< उत्पत्ति 16 >
1 १ अब्रामाला आपली पत्नी साराय हिच्यापासून मूल झाले नाही, परंतु तिची एक मिसरी दासी होती, जिचे नाव हागार होते.
Szóráj pedig, Ávrom felesége, nem szült neki; de volt neki egy egyiptomi szolgálója és neve Hágár.
2 २ साराय अब्रामाला म्हणाली, “परमेश्वराने मला मुले होण्यापासून वंचित ठेवले आहे. तेव्हा तुम्ही माझ्या दासीपाशी जा. कदाचित तिच्यापासून मला मुले मिळतील.” अब्रामाने आपली पत्नी साराय हिचे म्हणणे मान्य केले.
És mondta Szóráj Ávromnak: Íme, elzárt engem az Örökkévaló, hogy ne szüljek; menj be szolgálómhoz, talán felépülök általa. És Ávrom hallgatott Szórá szavára.
3 ३ अब्राम कनान देशात दहा वर्षे राहिल्यानंतर, अब्रामाची पत्नी साराय हिने आपली मिसरी दासी हागार ही, आपला पती अब्राम याला पत्नी म्हणून दिली.
És vette Szóráj, Ávrom felesége, az egyiptomi Hágárt, az ő szolgálóját, a tíz év végével, amióta Ávrom Kánaánban lakott és adta őt az ő férjének Ávromnak feleségül.
4 ४ त्याने हागार सोबत शरीरसंबंध केले, आणि अब्रामापासून ती गरोदर राहिली. आणि जेव्हा तिने पाहिले की आपण गरोदर आहोत, तेव्हा ती आपल्या मालकीणीकडे तिरस्काराने पाहू लागली.
Az bement Hágárhoz, ez pedig fogant; de midőn látta, hogy fogant, csekély lett úrnője az ő szemében.
5 ५ नंतर साराय अब्रामाला म्हणाली, “माझ्यावरचा अन्याय तुमच्यावर असो. मी आपली दासी तुम्हास दिली, आणि आपण गरोदर आहो हे लक्षात आल्यावर, मी तिच्या दृष्टीने तुच्छ झाले. परमेश्वर तुमच्यामध्ये व माझ्यामध्ये न्याय करो.”
És szólt Szóráj Ávromhoz: A rajtam elkövetett sérelem rád száll. Én adtam szolgálómat öledbe, és midőn látta, hogy ő fogant, akkor csekély lettem az ő szemeiben. Ítéljen az Örökkévaló, köztem és közötted.
6 ६ परंतु अब्राम सारायला म्हणाला, “तू हागारेची मालकीण आहेस, तुला काय पाहिजे तसे तू तिचे कर.” तेव्हा साराय तिच्याबरोबर निष्ठुरपणे वागू लागली म्हणून हागार तिला सोडून पळून गेली.
És mondta Ávrom Szórájnak: Íme, szolgálód kezedben van; tégy vele, amint jónak tetszik szemeidben. És Szóráj sanyargatta, úgy, hogy megszökött előle.
7 ७ शूर गावाच्या वाटेवर वाळवंटातील एका पाण्याच्या झऱ्याजवळ हागार परमेश्वराच्या एका देवदूताला आढळली.
És találta őt az Örökkévaló angyala a vízforrásnál a pusztában, a forrásnál, a Súr felé vezető úton,
8 ८ देवदूत तिला म्हणाला, “सारायचे दासी हागारे, तू येथे का आलीस? तू कोठे जात आहेस?” हागार म्हणाली, “माझी मालकीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.”
és mondta: Hágár, Szóráj szolgálója, honnan jössz és hova mész? És ő felelt: Szóráj, úrnőm elől szököm.
9 ९ परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “तू आपल्या मालकिणीकडे परत जा आणि तिच्या अधिकारात तिच्या अधीनतेत राहा.”
És mondta neki az Örökkévaló angyala: Térj vissza úrnődhöz és alázkodj meg keze alatt.
10 १० परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, “तुझी संतती मी इतकी बहुगुणित करीन, की ती मोजणे शक्य होणार नाही.”
És mondta neki az Örökkévaló angyala: Megsokasítom a te magzatodat, hogy nem lesz megszámlálható sokasága miatt.
11 ११ परमेश्वराचा दूत तिला असे सुद्धा म्हणाला, “तू आता गरोदर आहेस आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू इश्माएल म्हणजे परमेश्वर ऐकतो असे ठेव, कारण प्रभूने तुझ्या दुःखाविषयी ऐकले आहे.
És mondta neki az Örökkévaló angyala: Íme, te fogantál és fiat fogsz szülni, nevezd őt Ismáelnek: mert hallgatott az Örökkévaló a te nyomorúságodra.
12 १२ इश्माएल जंगली गाढवासारखा मनुष्य असेल. तो सर्वांविरूद्ध असेल आणि सर्व लोक त्याच्या विरूद्ध असतील, आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या भावांच्यापासून वेगळा राहील.”
Ő pedig vad lesz az emberek között, keze mindenen és mindenkinek keze rajta és minden testvérének színe előtt fog lakni.
13 १३ नंतर तिच्याशी बोलणारा जो परमेश्वर त्याचे नाव, “तू पाहणारा देव आहेस,” असे तिने ठेवले, कारण ती म्हणाली, “जो मला पाहतो त्यास मी येथेही मागून पाहिले काय?”
És hívta az Örökkévaló nevét, aki beszélt vele: Te, a látomás Istene! mert azt mondta: Láttam-e itt valamit a látomás után?
14 १४ तेव्हा तेथील विहिरीला बैर-लहाय-रोई असे नाव पडले; पाहा, ती कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे.
Azért nevezte el a kutat: az élő látomás kútja; íme, az Kódés és Bered között van.
15 १५ हागारेने अब्रामाच्या पुत्राला जन्म दिला, आणि ज्याला हगारेने जन्म दिला त्या त्याच्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माएल ठेवले.
És szült Hágár Ávromnak fiat és Ávrom elnevezte az ő fiát, akit Hágár szült, Ismáelnek.
16 १६ हागारेला अब्रामापासून इश्माएल झाला तेव्हा अब्राम शहाऐंशी वर्षांचा होता.
Ávrom pedig nyolcvanhat éves volt, midőn Hágár szülte Ismáelt Ávromnak.