< उत्पत्ति 16 >

1 अब्रामाला आपली पत्नी साराय हिच्यापासून मूल झाले नाही, परंतु तिची एक मिसरी दासी होती, जिचे नाव हागार होते.
Abrams Hustru Saraj fødte ham intet Barn. Men Saraj havde en Ægyptisk Trælkvinde ved Navn Hagar;
2 साराय अब्रामाला म्हणाली, “परमेश्वराने मला मुले होण्यापासून वंचित ठेवले आहे. तेव्हा तुम्ही माझ्या दासीपाशी जा. कदाचित तिच्यापासून मला मुले मिळतील.” अब्रामाने आपली पत्नी साराय हिचे म्हणणे मान्य केले.
og Saraj sagde til Abram: "HERREN har jo nægtet mig Børn; gå derfor ind til min Trælkvinde, måske kan jeg få en Søn ved hende!" Og Abram adlød Saraj.
3 अब्राम कनान देशात दहा वर्षे राहिल्यानंतर, अब्रामाची पत्नी साराय हिने आपली मिसरी दासी हागार ही, आपला पती अब्राम याला पत्नी म्हणून दिली.
Så tog Abrams Hustru Saraj sin Trælkvinde, Ægypterinden Hagar, efter at Abram havde boet ti År i Kana'ans Land, og gav sin Mand Abram hende til Hustru;
4 त्याने हागार सोबत शरीरसंबंध केले, आणि अब्रामापासून ती गरोदर राहिली. आणि जेव्हा तिने पाहिले की आपण गरोदर आहोत, तेव्हा ती आपल्या मालकीणीकडे तिरस्काराने पाहू लागली.
og han gik ind til Hagar, og hun blev frugtsommelig. Men da hun så, at hun var frugtsommelig, lod hun hånt om sin Herskerinde.
5 नंतर साराय अब्रामाला म्हणाली, “माझ्यावरचा अन्याय तुमच्यावर असो. मी आपली दासी तुम्हास दिली, आणि आपण गरोदर आहो हे लक्षात आल्यावर, मी तिच्या दृष्टीने तुच्छ झाले. परमेश्वर तुमच्यामध्ये व माझ्यामध्ये न्याय करो.”
Da sagde Saraj til Abram: "Min Krænkelse komme over dig! Jeg lagde selv min Trælkvinde i din Favn, og nu hun ser, at hun skal føde, lader hun hånt om mig; HERREN være Dommer mellem mig og dig!"
6 परंतु अब्राम सारायला म्हणाला, “तू हागारेची मालकीण आहेस, तुला काय पाहिजे तसे तू तिचे कर.” तेव्हा साराय तिच्याबरोबर निष्ठुरपणे वागू लागली म्हणून हागार तिला सोडून पळून गेली.
Abram svarede Saraj: "Din Trældkvinde er i din Hånd, gør med hende, hvad du finder for godt!" Da plagede Saraj hende, så hun flygtede for hende.
7 शूर गावाच्या वाटेवर वाळवंटातील एका पाण्याच्या झऱ्याजवळ हागार परमेश्वराच्या एका देवदूताला आढळली.
Men HERRENs Engel fandt hende ved Vandkilden i Ørkenen, ved Kilden på Vejen til Sjur;
8 देवदूत तिला म्हणाला, “सारायचे दासी हागारे, तू येथे का आलीस? तू कोठे जात आहेस?” हागार म्हणाली, “माझी मालकीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.”
og han sagde: "Hvorfra kommer du, Hagar, Sarajs Trælkvinde, og hvor går du hen?" Hun svarede: "Jeg flygter for min Herskerinde Saraj!"
9 परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “तू आपल्या मालकिणीकडे परत जा आणि तिच्या अधिकारात तिच्या अधीनतेत राहा.”
Da sagde HERRENs Engel til hende: "Vend tilbage til din Herskerinde og find dig i hendes Mishandling!"
10 १० परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, “तुझी संतती मी इतकी बहुगुणित करीन, की ती मोजणे शक्य होणार नाही.”
Og HERRENs Engel sagde til hende: "Jeg vil gøre dit Afkom så talrigt, at det ikke kan tælles."
11 ११ परमेश्वराचा दूत तिला असे सुद्धा म्हणाला, “तू आता गरोदर आहेस आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू इश्माएल म्हणजे परमेश्वर ऐकतो असे ठेव, कारण प्रभूने तुझ्या दुःखाविषयी ऐकले आहे.
Og HERRENs Engel sagde til hende: "Se, du er frugtsommelig, og du skal føde en Søn, som du skal kalde Ismael, thi HERREN har hørt, hvad du har lidt;
12 १२ इश्माएल जंगली गाढवासारखा मनुष्य असेल. तो सर्वांविरूद्ध असेल आणि सर्व लोक त्याच्या विरूद्ध असतील, आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या भावांच्यापासून वेगळा राहील.”
og han skal blive et Menneske Vildæsel, hvis Hånd er mod alle, og alles Hånd mod ham, og han skal ligge i Strid med alle sine Frænder!"
13 १३ नंतर तिच्याशी बोलणारा जो परमेश्वर त्याचे नाव, “तू पाहणारा देव आहेस,” असे तिने ठेवले, कारण ती म्हणाली, “जो मला पाहतो त्यास मी येथेही मागून पाहिले काय?”
Så gav hun HERREN, der havde talet til hende, Navnet: Du er en Gud, som ser; thi hun sagde: "Har jeg virkelig her set et Glimt af ham, som ser mig?"
14 १४ तेव्हा तेथील विहिरीला बैर-लहाय-रोई असे नाव पडले; पाहा, ती कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे.
Derfor kaldte man Brønden Be'er-lahaj-ro'i; den ligger mellem Kadesj og Bered.
15 १५ हागारेने अब्रामाच्या पुत्राला जन्म दिला, आणि ज्याला हगारेने जन्म दिला त्या त्याच्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माएल ठेवले.
Og Hagar fødte Abram en Søn, og Abram kaldte Sønnen, Hagar fødte ham, Ismael.
16 १६ हागारेला अब्रामापासून इश्माएल झाला तेव्हा अब्राम शहाऐंशी वर्षांचा होता.
Abram var seks og firsindstyve År gammel, da Hagar fødte ham Ismael.

< उत्पत्ति 16 >