< उत्पत्ति 27 >

1 जेव्हा इसहाक म्हातारा झाला आणि त्याची नजर मंद झाल्यामुळे त्यास दिसेनासे झाले तेव्हा त्याने आपला वडील मुलगा एसाव याला बोलावून म्हटले, “माझ्या मुला.” तो म्हणाला, “काय बाबा?”
Esi Isak tsi ku amegã belibeli, eye megate ŋu nɔ nu kpɔm tututu o la, eyɔ via tsitsitɔ Esau gbe ɖeka. Eyɔe be, “Vinye.” Esau tɔ be, “Nyee nye esi.”
2 तो म्हणाला, “हे पाहा, मी म्हातारा झालो आहे, माझ्या मरणाचा दिवस मला माहीत नाही.
Isak yi edzi gblɔ be, “Fifia metsi, eye menya be mate ŋu aku ɣe sia ɣi tso fifia dzi.
3 म्हणून तुझी हत्यारे, बाणांचा भाता व धनुष्य घे, आणि बाहेर रानात जा आणि माझ्यासाठी शिकार घेऊन ये.
Tsɔ wò da kple datiwo nàyi gbe me, eye nàwu lã aɖe tsɔ gbɔe.
4 मला आवडणारे रुचकर जेवण तयार करून माझ्याकडे आण, म्हणजे मग मी ते खाईन व मरण्यापूर्वी मी तुला आशीर्वाद देईन.”
Ne ègbɔ la, nàɖa nu nyui si tɔgbi melɔ̃a ɖuɖu la nam. Tsɔe vɛ nam maɖu, be mayra wò, vinye ŋutsuvi gbãtɔ hafi maku.”
5 जेव्हा इसहाक त्याच्या मुलाशी बोलत होता तेव्हा रिबका ऐकत होती. एसाव रानात शिकार करून घेऊन येण्यासाठी गेला.
Ke Rebeka fi nya si Isak gblɔ na via Esau la se. Ale esi Esau dzo yi adegbe be yeadi lã aɖe awu la,
6 रिबका आपला मुलगा याकोब याला म्हणाली, “हे पाहा, तुझ्या बापाला तुझा भाऊ एसावाशी बोलताना मी ऐकले. तो म्हणाला,
Rebeka yɔ via Yakob, eye wògblɔ nɛ be, “Mese fofowò gblɔ na nɔviwò be,
7 ‘माझ्यासाठी शिकार घेऊन ये आणि त्याचे रुचकर जेवण करून माझ्याकडे घेऊन ये म्हणजे मी ते खाईन आणि माझ्या मरण्यापूर्वी परमेश्वराच्या उपस्थितीत तुला आशीर्वाद देईन.’
‘Di adelã nàɖa nui nam maɖu, eye mayra wò le Yehowa ŋkume hafi maku.’”
8 तर आता माझ्या मुला, मी तुला आज्ञा देते त्याप्रमाणे माझा शब्द पाळ.
Rebeka yi edzi gblɔ be, “Vinye, ɖo tom, eye nàwɔ nu si magblɔ na wò la tututu.
9 आपल्या कळपाकडे जा आणि त्यातून दोन चांगली करडे घेऊन मला आणून दे. मी त्यांचे तुझ्या वडिलाच्या आवडीचे रुचकर जेवण तयार करते,
Yi lãhawo me, eye nàlé gbɔ̃ eve siwo metsi tututu o la vɛ nam ne matsɔ wo aɖa nu si vivia fofowò nu la nɛ.
10 १० मग ते जेवण तुझ्या बापाकडे घेऊन जा, म्हणजे मग ते खाऊन तुझा बाप मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईल.”
Àtsɔ nuɖuɖu la ayi na fofowò wòaɖu. Ne eɖui vɔ la, ayra wò boŋ ɖe fowò Esau teƒe hafi aku.”
11 ११ परंतु याकोब आपली आई रिबका हिला म्हणाला, “माझा भाऊ एसाव केसाळ मनुष्य आहे; मी गुळगुळीत मनुष्य आहे.
Ke Yakob gblɔ na dadaa be, “Enyo pɛ, gake fonye Esau to fu ɖe ŋuti, ke nye la, nye ŋutigbalẽ zrɔ̃.
12 १२ कदाचित माझा बाप मला स्पर्श करेल आणि मी फसवणारा असा होईल. मी आपणावर शाप ओढवून घेईन, आशीर्वाद आणणार नाही.”
Nya kae adzɔ ne fofonye ali asi ŋunye? Abu be ɖe medi be mado lã ye, eye wòaƒo fi adem le esime wòayram teƒe!”
13 १३ त्याची आई त्यास म्हणाली, “माझ्या मुला, तुझ्यावरचा शाप माझ्यावर येवो. केवळ माझा शब्द पाळ आणि जा, माझ्याकडे ते घेऊन ये.”
Rebeka gblɔ na via be, “Vinye lɔlɔ̃a, na eƒe fiƒode nava dzinye. Wò ya wɔ nu si megblɔ na wò la. Yi nàlé gbɔ̃awo vɛ.”
14 १४ मग याकोब गेला आणि ती करडे आईकडे घेऊन आला. त्याच्या आईने त्यांचे त्याच्या वडिलाच्या आवडीचे रुचकर जेवण तयार केले.
Ale Yakob zɔ ɖe dadaa ƒe ɖoɖowo dzi. Ewu gbɔ̃awo, ko wo nyuie, eye dadaa tsɔ lã la ɖa nu si vivia Isak nu.
15 १५ रिबकाने आपला वडील मुलगा एसावाचे चांगले कपडे घरात तिच्याजवळ होते ते घेऊन आपला धाकटा मुलगा याकोबाच्या अंगात घातले.
Le esia megbe la, Rebeka tsɔ Esau ƒe awu nyuitɔwo, eye wòna Yakob do wo.
16 १६ तसेच तिने करडांचे कातडे याकोबाच्या हातावर व त्याच्या मानेवरच्या गुळगुळीत भागावर लावले.
Etsɔ gbɔ̃awo ƒe agbalẽwo wɔ asiwuiwo, eye wòtsɔ gbɔ̃gbalẽ la ƒe ɖe wɔ kawo tsi ɖe asiwuiawo ŋu heku kɔ na Yakob.
17 १७ तिने स्वतः इसहाकासाठी तयार केलेले रुचकर जेवण आणि भाकर आणून याकोबाच्या हातात दिले.
Etsɔ lã si nɔ ʋeʋẽm lĩlĩlĩ kple abolo si wome teti la nɛ.
18 १८ ते घेऊन याकोब आपल्या बापाकडे गेला आणि म्हणाला, “माझ्या बापा” तो म्हणाला, “मी येथे आहे, माझ्या मुला तू कोण आहेस?”
Yakob tsɔ nuɖuɖua yi na fofoa hegblɔ be, “Fofonye.” Eɖo eŋu bena, “Nyee nye si, vinye kae nye ema?”
19 १९ याकोब आपल्या बापाला म्हणाला, “मी तुमचा वडील मुलगा एसाव आहे; तुम्ही मला सांगतिले तसे मी केले आहे. तेव्हा आता उठून बसा व तुमच्यासाठी शिकार करून आणलेले मांस खा म्हणजे मग तुम्ही मला आशीर्वाद द्याल.”
Yakob ɖo eŋu be, “Nye Esau, viwò tsitsitɔe. Mewɔ nu si nèɖo nam be mawɔ la. Nuɖuɖu nyui si nèdi lae nye esi. Fɔ nàɖui eye nàyram.”
20 २० इसहाक आपल्या मुलाला म्हणाला, “माझ्या मुला एवढ्या लवकर तुला शिकार कशी काय मिळाली?” याकोब म्हणाला, “कारण तुमचा देव परमेश्वराने मला मिळवून दिली.”
Enumake Isak gblɔ be, “Vinye, aleke nèwɔ hafi wò asi ka lã kaba ale?” Yakob ɖo eŋu be, “Yehowa, wò Mawu lae kpe ɖe ŋunye.”
21 २१ इसहाक याकोबाला म्हणाला, “माझ्या मुला, माझ्याजवळ ये, म्हणजे मी तुला स्पर्श करतो आणि मग तू खरेच माझा मुलगा एसावच आहेस की नाही हे मला समजेल.”
Isak gblɔ na Yakob be, “Te ɖe ŋunye. Medi be mali asi ŋuwò, ale be maka ɖe edzi be Esau tututue!”
22 २२ तेव्हा याकोब आपल्या बापाजवळ गेला. इसहाकाने त्यास स्पर्श केला आणि म्हणाला, “तुझा आवाज तर याकोबाच्या आवाजासारखा आहे. परंतु तुझे हात मात्र एसावाच्या हातासारखे केसाळ आहेत.”
Yakob te ɖe fofoa ŋu, eye wòli asi eŋu. Isak gblɔ na eɖokui be, “Gbe la nye Yakob tɔ, gake asiawo nye Esau tɔ!”
23 २३ इसहाकाने त्यास ओळखले नाही कारण त्याचे हात एसावाच्या हातासारखे केसाळ होते, म्हणून त्याने त्यास आशीर्वाद दिला.
Isak di be yeayra Yakob, gake egabia be,
24 २४ तो म्हणाला, “तू खरेच माझा मुलगा एसावच आहेस काय?” आणि तो म्हणाला, “मी आहे.”
“Woe nye Esau nyateƒea?” Ke Yakob ɖo eŋu be, “Nyee!”
25 २५ इसहाक म्हणाला, “तू जेवण माझ्याकडे आण, आणि मी तू आणलेले हरणाचे ते मांस खाईन, मग तुला आशीर्वाद देईन.” तेव्हा याकोबाने आपल्या बापाला जेवण दिले. इसहाकाने ते खाल्ले आणि याकोबाने त्याच्यासाठी द्राक्षरसही दिला आणि तो प्याला.
Isak gblɔ be, “Vinye, ekema tsɔ nuɖuɖu la vɛ nam. Ne meɖui vɔ la, ekema mayra wò.” Yakob tsɔ nuɖuɖu la na fofoa wòɖu, eye wòno wain si Yakob tsɔ kpe ɖe nuɖuɖua ŋu la.
26 २६ मग इसहाक त्याचा बाप त्यास म्हणाला, “माझ्या मुला जरा माझ्याजवळ ये व मला चुंबन दे.”
Emegbe Isak gblɔ be, “Vinye, te ɖe ŋunye, eye nàgbugbɔ nu nam!”
27 २७ मग याकोब आपल्या बापाजवळ गेला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. आणि त्याने त्याच्या कपड्यांचा वास घेतला; त्याने त्यास आशीर्वाद दिला. तो म्हणाला, “पाहा ज्या शेताला परमेश्वराने आशीर्वाद दिला त्याचा वास जसा येतो तसा माझ्या मुलाचा वास आहे.
Yakob te ɖe fofoa ŋu, eye wògbugbɔ eƒe alɔgo. Ʋeʋẽ si Isak se le awu siwo Yakob do me la na wòbu be Esaue. Eyrae hegblɔ be, “Ehɛ̃, Vinye ƒe ʋeʋẽ sɔ kple ʋeʋẽ nyui si dona tso anyigba kple agble si Yehowa yra la ene.
28 २८ देव तुला आकाशातले दव व भूमीची समृद्धी व भरपूर धान्य व द्राक्षरस देईल.
Mawu nana dziƒozãmu nadza ɖe wò nukuwo dzi ɣe sia ɣi, eye wòana bli kple wain yeye nasɔ gbɔ na wò.
29 २९ लोक तुझी सेवा करोत व राष्ट्रे तुझ्यापुढे नमोत. तू तुझ्या भावांवर राज्य करशील. तुझ्या आईची मुले तुला नमन करतील. तुला शाप देणारा प्रत्येकजण शापित होईल आणि तुला आशीर्वाद देणारा प्रत्येकजण आशीर्वादित होईल.”
Dukɔ geɖewo nazu kluviwo na wò. Àzu aƒetɔ ɖe nɔviwòwo dzi. Wò ƒometɔwo katã nade ta agu na wò. Woaƒo fi ade ame sia ame si aƒo fi de wò la, ke woayra ame sia ame si ayra wò la.”
30 ३० इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देण्याचे संपविले आणि त्यानंतर याकोब आपल्या बापापासून निघून गेला तोच एसाव शिकारीहून आला.
Esi Isak yra Yakob vɔ teti, eye Yakob do go le fofoa ƒe xɔ me la, Esau gbɔ tso adegbea.
31 ३१ त्यानेही आपल्या वडिलाच्या आवडीचे रुचकर भोजन तयार करून आपल्या बापाजवळ आणले, तो त्याच्या बापाला म्हणाला, “माझ्या वडिलाने उठावे आणि तुमच्या मुलाने शिकार करून आणलेले मांस खावे जेणेकरून मला आशीर्वाद द्यावा.”
Eya hã ɖa nu si fofoa lɔ̃a ɖuɖu la, eye wòtsɔe yi nɛ. Esau gblɔ be, “Fofonye, metsɔ nuɖuɖu la vɛ na wò. Fɔ nàɖu nua, eye nàyram!”
32 ३२ इसहाक त्याचा बाप त्यास म्हणाला, “तू कोण आहेस?” तो म्हणाला, “मी तुमचा मुलगा वडील मुलगा एसाव आहे.”
Isak bia be, “Wò ame kae?” Esau ɖo eŋu be, “Nyee! Nye Esau, viwò ŋutsu tsitsitɔe!”
33 ३३ मग इसहाक भीतीने थरथर कापत म्हणाला, “तर मग तू येण्या अगोदर ज्याने मांस तयार करून मला आणून दिले तो कोण होता? मी ते सर्व खाऊन त्यास आशीर्वाद दिला. खरोखर तो आशीर्वादित होईल.”
Isak de asi ƒoƒo me kpakpakpa. Egblɔ be, “Ekema ame kae tsɔ nuɖuɖu vɛ nam fifi laa meɖu, eye meyrae kple yayra si womagate ŋu aɖe ɖa o la?”
34 ३४ जेव्हा एसावाने आपल्या बापाचे शब्द ऐकले, तो खूप मोठ्याने ओरडून आणि दुःखाने रडून म्हणाला “माझ्या पित्या; मलाही आशीर्वाद द्या.”
Esau de asi avifafa me hehehe. Egblɔ be, “Oo fofonye, yram! Yra nye hã!”
35 ३५ इसहाक म्हणाला, “तुझा भाऊ कपटाने येथे आला आणि तो तुझे आशीर्वाद घेऊन गेला.”
Isak ɖo eŋu be, “Nɔviwò va flum, eye wòxɔ wò yayra.”
36 ३६ एसाव म्हणाला, “त्याचे याकोब हे नाव त्यास योग्यच आहे की नाही? त्याने माझी दोनदा फसवणूक केली आहे. त्याने माझा ज्येष्ठपणाचा हक्क हिरावून घेतला आणि आता त्याने माझा आशीर्वादही काढून घेतला आहे.” आणि एसाव म्हणाला, “माझ्याकरिता तुम्ही काही आशीर्वाद राखून ठेवला नाही काय?”
Esau gblɔ kple vevesese be, “Nu sia tututu tae woyɔe be Yakob si gɔmee nye ‘Amebala’ ɖo. Exɔ nye ŋgɔgbevinyenye le asinye, eye wògafi nye yayra hã. Oo, fofonye, yayra aɖeke megale asiwò nànam oa?”
37 ३७ इसहाकाने एसावास उत्तर दिले आणि म्हणाला “पाहा, मी त्यास तुझ्यावर धनीपणा करण्याचा अधिकार दिला आहे, आणि तुझे सर्व बंधू त्याचे सेवक होतील. आणि त्यास मी धान्य व नवा द्राक्षरस दिला आहे. माझ्या मुला, मी तुझ्यासाठी काय करू.”
Isak ɖo eŋu gblɔ be, “Mewɔe wòzu aƒetɔ ɖe dziwò, metsɔ nɔviawo katã wɔ eƒe dɔlawoe, eye metsɔ bli kple wain hã nɛ. Nu kae gali matsɔ ana wò.”
38 ३८ एसाव आपल्या बापाला म्हणाला, “माझ्या बापा, माझ्यासाठी तुमच्याकडे एकही आशीर्वाद नाही काय? माझ्या बापा मलाही आशीर्वाद द्या.” एसाव मोठ्याने रडला!
Esau xɔ nya la dzi gblɔ na fofoa be, “Yayra aɖeke mesusɔ nàtsɔ nam oa? Oo, fofonye yra nye hã!” Esau gade asi avifafa me, ke fofoa meke nu o.
39 ३९ मग त्याचा बाप इसहाकाने उत्तर दिले आणि त्यास म्हणाला, “पाहा, जेथे पृथ्वीवरील समृद्धी व आकाशातले दंव पडते त्या ठिकाणापासून दूर तुझी वस्ती होईल.
Mlɔeba la, Isak gblɔ na Esau be, “Manɔ anyigba wɔnuku aɖeke dzi o, eye zãmu hã madza na wò akpɔ o.
40 ४० तुझ्या तलवारीने तू जगशील व आपल्या भावाची सेवा करशील, परंतु जेव्हा तू बंड करशील, तू आपल्या मानेवरून त्याचे जू मोडून टाकशील.”
Wò yi anyi wò eye àsubɔ nɔviwò va se ɖe ɣeyiɣi aɖe, ke emegbe la, àva do le ete, eye nàkpɔ ablɔɖe.”
41 ४१ त्यानंतर आपल्या वडिलाने त्यास जो आशीर्वाद दिला होता त्यामुळे एसाव याकोबाचा द्वेष करू लागला. एसाव त्याच्या मनात म्हणाला, “माझ्या पित्याकरिता शोक करण्याचे दिवस जवळ आले आहेत. त्यानंतर मी माझा भाऊ याकोब याला ठार मारीन.”
Ale Esau lé fu nɔvia Yakob ɖe eƒe yayra si fofoa tsɔ nɛ la ta. Egblɔ na eɖokui be, “Esusɔ vie fofonye naku, ekema mawu Yakob.”
42 ४२ रिबकाला तिच्या वडील मुलाचे शब्द कोणी सांगितले. म्हणून तिने आपला धाकटा मुलगा याकोब याला निरोप पाठवून बोलावले आणि मग ती त्यास म्हणाली, “पाहा, तुझा भाऊ एसाव तुला ठार मारण्याचा बेत करीत आहे व स्वतःचे समाधान करून घेत आहे.
Ke ame aɖe va nya nu tso Esau ƒe tameɖoɖo ŋu, eye wòɖo afɔ afɔta na Rebeka. Eya ta Rebeka yɔ Yakob, eye wògblɔ nɛ be, “Esau le nugbe ɖom ɖe wò agbe ŋuti.”
43 ४३ म्हणून आता माझ्या मुला, माझी आज्ञा पाळ आणि, हारान प्रांतात माझा भाऊ लाबान राहत आहे, त्याच्याकडे तू पळून जा.
Rebeka yi edzi be, “Nu si nàwɔ fifia lae nye be nàsi ayi nyruiwò Laban gbɔ le Haran.
44 ४४ तुझ्या भावाचा राग शांत होईपर्यंत थोडे दिवस त्याजकडे राहा.
Nɔ afi ma va se ɖe esime nɔviwò ƒe dɔmedzoe nu nafa,
45 ४५ तुझ्यावरून तुझ्या भावाचा राग निघून जाईल, आणि तू त्यास काय केले हे तो विसरेल. मग मी तुला तेथून बोलावून घेईन. एकाच दिवशी मी तुम्हा दोघांनाही का अंतरावे?”
eye wòaŋlɔ nu si nèwɔ ɖe eŋu la be. Ekema maɖo du ɖe wò, elabena manyo be mi ame evea siaa miabu ɖem gbe ɖeka o.”
46 ४६ मग रिबका इसहाकाला म्हणाली, “हेथीच्या मुलींमुळे मला जीव नकोसा झाला आहे. याकोबाने जर या देशाच्या मुली करून हेथाच्या लोकांतून पत्नी केली तर माझ्या जगण्याचा काय उपयोग?”
Emegbe la, Rebeka gblɔ na Isak be, “Hiti ɖetugbiwo ƒe nya tim. Malɔ̃ be maku tsɔ wu be makpɔ Yakob wòaɖe wo dometɔ ɖeka.”

< उत्पत्ति 27 >