< उत्पत्ति 19 >
1 १ संध्याकाळी ते दोन देवदूत सदोमास आले, त्या वेळी लोट सदोमाच्या वेशीजवळ बसला होता. लोटाने त्यांना पाहिले, तो त्यांना भेटण्यास उठला, आणि त्याने भूमीपर्यंत तोंड लववून त्यांना नमन केले.
其二個の天使黄昏にソドムに至るロト時にソドムの門に坐し居たりしがこれを視起て迎へ首を地にさげて
2 २ तो म्हणाला, “माझ्या स्वामी, मी तुम्हास विनंती करतो की, कृपा करून तुम्ही आपल्या सेवकाच्या घरात या, आपले पाय धुवा, आणि आजची रात्र मुक्काम करा.” मग तुम्ही लवकर उठून तुमच्या मार्गाने जा. पण ते म्हणाले, “नाही, आम्ही रात्र नगरातील चौकात घालवू.”
言けるは我主よ請ふ僕の家に臨み足を濯ひて宿りつとに起きて途に遄征たまへ彼等言ふ否我等は街衢に宿らんと
3 ३ परंतु लोटाने त्यांना आग्रहाने विनंती केली, म्हणून ते त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले. त्याने त्यांच्यासाठी जेवण तयार केले व बेखमीर भाकरी भाजल्या आणि ते जेवले.
然ど固く強ければ遂に彼の所に臨みて其家に入るロト乃ち彼等のために筵を設け酵いれぬパンを炊て食はしめたり
4 ४ परंतु ते झोपण्यापूर्वी, त्या नगरातील मनुष्यांनी, सदोम नगराच्या सर्व भागातील तरुण व वृद्ध अशा सर्व माणसांनी लोटाच्या घराला वेढले.
斯て未だ寢ざる前に邑の人々即ちソドムの人老たるも若きも諸共に四方八方より來たれる民皆其家を環み
5 ५ त्यांनी लोटाला हाक मारून म्हटले “आज रात्री तुझ्याकडे आलेली माणसे कोठे आहेत? त्यांना आमच्याकडे बाहेर आण; म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू.”
ロトを呼て之に言けるは今夕爾に就たる人は何處にをるや彼等を我等の所に携へ出せ我等之を知らん
6 ६ लोट घराच्या दारातून बाहेर त्यांच्याकडे आला व त्याने आपल्यामागे दार बंद करून घेतले.
ロト入口に出て其後の戸を閉ぢ彼等の所に至りて
7 ७ तो म्हणाला, “माझ्या बंधूनो, मी तुम्हास विनंती करतो, तुम्ही असे भयंकर वाईट काम करू नका.
言けるは請ふ兄弟よ惡き事を爲すなかれ
8 ८ पाहा, माझ्या दोन मुली आहेत ज्यांचा अद्याप कोणाही पुरुषाशी संबंध आला नाही. मी तुम्हास विनंती करतो, मला त्यांना तुमच्याकडे बाहेर आणू द्या, आणि तुम्हास जे चांगले दिसेल तसे त्यांना करा. फक्त या मनुष्यांना काही करू नका, कारण ते माझ्या छपराच्या सावलीखाली राहण्यास आले आहेत.”
我に未だ男知ぬ二人の女あり請ふ我之を携へ出ん爾等の目に善と見ゆる如く之になせよ唯此人等は既に我家の蔭に入たれば何をも之になすなかれ
9 ९ ते म्हणाले, “बाजूला हो!” ते असेही म्हणाले, “हा आमच्यात परराष्ट्रीय म्हणून राहण्यास आला. आणि आता हा आमचा न्यायाधीश बनू पाहत आहे! आता आम्ही तुझे त्यांच्यापेक्षा वाईट करू.” ते त्या मनुष्यास म्हणजे लोटाला अधिक जोराने लोटू लागले व दरवाजा तोडण्यास ते जवळ आले.
彼等曰ふ爾退け又言けるは此人は來り寓れる身なるに恒に士師とならんとす然ば我等彼等に加ふるよりも多くの害を爾に加へんと遂に彼等酷しく其人ロトに逼り前よりて其戸を破んとせしに
10 १० परंतु त्या पुरुषांनी त्यांचा हात बाहेर काढून लोटाला आपणाजवळ घरात घेऊन दार बंद केले.
彼二人其手を舒しロトを家の内に援いれて其戸を閉ぢ
11 ११ लोटाच्या पाहुण्यांनी घराच्या दाराबाहेर जी सर्व तरुण व म्हातारी माणसे होती, त्यांना आंधळे करून टाकले. ते घराचे दार शोधण्याचा प्रयत्न करून करून थकून गेले.
家の入口にをる人衆をして大なるも小も倶に目を眩しめければ彼等遂に入口を索ぬるに困憊たり
12 १२ मग ते पुरुष लोटाला म्हणाले, “तुझे दुसरे कोणी येथे आहे काय? जावई, तुझी मुले, तुझ्या मुली आणि तुझे जे कोणी या नगरात आहेत त्यांना येथून बाहेर काढ.
斯て二人ロトに言けるは外に爾に屬する者ありや汝の婿子女および凡て邑にをりて爾に屬する者を此所より携へ出べし
13 १३ यासाठी की, आम्ही या ठिकाणाचा नाश करणार आहोत. कारण या लोकांच्या दुष्टतेचा फार मोठा बोभाटा परमेश्वरासमोर झाला आहे, म्हणून त्याने आम्हांला या नगराचा नाश करण्यासाठी पाठवले आहे.”
此處の號呼ヱホバの前に大になりたるに因て我等之を滅さんとすヱホバ我等を遣はして之を滅さしめたまふ
14 १४ मग लोट बाहेर गेला व ज्या मनुष्यांनी त्याच्या मुलींशी लग्न केले होते त्या आपल्या जावायांना तो म्हणाला, “उठा, तुम्ही, लवकर या ठिकाणातून बाहेर पडा; कारण परमेश्वर देव या नगराचा नाश करणार आहे.” परंतु लोट गंमत करत आहे असे त्याच्या जावयांना वाटले.
ロト出て其女を娶る婿等に告て言けるはヱホバが邑を滅したまふべければ爾等起て此處を出よと然ど婿等は之を戲言と視爲り
15 १५ मग पहाट झाल्यावर दूत लोटाला घाई करून म्हणाले, “ऊठ, या नगराला शिक्षा होणार आहे; तेव्हा तू, तुझी पत्नी व तुझ्या येथे असलेल्या दोन मुली यांना घेऊन नीघ म्हणजे मग या नगराच्या शिक्षेत तुमचा नाश होणार नाही.”
曉に及て天使ロトを促して言けるは起て此なる爾の妻と二人の女を携へよ恐くは爾邑の惡とともに滅されん
16 १६ परंतु तो उशीर करीत राहिला. तेव्हा परमेश्वराची त्याच्यावर कृपा होती, म्हणून त्या पुरुषांनी त्याचा हात आणि त्याच्या पत्नीचा आणि त्याच्या दोन मुलींचे हात धरून त्यांना बाहेर आणले आणि नगराबाहेर आणून सोडले.
然るに彼遲延ひしかば二人其手と其妻の手と其二人の女の手を執て之を導き出し邑の外に置りヱホバ斯彼に仁慈を加へたまふ
17 १७ त्यांनी त्यांना बाहेर आणल्यावर त्यातील एक पुरुष म्हणाला, “आता पळा व तुमचे जीव वाचवा, नगराकडे मागे वळून पाहू नका आणि या मैदानात कोणत्याही ठिकाणी थांबू नका; डोंगराकडे निसटून जा म्हणजे तुमचा नाश होणार नाही.”
既に之を導き出して其一人曰けるは逃遁て汝の生命を救へ後を回顧るなかれ低地の中に止るなかれ山に遁れよ否ずば爾滅されん
18 १८ लोट त्यांना म्हणाला, “हे माझ्या प्रभू, असे नको, कृपा कर!
ロト彼等に言けるはわが主よ請ふ斯したまふなかれ
19 १९ माझा जीव वाचवून तू माझ्यावर मोठी दया दाखवली आहेस आणि तुझी कृपादृष्टी तुझ्या दासास प्राप्त झाली आहे, परंतु मी डोंगरापर्यंत पळून जाऊ शकणार नाही, कारण आपत्ती मला गाठेल व मी मरून जाईन.
視よ僕爾の目のまへに恩を得たり爾大なる仁慈を吾に施してわが生命を救たまふ吾山に遁る能はず恐くは災害身に及びて死るにいたらん
20 २० पाहा, पळून जाण्यासाठी हे नगर जवळ आहे, आणि ते लहान आहे, कृपा करून मला तिकडे पळून जाऊ दे, ते लहान नाही काय? म्हणजे माझा जीव वाचेल.”
視よ此邑は遁ゆくに近くして且小し我をして彼處に遁れしめよしからば吾生命全からん是は小き邑なるにあらずや
21 २१ तो त्यास म्हणाला, “ठीक आहे, मी तुझी ही विनंतीसुद्धा मान्य करतो. तू उल्लेख केलेल्या नगराचा नाश मी करणार नाही.
天使之にいひけるは視よ我此事に關ても亦爾の願を容たれば爾が言ふところの邑を滅さじ
22 २२ त्वरा कर! तिकडे पळून जा, कारण तू तेथे पोहचेपर्यंत मला काही करता येणार नाही.” यावरुन त्या नगराला सोअर असे नाव पडले.
急ぎて彼處に遁れよ爾が彼處に至るまでは我何事をも爲を得ずと是に因て其邑の名はゾアル(小し)と稱る
23 २३ जेव्हा लोट सोअर नगरामध्ये पोहचला तेव्हा सूर्य उगवला होता,
ロト、ゾアルに至れる時日地の上に昇れり
24 २४ नंतर परमेश्वराने सदोम व गमोरा या नगरांवर आकाशातून गंधक व अग्नी यांचा वर्षाव केला.
ヱホバ硫黄と火をヱホバの所より即ち天よりソドムとゴモラに雨しめ
25 २५ त्याने त्या नगरांचा नाश केला, तसेच त्या सगळ्या खोऱ्याचा आणि त्या नगरात राहणाऱ्या सगळ्यांचा, आणि जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींचा नाश केला.
其邑と低地と其邑の居民および地に生るところの物を盡く滅したまへり
26 २६ परंतु लोटाची पत्नी त्याच्यामागे होती, तिने मागे वळून पाहिले, आणि ती मिठाचा खांब झाली.
ロトの妻は後を回顧たれば鹽の柱となりぬ
27 २७ अब्राहाम सकाळी लवकर उठला आणि परमेश्वरासमोर तो ज्या ठिकाणी उभा राहिला होता तेथे गेला.
アブラハム其朝夙に起て其嘗てヱホバの前に立たる處に至り
28 २८ त्याने तेथून सदोम व गमोरा नगराकडे आणि खोऱ्यातील सर्व प्रदेशाकडे पाहिले. त्याने पाहिले तेव्हा पाहा, त्या अवघ्या प्रदेशातून भट्टीच्या धुरासारखा धूर त्या प्रदेशातून वर चढताना त्यास दिसला.
ソドム、ゴモラおよび低地の全面を望み見るに其地の烟燄窰の烟のごとくに騰上れり
29 २९ देवाने जेव्हा त्या खोऱ्यातील नगरांचा नाश केला तेव्हा अब्राहामाची आठवण केली. त्याने लोट राहत होता त्या नगरांचा नाश करण्यापूर्वी लोटाला त्या नाशातून काढले.
神低地の邑を滅したまふ時即ちロトの住る邑を滅したまふ時に當り神アブラハムを眷念て斯其滅亡の中よりロトを出したまへり
30 ३० परंतु लोट त्याच्या दोन मुलींबरोबर सोअर नगरातून निघून डोंगरात राहण्यासाठी चढून गेला, कारण त्यास सोअरात राहण्याची भीती वाटली. तो आपल्या दोन मुलींसह एका गुहेत राहिला.
斯てロト、ゾアルに居ることを懼れたれば其二人の女と偕にゾアルを出て上りて山に居り其二人の女子とともに巖穴に住り
31 ३१ थोरली मुलगी धाकटीला म्हणाली, “आपला पिता म्हातारा झाला आहे आणि जगाच्या रीतीप्रमाणे आपल्याबरोबर संबंध ठेवण्यास येथे कोठेही कोणी पुरुष नाही.
茲に長女季女にいひけるは我等の父は老いたり又此地には我等に偶て世の道を成す人あらず
32 ३२ चल, आपल्या पित्याला द्राक्षरस पाजू, आणि त्याच्याबरोबर झोपू. अशा रीतीने आपल्या पित्याचा आपण वंश चालवू.”
然ば我等父に酒を飮せて與に寢ね父に由て子を得んと
33 ३३ म्हणून, त्या रात्री त्यांनी आपल्या पित्याला द्राक्षरस पाजला. नंतर थोरली मुलगी आपल्या पित्याबरोबर झोपली; ती कधी झोपली व कधी उठली हे त्यास समजले नाही.
遂に其夜父に酒を飮せ長女入て其父と與に寢たり然るにロトは女の起臥を知ざりき
34 ३४ दुसऱ्या दिवशी थोरली धाकटीला म्हणाली, “मी काल रात्री माझ्या बापाबरोबर झोपले, तर आज रात्री पुन्हा आपण बापाला द्राक्षरस पाजू या, मग रात्री तू बापाबरोबर झोप. अशा रीतीने आपण बापाचा वंश चालवू.”
翌日長女季女に言けるは我昨夜わが父と寢たり我等此夜又父に酒をのません爾入て與に寢よわれらの父に由て子を得ることをえんと
35 ३५ तेव्हा त्या रात्रीही त्यांनी आपल्या बापाला द्राक्षरस पाजला, नंतर धाकटी मुलगी आपल्या बापाबरोबर झोपली, आणि ती कधी झोपली व कधी उठली हे त्यास समजले नाही.
乃ち其夜も亦父に酒をのませ季女起て父と與に寢たりロトまた女の起臥を知ざりき
36 ३६ अशा रीतीने लोटाच्या दोन्हीही मुली आपल्या बापापासून गरोदर राहिल्या.
斯ロトの二人の女其父によりて孕みたり
37 ३७ वडील मुलीला मुलगा झाला, तेव्हा तिने त्याचे नाव मवाब ठेवले. आजपर्यंत जे मवाबी लोक आहेत, त्यांचा हा मूळ पुरुष.
長女子を生み其名をモアブと名く即ち今のモアブ人の先祖なり
38 ३८ धाकट्या मुलीलाही मुलगा झाला; तिने त्याचे नाव बेनअम्मी असे ठेवले; आजमितीला जे अम्मोनी लोक त्यांचा हा मूळ पुरुष.
季女も亦子を生み其名をベニアンミと名く即ち今のアンモニ人の先祖なり