< उत्पत्ति 36 >

1 एसाव म्हणजे अदोम याची वंशावळ ही,
وَهَذَا سِجِلُّ مَوَالِيدِ عِيسُو أَيْ أَدُومَ:١
2 एसावाने कनानी मुलींतून स्त्रिया करून घेतल्या, एलोन हित्ती याची मुलगी आदा, सिबोन हिव्वी ह्याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा
تَزَوَّجَ عِيسُو مِنْ بَنَاتِ كَنْعَانَ: عَدَا بِنْتَ إِيلُونَ الْحِثِّيِّ وَأُهُولِيبَامَةَ بِنْتَ عَنَى بِنْتِ صِبْعُونَ الْحِوِّيِّ.٢
3 आणि इश्माएलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमथ.
وَتَزَوَّجَ أَيْضاً بَسْمَةَ بِنْتَ إِسْمَاعِيلَ عَمِّهِ، أُخْتَ نَبَايُوتَ.٣
4 एसावापासून आदेला झालेल्या मुलाचे नाव अलीपाज व बासमथला झालेल्या मुलाचे नाव रगुवेल होते.
فَأَنْجَبَتْ عَدَا لِعِيسُو أَلِيفَازَ، وَأَنْجَبَتْ بَسْمَةُ رَعُوئِيلَ.٤
5 आणि अहलीबामेस, यऊश, यालाम व कोरह हे झाले. हे एसावाचे पुत्र त्यास कनान देशात झाले.
أَمَّا أُهُولِيبَامَةُ فَقَدْ أَنْجَبَتْ يَعُوشَ وَيَعْلامَ وَقُورَحَ. هَؤُلاءِ هُمْ أَبْنَاءُ عِيسُو الَّذِينَ وُلِدُوا لَهُ فِي أَرْضِ كَنْعَانَ.٥
6 एसाव आपल्या स्त्रिया, आपली मुले, आपल्या मुली आणि आपल्या घरातील सर्व माणसे, आपली गुरेढोरे, आपली सर्व जनावरे, आणि आपली सर्व मालमत्ता जी त्याने कनान देशात जमा केली होती हे सर्व घेऊन आपला भाऊ याकोब ह्याच्या पूर्वेकडील देशात गेला.
وَأَخَذَ عِيسُو زَوْجَاتِهِ وَبَنِيهِ وَبَنَاتِهِ وَجَمِيعَ أَهْلِ بَيْتِهِ وَمَوَاشِيهِ وَكُلَّ بَهَائِمِهِ وَسَائِرَ مُقْتَنَيَاتِهِ الَّتِي اقْتَنَاهَا فِي أَرْضِ كَنْعَانَ وَانْتَقَلَ إِلَى أَرْضٍ أُخْرَى بَعِيداً عَنْ أَخِيهِ يَعْقُوبَ،٦
7 कारण त्यांची मालमत्ता इतकी वाढली होती की त्यांना एकत्र राहता येईना. ज्या देशात ते राहत होते त्यामध्ये त्यांच्या गुरांढोरांचा निर्वाह होईना.
لأَنَّ أَمْلاكَهُمَا كَانَتْ مِنَ الْكَثْرَةِ بِحَيْثُ لَمْ تَسَعْهُمَا الأَرْضُ لِلإِقَامَةِ مَعاً، وَلَمْ تَسْتَطِعْ أَرْضُ غُرْبَتِهِمَا أَنْ تَكْفِيَهُمَا لِرَعْيِ مَوَاشِيهِمَا.٧
8 एसाव सेईरच्या डोंगराळ प्रदेशात वस्ती करून राहिला. एसावाला अदोमसुद्धा म्हणतात.
فَاسْتَوْطَنَ عِيسُو، أَيْ أَدُومُ، جَبَلَ سَعِيرَ.٨
9 सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या अदोमी लोकांचा पूर्वज एसाव याची ही वंशावळ:
وَهَذِهِ هِيَ أَسْمَاءُ أَبنَاءِ عِيسُو:٩
10 १० एसावाच्या मुलांची नावे: एसाव व आदा यांचा मुलगा अलीपाज आणि एसाव व बासमथ यांचा मुलगा रगुवेल.
أَلِيفَازُ بْنُ عَدَا، وَرَعُوئِيلُ بْنُ بَسْمَةَ.١٠
11 ११ अलीपाजचे पुत्र तेमान, ओमार, सपो, गाताम व कनाज.
أَمَّا أَبْنَاءُ أَلِيفَازَ فَهُمْ: تَيْمَانُ وَأُوْمَارُ وَصَفْوُ وَجَعْثَامُ وَقَنَازُ.١١
12 १२ अलीपाज याची तिम्ना नावाची एक उपपत्नी होती, तिला अलीपाजापासून अमालेक झाला. ही एसावाची पत्नी आदा हिची नातवंडे होती.
وَكَانَتْ تِمْنَاعُ سُرِّيَّةً لأَلِيفَازَ بْنِ عِيسُو فَأَنْجَبَتْ لأَلِيفَازَ عَمَالِيقَ. هَؤُلاءِ أَبْنَاءُ عَدَا زَوْجَةِ عِيسُو.١٢
13 १३ रगुवेलाचे हे पुत्र होते: नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमथ हिची नातवंडे होती.
أَمَّا أَبْنَاءُ رَعُوئِيلَ فَهُمْ: نَحَثُ وَزَارَحُ وَشَمَّةُ وَمِزَّةُ. وَجَمِيعُهُمْ أَبْنَاءُ بَسْمَةَ زَوْجَةِ عِيسُو.١٣
14 १४ सिबोनाची मुलगी अना याची मुलगी व सिबोनाची नात अहलीबामा ही एसावाची पत्नी होती. यऊश, यालाम व कोरह हे तिला एसावापासून झाले.
وَهَؤُلاءِ هُمْ أَبْنَاءُ أُهُولِيبَامَةَ بِنْتِ عَنَى حَفِيدَةِ صِبْعُونَ، زَوْجَةِ عِيسُو؛ فَقَدْ أَنْجَبَتْ لِعيسُو يَعُوشَ وَيَعْلامَ وَقُورَحَ.١٤
15 १५ एसावाचे वंशज आपापल्या कुळांचे सरदार झाले ते हे: एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे पुत्र: तेमान, ओमार, सपो, कनाज,
وَهَؤُلاءِ هُمْ رُؤَسَاءُ قَبَائِلِ بَنِي عِيسُو، مِنْ مَوَالِيدِ أَلِيفَازَ بِكْرِ عِيسُو: تَيْمَانُ وَأُوْمَارُ وَصَفْوُ وَقَنَازُ.١٥
16 १६ कोरह, गाताम व अमालेक. आपापल्या कुळांचे हे सरदार अलीपाजला अदोम देशात झाले. ही आदेची नातवंडे होती.
وَقُورَحُ وَجَعْثَامُ وَعَمَالِيقُ. هَؤُلاءِ هُمْ رُؤَسَاءُ الْقَبَائِلِ الْمُنْحَدِرَةِ مِنْ أَلِيفَازَ فِي أَرْضِ أَدُومَ. وَهُمْ مِنْ ذُرِّيَّةِ عَدَا.١٦
17 १७ एसावाचा मुलगा रगुवेल याचे पुत्र हे: सरदार नहाथ, सरदार जेरह, सरदार शम्मा, सरदार मिज्जा. हे सर्व सरदार रगुवेलास अदोम देशात झाले. एसावाची पत्नी बासमथ हिची ही नातवंडे होती.
وَهَؤُلاءِ هُمْ رُؤَسَاءُ قَبَائِلِ بَنِي رَعُوئِيلَ ابْنِ عِيسُو: نَحَثُ وَزَارَحُ وَشَمَّةُ وَمِزَّةُ. هَؤُلاءِ هُمْ رُؤَسَاءُ الْقَبَائِلِ الْمُنْحَدِرَةِ مِنْ رَعُوئِيلَ فِي أَرْضِ أَدُومَ. وَهُمْ مِنْ ذُرِّيَّةِ بَسْمَةَ امْرَأَةِ عِيسُو.١٧
18 १८ एसावाची पत्नी अहलीबामा हिचे पुत्र: यऊश, यालाम व कोरह. हे सरदार एसावाची पत्नी, अनाची मुलगी अहलीबामा हिला झाले.
وَهَؤُلاءِ هُمْ أَبْنَاءُ أَهُولِيبَامَةَ امْرَأَةِ عِيسُو: الرُّؤَسَاءُ يَعُوشُ وَيَعْلامُ وَقُورَحُ. وَهُمْ رُؤَسَاءُ الْقَبَائِلِ الْمُنْحَدِرَةِ مِنْ أُهُولِيبَامَةَ امْرَأَةِ عِيسُو.١٨
19 १९ हे एसावाचे पुत्र होते, आणि हे त्यांचे वंश होते.
هَؤُلاءِ هُمْ أَبْنَاءُ عِيسُو، أَيْ أَدُومَ، وَهَؤُلاءِ هُمْ رُؤَسَاءُ قَبَائِلِهِمْ.١٩
20 २० त्या देशात सेईर नावाच्या होरी मनुष्याचे पुत्र हे: लोटान, शोबाल, सिबोन, अना,
وَهَؤُلاءِ هُمْ أَبْنَاءُ سِعِيرَ الْحُورِيِّ رُؤَسَاءُ الْقَبَائِلِ الْقَاطِنَةِ فِي الْمِنْطَقَةِ: لُوطَانُ وَشُوبَالُ وَصِبْعُونُ وَعَنَى.٢٠
21 २१ दीशोन, एसर व दिशान. हे अदोम देशात सेईराचे पुत्र होरी वंशातील आपापल्या कुळांचे सरदार झाले.
وَدِيشُونُ وَإِيصَرُ وَدِيشَانُ. هَؤُلاءِ هُمْ رُؤَسَاءُ قَبَائِلِ الْحُورِيِّينَ مِنْ بَنِي سِعِيرَ الْمُقِيمِينَ فِي أَرْضِ أَدُومَ.٢١
22 २२ लोटानाचे पुत्र होते होरी व हेमाम, आणि तिम्ना ही लोटानाची बहीण होती.
أَمَّا ابْنَا لُوطَانَ فَهُمَا حُورِيُّ وَهَيْمَامُ، وَتِمْنَاعُ هِيَ أُخْتُ لُوطَانَ.٢٢
23 २३ शोबालाचे पुत्र: अलवान, मानहाथ, एबाल, शपो व ओनाम.
وَهَؤُلاءِ هُمْ بَنُو شُوبَالَ: عَلْوَانُ وَمَنَاحَةُ وَعِيبَالُ وَشَفْوُ وَأُونَامُ.٢٣
24 २४ सिबोनाचे दोन पुत्र होते: अय्या व अना. आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे सापडले तोच हा अना.
أَمَّا ابْنَا صِبْعُونَ فَهُمَا أَيَّةُ وَعَنَى. هَذَا هُوَ عَنَى الَّذِي عَثَرَ عَلَى يَنَابِيعِ الْمِيَاهِ الْحَارَّةِ فِي الصَّحْرَاءِ عِنْدَمَا كَانَ يَرْعَى حَمِيرَ أَبِيهِ صِبْعُونَ.٢٤
25 २५ अनाचा मुलगा दिशोन व अनाची मुलगी अहलीबामा.
وَأَنْجَبَ عَنَى دِيشُونَ وَابْنَتَهُ أَهُولِيبَامَة.٢٥
26 २६ दीशोनाचे हे पुत्र होते: हेम्दान, एश्बान, यित्रान व करान.
وَأَبْنَاءُ دِيَشَانَ حَمْدَانُ وَأَشْبَانُ وَيثْرَانُ وَكَرَانُ.٢٦
27 २७ एसराला बिल्हान, जावान व अकान हे पुत्र होते.
وَأَبْنَاءُ إِيصَرَ: بِلْهَانُ وَزَعْوَانُ وَعَقَانُ.٢٧
28 २८ दीशानाला ऊस व अरान हे पुत्र होते.
أَمَّا ابْنَا دِيشَانَ فَهُمَا: عُوصٌ وَأَرَانُ.٢٨
29 २९ होरी कुळांचे जे सरदार झाले त्यांची नावे अशी: लोटान, शोबाल, सिबोन, अना,
هَؤُلاءِ هُمْ رُؤَسَاءُ قَبَائِلِ الْحُورِيِّينَ: لُوطَانُ وَشُوبَالُ وَصِبْعُونُ وَعَنَى.٢٩
30 ३० दीशोन, एसर व दीशान, सेईर प्रदेशात राहणाऱ्या होरींच्या कुळांचे हे वंशज झाले.
وَدِيشُونُ وَإِيصَرُ وَدِيشَانُ. هَؤُلاءِ هُمْ رُؤَسَاءُ قَبَائِلِ الْحُورِيِّينَ وَفْقاً لِطَوَائِفِهِمِ الْمُقِيمَةِ فِي أَرْضِ سِعِيرَ.٣٠
31 ३१ इस्राएलावर कोणी राजा राज्य करण्यापूर्वी अदोम देशात जे राजे राज्य करीत होते ते हेच:
وَهَؤُلاءِ هُمُ الْمُلُوكُ الَّذِينَ حَكَمُوا أَرْضَ أَدُومَ قَبْلَ أَنْ يُتَوَّجَ مَلِكٌ فِي إِسْرَائِيلَ:٣١
32 ३२ बौराचा मुलगा बेला याने अदोमावर राज्य केले, आणि त्याच्या नगराचे नाव दिन्हाबा होते.
بَالَعُ بْنُ بَعُورَ مَلَكَ فِي أَدُومَ وَكَانَ اسْمُ مَدِينَتِهِ دِنْهَابَةَ.٣٢
33 ३३ बेला मरण पावल्यावर बस्रा येथील जेरहाचा मुलगा योबाब ह्याने राज्य केले.
وَمَاتَ بَالَعُ فَخَلَفَهُ يُوبَابُ بْنُ زَارَحَ مِنْ بُصْرَةَ.٣٣
34 ३४ योबाब मरण पावल्यावर, तेमानी लोकांच्या देशाचा हुशाम याने राज्य केले.
وَمَاتَ يُوبَابُ فَخَلَفَهُ حُوشَامُ مِنْ أَرْضِ التَّيْمَانِيِّ.٣٤
35 ३५ हुशाम मरण पावल्यावर, बदाद याचा मुलगा हदाद याने त्याच्या जागी राज्य केले. यानेच मवाब देशात मिद्यानांचा पराभव केला. त्याच्या नगराचे नाव अवीत होते.
وَمَاتَ حُوشَامُ فَخَلَفَهُ هَدَادُ بْنُ بَدَادَ الَّذِي قَهَرَ الْمِدْيَانِيِّينَ فِي بِلادِ مُوآبَ. وَاسْمُ مَدِينَتِهِ عَوِيتُ.٣٥
36 ३६ हदाद मरण पावल्यावर मास्रेका येथील साम्ला याने त्या देशावर राज्य केले.
وَمَاتَ هَدَادُ فَخَلَفَهُ سَمْلَةُ مِنْ مَسْرِيقَةَ.٣٦
37 ३७ साम्ला मरण पावल्यावर फरात नदीवर असलेल्या रहोबोथ येथील शौल याने त्या देशावर राज्य केले.
وَمَاتَ سَمْلَةُ فَخَلَفَهُ شَأُولُ مِنْ رَحُوبُوتِ النَّهْرِ.٣٧
38 ३८ शौल मरण पावल्यावर अकबोराचा मुलगा बाल-हानान याने त्या देशावर राज्य केले.
وَمَاتَ شَأُولُ فَخَلَفَهُ بَعْلُ حَانَانَ بْنُ عَكْبُورَ.٣٨
39 ३९ बाल-हानान मरण पावल्यावर हदार याने त्या देशावर राज्य केले. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते. त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल होते. ही मात्रेद हिची मुलगी मेजाहाब हिची नात होती.
وَمَاتَ بَعْلُ حَانَانَ فَخَلَفَهُ هَدَارُ وَاسْمُ مَدِينَتِهِ فَاعُوَ، وَكَانَتْ زَوْجَتُهُ مَهِيطَبْئِيلَ بِنْتَ مَطْرِدَ بِنْتِ مَاءِ ذَهَبٍ.٣٩
40 ४० एसावाच्या वंशातील कुळांप्रमाणे त्या त्या कुळांच्या सरदारांची नावे: तिम्ना, आल्वा, यतेथ,
وَهَذِهِ أَسْمَاءُ رُؤَسَاءِ الْقَبَائِلِ الْمُتَفَرِّعَةِ مِنْ نَسْلِ عِيسُو حَسَبَ قَبَائِلِهِمْ وَأَمَاكِنِهِمِ الَّتِي حَمَلَتْ أَسْمَاءَهُمْ: رُؤَسَاءُ تِمْنَاعَ وَعَلْوَةَ وَيَتِيتَ٤٠
41 ४१ अहलीबामा, एला, पीनोन,
وَأُهُولِيبَامَةَ وَإِيلَةَ وَفِينُونَ٤١
42 ४२ कनाज, तेमान, मिब्सार,
وَقَنَازَ وَتَيْمَانَ وَمِبْصَارَ٤٢
43 ४३ माग्दीएल, व ईराम. ह्यातील प्रत्येक कूळ त्या कुळाचे नाव दिलेल्या प्रदेशात राहिले. अदोमी यांचा बाप एसाव याचा हा विस्तार आहे.
وَمَجْدِيئِيلَ وَعِيرَامَ. هَؤُلاءِ هُمْ رُؤَسَاءُ أَدُومَ، حَسَبَ مَوَاطِنِ سُكْنَاهُمْ فِي الأَرْضِ الَّتِي امْتَلَكُوهَا. وَجَمِيعُهُمْ مِنْ ذُرِّيَّةِ عِيسُو، أَبِي أَدُومَ.٤٣

< उत्पत्ति 36 >