< गलती 4 >
1 १ आता मी म्हणतो की, वारीस लहान बाळ आहे, तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व दासामध्ये काही फरक नसतो.
我說那承受產業的,雖然是全業的主人,但為孩童的時候卻與奴僕毫無分別,
2 २ पण पित्याने ठरवलेल्या मुदतीपर्यंत तो शिक्षकांच्या व कारभाऱ्याच्या स्वाधीन असतो.
乃在師傅和管家的手下,直等他父親預定的時候來到。
3 ३ अशाप्रकारे आपणदेखील बाळ असताना, आपण जगाच्या प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो.
我們為孩童的時候,受管於世俗小學之下,也是如此。
4 ४ पण काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मास आला, नियमशास्त्राधीन असा जन्मास आला,
及至時候滿足,上帝就差遣他的兒子,為女子所生,且生在律法以下,
5 ५ ह्यात उद्देश हा होता की, नियमशास्त्राखाली असलेल्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे; म्हणजे आपल्याला पुत्र होण्याचा हक्क मिळावा.
要把律法以下的人贖出來,叫我們得着兒子的名分。
6 ६ आणि तुम्ही पुत्र आहात म्हणून, देवाने अब्बा-पिता, अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्याआमच्या अंतःकरणात पाठवले आहे;
你們既為兒子,上帝就差他兒子的靈進入你們的心,呼叫:「阿爸!父!」
7 ७ म्हणून तू आतापासून दास नाही तर पुत्र आहेस; आणि पुत्र आहेस, तर देवाच्याद्वारे वारीसही आहेस.
可見,從此以後,你不是奴僕,乃是兒子了;既是兒子,就靠着上帝為後嗣。
8 ८ तथापि पूर्वी तुम्ही देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा, जे स्वभावतः देव नाहीत त्यांचे दास होता;
但從前你們不認識上帝的時候,是給那些本來不是神的作奴僕;
9 ९ पण आता तुम्ही देवाला ओळखीत असताना किंवा देव तुम्हास ओळखीत असताना तुम्ही त्या दुर्बळ व निःसत्व प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे परत जाता? आणि पुन्हा त्यांच्या दास्यात राहण्याची इच्छा करता?
現在你們既然認識上帝,更可說是被上帝所認識的,怎麼還要歸回那懦弱無用的小學,情願再給他作奴僕呢?
10 १० तुम्ही दिवस, महिने, ऋतू आणि वर्षे पाळता.
你們謹守日子、月份、節期、年份,
11 ११ तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील, अशी मला तुमच्याविषयी भीती वाटते.
我為你們害怕,惟恐我在你們身上是枉費了工夫。
12 १२ बंधूंनो, मी तुम्हास विनवणी करतो की, तुम्ही माझ्यासारखे व्हा, कारण मीही तुमच्यासारखा होतो. तुम्ही माझे काहीच वाईट केले नाही.
弟兄們,我勸你們要像我一樣,因為我也像你們一樣。你們一點沒有虧負我。
13 १३ प्रथम तुम्हास शुभवर्तमान सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरीक व्याधीमुळे मिळाला हे तुम्हास माहित आहे.
你們知道我頭一次傳福音給你們,是因為身體有疾病。
14 १४ आणि माझ्या देहाच्या अशक्तपणात तुमची परीक्षा होत असता, तुम्ही तिरस्कार केला नाही पण माझा देवाच्या दूतासारखा, ख्रिस्त येशूसारखा स्वीकार केला.
你們為我身體的緣故受試煉,沒有輕看我,也沒有厭棄我,反倒接待我,如同上帝的使者,如同基督耶穌。
15 १५ तर तेव्हाचा तुमचा तो आशीर्वाद कोठे आहे? कारण, मी तुमच्याविषयी साक्ष देतो की, शक्य असते तर तुम्ही मला तुमचे स्वतःचे डोळे काढून दिले असते.
你們當日所誇的福氣在哪裏呢?那時你們若能行,就是把自己的眼睛剜出來給我,也都情願。這是我可以給你們作見證的。
16 १६ मग मी तुम्हास खरे सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय?
如今我將真理告訴你們,就成了你們的仇敵嗎?
17 १७ ते लोक तुमच्याविषयी आवेशी आहेत तरी चांगल्या प्रकारे नाही पण तुम्ही त्यांच्याविषयी आवेशी असावे म्हणून ते तुम्हास आमच्यापासून वेगळे करू पाहतात.
那些人熱心待你們,卻不是好意,是要離間你們,叫你們熱心待他們。
18 १८ तर चांगल्या कारणांसाठी सर्वदा आवेशी असणे हे चांगले आणि मी तुम्हाजवळ प्रत्यक्ष आहे तेव्हाच मात्र आवेशी असावे असे नाही.
在善事上,常用熱心待人原是好的,卻不單我與你們同在的時候才這樣。
19 १९ माझ्या मुलांनो, तुमच्यात ख्रिस्ताचे रूप निर्माण होईपर्यंत मला तुमच्यासाठी पुन्हा प्रसूती वेदना होत आहेत.
我小子啊,我為你們再受生產之苦,直等到基督成形在你們心裏。
20 २० ह्यावेळी मी तुमच्याबरोबर हजर असतो आणि आवाज चढवून बोलता आले असते तर मला बरे वाटले असते कारण तुमच्याविषयी मी संशयात आहे.
我巴不得現今在你們那裏,改換口氣,因我為你們心裏作難。
21 २१ जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हावयास पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय? हे मला सांगा.
你們這願意在律法以下的人,請告訴我,你們豈沒有聽見律法嗎?
22 २२ कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन पुत्र होतेः एक दासीपासून व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला.
因為律法上記着,亞伯拉罕有兩個兒子,一個是使女生的,一個是自主之婦人生的。
23 २३ पण दासीपासून झालेला देहस्वभावानुसार जन्माला आला होता; तर स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला.
然而,那使女所生的是按着血氣生的;那自主之婦人所生的是憑着應許生的。
24 २४ या गोष्टी दृष्टांतरूपाने समजावल्या जावू शकतात. त्या स्त्रिया दोन करारासारख्या आहेत एक सीनाय पर्वतावरून केलेला व दास्यासाठी मुलांना जन्म देणारा करार म्हणजे हागार होय.
這都是比方:那兩個婦人就是兩約。一約是出於西奈山,生子為奴,乃是夏甲。
25 २५ कारण ही हागार अरबस्तानातील सीनाय पर्वत आहे आणि ती आत्ताच्या यरूशलेमेच्या जोडीची आहे. आपल्या मुलांबाळांसह दास्यात आहे.
這夏甲二字是指着阿拉伯的西奈山,與現在的耶路撒冷同類,因耶路撒冷和她的兒女都是為奴的。
26 २६ नवीन वरील यरूशलेम स्वतंत्र आहे; ही आपल्या सर्वांची आई आहे.
但那在上的耶路撒冷是自主的,她是我們的母。
27 २७ पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, “अगे वंध्ये, तुला मूल होत नसले तरी, तू आनंदित हो! ज्या तुला प्रसूतिवेदना होत नाही, ती तू आनंदाने जयघोष कर! आनंदाची आरोळी मार! कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा, आशा सोडलेल्या स्त्रीची मुले अधिक आहेत.”
因為經上記着: 不懷孕、不生養的,你要歡樂; 未曾經過產難的,你要高聲歡呼; 因為沒有丈夫的,比有丈夫的兒女更多。
28 २८ आता बंधूनो, इसहाकासारखे तुम्ही अभिवचनाची संतती आहात.
弟兄們,我們是憑着應許作兒女,如同以撒一樣。
29 २९ परंतु त्यावेळेस देहस्वभावानुसार जो जन्मला होता, त्याने जो आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला, तसा आताही होत आहे.
當時,那按着血氣生的逼迫了那按着聖靈生的,現在也是這樣。
30 ३० पण शास्त्रलेख काय सांगतो? ‘तू त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे; कारण दासीचा मुलगा स्वतंत्र स्त्रीच्या मुलाबरोबर वारीस होणारच नाही.’
然而經上是怎麼說的呢?是說:「把使女和她兒子趕出去!因為使女的兒子不可與自主婦人的兒子一同承受產業。」
31 ३१ तर मग, बंधूंनो, आपण दासीची मुले नाही, पण स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.
弟兄們,這樣看來,我們不是使女的兒女,乃是自主婦人的兒女了。