< उत्पत्ति 20 >
1 १ अब्राहाम तेथून नेगेबकडे प्रवास करीत आणि कादेश व शूर यांच्यामध्ये राहिला. तो गरारात परदेशी मनुष्य म्हणून राहिला होता.
And Abraham departed thence towarde the southcontre and dwelled betwene Cades and Sur ad sogeorned in Gerar.
2 २ अब्राहाम आपली पत्नी सारा हिच्याविषयी म्हणाला, “ती माझी बहीण आहे.” गराराचा राजा अबीमलेखाने आपली माणसे पाठवली आणि ते सारेला घेऊन गेले.
And Abraham sayde of Sara his wyfe that she was his sister. Than Abimelech kynge of Gerar sent and fett Sara awaye.
3 ३ परंतु देव रात्री अबीमलेखाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “पाहा जी स्त्री तू घेऊन आलास तिच्यामुळे तू मेलाच म्हणून असे समज, कारण ती एका मनुष्याची पत्नी आहे.”
And God came to Abimelech by nyghte in a dreame and sayde to him: Se thou art but a deed man for the womas sake which thou hast taken awaye for she is a mans wyfe.
4 ४ परंतु अबीमलेख तिच्याजवळ गेला नव्हता. तो म्हणाला, “प्रभू, तू नीतिमान राष्ट्राचाही नाश करणार काय?
But Abimelech had not yet come nye her and therfore sayde: lorde wilt thou sley rightewes people?
5 ५ ‘ती माझी बहीण आहे,’ असे तो स्वतःच मला म्हणाला नाही काय? आणि ‘तो माझा भाऊ आहे,’ असे तिनेही म्हटले. मी आपल्या अंतःकरणाच्या शुद्धपणाने आणि आपल्या हाताच्या निर्दोषतेने हे केले आहे.”
sayde not he vnto me that she was hys sister? yee and sayde not she herself that he was hir brother? wyth a pure herte and innocent handes haue I done this.
6 ६ मग देव त्यास स्वप्नात म्हणाला, “होय! तू आपल्या अंतःकरणाच्या शुद्धतेने हे केले आहेस हे मला माहीत आहे, आणि तू माझ्याविरूद्ध पाप करू नये म्हणून मी तुला आवरले. मीच तुला तिला स्पर्श करू दिला नाही.
And God sayde vnto him in a dreame. I wot it well that thou dydest it in the purenesse of thi herte. And therfore I kepte ye that thou shuldest not synne agenst me nether suffred I the to come nygh her.
7 ७ म्हणून आता तू अब्राहामाची पत्नी सारा ही त्यास परत दे; कारण तो संदेष्टा आहे; तो तुझ्यासाठी प्रार्थना करील व तू वाचशील. परंतु तू तिला त्याच्याकडे परत पाठवले नाहीस, तर तू आणि तुझ्या बरोबर जे सर्व तुझे आहेत ते खात्रीने मरतील, हे लक्षात ठेव.”
Now therfore delyuer the ma his wyfe ageyne for he is a prophete. And let him praye for the that thou mayst lyue. But and yf thou delyuer her not agayne be sure that thou shalt dye the deth with all that thou hast.
8 ८ अबीमलेख सकाळीच लवकर उठला आणि त्याने आपल्या सर्व सेवकांना स्वतःकडे बोलावले. त्याने सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या तेव्हा ती माणसे फारच घाबरली.
Than Abimelech rose vp be tymes in the mornynge and called all his servauntes and tolde all these thinges in their eares and the men were sore a frayde.
9 ९ मग अबीमलेखाने अब्राहामास बोलावून त्यास म्हटले, “तू हे आम्हांला काय केले? मी तुझ्याविरूद्ध काय पाप केले की तू माझ्यावर आणि माझ्या राष्ट्रावर असे मोठे पाप आणले? तू माझ्याशी करू नये ते केले आहे अशा गोष्टी तू करायच्या नव्हत्या.”
And Abimelech called Abraham and sayde vnto him: What hast thou done vnto vs and what haue I offended the that thou shuldest brynge on me and on my kyngdome so greate a synne? thou hast done dedes vnto me that ought not to be done.
10 १० अबीमलेख अब्राहामाला म्हणाला, “तुला हे करण्यास कोणी सुचवले?”
And Abimelech sayde morouer vnto Abraham: What sawest thou that moved the to do this thinge?
11 ११ अब्राहाम म्हणाला, “या ठिकाणी देवाचे भय खात्रीने नाही, म्हणून ते माझ्या पत्नीकरीता मला ठार मारतील, असा विचार मी केला.
And Abraham Answered. I thought that peradveture the feare of God was not in this place and that they shulde sley me for my wyfes sake:
12 १२ शिवाय ती खरोखर माझी बहीण आहे. ती माझ्या बापाची मुलगी आहे, पण माझ्या आईची ती मुलगी नाही आणि म्हणून ती माझी पत्नी झाली आहे.
yet in very dede she is my sister the doughter of my father but not of my mother: and became my wyfe.
13 १३ देवाने मला माझ्या बापाचे घर सोडून देऊन जागोजागी प्रवास करायला लावले, तेव्हा मी तिला म्हणालो, तू माझी पत्नी म्हणून मला एवढा विश्वासूपणा दाखव; जेथे जेथे आपण जाऊ तेथे तेथे माझ्याविषयी हा, ‘माझा भाऊ आहे असे सांग.’”
And after God caused me to wandre out of my fathers house I sayde vnto her: This kyndnesse shalt thou shewe vnto me in all places where we come that thou saye of me how that I am thy brother.
14 १४ अबीमलेखाने अब्राहामाला सारा परत दिली; तसेच त्याने त्यास मेंढरे, बैल व दास-दासीही दिल्या.
Than toke Abimelech shepe and oxen menservauntes and wemenseruauntes and gaue them vnto Abraham and delyvered him Sara his wyfe agayne.
15 १५ अबीमलेख म्हणाला, “पाहा, माझा हा सर्व देश तुझ्यासमोर आहे; तुला बरे वाटेल तेथे तू राहा.”
And Abimelech sayde: beholde the lande lyeth be fore the dwell where it pleaseth ye best.
16 १६ तो सारेला म्हणाला, “तुझा भाऊ अब्राहाम याला मी चांदीची एक हजार नाणी दिली आहेत. तुझ्यासोबत असलेल्या सर्व लोकांसमोर तुझी भरपाई करण्यासाठी ते आहेत, आणि या प्रकारे तू सर्वांसमोर पूर्णपणे निर्दोष ठरली आहेस.”
And vnto Sara he sayde: Se I haue geuen thy brother a thousande peeces of syluer beholde he shall be a couerynge to thyne eyes vnto all that ar with the and vnto all men and an excuse.
17 १७ अब्राहामाने देवाची प्रार्थना केली आणि देवाने अबीमलेख, त्याची पत्नी आणि त्याच्या दासी यांना बरे केले. मग त्यांना मुले होऊ लागली.
And so Abraham prayde vnto God and God healed Abimeleh and his wyfe and hys maydens so that they bare.
18 १८ कारण परमेश्वराने अब्राहामाची पत्नी सारा हिच्यामुळे अबीमलेखाच्या घराण्यातल्या सर्व स्त्रियांची गर्भाशये अगदी बंद केली होती.
For the LORde had closed to all the matryces of the house of Abimelech because of Sara Abrahams wyfe.