< उत्पत्ति 30 >

1 याकोबापासून आपल्याला मुल होत नाहीत हे पाहिल्यावर राहेल आपली बहीण लेआ हिचा मत्सर करू लागली; तेव्हा राहेल याकोबाला म्हणाली, “मला मुल द्या, नाही तर मी मरेन.”
Al ver Raquel que no daba hijos a Jacob, tuvo celos de su hermana y decía a Jacob: ¡Dame hijos o me muero!
2 याकोबाचा राहेलवर राग भडकला. तो म्हणाला, “ज्याने तुला मुल होण्यापासून रोखून धरले आहे, त्या देवाच्या ठिकाणी मी आहे की काय?”
Entonces la ira de Jacob se encendió contra Raquel y contestó: ¿Estoy yo en lugar de ʼElohim que te impide el fruto del vientre?
3 ती म्हणाली, “पाहा, माझी दासी बिल्हा आहे. तुम्ही तिच्या जवळ जा म्हणजे मग ती माझ्या मांडीवर मुलाला जन्म देईल व तिजपासून मलाही मुले मिळतील.”
Ella dijo: Aquí está mi esclava Bilha. Únete a ella, y que dé a luz sobre mis rodillas. Así también yo seré edificada por ella.
4 अशा रीतीने तिने त्यास आपली दासी बिल्हा पत्नी म्हणून दिली. आणि याकोबाने तिच्याबरोबर संबंध ठेवला.
Le entregó a su esclava Bilha como mujer, y Jacob se unió a ella.
5 तेव्हा बिल्हा गरोदर राहिली व याकोबाच्या मुलाला जन्म दिला.
Bilha concibió y dio a luz un hijo a Jacob.
6 मग राहेल म्हणाली, “देवाने माझे ऐकले आहे. त्याने माझा आवाज नक्कीच ऐकला आहे आणि मला मुलगा दिला आहे.” म्हणून तिने त्याचे नाव दान ठेवले.
Entonces Raquel dijo: ʼElohim me juzgó. También oyó mi voz y me dio un hijo. Por tanto lo llamó Dan.
7 राहेलची दासी बिल्हा पुन्हा गर्भवती झाली व तिने याकोबाच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला.
Bilha, esclava de Raquel, concibió otra vez y dio a luz un segundo hijo a Jacob.
8 राहेल म्हणाली, “मी माझ्या बहिणीशी प्रबळ स्पर्धा करून लढा दिला व विजय मिळवला आहे.” तिने त्याचे नाव नफताली ठेवले.
Y Raquel dijo: Con gran conflicto luché contra mi hermana y vencí. Y lo llamó Neftalí.
9 जेव्हा लेआने पाहिले की, आता आपल्याला मुले होण्याचे थांबले आहे. तेव्हा तिने आपली दासी जिल्पा हिला घेतले आणि याकोबाला पत्नी म्हणून दिली.
Al ver Lea que cesó de dar a luz, tomó a su esclava Zilpa, y la dio a Jacob como mujer.
10 १० नंतर लेआची दासी जिल्पाने याकोबाच्या मुलाला जन्म दिला.
Zilpa, esclava de Lea, dio a luz un hijo a Jacob.
11 ११ लेआ म्हणाली, “मी सुदैवी आहे.” तेव्हा तिने त्याचे नाव गाद ठेवले.
Entonces Lea dijo: ¡Vino la ventura! Y lo llamó Gad.
12 १२ नंतर लेआची दासी जिल्पाने याकोबाच्या दुसऱ्या मुलाला दिला.
Zilpa, esclava de Lea, dio a luz un segundo hijo a Jacob.
13 १३ लेआ म्हणाली, “मी आनंदी आहे! इतर स्त्रिया मला आनंदी म्हणतील” म्हणून तिने त्याचे नाव आशेर ठेवले.
Y Lea dijo: ¡Soy feliz! Porque las mujeres me llamarán dichosa. Y lo llamó Aser.
14 १४ गहू कापणीच्या हंगामाच्या दिवसात रऊबेन शेतात गेला आणि त्यास पुत्रदात्रीची फळे सापडली. त्याने ती आपली आई लेआ हिच्याकडे आणून दिली. नंतर राहेल लेआस म्हणाली, “तुझा मुलगा रऊबेन याने आणलेल्या पुत्रदात्रीच्या फळातून मला काही दे.”
Durante la cosecha del trigo, Rubén fue y halló mandrágoras en el campo, y las llevó a su madre Lea. Y Raquel dijo a Lea: Te ruego que me des de las mandrágoras de tu hijo.
15 १५ लेआ तिला म्हणाली, “तू माझ्या नवऱ्याला माझ्यापासून घेतलेस हे काय कमी झाले? आता माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळेही तू घेतेस काय?” राहेल म्हणाली, “तुझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे मला देशील तर त्याच्या बदल्यात आज रात्री तो तुझ्याबरोबर झोपेल.”
Y ella le contestó: ¿Te parece poco que me quitaste a mi esposo, y quieres llevarte las mandrágoras de mi hijo? Raquel respondió: Bueno, que se una contigo esta noche en pago por las mandrágoras de tu hijo.
16 १६ संध्याकाळी याकोब शेतावरून आला. तेव्हा लेआ त्यास भेटण्यास बाहेर गेली व ती म्हणाली, “आज रात्री तुम्ही माझ्याबरोबर झोपणार आहात, कारण माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे देऊन मी तुम्हास मोलाने घेतले आहे.” तेव्हा याकोब त्या रात्री लेआपाशी झोपला.
Cuando Jacob regresaba del campo al llegar la noche, Lea le salió al encuentro, y dijo: Únete a mí, porque te alquilé formalmente por unas mandrágoras de mi hijo. Y se unió con ella aquella noche.
17 १७ तेव्हा देवाने लेआचे ऐकले व ती गर्भवती राहिली आणि तिने याकोबाच्या पाचव्या मुलाला जन्म दिला.
ʼElohim oyó a Lea, quien concibió y dio a luz un quinto hijo a Jacob.
18 १८ लेआ म्हणाली, “देवाने माझे वेतन मला दिले आहे कारण मी माझी दासी माझ्या नवऱ्याला दिली.” तेव्हा तिने आपल्या मुलाचे नाव इस्साखार ठेवले.
Y Lea dijo: ʼElohim me dio mi recompensa, por cuanto di mi esclava a mi esposo. Por eso lo llamó Isacar.
19 १९ लेआ पुन्हा गरोदर राहिली व तिने याकोबाच्या सहाव्या मुलाला जन्म दिला.
Lea concibió otra vez y dio a luz un sexto hijo a Jacob.
20 २० लेआ म्हणाली, “देवाने मला उत्तम देणगी दिली आहे. आता माझा पती माझा आदर करील कारण मी त्याच्या सहा मुलांना जन्म दिला आहे.” तिने त्याचे नाव जबुलून ठेवले.
Y Lea dijo: ʼElohim me dio buena dote. Porque le di a luz seis hijos, esta vez mi esposo vivirá conmigo. Y lo llamó Zabulón.
21 २१ त्यानंतर तिला एक मुलगी झाली. तिने तिचे नाव दीना ठेवले.
Después dio a luz una hija y la llamó Dina.
22 २२ मग देवाने राहेलीचा विचार केला आणि तिचे ऐकले. त्याने तिची कूस वाहती केली.
ʼElohim se acordó de Raquel. ʼElohim la oyó y abrió su matriz.
23 २३ ती गर्भवती झाली व तिला मुलगा झाला. ती म्हणाली, “देवाने माझा अपमान दूर केला आहे.”
Concibió y dio a luz un hijo, y dijo: ʼElohim quitó mi afrenta.
24 २४ तिने त्याचे नाव योसेफ ठेवले. ती म्हणाली, “परमेश्वर देवाने आणखी एक मुलगा मला दिला आहे.”
Lo llamó José y dijo: Añádame Yavé otro hijo.
25 २५ मग राहेलीला योसेफ झाल्यानंतर याकोब लाबानाला म्हणाला, “मला माझ्या स्वतःच्या घरी आणि माझ्या देशात मला पाठवा.
Aconteció que cuando Raquel dio a luz a José, Jacob dijo a Labán: Despídeme para que me vaya a mi lugar y a mi tierra.
26 २६ ज्यांच्यासाठी मी तुमची सेवा केली आहे त्या माझ्या स्त्रिया आणि माझी मुले द्या आणि मला जाऊ द्या, कारण मी तुमची सेवा कशी केली आहे हे तुम्हास माहीत आहे.”
Dame mis esposas y mis hijos por los cuales te serví, y me iré, pues tú bien sabes cuál es el trabajo que realicé para ti.
27 २७ लाबान त्यास म्हणाला, “परमेश्वराने केवळ तुझ्यामुळे मला आशीर्वादित केले आहे हे मी जाणतो. जर तुझ्या दृष्टीने माझ्यावर तुझी कृपा असेल तर आता थांब.”
Pero Labán le respondió: Halle yo gracia ante tus ojos. Percibí que Yavé me bendijo por tu causa.
28 २८ नंतर तो म्हणाला, “तुला काय वेतन द्यावे हे सांग आणि ते मी देईन.”
Y añadió: Señálame tu salario, y te lo pagaré.
29 २९ याकोब त्यास म्हणाला, “मी तुमची सेवा केली आहे आणि तुझी गुरेढोरे माझ्याजवळ कशी होती हे तुम्हास माहीत आहे.
Pero Jacob dijo: Tú mismo sabes lo que te serví y cómo estuvo tu ganado conmigo.
30 ३० मी येण्यापूर्वी तुम्हापाशी फार थोडी होती. आणि आता भरपूर वाढली आहेत. मी जेथे जेथे काम केले तेथे तेथे परमेश्वराने तुम्हास आशीर्वादित केले आहे. आता मी माझ्या स्वतःच्या घराची तरतूद कधी करू?”
Pues poco tenías antes de mi venida, y aumentó mucho. Yavé te bendijo con mi presencia. Así que, ¿cuándo trabajaré yo por mi propia casa?
31 ३१ म्हणून लाबान म्हणाला, “मी तुला काय देऊ?” याकोब म्हणाला, “तुम्ही मला काही देऊ नका. जर तुम्ही माझ्यासाठी ही गोष्ट कराल तर मी पूर्वीप्रमाणे आपले कळप चारीन व सांभाळीन.
Y él contestó: ¿Qué te daré? Y Jacob dijo: No me des algo. Volveré a apacentar tu rebaño si haces esto para mí:
32 ३२ परंतु आज मला तुमच्या सगळ्या कळपात फिरून त्यातील मेंढरांपैकी ठिपकेदार व प्रत्येक काळे व तपकरी असलेली मेंढरे व शेळ्यांतून तपकरी आणि काळ्या रंगाची ही मी बाजूला करीन; हेच माझे वेतन असेल.
Hoy pasaré por todo tu rebaño y separaré de entre las cabras y ovejas toda manchada y moteada, y toda oscura. Éstas serán mi salario.
33 ३३ त्यानंतर तुमच्यापुढे असलेल्या माझ्या वेतनाविषयी हिशोब घ्यायला याल तेव्हा माझा प्रामाणिकपणा माझ्याकरिता साक्ष देईल, जर त्यामध्ये तुम्हास माझ्याजवळच्या शेळ्यांतले जे प्रत्येक ठिपकेदार व तपकरी नाही व मेंढरांतले जे काळे नाही ते आढळले, तर ते मी चोरले आहे असे समजावे.”
Así mañana, cuando vayas a comprobar mi salario, mi honradez responderá por mí: Todo lo que no sea moteado o manchado entre las cabras, o de color oscuro entre los corderos, se considerará hurtado por mí.
34 ३४ लाबान म्हणाला, “मी मान्य करतो. तुझ्या शब्दाप्रमाणे कर.”
Y Labán respondió: ¡Convenido! ¡Que sea como tú dices!
35 ३५ परंतु त्याच दिवशी लाबानाने ठिपकेदार व बांडे एडके तसेच ठिपकेदार व बांड्या शेळ्या आणि मेंढरापैकी काळी मेंढरे कळपातून काढून लपवली, गुपचूप ती आपल्या मुलांच्या हवाली केली व त्यावर लक्ष ठेवून त्यांना सांभाळण्यास सांगितले;
Sin embargo, aquel mismo día Labán separó todas las cabras y los machos cabríos manchados y moteados. Toda aquella que tenía algo de blanco y todos los corderos de color los entregó en manos de sus hijos.
36 ३६ तेव्हा लाबानाने आपल्यामध्ये व याकोबामध्ये तीन दिवसाचे अंतर ठेवले. याकोब लाबानाचे बाकीचे कळप चारीत राहिला.
Además interpuso tres días de camino entre él y Jacob. Y Jacob quedó y apacentaba el resto del rebaño de Labán.
37 ३७ मग याकोबाने हिवर व बदाम व अर्मोन या झाडांच्या हिरव्या कोवळ्या फांद्या कापून घेतल्या, त्याने त्यांच्या साली, त्याचे आतील पांढरे पट्टे दिसेपर्यंत त्या सोलून काढल्या.
Entonces Jacob tomó varas verdes de álamo, de avellano y de castaño, y descortezó en ellas mondaduras blancas para descubrir así lo blanco de las varas.
38 ३८ त्याने त्या पांढऱ्या फांद्या किंवा पांढरे फोक कळपांच्या समोर पाणी पिण्याच्या टाक्यात ठेवले जेव्हा शेळ्यामेंढ्या पाणी पिण्यास तेथे येत तेव्हा त्यांच्यावर त्याचे नर उडत व त्या फळत.
Puso las varas que descortezó en los abrevaderos, delante del rebaño en las canales de agua donde bebían las ovejas, las cuales se apareaban cuando iban a beber.
39 ३९ तेव्हा त्या काठ्यांपाशी शेळ्यामेंढ्यांचे कळप फळले आणि त्या कळपात बांडी व ठिपकेदार, तपकरी अशी पिल्ले झाली.
Las ovejas se apareaban delante de las varas y parían borregos listados, moteados y manchados.
40 ४० याकोब कळपातील इतर जनावरांतून ठिपकेदार, पांढऱ्या ठिपक्यांची व काळी करडी कोकरे लाबानाच्या कळपापासून वेगळी करून ठेवत असे.
Entonces Jacob separaba los corderos, y colocaba con su propio rebaño lo listado y todo lo que era oscuro en el rebaño de Labán. Él colocó su manada aparte y no la mezcló con el rebaño de Labán.
41 ४१ जेव्हा जेव्हा कळपातील चांगली पोसलेली जनावरे फळत असत तेव्हा तेव्हा याकोब त्या पांढऱ्या फांद्या त्यांच्या नजरेसमोर ठेवी आणि मग ती जनावरे त्या फांद्यांसमोर फळत.
Sucedía que cuantas veces se apareaban las robustas, Jacob colocaba las varas en los abrevaderos delante de las ovejas para que concibieran ante las varas.
42 ४२ परंतु जेव्हा दुर्बल जनावरे फळत तेव्हा याकोब त्यांच्या नजरेसमोर त्या झाडांच्या फांद्या ठेवत नसे. म्हणून मग अशक्त नर-माद्यापासून झालेली करडी, कोकरे लाबानाची होत. आणि सशक्त नर-माद्यांपासून झालेली करडी, कोकरे याकोबाची होत.
En cambio, cuando las débiles llegaban, no las colocaba. Así las más débiles eran para Labán, y las más fuertes para Jacob.
43 ४३ अशा प्रकारे याकोब संपन्न झाला. त्याच्यापाशी शेरडेमेंढरे, उंट, गाढवे व दासदासी हे सर्व भरपूर होते.
El hombre se enriqueció muchísimo y logró poseer numerosos rebaños, esclavas y esclavos, camellos y asnos.

< उत्पत्ति 30 >