< उत्पत्ति 14 >
1 १ त्यानंतर शिनाराचा राजा अम्राफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचा राजा कदार्लागोमर आणि गोयिमाचा राजा तिदाल यांच्या दिवसात असे झाले की,
Un notikās Amrafela, Sineāras ķēniņa, Arioka, Elasaras ķēniņa, Ķedorlaomera, Elama ķēniņa, un Tideāla, Gojimu ķēniņa, laikā -
2 २ त्यांनी सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिर्शा, अदमाचा राजा शिनाब, सबोयिमाचा राजा शमेबर आणि बेला ज्याला सोअर म्हणतात त्याच्या राजांशी युद्ध केले.
Tie karoja pret Beru, Sodomas ķēniņu, un pret Biršu, Gomoras ķēniņu, Sineabu, Adamas ķēniņu, un Semeberu, Ceboīma ķēniņu, un Belas, tas ir Coāras ķēniņu.
3 ३ नंतर हे पाच राजे सिद्दीम खोऱ्यात एकत्र जमले. या खोऱ्याला क्षार समुद्र असेही म्हणतात.
Šie visi sapulcējās Sidim ielejā, tā ir tā Sāls jūra.
4 ४ त्यांनी बारा वर्षे कदार्लागोमरची सेवा केली होती, परंतु तेराव्या वर्षी त्यांनी त्याच्या विरूद्ध बंड केले.
Divpadsmit gadus tie bija kalpojuši Ķedorlaomeram, un trīspadsmitā gadā tie atkrita.
5 ५ त्यानंतर चौदाव्या वर्षी कदार्लागोमर व त्याच्या बरोबरचे राजे आले आणि त्यांनी अष्टरोथ-कर्णईम येथे रेफाईम लोकांस, हाम येथे जूजीम लोकांस, शावेह किर्याथाईम येथे एमीम या लोकांस मारले.
Un četrpadsmitā gadā Ķedorlaomers nāca un tie ķēniņi, kas līdz ar viņu bija, un sakāva tos Refaīm iekš Astarot-Karnaīm un tos Hauzim Amā, un tos Emim Kiriataīm ielejā,
6 ६ आणि होरी यांना त्यांच्या सेईर डोंगराळ प्रदेशात जे एल पारान रान आहे तेथपर्यंत त्यांनी जाऊन मारले.
Un tos Horiešus uz viņu Seīra kalniem līdz Ēl-Param, kas pie tuksneša.
7 ७ नंतर ते मागे फिरून एन-मिशपात म्हणजे कादेश येथे आले. आणि त्यांनी सर्व अमालेकी देशाचा आणि तसेच हससोन-तामार येथे राहणाऱ्या अमोरी लोकांचाही पराभव केला.
Un tie griezās atpakaļ un nāca pie Mišpata avota, tas ir Kādeša, un sakāva visu Amalekiešu apgabalu un arī Amoriešus, kas dzīvoja Acecon-Tamarā.
8 ८ नंतर सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाचा राजा, सबोयिमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा ह्यांनी लढाईची तयारी केली.
Tad izgāja Sodomas ķēniņš un Gomoras ķēniņš un Adamas ķēniņš un Ceboīma ķēniņš un Belas, tas ir Coāras, ķēniņš, un taisījās pret tiem kauties Sidim ielejā,
9 ९ एलामाचा राजा कदार्लागोमर, गोयिमाचा राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एल्लासाराचा राजा अर्योक यांच्या विरूद्ध ते लढले. हे चार राजे पाच राजांविरूद्ध लढले.
Pret Ķedorlaomeru, Elama ķēniņu, un Tideālu, Gojimu ķēniņu, un Amrafeli, Sineāras ķēniņu, un Arioku, Elasaras ķēniņu: - četri ķēniņi pret pieciem.
10 १० सिद्दीम खोऱ्यात पूर्ण डांबराने भरलेले खड्डे होते आणि सदोम व गमोराचे राजे पळून जाताना त्यामध्ये पडले, जे राहिले ते डोंगराकडे पळून गेले.
Un Sidim ielejā bija daudz zemes piķa bedres; tad Sodomas un Gomoras ķēniņi bēga un tur iekrita, un tie atlikušie aizbēga kalnos.
11 ११ अशा रीतीने शत्रूंनी सदोम व गमोरा नगराच्या सर्व वस्तू आणि त्यांचा सर्व अन्नसाठा लुटून घेऊन माघारी गेले.
Un tie paņēma visu Sodomas un Gomoras mantu un visu viņu barību un aizgāja projām;
12 १२ ते गेले तेव्हा त्यांनी अब्रामाच्या भावाचा मुलगा लोट जो सदोमात राहत होता, त्यालासुद्धा त्याच्या सर्व मालमत्तेसह नेले.
Un paņēma arī Latu, Ābrama brālēnu, un viņa mantu, jo tas dzīvoja Sodomā, - un aizgāja projām.
13 १३ तेथून पळून आलेल्या एकाने अब्राम इब्रीला हे सांगितले. तो तर अष्कोल व आनेर ह्यांचा भाऊ मम्रे अमोरी याच्या एलोन झाडांजवळ राहत होता आणि ते सर्व अब्रामाचे सहकारी होते.
Tad nāca viens, kas bija izmucis, un pasacīja to Ābramam, tam Ebrejam; tas dzīvoja starp tiem ozoliem, kas piederēja tam Amorietim Mamre, Eškola un Anera brālim; šie bija Ābrama derības biedri.
14 १४ जेव्हा अब्रामाने ऐकले की, त्याच्या नातेवाइकांना शत्रूंनी पकडून नेले आहे तेव्हा त्याने आपल्या घरी जन्मलेली, लढाईचे शिक्षण घेतलेली तीनशे अठरा माणसे घेऊन सरळ दान नगरापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला.
Un Ābrams dzirdējis, savu brāli esam aizvestu cietumā, apbruņojās ar saviem kalpiem, kas viņa namā bija dzimuši, trīssimt un astoņpadsmit, un dzinās tiem pakaļ līdz Danam.
15 १५ त्याने रात्री त्याचे लोक त्यांच्याविरुद्ध विभागले आणि त्यांच्यावर हल्ला केला आणि दिमिष्काच्या डावीकडे होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला.
Un viņš dalījās un uzbruka tiem naktī, viņš un viņa kalpi, un tos sakāva un dzinās tiem pakaļ līdz Hobai, kas Damaskum pa kreiso roku,
16 १६ अब्रामाने सगळी मालमत्ता आणि त्याचा नातेवाइक लोट आणि त्याच्या वस्तू, त्याचप्रमाणे स्त्रिया आणि इतर लोक यांना परत आणले.
Un atveda atpakaļ visu mantu, un arī Latu, savu brāli, un viņa mantu viņš atveda atpakaļ, ir tās sievas un tos ļaudis.
17 १७ मग कदार्लागोमर व त्याच्याबरोबरचे राजे यांचा पराभव केल्यावर अब्राम परत आला तेव्हा सदोमाचा राजा शावेच्या खोऱ्यात त्यास भेटायला बाहेर आला. या खोऱ्याला राजाचे खोरे असे म्हणतात.
Un kad viņš atpakaļ nāca no kaušanās ar Kedorlaomeru un ar tiem ķēniņiem, kas pie tā bija, tad Sodomas ķēniņš izgāja viņam pretī līdz Šaves ielejai, - tā ir tā ķēniņa ieleja.
18 १८ देवाचा याजक असलेला शालेमाचा राजा मलकीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला. हा परात्पर देवाचा याजक होता.
Un Melhizedeks, Salemes ķēniņš, iznesa maizi un vīnu, un tas bija priesteris Dievam tam visu augstajam.
19 १९ त्याने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले, “अब्रामा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता परात्पर देव तुला आशीर्वाद देवो.
Un tas viņu svētīja un sacīja: svētīts lai ir Ābrams no tā visu augstā Dieva, kam pieder zeme un debess.
20 २० परात्पर देव ज्याने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले तो धन्यवादित असो.” तेव्हा अब्रामाने त्यास सर्वाचा दहावा भाग दिला.
Un svētīts lai ir tas visu augstais Dievs, kas tavus ienaidniekus nodevis tavā rokā. Un Ābrams tam deva desmito tiesu no visām lietām.
21 २१ सदोमाचा राजा अब्रामास म्हणाला, “मला फक्त माझे लोक द्या आणि तुमच्यासाठी वस्तू घ्या.”
Un Sodomas ķēniņš sacīja uz Ābramu: dod man tos ļaudis, un to mantu ņem sev.
22 २२ अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “आकाश व पृथ्वीचा उत्पन्नकर्ता परमेश्वर परात्पर देव याच्यासमोर आपला हात उंचावून मी वचन देतो की,
Un Ābrams sacīja uz Sodomas ķēniņu: es savu roku paceļu uz To Kungu, to visaugsto Dievu, kam debess un zeme pieder, -
23 २३ तुझा दोरा, चपलेचा बंध, किंवा जे तुझे आहे त्यातून मी काहीच घेणार नाही, नाहीतर तू म्हणशील, ‘अब्रामाला मी धनवान केले.’
Nevienu pavedienu, nedz kurpes siksnu, nedz citu ko es neņemšu no visa tā, kas tev pieder, lai tu nesaki: es Ābramu esmu darījis bagātu.
24 २४ माझ्या या तरुणांनी जे अन्न खाल्ले आहे तेवढे पुरे. आनेर, अष्कोल व मम्रे हे जे पुरुष माझ्याबरोबर गेले त्यांना आपापला वाटा घेऊ द्या.”
Tik vien to, ko tie jaunekļi apēduši, un to vīru daļu, kas man gājuši līdz, Aners, Eškols un Mamre, tie lai ņem savu daļu.