< उत्पत्ति 35 >

1 देव याकोबाला म्हणाला, “ऊठ, बेथेल नगरामध्ये जा आणि तेथे राहा. तुझा भाऊ एसाव याजपासून तू पळून जात असताना ज्याने तुला दर्शन दिले, त्या देवासाठी तेथे एक वेदी बांध.”
上帝對雅各說:「起來!上伯特利去,住在那裏;要在那裏築一座壇給上帝,就是你逃避你哥哥以掃的時候向你顯現的那位。」
2 तेव्हा याकोब आपल्या घरातील सर्व मंडळीला व आपल्याबरोबरच्या सगळ्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ असलेल्या परक्या देवांचा त्याग करा. तुम्ही स्वतःला शुद्ध करा. आपले कपडे बदला.
雅各就對他家中的人並一切與他同在的人說:「你們要除掉你們中間的外邦神,也要自潔,更換衣裳。
3 नंतर आपण येथून निघून बेथेलास जाऊ. मी दुःखात असताना ज्याने मला उत्तर दिले आणि जेथे कोठे मी गेलो तेथे जो माझ्याबरोबर होता, त्या देवासाठी मी वेदी बांधीन.”
我們要起來,上伯特利去,在那裏我要築一座壇給上帝,就是在我遭難的日子應允我的禱告、在我行的路上保佑我的那位。」
4 तेव्हा त्या लोकांनी त्यांच्या हातातले सर्व परके देव आणि आपल्या कानातील कुंडलेही आणून याकोबाला दिली. तेव्हा याकोबाने त्या सर्व वस्तू शखेम नगराजवळील एला झाडाच्या खाली पुरून टाकल्या.
他們就把外邦人的神像和他們耳朵上的環子交給雅各;雅各都藏在示劍那裏的橡樹底下。
5 ते तेथून निघाले, त्यांच्या सभोवतालच्या नगरावर देवाने भीती उत्पन्न केली, म्हणून त्यांनी याकोबाच्या मुलांचा पाठलाग केला नाही.
他們便起行前往。上帝使那周圍城邑的人都甚驚懼,就不追趕雅各的眾子了。
6 अशा रीतीने याकोब व त्याच्याबरोबरचे सर्व लोक कनान देशात लूज येथे येऊन पोहचले त्यालाच आता बेथेल म्हणतात.
於是雅各和一切與他同在的人到了迦南地的路斯,就是伯特利。
7 त्याने तेथे एक वेदी बांधली, व त्या ठिकाणाचे नाव “एल-बेथेल” असे ठेवले. कारण आपला भाऊ एसाव याजपासून पळून जाताना याच जागी प्रथम देवाने त्यास दर्शन दिले होते.
他在那裏築了一座壇,就給那地方起名叫伊勒‧伯特利;因為他逃避他哥哥的時候,上帝在那裏向他顯現。
8 रिबकेची दाई दबोरा या ठिकाणी मरण पावली तेव्हा त्यांनी तिला बेथेल येथे अल्लोन झाडाच्या खाली पुरले; त्या जागेचे नाव त्यांनी अल्लोन बाकूथ म्हणजे रडण्याचे अल्लोन असे ठेवले.
利百加的奶母底波拉死了,就葬在伯特利下邊橡樹底下;那棵樹名叫亞倫‧巴古。
9 याकोब पदन-अराम येथून परत आला, तेव्हा देवाने त्यास पुन्हा दर्शन दिले आणि त्यास आशीर्वाद दिला.
雅各從巴旦‧亞蘭回來,上帝又向他顯現,賜福與他,
10 १० देव त्यास म्हणाला, “तुझे नाव याकोब आहे, परंतु तुला आता याकोब म्हणणार नाहीत तर तुझे नवे नाव इस्राएल असे होईल.” म्हणून देवाने त्यास इस्राएल हे नाव दिले.
且對他說:「你的名原是雅各,從今以後不要再叫雅各,要叫以色列。」這樣,他就改名叫以色列。
11 ११ देव त्यास म्हणाला, “मी सर्व सर्वसमर्थ देव आहे. तू फलद्रूप आणि बहुगुणित हो. तुझ्यातून एक राष्ट्र आणि राष्ट्रांचा समुदाय येईल व तुझ्या वंशजातून राजे जन्मास येतील.
上帝又對他說:「我是全能的上帝;你要生養眾多,將來有一族和多國的民從你而生,又有君王從你而出。
12 १२ मी अब्राहाम व इसहाक यांना जो देश दिला, तो आता मी तुला व तुझ्यामागे राहणाऱ्या तुझ्या संततीला देतो.”
我所賜給亞伯拉罕和以撒的地,我要賜給你與你的後裔。」
13 १३ मग देव ज्या ठिकाणी त्याच्याशी बोलला तेथूनच वर निघून गेला.
上帝就從那與雅各說話的地方升上去了。
14 १४ मग याकोबाने तेथे स्मारक म्हणून दगडाचा एक स्तंभ उभा केला त्याने त्यावर पेयार्पण व तेल ओतले.
雅各便在那裏立了一根石柱,在柱子上奠酒,澆油。
15 १५ जेथे देवाने याकोबाशी भाषण केले होते त्या स्थानाचे नाव याकोबाने बेथेल ठेवले.
雅各就給那地方起名叫伯特利。
16 १६ मग ते बेथेल येथून पुढे निघाले, ते एफ्राथ गावापासून काही अंतरावर आले असताना तेथे राहेलीस प्रसूतीवेदना सुरू झाल्या. तिला प्रसुतीच्या असह्य वेदना होत होत्या.
他們從伯特利起行,離以法他還有一段路程,拉結臨產甚是艱難。
17 १७ राहेलीस प्रसूतीवेदनांचा अतिशय त्रास होत असताना, राहेलीची सुईण तिला म्हणाली, “भिऊ नकोस कारण तुला हाही मुलगाच होईल.”
正在艱難的時候,收生婆對她說:「不要怕,你又要得一個兒子了。」
18 १८ त्या मुलाला जन्म देताना राहेल मरण पावली, परंतु मरण्यापूर्वी तिने त्याचे नाव बेनओनी असे ठेवले, परंतु त्याच्या वडिलाने त्याचे नाव बन्यामीन असे ठेवले.
她將近於死,靈魂要走的時候,就給她兒子起名叫便‧俄尼;他父親卻給他起名叫便雅憫。
19 १९ राहेल मरण पावली. एफ्राथ (म्हणजे बेथलहेम) गावास जाणाऱ्या वाटेजवळ राहेलीस पुरले.
拉結死了,葬在以法他的路旁;以法他就是伯利恆。
20 २० आणि याकोबाने तिचे स्मारक म्हणून तिच्या कबरेवर एक स्तंभ उभा केला. तो स्तंभ आजपर्यंत तेथे कायम आहे.
雅各在她的墳上立了一統碑,就是拉結的墓碑,到今日還在。
21 २१ त्यानंतर इस्राएल पुढे गेला आणि मिगदाल-एदेरच्या पलीकडे त्याने तळ दिला.
以色列起行前往,在以得臺那邊支搭帳棚。
22 २२ इस्राएल त्या देशात राहत होता, त्या वेळी रऊबेन, आपल्या पित्याची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी निजला, हे इस्राएलाने ऐकले. याकोबाला बारा पुत्र होते.
以色列住在那地的時候,呂便去與他父親的妾辟拉同寢,以色列也聽見了。 雅各共有十二個兒子。
23 २३ त्यास लेआपासून झालेले पुत्र: याकोबाचा ज्येष्ठ मुलगा रऊबेन आणि शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार व जबुलून.
利亞所生的是雅各的長子呂便,還有西緬、利未、猶大、以薩迦、西布倫。
24 २४ त्यास राहेलीपासून झालेले पुत्र: योसेफ व बन्यामीन.
拉結所生的是約瑟、便雅憫。
25 २५ त्यास राहेलीची दासी बिल्हापासून झालेले पुत्र: दान व नफताली.
拉結的使女辟拉所生的是但、拿弗他利。
26 २६ आणि लेआची दासी जिल्पा हिचे पुत्र गाद व आशेर. हे सर्व याकोबाचे पुत्र जे त्यास पदन-अरामात झाले.
利亞的使女悉帕所生的是迦得、亞設。這是雅各在巴旦‧亞蘭所生的兒子。
27 २७ याकोब मग किर्याथ-आर्बा (म्हणजे हेब्रोन) येथीन मम्रे या ठिकाणी आपला बाप इसहाक याजकडे आला. येथेच अब्राहाम व इसहाक हे राहिले होते.
雅各來到他父親以撒那裏,到了基列‧亞巴的幔利,乃是亞伯拉罕和以撒寄居的地方;基列‧亞巴就是希伯崙。
28 २८ इसहाक एकशे ऐंशी वर्षे जगला.
以撒共活了一百八十歲。
29 २९ इसहाकाने शेवटचा श्वास घेतला आणि मरण पावला, आणि आपल्या पूर्वजास मिळाला, तो म्हातारा व आयुष्याचे पूर्ण दिवस होऊन मरण पावला. त्याचे पुत्र एसाव व याकोब यांनी त्यास पुरले.
以撒年紀老邁,日子滿足,氣絕而死,歸到他列祖那裏。他兩個兒子以掃、雅各把他埋葬了。

< उत्पत्ति 35 >