,跑到外邊去了。
13 १३ तेव्हा तो त्याचे वस्त्र आपल्या हाती सोडून आणि बाहेर पळून गेला हे तिने पाहिले.
婦人看見約瑟把衣裳丟在她手裏跑出去了,
14 १४ आणि तिने हाक मारून तिच्या घरातील मनुष्यांना बोलावले. आणि ती म्हणाली, “पाहा, पोटीफराने या इब्र्याला आमच्या घरच्या मनुष्यांची अब्रू घेण्यासाठी आणून ठेवले आहे. त्याने आत येऊन माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी मोठ्याने ओरडले.
就叫了家裏的人來,對他們說:「你們看!他帶了一個希伯來人進入我們家裏,要戲弄我們。他到我這裏來,要與我同寢,我就大聲喊叫。
15 १५ मी मोठ्याने ओरडले त्यामुळे त्याचे वस्त्र माइयापाशी टाकून तो पळाला आणि बाहेर गेला.”
他聽見我放聲喊起來,就把衣裳丟在我這裏,跑到外邊去了。」
16 १६ तेव्हा त्याचा धनी घरी येईपर्यंत तिने त्याचे वस्त्र आपल्याजवळ ठेवले.
婦人把約瑟的衣裳放在自己那裏,等着他主人回家,
17 १७ नंतर तिने त्यास सांगितले. ती म्हणाली, “तुम्ही हा जो इब्री घरी आणून ठेवला आहे त्याने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
就對他如此如此說:「你所帶到我們這裏的那希伯來僕人進來要戲弄我,
18 १८ परंतु तो माझ्याजवळ आल्यावर मी मोठ्याने ओरडले म्हणून तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून बाहेर पळून गेला.”
我放聲喊起來,他就把衣裳丟在我這裏,跑出去了。」
19 १९ आणि असे झाले की, त्याच्या धन्याने पत्नीचे बोलणे ऐकले, ती त्यास म्हणाली की, “तुझ्या सेवकाने माझ्याशी असे वर्तन केले,” तो खूप संतापला.
約瑟的主人聽見他妻子對他所說的話,說「你的僕人如此如此待我」,他就生氣,
20 २० योसेफाच्या धन्याने त्यास धरले आणि जेथे राजाच्या कैद्यांना कोंडत असत त्या तुरुंगात टाकले. योसेफ त्या तुरुंगात राहिला.
把約瑟下在監裏,就是王的囚犯被囚的地方。於是約瑟在那裏坐監。
21 २१ परंतु परमेश्वर देव योसेफाबरोबर होता, आणि त्याने त्यास कराराची सत्यता दाखवली. त्याने तुरुंगाच्या अधिकाऱ्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले.
但耶和華與約瑟同在,向他施恩,使他在司獄的眼前蒙恩。
22 २२ त्या अधिकाऱ्याने तुरुंगातील सर्व कैद्यांना योसेफाच्या स्वाधीन केले. ते तेथे जे काही करीत होते, त्याचा योसेफ प्रमुख होता.
司獄就把監裏所有的囚犯都交在約瑟的手下;他們在那裏所辦的事都是經他的手。
23 २३ तुरुंगाचा अधिकारी त्याच्या हाताखालील कोणत्याही कामाबद्दल काळजी करीत नसे. कारण परमेश्वर त्याच्याबरोबर होता. तो जे काही करी, त्यामध्ये परमेश्वर देव त्यास यश देई.
凡在約瑟手下的事,司獄一概不察,因為耶和華與約瑟同在;耶和華使他所做的盡都順利。

< उत्पत्ति 39 >