< उत्पत्ति 15 >

1 या गोष्टी घडल्यानंतर अब्रामाला दृष्टांतात परमेश्वराचे वचन आले. तो म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको. मी तुझे संरक्षण करीन आणि तुला फार मोठे प्रतिफळ देईन.”
بعد از این وقایع، خداوند در رویا به ابرام چنین گفت: «ای ابرام نترس، زیرا من همچون سپر از تو محافظت خواهم کرد و اجری بسیار عظیم به تو خواهم داد.»
2 अब्राम म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा, मी अजून निपुत्रिक आहे, आणि माझ्या घराचा वारस दिमिष्क शहरातील अलिएजर हाच होईल, तेव्हा तू मला काय देणार?”
اما ابرام در پاسخ گفت: «ای خداوند یهوه، این اجر تو چه فایده‌ای برای من دارد، زیرا که من فرزندی ندارم و این العازار دمشقی، غلام من، صاحب ثروتم خواهد شد.
3 अब्राम म्हणाला, “तू मला संतान दिले नाहीस म्हणून माझ्या घराचा कारभारीच माझा वारस आहे.”
تو به من نسلی نبخشیده‌ای، پس غلامم وارث من خواهد شد.»
4 नंतर, पाहा, परमेश्वराचे वचन अब्रामाकडे आले. तो म्हणाला, “हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटी येईल तोच तुझा वारस होईल.”
سپس خداوند به او فرمود: «این غلام وارث تو نخواهد شد، زیرا تو خود پسری خواهی داشت و او وارث همه ثروتت خواهد شد.»
5 मग त्याने त्यास बाहेर आणले, आणि म्हटले, “या आकाशाकडे पाहा, तुला तारे मोजता येतील तर मोज.” तो त्यास म्हणाला, “असे तुझे संतान होईल.”
خداوند شب هنگام ابرام را به بیرون خانه فرا خواند و به او فرمود: «ستارگان آسمان را بنگر و ببین آیا می‌توانی آنها را بشماری؟ نسل تو نیز چنین بی‌شمار خواهد بود.»
6 त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला. आणि तो विश्वास त्याचा प्रामाणिकपणा असा मोजण्यात आला.
آنگاه ابرام به خداوند ایمان آورد و خداوند این را برای او عدالت به شمار آورد.
7 परमेश्वर त्यास म्हणाला, “हा देश तुला वतन करून देण्याकरता खास्द्यांच्या ऊर देशातून तुला आणणारा मीच परमेश्वर आहे.”
خدا به ابرام فرمود: «من همان خداوندی هستم که تو را از شهر اور کلدانیان بیرون آوردم تا این سرزمین را به تو دهم.»
8 तो त्यास म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा मला हे वतन मिळेल हे मी कशावरून समजू?”
اما ابرام در پاسخ گفت: «خداوند یهوه، چگونه مطمئن شوم که تو این سرزمین را به من خواهی داد؟»
9 तो त्यास म्हणाला, “माझ्यासाठी तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका तसेच एक होला व एक पारव्याचे पिल्लू आण.”
خداوند به او فرمود: «یک گوسالهٔ مادهٔ سه ساله، یک بز مادهٔ سه ساله، یک قوچ سه ساله، یک قمری و یک کبوتر برای من بیاور.»
10 १० त्याने ते सर्व त्याच्याकडे आणले आणि त्यांना चिरून त्या प्रत्येकाचे दोन दोन तुकडे केले व प्रत्येक अर्धा भाग दुसऱ्या अर्ध्या भागासमोर ठेवला. पण पक्षी त्याने चिरले नाहीत;
ابرام همۀ اینها را نزد خداوند آورد و هر کدام را از بالا تا پایین دو نصف کرد و پاره‌های هر کدام از آنها را در مقابل هم گذاشت؛ ولی پرنده‌ها را نصف نکرد.
11 ११ कापलेल्या प्राण्यांचे मांस खाण्याकरिता पक्ष्यांनी त्यावर झडप घातली, परंतु अब्रामाने त्यांना हाकलून लावले.
و لاشخورهایی را که بر اجساد حیوانات می‌نشستند، دور نمود.
12 १२ नंतर जेव्हा सूर्य मावळू लागला, तेव्हा अब्रामाला गाढ झोप लागली आणि पाहा निबिड आणि घाबरून सोडणाऱ्या काळोखाने त्यास झाकले.
هنگام غروب، ابرام به خواب عمیقی فرو رفت. در عالم خواب، تاریکی وحشتناکی او را احاطه کرد.
13 १३ मग परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तुला या गोष्टी समजल्या पाहिजेत; तुझे वंशज जो देश त्यांचा नाही त्या अनोळखी देशात राहतील आणि ते तेथे गुलाम होतील आणि चारशे वर्षे त्यांचा छळ होईल.
آنگاه خداوند به ابرام فرمود: «یقین بدان که نسل تو مدت چهارصد سال در مملکت بیگانه‌ای بندگی خواهند کرد و مورد ظلم و ستم قرار خواهند گرفت.
14 १४ परंतु ज्याने त्यांना गुलाम बनवले त्या राष्ट्राचा मी न्याय करीन, आणि मग आपल्या बरोबर पुष्कळ धन घेऊन ते त्या देशातून निघतील.
اما من آن قومی را که ایشان را اسیر سازند، مجازات خواهم نمود و سرانجام نسل تو با اموال زیاد از آنجا بیرون خواهند آمد.
15 १५ तू स्वतः फार म्हातारा होऊन शांतीने आपल्या पूर्वजांकडे जाशील आणि चांगला म्हातारा झाल्यावर तुला पुरतील.
(تو نیز در کمال پیری در آرامش خواهی مُرد و دفن شده، به پدرانت خواهی پیوست.)
16 १६ मग चार पिढ्यानंतर तुझे लोक या देशात माघारे येतील. कारण अमोरी लोकांचा अन्याय अद्याप त्याच्या मर्यादेपर्यंत पोहोचलेला नाही.”
آنها بعد از چهار نسل، به این سرزمین باز خواهند گشت، زیرا شرارت قوم اموری که در اینجا زندگی می‌کنند، هنوز به اوج خود نرسیده است.»
17 १७ सूर्य मावळल्यानंतर गडद अंधार पडला; मारलेल्या जनावरांच्या तेथेच पडलेल्या त्या तुकड्यांमधून धुराची अग्नीज्वाला आणि अग्नीची ज्योती गेली.
وقتی آفتاب غروب کرد و هوا تاریک شد، تنوری پُر دود و مشعلی فروزان از وسط پاره‌های حیوانات گذشت.
18 १८ त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार केला. तो म्हणाला, “मिसर देशाच्या नदीपासून फरात महानदीपर्यंतचा
آن روز خداوند با ابرام عهد بست و فرمود: «من این سرزمین را از مرز مصر تا رود فرات به نسل تو می‌بخشم،
19 १९ केनी, कनिज्जी, कदमोनी,
یعنی سرزمین اقوام قینی، قِنِزّی، قَدمونی،
20 २० हित्ती, परिज्जी, रेफाईम,
حیتّی، فِرزّی، رِفایی،
21 २१ अमोरी, कनानी, गिर्गाशी व यबूसी यांचा देश मी तुझ्या संतानाला देतो.”
اَموری، کَنعانی، جِرجاشی و یِبوسی را.»

< उत्पत्ति 15 >