< उत्पत्ति 11 >

1 आता पृथ्वीवरील सर्व लोक एकच भाषेचा वापर करत होते आणि शब्द समान होते.
و تمام جهان را یک زبان و یک لغت بود.۱
2 ते पूर्वेकडे प्रवास करत असताना त्यांना शिनार देशात एक मैदान लागले आणि त्यांनी तेथेच वस्ती केली.
و واقع شد که چون از مشرق کوچ می‌کردند، همواری‌ای در زمین شنعار یافتند و درآنجا سکنی گرفتند.۲
3 ते एकमेकांना म्हणाले, “चला, आपण विटा करू व त्या पक्क्या भाजू.” त्यांच्याकडे बांधकामासाठी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर होते.
و به یکدیگر گفتند: «بیایید، خشتها بسازیم و آنها را خوب بپزیم.» و ایشان راآجر به‌جای سنگ بود، و قیر به‌جای گچ.۳
4 मग लोक म्हणाले, “चला, आपण आपल्यासाठी नगर बांधू आणि ज्याचे शिखर आकाशापर्यंत पोहचेल असा उंच बुरूज बांधू, आणि आपण आपले नाव होईल असे करू या. आपण जर असे केले नाही, तर पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होईल.”
وگفتند: «بیایید شهری برای خود بنا نهیم، و برجی را که سرش به آسمان برسد، تا نامی برای خویشتن پیدا کنیم، مبادا بر روی تمام زمین پراکنده شویم.»۴
5 आदामाच्या वंशजांनी बांधलेले ते नगर व तो बुरूज पाहण्यासाठी म्हणून परमेश्वर खाली उतरून आला.
و خداوند نزول نمود تا شهر وبرجی را که بنی آدم بنا می‌کردند، ملاحظه نماید.۵
6 परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, हे सर्व लोक एक असून, एकच भाषा बोलतात आणि ही तर त्यांची सुरुवात आहे! लवकरच, जे काही करण्याचा त्यांचा हेतू आहे ते करणे त्यांना मुळीच अशक्य होणार नाही.
و خداوند گفت: «همانا قوم یکی است و جمیع ایشان را یک زبان و این کار را شروع کرده‌اند، والان هیچ کاری که قصد آن بکنند، از ایشان ممتنع نخواهد شد.۶
7 चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करून टाकू. मग त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.”
اکنون نازل شویم و زبان ایشان رادر آنجا مشوش سازیم تا سخن یکدیگر رانفهمند.»۷
8 मग परमेश्वराने पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली आणि म्हणून नगर बांधण्याचे काम त्यांनी थांबवले.
پس خداوند ایشان را از آنجا بر روی تمام زمین پراکنده ساخت و از بنای شهر بازماندند.۸
9 त्यामुळे त्या ठिकाणाचे नाव बाबेल पडले, कारण तेथे परमेश्वराने सर्व पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा केला आणि परमेश्वराने त्यांना तेथून सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले.
از آن سبب آنجا را بابل نامیدند، زیرا که در آنجا خداوند لغت تمامی اهل جهان رامشوش ساخت. و خداوند ایشان را از آنجا برروی تمام زمین پراکنده نمود.۹
10 १० ही शेमाची वंशावळ: जलप्रलयानंतर दोन वर्षांनी शेम शंभर वर्षांचा झाला होता आणि तो अर्पक्षदाचा पिता झाला.
این است پیدایش سام. چون سام صد ساله بود، ارفکشاد را دو سال بعد از طوفان آورد.۱۰
11 ११ अर्पक्षदाला जन्म दिल्यानंतर शेम पाचशे वर्षे जगला, तो आणखी मुले व मुलींचा पिता झाला.
وسام بعد از آوردن ارفکشاد، پانصد سال زندگانی کرد و پسران و دختران آورد.۱۱
12 १२ अर्पक्षद पस्तीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने शेलहाला जन्म दिला.
و ارفکشاد سی وپنج سال بزیست و شالح را آورد.۱۲
13 १३ शेलहाला जन्म दिल्यानंतर अर्पक्षद चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
و ارفکشادبعد از آوردن شالح، چهار صد و سه سال زندگانی کرد و پسران و دختران آورد.۱۳
14 १४ जेव्हा शेलह तीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने एबरला जन्म दिला;
و شالح سی سال بزیست، و عابر را آورد.۱۴
15 १५ एबरला जन्म दिल्यावर शेलह चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
و شالح بعد از آوردن عابر، چهارصد و سه سال زندگانی کرد و پسران ودختران آورد.۱۵
16 १६ एबर चौतीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पेलेगाला जन्म दिला.
و عابر سی و چهار سال بزیست و فالج را آورد.۱۶
17 १७ पेलेग झाल्यावर एबर चारशे तीस वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
و عابر بعد از آوردن فالج، چهار صد و سی سال زندگانی کرد و پسران ودختران آورد.۱۷
18 १८ पेलेग तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने रऊ याला जन्म दिला.
و فالج سی سال بزیست، و رعورا آورد.۱۸
19 १९ रऊ याला जन्म दिल्यावर पेलेग दोनशे नऊ वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
و فالج بعد از آوردن رعو، دویست ونه سال زندگانی کرد و پسران و دختران آورد.۱۹
20 २० रऊ बत्तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने सरुगाला जन्म दिला.
ورعو سی و دو سال بزیست، و سروج را آورد.۲۰
21 २१ सरुगाला जन्म दिल्यावर रऊ दोनशे सात वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
ورعو بعد از آوردن سروج، دویست و هفت سال زندگانی کرد و پسران و دختران آورد.۲۱
22 २२ सरुग तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने नाहोराला जन्म दिला.
وسروج سی سال بزیست، و ناحور را آورد.۲۲
23 २३ नाहोराला जन्म दिल्यावर सरुग दोनशे वर्षे जगला आणि त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
وسروج بعد از آوردن ناحور، دویست سال بزیست و پسران و دختران آورد.۲۳
24 २४ नाहोर एकोणतीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने तेरहाला जन्म दिला.
و ناحور بیست و نه سال بزیست، و تارح را آورد.۲۴
25 २५ तेरहाला जन्म दिल्यावर नाहोर आणखी एकशे एकोणीस वर्षे जगला आणि त्याने मुलांना व मुलींना जन्म दिला.
و ناحور بعد ازآوردن تارح، صد و نوزده سال زندگانی کرد وپسران و دختران آورد.۲۵
26 २६ तेरह सत्तर वर्षांचा झाला, तेव्हा त्याने अब्राम, नाहोर व हारान यांना जन्म दिला.
و تارح هفتاد سال بزیست، و ابرام و ناحور و هاران را آورد.۲۶
27 २७ तेरहाची वंशावळ ही: तेरहाने अब्राम, नाहोर व हारान यांना जन्म दिला. हारानाने लोटाला जन्म दिला.
و این است پیدایش تارح که تارح، ابرام وناحور و هاران را آورد، و هاران، لوط را آورد.۲۷
28 २८ हारान, आपला पिता तेरह जिवंत असताना आपली जन्मभूमी खास्द्यांचे ऊर येथे मरण पावला.
وهاران پیش پدر خود، تارح در زادبوم خویش دراور کلدانیان بمرد.۲۸
29 २९ अब्राम व नाहोर या दोघांनीही लग्न केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय आणि नाहोरच्या पत्नीचे नाव मिल्का होते. मिल्का ही हारानाची मुलगी होती. हा हारान मिल्का व इस्का यांचा पिता होता.
و ابرام و ناحور زنان برای خود گرفتند. زن ابرام را سارای نام بود. و زن ناحور را ملکه نام بود، دختر هاران، پدر ملکه وپدر یسکه.۲۹
30 ३० साराय वांझ होती, तिला मूलबाळ नव्हते.
اما سارای نازاد مانده، ولدی نیاورد.۳۰
31 ३१ मग तेरह आपले कुटुंब घेऊन म्हणजे आपला मुलगा अब्राम, हारानचा मुलगा लोट, आणि आपली सून म्हणजे अब्रामाची पत्नी साराय यांना बरोबर घेऊन खास्द्यांचे ऊर येथून कनान देशास जाण्यासाठी निघाला आणि प्रवास करीत ते हारान प्रदेशापर्यंत येऊन तेथे राहिले.
پس تارح پسر خود ابرام، و نواده خودلوط، پسر هاران، و عروس خود سارای، زوجه پسرش ابرام را برداشته، با ایشان از اور کلدانیان بیرون شدند تا به ارض کنعان بروند، و به حران رسیده، در آنجا توقف نمودند.۳۱
32 ३२ तेरह दोनशे पाच वर्षे जगला; त्यानंतर तो हारान येथे मरण पावला.
و مدت زندگانی تارح، دویست و پنج سال بود، و تارح درحران مرد.۳۲

< उत्पत्ति 11 >