< उत्पत्ति 20 >

1 अब्राहाम तेथून नेगेबकडे प्रवास करीत आणि कादेश व शूर यांच्यामध्ये राहिला. तो गरारात परदेशी मनुष्य म्हणून राहिला होता.
A Avram otide odande na jug, i stani se izmeðu Kadisa i Sura; i življaše kao došljak u Geraru.
2 अब्राहाम आपली पत्नी सारा हिच्याविषयी म्हणाला, “ती माझी बहीण आहे.” गराराचा राजा अबीमलेखाने आपली माणसे पाठवली आणि ते सारेला घेऊन गेले.
I govoraše za ženu svoju Saru: sestra mi je. A car Gerarski Avimeleh posla, te uze Saru.
3 परंतु देव रात्री अबीमलेखाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “पाहा जी स्त्री तू घेऊन आलास तिच्यामुळे तू मेलाच म्हणून असे समज, कारण ती एका मनुष्याची पत्नी आहे.”
Ali doðe Bog Avimelehu noæu u snu, i reèe mu: gle, poginuæeš sa žene koju si uzeo, jer ima muža.
4 परंतु अबीमलेख तिच्याजवळ गेला नव्हता. तो म्हणाला, “प्रभू, तू नीतिमान राष्ट्राचाही नाश करणार काय?
A Avimeleh ne bješe se nje dotakao, i zato reèe: Gospode, eda li æeš i pravedan narod pogubiti?
5 ‘ती माझी बहीण आहे,’ असे तो स्वतःच मला म्हणाला नाही काय? आणि ‘तो माझा भाऊ आहे,’ असे तिनेही म्हटले. मी आपल्या अंतःकरणाच्या शुद्धपणाने आणि आपल्या हाताच्या निर्दोषतेने हे केले आहे.”
Nije li mi sam kazao: sestra mi je? a i ona sama kaza: brat mi je. Uèinio sam u èistoti srca svojega i u pravdi ruku svojih.
6 मग देव त्यास स्वप्नात म्हणाला, “होय! तू आपल्या अंतःकरणाच्या शुद्धतेने हे केले आहेस हे मला माहीत आहे, आणि तू माझ्याविरूद्ध पाप करू नये म्हणून मी तुला आवरले. मीच तुला तिला स्पर्श करू दिला नाही.
Tada mu reèe Bog u snu: znam da si uèinio u èistoti srca svojega, zato te saèuvah da mi ne sagriješiš, i ne dadoh da je se dotakneš.
7 म्हणून आता तू अब्राहामाची पत्नी सारा ही त्यास परत दे; कारण तो संदेष्टा आहे; तो तुझ्यासाठी प्रार्थना करील व तू वाचशील. परंतु तू तिला त्याच्याकडे परत पाठवले नाहीस, तर तू आणि तुझ्या बरोबर जे सर्व तुझे आहेत ते खात्रीने मरतील, हे लक्षात ठेव.”
A sada vrati èovjeku ženu njegovu, jer je prorok, i moliæe se za te, te æeš ostati živ. Ako li ne vratiš, znaj da æeš umrijeti ti i svi tvoji.
8 अबीमलेख सकाळीच लवकर उठला आणि त्याने आपल्या सर्व सेवकांना स्वतःकडे बोलावले. त्याने सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या तेव्हा ती माणसे फारच घाबरली.
I ujutru rano usta Avimeleh, i sazva sve sluge svoje, i kaza im sve ovo da èuju. I uplašiše se ljudi veoma.
9 मग अबीमलेखाने अब्राहामास बोलावून त्यास म्हटले, “तू हे आम्हांला काय केले? मी तुझ्याविरूद्ध काय पाप केले की तू माझ्यावर आणि माझ्या राष्ट्रावर असे मोठे पाप आणले? तू माझ्याशी करू नये ते केले आहे अशा गोष्टी तू करायच्या नव्हत्या.”
Tada Avimeleh dozva Avrama i reèe mu: šta si nam uèinio? šta li sam ti zgriješio, te navuèe na me i na carstvo moje toliko zlo? Uèinio si mi što ne valja èiniti.
10 १० अबीमलेख अब्राहामाला म्हणाला, “तुला हे करण्यास कोणी सुचवले?”
I još reèe Avimeleh Avramu: šta ti je bilo, te si to uèinio?
11 ११ अब्राहाम म्हणाला, “या ठिकाणी देवाचे भय खात्रीने नाही, म्हणून ते माझ्या पत्नीकरीता मला ठार मारतील, असा विचार मी केला.
A Avram odgovori: veljah: jamaèno nema straha Božijega u ovom mjestu, pa æe me ubiti radi žene moje.
12 १२ शिवाय ती खरोखर माझी बहीण आहे. ती माझ्या बापाची मुलगी आहे, पण माझ्या आईची ती मुलगी नाही आणि म्हणून ती माझी पत्नी झाली आहे.
A upravo i jest mi sestra, kæi oca mojega; ali nije kæi moje matere, pa poðe za me.
13 १३ देवाने मला माझ्या बापाचे घर सोडून देऊन जागोजागी प्रवास करायला लावले, तेव्हा मी तिला म्हणालो, तू माझी पत्नी म्हणून मला एवढा विश्वासूपणा दाखव; जेथे जेथे आपण जाऊ तेथे तेथे माझ्याविषयी हा, ‘माझा भाऊ आहे असे सांग.’”
A kad me Bog izvede iz doma oca mojega, ja joj rekoh: uèini dobro, i kaži za me gdje god doðemo: brat mi je.
14 १४ अबीमलेखाने अब्राहामाला सारा परत दिली; तसेच त्याने त्यास मेंढरे, बैल व दास-दासीही दिल्या.
Tada Avimeleh uze ovaca i goveda i sluga i sluškinja, te dade Avramu, i vrati mu Saru ženu njegovu.
15 १५ अबीमलेख म्हणाला, “पाहा, माझा हा सर्व देश तुझ्यासमोर आहे; तुला बरे वाटेल तेथे तू राहा.”
I reèe Avimeleh Avramu: evo, zemlja ti je moja otvorena, živi slobodno gdje ti je volja.
16 १६ तो सारेला म्हणाला, “तुझा भाऊ अब्राहाम याला मी चांदीची एक हजार नाणी दिली आहेत. तुझ्यासोबत असलेल्या सर्व लोकांसमोर तुझी भरपाई करण्यासाठी ते आहेत, आणि या प्रकारे तू सर्वांसमोर पूर्णपणे निर्दोष ठरली आहेस.”
A Sari reèe: evo dao sam tvojemu bratu tisuæu srebrnika; gle, on ti je oèima pokrivalo pred svima koji budu s tobom; i to sve da ti je za nauku.
17 १७ अब्राहामाने देवाची प्रार्थना केली आणि देवाने अबीमलेख, त्याची पत्नी आणि त्याच्या दासी यांना बरे केले. मग त्यांना मुले होऊ लागली.
I Avram se pomoli Bogu, i iscijeli Bog Avimeleha i ženu njegovu i sluškinje njegove, te raðahu.
18 १८ कारण परमेश्वराने अब्राहामाची पत्नी सारा हिच्यामुळे अबीमलेखाच्या घराण्यातल्या सर्व स्त्रियांची गर्भाशये अगदी बंद केली होती.
Jer Gospod bješe sasvijem zatvorio svaku matericu u domu Avimelehovu radi Sare žene Avramove.

< उत्पत्ति 20 >