< उत्पत्ति 25 >
1 १ अब्राहामाने दुसरी पत्नी केली; तिचे नाव कटूरा होते.
Ibrahim nokendo dhako machielo mane nyinge Ketura.
2 २ तिच्यापासून त्यास जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूह ही मुले झाली.
Ketura nonywolone Ibrahim, Zimran, Jokshan, Medan, Midian, Ishbak kod Shua.
3 ३ यक्षानास शबा व ददान झाले. अश्शूरी, लटूशी व लऊमी लोक हे ददानाचे वंशज होते.
Jokshan nonywolo Sheba kod Dedan; nyikwa Dedan ne gin jo-Ashur, jo-Letush kod jo-Leum.
4 ४ एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा हे मिद्यानाचे पुत्र होते. हे सर्व कटूरेचे वंशज होते.
Midian nonywolo Efa, Efer, Hanok, Abida kod Elda. Magi duto ne gin nyikwa Ketura.
5 ५ अब्राहामाने आपले सर्वस्व इसहाकास दिले.
Ibrahim nomiyo Isaka mwandune duto mane en-go.
6 ६ अब्राहामाने आपल्या उपपत्नीच्या मुलांना देणग्या दिल्या, आणि आपण जिवंत असतानाच त्याने आपला मुलगा इसहाकापासून त्यांना वेगळे करून दूर पूर्वेकडील देशात पाठवून दिले.
To kane pod ongima, nochiwo mich ne yawuot monde ma jotichge kendo nodarogi mondo gia kuom Isaka koterogi e piny man yo wuok chiengʼ.
7 ७ अब्राहामाच्या आयुष्याच्या वर्षाचे दिवस हे इतके आहेत, तो एकशे पंच्याहत्तर वर्षे जगला.
Ibrahim nodak kuom higni mia achiel gi piero abiriyo gabich
8 ८ अब्राहामाने शेवटचा श्वास घेतला आणि तो वृद्ध होऊन व पूर्ण जीवन जगून चांगल्या म्हातारपणी मेला व आपल्या लोकांस जाऊन मिळाला.
Eka Ibrahim notho koluwo kwerene ka en gi higni mathoth ka en ngʼama oti kendo hike ngʼeny.
9 ९ इसहाक व इश्माएल या त्याच्या मुलांनी त्यास सोहर हित्ती याचा मुलगा एफ्रोन याचे शेत मम्रेसमोर आहे त्यातल्या मकपेला गुहेत पुरले.
Yawuot, Isaka kod Ishmael noyike e rogo man Makpela machiegni gi Mamre e puoth Efron ma wuod Zohar ja-Hiti,
10 १० हे शेत अब्राहामाने हेथीच्या मुलाकडून विकत घेतले होते. त्याची पत्नी सारा हिच्याबरोबर तेथे अब्राहामाला पुरले.
ma en puodho ma Ibrahim nongʼiewo kuom jo-Hiti. Kanyo ema Ibrahim gi Sara chiege noyikie.
11 ११ अब्राहामाच्या मृत्यूनंतर देवाने त्याचा मुलगा इसहाक याला आशीर्वादित केले आणि इसहाक बैर-लहाय-रोई जवळ राहत होता.
Bangʼ tho Ibrahim, Nyasaye nogwedho wuode Isaka, mane kindeno odak Beer-Lahai-Roi.
12 १२ अब्राहामापासून सारेची दासी हागार हिला झालेल्या इश्माएलाची वंशावळ ही:
Ma e nonro mar Ishmael wuod Ibrahim mane Hagar jatich Sara ma nyar Misri onywolone.
13 १३ इश्माएलाच्या मुलांची नावे ही होती. इश्माएलाच्या मुलांची नावे त्यांच्या जन्मक्रमाप्रमाणे: इश्माएलाचा प्रथम जन्मलेला मुलगा नबायोथ, केदार, अदबील, मिबसाम,
Magi e nying yawuot Ishmael kaluwore gi nywolgi: Nebayoth, wuod Ishmael makayo, Kedar, Adbel, Mibsam,
14 १४ मिश्मा, दुमा, मस्सा,
Mishma, Duma, Masa,
15 १५ हदद, तेमा, यतूर, नापीश व केदमा.
Hadad, Tema, Jetur, Nafish kod Kedema.
16 १६ ही इश्माएलाची मुले होती, आणि त्यांच्या गावांवरून आणि त्याच्या छावणीवरून त्यांची नावे ही पडली होती. हे त्यांच्या वंशाप्रमाणे बारा सरदार झाले.
Magi e nying yawuot Ishmael ma nying-gi nochak miechgi kod kuonde mane gibworoe, ne gin ruodhi apar gariyo ngʼato ka ngʼato gi ogandane.
17 १७ ही इश्माएलाच्या आयुष्याची वर्षे एकशे सदतीस आहेत. त्याने शेवटचा श्वास घेतला आणि मेला आणि आपल्या लोकांस जाऊन मिळाला.
Ishmael nodak kuom higni mia achiel kod piero adek gabiriyo. Eka notho kendo oluwo kwerene.
18 १८ त्याचे वंशज हवीलापासून ते शूरापर्यंत वस्ती करून राहिले, अश्शूराकडे जाताना मिसराजवळ हा देश आहे. ते एकमेकांबरोबर वैराने राहत होते.
Nyikwaye nodak e gwengʼ manie kind Havila nyaka Shur, machiegni gi tongʼ Misri kochomo yo Ashur kendo negidak kagimonre gowetene.
19 १९ अब्राहामाचा मुलगा इसहाक ह्याच्यासंबंधीच्या घटना या आहेत. अब्राहाम इसहाकाचा बाप झाला.
Mae nonro Isaka wuod Ibrahim. Ibrahim nonywolo Isaka,
20 २० इसहाक चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पदन-अरामातील अरामी बथुवेलाची मुलगी व अरामी लाबानाची बहीण रिबका हिला पत्नी करून घेतले.
kendo Isaka ne ja-higni piero angʼwen kane okendo Rebeka nyar Bethuel ja-Aram mane odak e piny Padan Aram, kendo ma nyamin Laban.
21 २१ इसहाकाने आपल्या पत्नीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली कारण ती निःसंतान होती, आणि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली, आणि रिबका त्याची पत्नी गरोदर राहिली.
Isaka nolamo Jehova Nyasaye ne chiege, nikech en migumba. Jehova Nyasaye nodwoko lamone, kendo chiege Rebeka nomako ich.
22 २२ मुले तिच्या उदरात एकमेकांशी झगडू लागली, तेव्हा ती म्हणाली, “मला हे काय होत आहे?” ती परमेश्वरास याबद्दल विचारायला गेली.
Nyithindo ne olarore e iye mi nowacho niya, “Angʼo momiyo ma timorena?” Omiyo nodhi mondo openj Jehova Nyasaye wachni.
23 २३ परमेश्वर तिला म्हणाला, “दोन राष्ट्रे तुझ्या गर्भाशयात आहेत आणि तुझ्यामधून दोन वंश निघतील. एक वंश दुसऱ्यापेक्षा बलवान असेल आणि थोरला धाकट्याची सेवा करील.”
Jehova Nyasaye nowacho niya, “Ogendini ariyo ni e iyi, kendo ogendini ariyogo biro pogore; oganda moro biro bedo motegno moloyo machielo kendo wuowi maduongʼ noti ne wuowi matin.”
24 २४ जेव्हा तिची बाळंतपणाची वेळ आली तेव्हा तिच्या गर्भशयात जुळी होती.
Kane kinde mar nywol ochopo, to ne nitie rude ma yawuowi e iye.
25 २५ आणि पहिला मुलगा बाहेर आला तो तांबूस वर्णाचा असून, त्याचे सर्व अंग केसांच्या वस्त्रासारखे होते. त्यांनी त्याचे नाव एसाव असे ठेवले.
Mano mane okwongo wuok ne kwar, kendo dende duto ne chalo motimo yier; kuom mano negichake ni Esau.
26 २६ त्याच्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला. त्याच्या हाताने त्याने एसावाची टाच हाताने धरली होती म्हणून त्याचे नाव याकोब असे ठेवले. जेव्हा त्याच्या पत्नीने त्यांना जन्म दिला तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता.
Bangʼ ma owadgi nowuok kod lwete komako ofunj tiend Esau; kuom mano negichako Jakobo. Isaka ne ja-higni piero auchiel kane Rebeka onywolo yawuowigo.
27 २७ ही मुले मोठी झाली, आणि एसाव तरबेज शिकारी झाला, तो रानातून फिरणारा मनुष्य होता; पण याकोब शांत मनुष्य होता, तो त्याचा वेळ तंबूत घालवीत असे.
Yawuowigo nodongo, kendo Esau nobedo jadwar molony, ngʼat ma jathim, to Jakobo to ne ngʼama muol madak ei hema.
28 २८ एसावावर इसहाकाची प्रीती होती, कारण त्याने शिकार करून आणलेल्या प्राण्यांचे मांस तो खात असे, परंतु रिबकेने याकोबावर प्रीती केली.
Isaka ma nohero ring le nohero Esau to Rebeka nohero Jakobo.
29 २९ याकोबाने वरण शिजवले. एसाव शिकारीहून परत आला, आणि तो भुकेने व्याकुळ झाला होता.
Chiengʼ moro kane Jakobo tedo ogira, Esau nodonjo koa e dwar kodenyo.
30 ३० एसाव याकोबास म्हणाला, “मी तुला विनंती करतो, मला थोडे तांबडे डाळीचे वरण खायला घेऊ दे. मी फार दमलो आहे!” म्हणून त्याचे नाव अदोम पडले.
Esau nowacho ne Jakobo niya, “Asayi miya ogira makwarno adenyo!” (Mano emomiyo bende iluonge ni Edom.)
31 ३१ याकोब म्हणाला, “पहिल्यांदा तुझ्या ज्येष्ठपणाचा हक्क मला विकत दे.”
Jakobo nodwoke niya, “Kuong iusna duongʼni mar nywol.”
32 ३२ एसाव म्हणाला, “पाहा, मी मरायला लागलो आहे. या ज्येष्ठपणाच्या हक्काचा मला काय उपयोग आहे?”
Esau nowachone niya, “Ne achiegni tho. Ere ohala ma ayudo kuom duongʼ mar nywolna?”
33 ३३ याकोब म्हणाला, “प्रथम, तू माझ्याशी शपथ घे.” तेव्हा एसावाने तशी शपथ घेतली आणि अशा रीतीने त्याने आपल्या ज्येष्ठपणाचा हक्क याकोबाला विकला.
To Jakobo nowachone niya, “Kwongʼrina mokwongo.” Kuom mano Esau nokwongʼore ne Jakobo, ma ousone duongʼne mar nywol.
34 ३४ याकोबाने त्यास भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले. त्याने ते खाल्ले व पाणी पिऊन झाल्यावर उठला व तेथून त्याच्या मार्गाने निघून गेला. अशा रीतीने एसावाने त्याच्या ज्येष्ठपणाचा हक्क तुच्छ मानला.
Eka Jakobo nomiyo Esau kuon gi ogich ngʼor. Nochiemo kendo ometho, eka ne ochungʼ mi odhi. Kuom mano Esau, nojwangʼo duongʼne mar nywol.