< उत्पत्ति 17 >

1 अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन दिले व त्यास म्हटले, “मी सर्वशक्तिमान देव आहे. माझ्या समक्षतेत चाल, आणि सात्त्विकतेने राहा.
Abram tenía 99 años cuando Yavé se le apareció, y le dijo: Yo soy ʼEL-Shadday. Anda delante de Mí y sé perfecto.
2 तू असे करशील, तर मी माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये एक करार करीन, आणि मी तुला अनेक पटींनी वाढवीन असे अभिवचन देतो.”
Estableceré mi Pacto entre Yo y tú, y te multiplicaré muchísimo.
3 मग अब्रामाने देवास लवून नमन केले आणि देव त्यास म्हणाला,
Entonces Abram se postró sobre su rostro. ʼElohim le habló:
4 “पाहा, तुझ्यासोबत माझा करार असा आहे: तू अनेक राष्ट्रांचा महान पिता होशील.
Mira, establezco mi Pacto contigo: Serás padre de una multitud de pueblos.
5 येथून पुढे तुझे नाव अब्राम असणार नाही, तर तुझे नाव अब्राहाम असे होईल. कारण मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता असे नेमले आहे.
Tu nombre ya no será Abram, sino Abraham, porque te constituí padre de una multitud de pueblos.
6 मी तुला भरपूर संतती देईन, आणि मी तुझ्यापासून नवीन राष्ट्रे उदयास आणीन, आणि तुझ्यापासून राजे उत्पन्न होतील.
Te haré muy fecundo. Haré naciones de ti, y de ti saldrán reyes.
7 मी तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये आणि तुझ्या वंशजांमध्येही पिढ्यानपिढ्या कायम लागू राहील असा सनातन करार करीन, तो असा की, मी तुझा आणि तुझ्यानंतर तुझ्या वंशजांचा देव होईन.
Yo establezco mi Pacto entre Yo y tú, y después de ti con tu descendencia en sus generaciones como alianza perpetua, para ser el ʼElohim tuyo y a tu descendencia.
8 ज्या प्रदेशामध्ये तू राहत आहेस तो, म्हणजे कनान देश, मी तुला व तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन, आणि मी तुमचा देव होईन.”
Te daré por posesión perpetua la tierra de tus peregrinaciones, toda la tierra de Canaán, y a tu descendencia. Y seré su ʼElohim.
9 नंतर देव अब्राहामाला पुढे म्हणाला, “आता या करारातील तुझा भाग हा असा, तू माझा करार पाळावा, तू आणि तुझ्या मागे तुझ्या वंशजांनी पिढ्यानपिढ्या पाळावयाचा माझा करार पाळावा.
Además ʼElohim dijo a Abraham: Tú guardarás mi Pacto, tú y tu descendencia en sus generaciones.
10 १० माझा करार जो, तू आणि तुझ्या मागे तुझ्या संतानाने पाळायचा तो हा की: तुमच्यातील प्रत्येक पुरुषांची सुंता व्हावी.
Éste es mi Pacto entre Yo y ustedes, el cual guardarán tú y tu descendencia: Que todo varón entre ustedes sea circuncidado.
11 ११ माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये असलेला करार हा, तुम्ही आपली सुंता करून घ्यावी.
Circuncidarán sus prepucios, y esta será la señal del Pacto entre Yo y ustedes.
12 १२ पिढ्यानपिढ्या तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची त्याच्या जन्मानंतर आठ दिवसानी सुंता करावी. मग तो पुरुष तुझ्या कुटुंबात जन्मलेला असो किंवा तो तुझ्या वंशातला नसून परक्यापासून पैसा देऊन घेतलेला असो.
Todo varón entre ustedes en todas sus generaciones será circuncidado a los ocho días de nacido, tanto el nacido en casa, como el comprado con dinero a cualquier extranjero que no sea de tu descendencia.
13 १३ अशा रीतीने तुझ्या राष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक पुरुषांची सुंता करावी, मग तो तुझ्या कुटुंबातील असो किंवा विकत घेतलेल्या गुलामाच्या कुटुंबात जन्मलेला असो; तुझ्या व माझ्यामध्ये केलेला करार या खुणेवरून कायम राहील.
Ciertamente será circuncidado el nacido en tu casa y el comprado con tu dinero. Mi Pacto estará en su cuerpo como Pacto eterno.
14 १४ ज्या कोणाची सुंता झाली नाही अशा पुरुषाला त्याच्या लोकांतून बाहेर टाकावे; कारण त्याने माझा करार मोडला आहे.”
Pero el varón incircunciso, que no haya circuncidado su prepucio, será cortado de su pueblo. Quebrantó mi Pacto.
15 १५ देव अब्राहामाला म्हणाला, “तुझी पत्नी साराय, हिला येथून पुढे साराय असे संबोधू नको. त्या ऐवजी तिचे नाव सारा असे होईल.
También ʼElohim dijo a Abraham: A tu esposa Saray no la llamarás Saray, sino su nombre será Sara.
16 १६ मी तिला आशीर्वादित करीन, आणि मी तुला तिच्यापासून मुलगा देईन. मी तिला आशीर्वादीत करीन, आणि ती अनेक राष्ट्रांची माता होईल. लोकांचे राजे तिच्यापासून निपजतील.”
La bendeciré y también te daré un hijo por medio de ella. Sí, la bendeciré. Ella [será madre de] naciones. Reyes de pueblos procederán de ella.
17 १७ अब्राहामाने देवाला लवून नमन केले आणि तो हसला, तो मनात म्हणाला, “शंभर वर्षांच्या मनुष्यास मुलगा होणे शक्य आहे का? आणि सारा, जी नव्वद वर्षांची आहे, तिला मुलगा होऊ शकेल का?”
Abraham se postró sobre su rostro. Pero se rió y dijo en su corazón: ¿A un hombre de 100 años le nacerá un hijo? Y Sara, ¿dará a luz a los 90 años?
18 १८ अब्राहाम देवाला म्हणाला, “इश्माएल तुझ्या समोर जगावा तेवढे पुरे!”
Abraham dijo a ʼElohim: ¡Ojalá Ismael viva delante de Ti!
19 १९ देव म्हणाला, “नाही! परंतु तुझी पत्नी सारा हिलाच मुलगा होईल, आणि त्याचे नाव तू इसहाक असे ठेव. मी त्याच्याशी निरंतरचा करार करीन; तो करार त्याच्यानंतर त्याच्या वंशजांसोबत निरंतर असेल.
Pero ʼElohim le dijo: Ciertamente tu esposa Sara te dará a luz un hijo. Tú lo llamarás Isaac, y estableceré mi Pacto con él como Pacto perpetuo para su descendencia después de él.
20 २० तू मला इश्माएलविषयी विचारलेस ते मी ऐकले आहे. पाहा, मी आतापासून पुढे त्यास आशीर्वाद देईन, आणि त्यास फलद्रुप करीन आणि त्यास बहुगुणित करीन. तो बारा सरदारांच्या वंशांचा पिता होईल, आणि मी त्यास एक मोठे राष्ट्र करीन.
En cuanto a Ismael, te escuché: Ciertamente lo bendeciré, lo haré fecundo y lo multiplicaré muchísimo. Engendrará 12 príncipes y haré de él una gran nación.
21 २१ परंतु मी इसहाकाबरोबर माझा करार स्थापीन, ज्याला सारा पुढल्या वर्षी याच वेळी जन्म देईल.”
Pero mi Pacto lo confirmaré con Isaac, a quien Sara te dará a luz por este tiempo, el año próximo.
22 २२ देवाने त्याच्याशी बोलणे संपवल्यावर, देव अब्राहामापासून वर गेला.
Cuando terminó de hablarle, ʼElohim ascendió de [la presencia] de Abraham.
23 २३ त्यानंतर अब्राहामाने त्याचा मुलगा इश्माएल आणि त्याच्या घराण्यात जन्मलेले आणि जे सर्व मोल देऊन विकत घेतलेले अशा सगळ्या पुरुषांना एकत्र केले, आणि देवाने सांगितल्याप्रमाणेच त्याच्या घरातील सर्व पुरुषांची त्या एकाच दिवशी सुंता केली.
Entonces ese mismo día Abraham tomó a Ismael su hijo, a todos los nacidos en su casa, a todos los comprados con su dinero, y a todo varón entre las gentes de la casa de Abraham, y circuncidó su prepucio, como ʼElohim le dijo.
24 २४ अब्राहाम नव्याण्णव वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली.
Abraham tenía 99 años cuando circuncidó su prepucio,
25 २५ आणि त्याचा मुलगा इश्माएल तेरा वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली.
y su hijo Ismael tenía 13 años cuando su prepucio fue circuncidado.
26 २६ अब्राहाम आणि त्याचा मुलगा इश्माएल या दोघांची एकाच दिवशी सुंता झाली.
Aquel mismo día Abraham se circuncidó, y también su hijo Ismael.
27 २७ त्याच्या घरी जन्मलेले व त्याने विकत घेतलेले असे त्याच्या घरचे सगळे पुरुष यांचीही त्याच्या बरोबर सुंता झाली.
Todos los hombres de su casa, nacidos en casa o comprados con dinero a un extranjero, fueron circuncidados con él.

< उत्पत्ति 17 >