< उत्पत्ति 38 >

1 त्याच सुमारास यहूदा आपल्या भावांना सोडून अदुल्लाम नगरातील हिरा नावाच्या मनुष्याबरोबर त्याच्या घरी रहावयास गेला.
וַֽיְהִי בָּעֵת הַהִוא וַיֵּרֶד יְהוּדָה מֵאֵת אֶחָיו וַיֵּט עַד־אִישׁ עֲדֻלָּמִי וּשְׁמוֹ חִירָֽה׃
2 तेथे यहूदाला शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याची मुलगी भेटली. तेव्हा त्याने तिच्यावर प्रेम केले आणि तिच्याशी लग्न केले.
וַיַּרְא־שָׁם יְהוּדָה בַּת־אִישׁ כְּנַעֲנִי וּשְׁמוֹ שׁוּעַ וַיִּקָּחֶהָ וַיָּבֹא אֵלֶֽיהָ׃
3 ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला. त्याने त्याचे नाव एर ठेवले.
וַתַּהַר וַתֵּלֶד בֵּן וַיִּקְרָא אֶת־שְׁמוֹ עֵֽר׃
4 त्यानंतर ती पुन्हा गरोदर राहिली व तिला मुलगा झाला. तिने त्याचे नाव ओनान ठेवले.
וַתַּהַר עוֹד וַתֵּלֶד בֵּן וַתִּקְרָא אֶת־שְׁמוֹ אוֹנָֽן׃
5 त्यानंतर तिला आणखी एक मुलगा झाला आणि त्याचे नाव शेला ठेवले. त्यास जन्म दिला होता तेव्हा ती कजीब नगरामध्ये राहत होती.
וַתֹּסֶף עוֹד וַתֵּלֶד בֵּן וַתִּקְרָא אֶת־שְׁמוֹ שֵׁלָה וְהָיָה בִכְזִיב בְּלִדְתָּהּ אֹתֽוֹ׃
6 यहूदाने आपला पहिला मुलगा एर याच्यासाठी पत्नी शोधली. तिचे नाव तामार होते.
וַיִּקַּח יְהוּדָה אִשָּׁה לְעֵר בְּכוֹרוֹ וּשְׁמָהּ תָּמָֽר׃
7 परंतु यहूदाचा प्रथम जन्मलेला मुलगा एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता. परमेश्वराने त्यास ठार मारले.
וַיְהִי עֵר בְּכוֹר יְהוּדָה רַע בְּעֵינֵי יְהֹוָה וַיְמִתֵהוּ יְהֹוָֽה׃
8 मग यहूदा ओनान याला म्हणाला, “तू तुझ्या भावाच्या पत्नीवर प्रेम कर. तिच्याबरोबर दिराचे कर्तव्य पार पाड, आणि तुझ्या भावाकरता तिला संतान होऊ दे.”
וַיֹּאמֶר יְהוּדָה לְאוֹנָן בֹּא אֶל־אֵשֶׁת אָחִיךָ וְיַבֵּם אֹתָהּ וְהָקֵם זֶרַע לְאָחִֽיךָ׃
9 ती मुले आपली होणार नाहीत, हे ओनानला माहीत होते. म्हणून जेव्हा तो त्याच्या भावाच्या पत्नीशी प्रेम करत असे, तेव्हा तो आपले वीर्य बाहेर जमिनीवर पाडत असे, यासाठी की त्यास त्याच्या भावासाठी मूल होऊ नये.
וַיֵּדַע אוֹנָן כִּי לֹּא לוֹ יִהְיֶה הַזָּרַע וְהָיָה אִם־בָּא אֶל־אֵשֶׁת אָחִיו וְשִׁחֵת אַרְצָה לְבִלְתִּי נְתׇן־זֶרַע לְאָחִֽיו׃
10 १० त्याने जे केले ते परमेश्वराच्या दृष्टीने वाईट होते, म्हणून परमेश्वराने त्यास मारून टाकले.
וַיֵּרַע בְּעֵינֵי יְהֹוָה אֲשֶׁר עָשָׂה וַיָּמֶת גַּם־אֹתֽוֹ׃
11 ११ मग यहूदा आपली सून तामार हिला म्हणाला, “माझा मुलगा शेला लग्नाच्या वयाचा होईपर्यंत तू तुझ्या वडिलाच्या घरी जाऊन तेथे विधवा म्हणून राहा.” कारण त्याने विचार केला, “नाही तर, तोसुद्धा आपल्या दोन भावांप्रमाणे मरून जाईल.” मग तामार आपल्या वडिलाच्या घरी जाऊन राहिली.
וַיֹּאמֶר יְהוּדָה לְתָמָר כַּלָּתוֹ שְׁבִי אַלְמָנָה בֵית־אָבִיךְ עַד־יִגְדַּל שֵׁלָה בְנִי כִּי אָמַר פֶּן־יָמוּת גַּם־הוּא כְּאֶחָיו וַתֵּלֶךְ תָּמָר וַתֵּשֶׁב בֵּית אָבִֽיהָ׃
12 १२ बऱ्याच काळानंतर यहूदाची पत्नी, म्हणजे शूवाची मुलगी मरण पावली. तिच्यासाठी शोक करण्याचे दिवस संपल्यानंतर यहूदा अदुल्लाम येथील आपला मित्र हिरा याच्याबरोबर आपली मेंढरे कातरायला वर तिम्ना येथे गेला.
וַיִּרְבּוּ הַיָּמִים וַתָּמׇת בַּת־שׁוּעַ אֵֽשֶׁת־יְהוּדָה וַיִּנָּחֶם יְהוּדָה וַיַּעַל עַל־גֹּֽזְזֵי צֹאנוֹ הוּא וְחִירָה רֵעֵהוּ הָעֲדֻלָּמִי תִּמְנָֽתָה׃
13 १३ तेव्हा तामारेला कोणी सांगितले की, “पाहा, तुझा सासरा आपल्या मेंढरांची लोकर कातरवून घेण्याकरता तिम्ना येथे जात आहे.”
וַיֻּגַּד לְתָמָר לֵאמֹר הִנֵּה חָמִיךְ עֹלֶה תִמְנָתָה לָגֹז צֹאנֽוֹ׃
14 १४ तिने आपली विधवेची वस्त्रे काढली आणि बुरखा घेऊन शरीर लपेटून घेतले. नंतर तिम्नाच्या रस्त्यावर एनाईम नगराच्या वेशीत ती बसून राहिली. कारण तिने पाहिले की, शेला आता प्रौढ झाला असूनही आपल्याला अजून त्याची पत्नी करून दिले नाही.
וַתָּסַר בִּגְדֵי אַלְמְנוּתָהּ מֵֽעָלֶיהָ וַתְּכַס בַּצָּעִיף וַתִּתְעַלָּף וַתֵּשֶׁב בְּפֶתַח עֵינַיִם אֲשֶׁר עַל־דֶּרֶךְ תִּמְנָתָה כִּי רָאֲתָה כִּֽי־גָדַל שֵׁלָה וְהִוא לֹֽא־נִתְּנָה לוֹ לְאִשָּֽׁה׃
15 १५ यहूदाने तिला पाहिले, परंतु ती एक वेश्या असावी असे त्यास वाटले. तिने आपले तोंड झाकले होते.
וַיִּרְאֶהָ יְהוּדָה וַֽיַּחְשְׁבֶהָ לְזוֹנָה כִּי כִסְּתָה פָּנֶֽיהָ׃
16 १६ तेव्हा यहूदा तिच्याजवळ जाऊन म्हणाला, “मला तुझ्यापाशी निजू दे.” ती आपली सून आहे हे यहूदाला माहीत नव्हते. ती म्हणाली, “तुम्ही मला त्याबद्दल काय मोबदला द्याल?”
וַיֵּט אֵלֶיהָ אֶל־הַדֶּרֶךְ וַיֹּאמֶר הָֽבָה־נָּא אָבוֹא אֵלַיִךְ כִּי לֹא יָדַע כִּי כַלָּתוֹ הִוא וַתֹּאמֶר מַה־תִּתֶּן־לִי כִּי תָבוֹא אֵלָֽי׃
17 १७ यहूदा म्हणाला, “मी तुला माझ्या कळपातून एक करडू पाठवून देईन.” ती म्हणाली, “परंतु ते पाठवून देईपर्यंत तुम्ही माझ्याजवळ काय गहाण ठेवाल?”
וַיֹּאמֶר אָנֹכִי אֲשַׁלַּח גְּדִֽי־עִזִּים מִן־הַצֹּאן וַתֹּאמֶר אִם־תִּתֵּן עֵרָבוֹן עַד שׇׁלְחֶֽךָ׃
18 १८ यहूदा म्हणाला, “गहाण म्हणून मी तुझ्याकडे काय ठेवू?” तामार म्हणाली, “तुम्ही अंगठी, गोफ व हातातली काठी मला द्या.” तेव्हा यहूदाने त्या वस्तू तिला दिल्या. मग तो तिजपाशी जाऊन निजला. त्याच्यापासून ती गरोदर राहिली.
וַיֹּאמֶר מָה הָעֵֽרָבוֹן אֲשֶׁר אֶתֶּן־לָךְ וַתֹּאמֶר חֹתָֽמְךָ וּפְתִילֶךָ וּמַטְּךָ אֲשֶׁר בְּיָדֶךָ וַיִּתֶּן־לָהּ וַיָּבֹא אֵלֶיהָ וַתַּהַר לֽוֹ׃
19 १९ ती उठली आणि निघून गेली. तिने आपला बुरखा काढून टाकला आणि आपली विधवेची वस्त्रे घातली.
וַתָּקׇם וַתֵּלֶךְ וַתָּסַר צְעִיפָהּ מֵעָלֶיהָ וַתִּלְבַּשׁ בִּגְדֵי אַלְמְנוּתָֽהּ׃
20 २० यहूदाने आपला मित्र अदुल्लामकर ह्याला आपल्या कळपातील करडू घेऊन त्या स्त्रीला तारण म्हणून दिलेल्या वस्तू आणावयास पाठवले, परंतु त्यास ती सापडली नाही.
וַיִּשְׁלַח יְהוּדָה אֶת־גְּדִי הָֽעִזִּים בְּיַד רֵעֵהוּ הָֽעֲדֻלָּמִי לָקַחַת הָעֵרָבוֹן מִיַּד הָאִשָּׁה וְלֹא מְצָאָֽהּ׃
21 २१ मग अदुल्लामकराने तेथील काही लोकांस विचारले, “येथे या एनाईमाच्या रस्त्यावर एक वेश्या होती ती कोठे आहे?” तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “येथे कधीच कोणीही वेश्या नव्हती.”
וַיִּשְׁאַל אֶת־אַנְשֵׁי מְקֹמָהּ לֵאמֹר אַיֵּה הַקְּדֵשָׁה הִוא בָעֵינַיִם עַל־הַדָּרֶךְ וַיֹּאמְרוּ לֹא־הָיְתָה בָזֶה קְדֵשָֽׁה׃
22 २२ तेव्हा यहूदाचा मित्र त्याच्याकडे परत गेला व म्हणाला, “ती वेश्या मला काही सापडली नाही, तेथे राहणारे लोक म्हणाले की, ‘तेथे कोणीही वेश्या कधीच नव्हती.’”
וַיָּשׇׁב אֶל־יְהוּדָה וַיֹּאמֶר לֹא מְצָאתִיהָ וְגַם אַנְשֵׁי הַמָּקוֹם אָֽמְרוּ לֹא־הָיְתָה בָזֶה קְדֵשָֽׁה׃
23 २३ यहूदा म्हणाला, “जाऊ दे, त्या वस्तू तिला ठेवून घेऊ दे, नाहीतर आपलीच नालस्ती होईल. मी कबूल केल्याप्रमाणे तिला करडू देण्याचा प्रयत्न केला, परंतु ती आपल्याला सापडली नाही.”
וַיֹּאמֶר יְהוּדָה תִּֽקַּֽח־לָהּ פֶּן נִהְיֶה לָבוּז הִנֵּה שָׁלַחְתִּי הַגְּדִי הַזֶּה וְאַתָּה לֹא מְצָאתָֽהּ׃
24 २४ या नंतर तीन महिन्यांनी कोणीतरी यहूदाला सांगितले, “तुझी सुन तामार हिने वेश्येप्रमाणे पापकर्म केले आणि त्या व्यभिचारामुळे ती आता गरोदर राहिली आहे.” यहूदा म्हणाला, “तिला बाहेर काढा व जाळून टाका.”
וַיְהִי ׀ כְּמִשְׁלֹשׁ חֳדָשִׁים וַיֻּגַּד לִֽיהוּדָה לֵֽאמֹר זָֽנְתָה תָּמָר כַּלָּתֶךָ וְגַם הִנֵּה הָרָה לִזְנוּנִים וַיֹּאמֶר יְהוּדָה הוֹצִיאוּהָ וְתִשָּׂרֵֽף׃
25 २५ जेव्हा तिला बाहेर आणले तिने आपल्या सासऱ्यासाठी एक निरोप पाठवला, “ज्या मनुष्याच्या मालकीच्या या वस्तू आहेत त्याच्यापासून मी गरोदर आहे.” पुढे ती म्हणाली, “ही अंगठी, गोफ आणि काठी कोणाची आहेत ते ओळख.”
הִוא מוּצֵאת וְהִיא שָׁלְחָה אֶל־חָמִיהָ לֵאמֹר לְאִישׁ אֲשֶׁר־אֵלֶּה לּוֹ אָנֹכִי הָרָה וַתֹּאמֶר הַכֶּר־נָא לְמִי הַחֹתֶמֶת וְהַפְּתִילִים וְהַמַּטֶּה הָאֵֽלֶּה׃
26 २६ यहूदाने त्या वस्तू ओळखल्या आणि तो म्हणाला, “माझ्यापेक्षा ती अधिक नीतिमान आहे. कारण मी तिला वचन दिल्यानुसार माझा मुलगा शेला याला ती पत्नी म्हणून दिली नाही.” त्यानंतर त्याने तिच्याशी पुन्हा शरीरसंबंध केला नाही.
וַיַּכֵּר יְהוּדָה וַיֹּאמֶר צָֽדְקָה מִמֶּנִּי כִּֽי־עַל־כֵּן לֹא־נְתַתִּיהָ לְשֵׁלָה בְנִי וְלֹֽא־יָסַף עוֹד לְדַעְתָּֽהּ׃
27 २७ तिच्या प्रसुतीच्या वेळी असे झाले की, पाहा, तिच्या पोटात जुळी मुले होती.
וַיְהִי בְּעֵת לִדְתָּהּ וְהִנֵּה תְאוֹמִים בְּבִטְנָֽהּ׃
28 २८ प्रसुतीच्या वेळी एका बाळाचा हात बाहेर आला. तेव्हा दाईने त्याच्या हाताला लाल धागा बांधला व ती म्हणाली, “हा आधी जन्मला.”
וַיְהִי בְלִדְתָּהּ וַיִּתֶּן־יָד וַתִּקַּח הַמְיַלֶּדֶת וַתִּקְשֹׁר עַל־יָדוֹ שָׁנִי לֵאמֹר זֶה יָצָא רִאשֹׁנָֽה׃
29 २९ परंतु त्या बाळाने आपला हात आखडून घेतला. त्यानंतर मग दुसरे बाळ प्रथम जन्मले. म्हणून मग ती सुईण म्हणाली, “तू आपल्यासाठी कशी वाट फोडलीस!” आणि त्याचे नाव पेरेस असे ठेवले.
וַיְהִי ׀ כְּמֵשִׁיב יָדוֹ וְהִנֵּה יָצָא אָחִיו וַתֹּאמֶר מַה־פָּרַצְתָּ עָלֶיךָ פָּרֶץ וַיִּקְרָא שְׁמוֹ פָּֽרֶץ׃
30 ३० त्यानंतर त्याचा भाऊ, ज्याच्या हाताला लाल धागा बांधलेला होता, तो बाहेर आला आणि त्याचे नाव जेरह असे ठेवले.
וְאַחַר יָצָא אָחִיו אֲשֶׁר עַל־יָדוֹ הַשָּׁנִי וַיִּקְרָא שְׁמוֹ זָֽרַח׃

< उत्पत्ति 38 >