< उत्पत्ति 11 >
1 १ आता पृथ्वीवरील सर्व लोक एकच भाषेचा वापर करत होते आणि शब्द समान होते.
At first, all the people in [MTY] the world spoke the same language [DOU].
2 २ ते पूर्वेकडे प्रवास करत असताना त्यांना शिनार देशात एक मैदान लागले आणि त्यांनी तेथेच वस्ती केली.
As people moved further east, they arrived at a plain in Babylonia region and began to live there.
3 ३ ते एकमेकांना म्हणाले, “चला, आपण विटा करू व त्या पक्क्या भाजू.” त्यांच्याकडे बांधकामासाठी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर होते.
Then they said to each other, “(Hey/Come on), let’s form bricks and bake them to make them hard, for building!” So they used bricks instead of stones, and used tar instead of (mortar/a mixture of cement, sand and lime) to hold them together.
4 ४ मग लोक म्हणाले, “चला, आपण आपल्यासाठी नगर बांधू आणि ज्याचे शिखर आकाशापर्यंत पोहचेल असा उंच बुरूज बांधू, आणि आपण आपले नाव होईल असे करू या. आपण जर असे केले नाही, तर पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होईल.”
They said, “Hey, let’s build a city for ourselves! We also ought to build a very high tower that reaches up to the sky! In that way we will become famous! If we do not do this, we will be scattered all over the earth!”
5 ५ आदामाच्या वंशजांनी बांधलेले ते नगर व तो बुरूज पाहण्यासाठी म्हणून परमेश्वर खाली उतरून आला.
So they began to build the city and the tower. Then Yahweh looked down and saw the city and the tower that those [puny] men were building.
6 ६ परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, हे सर्व लोक एक असून, एकच भाषा बोलतात आणि ही तर त्यांची सुरुवात आहे! लवकरच, जे काही करण्याचा त्यांचा हेतू आहे ते करणे त्यांना मुळीच अशक्य होणार नाही.
Yahweh said, “These people are one group that all speak the same language. If they have begun to do this now, then (there is nothing that they will decide to do that will be impossible for them/they will be able to do whatever they decide to do) [LIT]!
7 ७ चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करून टाकू. मग त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.”
So, okay/now, we will go down there and cause there to be many different languages, so that they will not be able to understand each other.”
8 ८ मग परमेश्वराने पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली आणि म्हणून नगर बांधण्याचे काम त्यांनी थांबवले.
So Yahweh did that. As a result, the people stopped building the city, and Yahweh caused them to disperse all over the earth.
9 ९ त्यामुळे त्या ठिकाणाचे नाव बाबेल पडले, कारण तेथे परमेश्वराने सर्व पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा केला आणि परमेश्वराने त्यांना तेथून सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले.
The city was called Babel which means ‘confusion’, because there Yahweh caused the people to become confused because the people [MTY] spoke [different languages that the others could not understand], not just one language. From there Yahweh caused them to disperse all over the earth.
10 १० ही शेमाची वंशावळ: जलप्रलयानंतर दोन वर्षांनी शेम शंभर वर्षांचा झाला होता आणि तो अर्पक्षदाचा पिता झाला.
(This is a bigger list/I will now tell you more) of the descendants of Shem: Two years after the flood, when Shem was 100 years old, he became the father of Arpachshad.
11 ११ अर्पक्षदाला जन्म दिल्यानंतर शेम पाचशे वर्षे जगला, तो आणखी मुले व मुलींचा पिता झाला.
After Arpachshad was born, Shem lived 500 more years and had more sons and daughters.
12 १२ अर्पक्षद पस्तीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने शेलहाला जन्म दिला.
When Arphachshad was 35 years old, he became the father of Shelah.
13 १३ शेलहाला जन्म दिल्यानंतर अर्पक्षद चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
After Shelah was born, Arpachshad lived 403 more years and became the father of more sons and daughters.
14 १४ जेव्हा शेलह तीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने एबरला जन्म दिला;
When Shelah was 30 years old, he became the father of Eber.
15 १५ एबरला जन्म दिल्यावर शेलह चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
After Eber was born, Shelah lived 403 more years and became the father of other sons and daughters.
16 १६ एबर चौतीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पेलेगाला जन्म दिला.
When Eber was 34 years old, he became the father of Peleg.
17 १७ पेलेग झाल्यावर एबर चारशे तीस वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
After Peleg was born, Eber lived 430 more years and became the father of other sons and daughters.
18 १८ पेलेग तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने रऊ याला जन्म दिला.
When Peleg was 30 years old, he became the father of Reu.
19 १९ रऊ याला जन्म दिल्यावर पेलेग दोनशे नऊ वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
After Reu was born, Peleg lived 209 more years and became the father of other sons and daughters.
20 २० रऊ बत्तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने सरुगाला जन्म दिला.
When Reu was 32 years old, he became the father of Serug.
21 २१ सरुगाला जन्म दिल्यावर रऊ दोनशे सात वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
After Serug was born, Reu lived 207 more years and became the father of other sons and daughters.
22 २२ सरुग तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने नाहोराला जन्म दिला.
When Serug was 30 years old, he became the father of Nahor.
23 २३ नाहोराला जन्म दिल्यावर सरुग दोनशे वर्षे जगला आणि त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
After Nahor was born, Serug lived 200 more years and became the father of other sons and daughters.
24 २४ नाहोर एकोणतीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने तेरहाला जन्म दिला.
When Nahor was 29 years old, he became the father of Terah.
25 २५ तेरहाला जन्म दिल्यावर नाहोर आणखी एकशे एकोणीस वर्षे जगला आणि त्याने मुलांना व मुलींना जन्म दिला.
After Terah was born, Nahor lived 119 more years and became the father of other sons and daughters.
26 २६ तेरह सत्तर वर्षांचा झाला, तेव्हा त्याने अब्राम, नाहोर व हारान यांना जन्म दिला.
When Terah was 70 years old, his son Abram was born. Later, two other sons, Nahor and Haran were born.
27 २७ तेरहाची वंशावळ ही: तेरहाने अब्राम, नाहोर व हारान यांना जन्म दिला. हारानाने लोटाला जन्म दिला.
(This is/I will now give) a list of the descendants of Terah: Terah’s sons were Abram, Nahor, and Haran. Haran’s son was named Lot.
28 २८ हारान, आपला पिता तेरह जिवंत असताना आपली जन्मभूमी खास्द्यांचे ऊर येथे मरण पावला.
Haran died before his father died. He died in Ur [city] in Chaldea land, where he was born.
29 २९ अब्राम व नाहोर या दोघांनीही लग्न केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय आणि नाहोरच्या पत्नीचे नाव मिल्का होते. मिल्का ही हारानाची मुलगी होती. हा हारान मिल्का व इस्का यांचा पिता होता.
Abram and Nahor both married. Abram’s wife was named Sarai, and Nahor’s wife was named Milcah. Milcah and her younger sister Iscah were the daughters of Haran.
30 ३० साराय वांझ होती, तिला मूलबाळ नव्हते.
Sarai was unable to bear any children.
31 ३१ मग तेरह आपले कुटुंब घेऊन म्हणजे आपला मुलगा अब्राम, हारानचा मुलगा लोट, आणि आपली सून म्हणजे अब्रामाची पत्नी साराय यांना बरोबर घेऊन खास्द्यांचे ऊर येथून कनान देशास जाण्यासाठी निघाला आणि प्रवास करीत ते हारान प्रदेशापर्यंत येऊन तेथे राहिले.
Terah decided to leave Ur and go to live in Canaan land. So he took his son Abram and his grandson Lot, the son of Haran, and Abram’s wife Sarai with him. But instead of going to Canaan, they stopped at Haran [town] and lived there.
32 ३२ तेरह दोनशे पाच वर्षे जगला; त्यानंतर तो हारान येथे मरण पावला.
When Terah was 205 years old, he died there in Haran.