< उत्पत्ति 14 >

1 त्यानंतर शिनाराचा राजा अम्राफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचा राजा कदार्लागोमर आणि गोयिमाचा राजा तिदाल यांच्या दिवसात असे झाले की,
And it chaunsed within a while that Amraphel kynge of Synear Arioch kynge of Ellasar Kedorlaomer kynge of Elam and Thydeall kynge of the nations:
2 त्यांनी सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिर्शा, अदमाचा राजा शिनाब, सबोयिमाचा राजा शमेबर आणि बेला ज्याला सोअर म्हणतात त्याच्या राजांशी युद्ध केले.
made warre wyth Bera kynge of Sodoh and with Birsa kynge of Gomorra. And wythe Sineab kynge of Adama and with Semeaber kynge of Zeboim and wyth the kynge of Bela Which Bela is called Zoar.
3 नंतर हे पाच राजे सिद्दीम खोऱ्यात एकत्र जमले. या खोऱ्याला क्षार समुद्र असेही म्हणतात.
All these came together vnto the vale of siddim which is now the salt see
4 त्यांनी बारा वर्षे कदार्लागोमरची सेवा केली होती, परंतु तेराव्या वर्षी त्यांनी त्याच्या विरूद्ध बंड केले.
Twelve yere were they subiecte to kinge kedorlaomer and in the. xiij. yere rebelled.
5 त्यानंतर चौदाव्या वर्षी कदार्लागोमर व त्याच्या बरोबरचे राजे आले आणि त्यांनी अष्टरोथ-कर्णईम येथे रेफाईम लोकांस, हाम येथे जूजीम लोकांस, शावेह किर्याथाईम येथे एमीम या लोकांस मारले.
Therfore in the. xiiij. yere came kedorlaomer and the kynges that were wyth hym and smote the Raphayms in Astarath Karnaim and the Susims in Hain ad the Emyms in Sabe Kariathaim
6 आणि होरी यांना त्यांच्या सेईर डोंगराळ प्रदेशात जे एल पारान रान आहे तेथपर्यंत त्यांनी जाऊन मारले.
and the Hozyms in their awne mounte Seir vnto the playne of Pharan which bordreth vpon the wyldernesse.
7 नंतर ते मागे फिरून एन-मिशपात म्हणजे कादेश येथे आले. आणि त्यांनी सर्व अमालेकी देशाचा आणि तसेच हससोन-तामार येथे राहणाऱ्या अमोरी लोकांचाही पराभव केला.
And then turned they and came to the well of iugmente which is Cades and smote all the contre of the Amalechites and also the amorytes that dwell in Hazezon Thamar.
8 नंतर सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाचा राजा, सबोयिमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा ह्यांनी लढाईची तयारी केली.
Than went out the kynge of Sodome and the kynge of Gomorra and the kinge of Adama and the kynge of Zeboijm and the kynge of Bela now called Zoar. And sette their men in aray to fyghte wyth them in the vale of siddim that is to say
9 एलामाचा राजा कदार्लागोमर, गोयिमाचा राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एल्लासाराचा राजा अर्योक यांच्या विरूद्ध ते लढले. हे चार राजे पाच राजांविरूद्ध लढले.
wyth kedorlaomer the kynge of Elam and with Thydeall kynge of the Nations and wyth Amraphel kynge of Synear. And with Arioch kynge of Ellasar: foure kynges agenste v.
10 १० सिद्दीम खोऱ्यात पूर्ण डांबराने भरलेले खड्डे होते आणि सदोम व गमोराचे राजे पळून जाताना त्यामध्ये पडले, जे राहिले ते डोंगराकडे पळून गेले.
And that vale of siddim was full of slyme pyttes. And the kynges of Sodome and Gomorra fled and fell there. And the resydue fled to the mountaynes.
11 ११ अशा रीतीने शत्रूंनी सदोम व गमोरा नगराच्या सर्व वस्तू आणि त्यांचा सर्व अन्नसाठा लुटून घेऊन माघारी गेले.
And they toke all the goodes of Sodome and Gomorra and all their vitalles ad went their waye.
12 १२ ते गेले तेव्हा त्यांनी अब्रामाच्या भावाचा मुलगा लोट जो सदोमात राहत होता, त्यालासुद्धा त्याच्या सर्व मालमत्तेसह नेले.
And they toke Lot also Abrams brothers sonne and his good (for he dwelled at Sodome) and departed:
13 १३ तेथून पळून आलेल्या एकाने अब्राम इब्रीला हे सांगितले. तो तर अष्कोल व आनेर ह्यांचा भाऊ मम्रे अमोरी याच्या एलोन झाडांजवळ राहत होता आणि ते सर्व अब्रामाचे सहकारी होते.
Than came one that had escaped and tolde Abram the hebrue which dwelled in the okegrove of Mamre the Amoryte brother of Eschol and Aner: which were confederate wyth Abram.
14 १४ जेव्हा अब्रामाने ऐकले की, त्याच्या नातेवाइकांना शत्रूंनी पकडून नेले आहे तेव्हा त्याने आपल्या घरी जन्मलेली, लढाईचे शिक्षण घेतलेली तीनशे अठरा माणसे घेऊन सरळ दान नगरापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला.
When Abram herde that his brother was taken he harnessed his seruantes borne in his owne house. iij. hundred and. xviij. ad folowed tyll they came at Dan.
15 १५ त्याने रात्री त्याचे लोक त्यांच्याविरुद्ध विभागले आणि त्यांच्यावर हल्ला केला आणि दिमिष्काच्या डावीकडे होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला.
And sette hymselfe ad his seruantes in aray and fell vpon them by nyght and smote them and chased them awaye vnto Hoba: which lyeth on the lefte hande of Damascos
16 १६ अब्रामाने सगळी मालमत्ता आणि त्याचा नातेवाइक लोट आणि त्याच्या वस्तू, त्याचप्रमाणे स्त्रिया आणि इतर लोक यांना परत आणले.
and broughte agayne all the goodes and also his brother Lot ad his goodes the weme also and the people.
17 १७ मग कदार्लागोमर व त्याच्याबरोबरचे राजे यांचा पराभव केल्यावर अब्राम परत आला तेव्हा सदोमाचा राजा शावेच्या खोऱ्यात त्यास भेटायला बाहेर आला. या खोऱ्याला राजाचे खोरे असे म्हणतात.
And as he retourned agayne from the slaughter of kedorlaomer and of the kynges that were with hym than came the kynge of Sodome agaynst hym vnto the vale of Saue which now is called kynges dale.
18 १८ देवाचा याजक असलेला शालेमाचा राजा मलकीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला. हा परात्पर देवाचा याजक होता.
Than Melchisedech kinge of Salem brought forth breed and wyne. And he beynge the prest of the most hyghest God
19 १९ त्याने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले, “अब्रामा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता परात्पर देव तुला आशीर्वाद देवो.
blessed hym saynge. Blessed be Abram vnto the most hyghest God possessor of heauen and erth.
20 २० परात्पर देव ज्याने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले तो धन्यवादित असो.” तेव्हा अब्रामाने त्यास सर्वाचा दहावा भाग दिला.
And blessed be God the most hyghest which hath delyvered thyne enimies in to thy handes. And Abra gaue hym tythes of all.
21 २१ सदोमाचा राजा अब्रामास म्हणाला, “मला फक्त माझे लोक द्या आणि तुमच्यासाठी वस्तू घ्या.”
Than sayd the kynge of Sodome vnto Abram: gyue me the soulles and take the goodes to thy selfe.
22 २२ अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “आकाश व पृथ्वीचा उत्पन्नकर्ता परमेश्वर परात्पर देव याच्यासमोर आपला हात उंचावून मी वचन देतो की,
And Abram answered the kynge of Sodome: I lyfte vpp my hande vnto the LORde God most hygh possessor of heaven ad erth
23 २३ तुझा दोरा, चपलेचा बंध, किंवा जे तुझे आहे त्यातून मी काहीच घेणार नाही, नाहीतर तू म्हणशील, ‘अब्रामाला मी धनवान केले.’
that I will not take of all yt is thyne so moch as a thred or a shoulacher lest thou shuldest saye I haue made Abra ryche.
24 २४ माझ्या या तरुणांनी जे अन्न खाल्ले आहे तेवढे पुरे. आनेर, अष्कोल व मम्रे हे जे पुरुष माझ्याबरोबर गेले त्यांना आपापला वाटा घेऊ द्या.”
Saue only that which the yonge men haue eaten ad the partes of the men which went wyth me. Aner Escholl and Mamre. Let them take their partes.

< उत्पत्ति 14 >