< गलती 3 >
1 १ अहो बुद्धीहीन गलतीकरांनो, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्हास कोणी भुलविले आहे?
Galates insensés, qui vous a ensorcelés pour que vous n'obéissiez pas à la vérité, et sous les yeux desquels Jésus-Christ a été ouvertement présenté au milieu de vous comme crucifié?
2 २ मला तुम्हापासून इतकेच समजवून घ्यावयाचे आहे की, तुम्हास जो पवित्र आत्मा मिळाला तो नियमशास्त्रातील कृत्यांनी मिळाला की, सुवार्ता ऐकून विश्वास ठेवल्यामुळे मिळाला?
Je veux apprendre ceci de vous: Avez-vous reçu l'Esprit par les œuvres de la loi, ou par l'audition de la foi?
3 ३ तुम्ही इतके बुद्धीहीन आहात काय? तुम्ही देवाच्या आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देहस्वभावाने पूर्णत्व मिळवू पाहत आहात काय?
Êtes-vous si insensés? Après avoir commencé dans l'Esprit, êtes-vous maintenant achevés dans la chair?
4 ४ तुम्ही इतके दुःखे सोसली हे व्यर्थ काय? ह्याला व्यर्थ म्हणावे काय!
Avez-vous souffert tant de choses en vain, si c'est en vain?
5 ५ म्हणून जो तुम्हास देवाचा आत्मा पुरवतो आणि तुमच्यात चमत्कार करतो तो हे जे सर्व करतो ते नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो की, सुवार्ता ऐकून विश्वास ठेवल्यामुळे ते तो करतो?
Celui donc qui vous fournit l'Esprit et qui fait des miracles au milieu de vous, le fait-il par les œuvres de la loi, ou par l'audition de la foi?
6 ६ ज्याप्रमाणे अब्राहामानेही देवावर विश्वास ठेवला व ते त्यास नीतिमत्त्व असे गणण्यात आले. तसे हे झाले.
De même, Abraham « crut à Dieu, et cela lui fut compté pour justice ».
7 ७ ह्यावरून तुम्ही समजून घ्या की, जे विश्वास ठेवतात तेच अब्राहामाचे वंशज आहेत.
Sachez donc que ceux qui ont la foi sont enfants d'Abraham.
8 ८ आणि देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने, अब्राहामाला पूर्वीच शुभवर्तमान सांगितले की, ‘तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल.’
L'Écriture, prévoyant que Dieu justifierait les païens par la foi, a annoncé d'avance la Bonne Nouvelle à Abraham, en disant: « En toi toutes les nations seront bénies. »
9 ९ तर मग जे विश्वास ठेवतात त्यांना विश्वासू अब्राहामाबरोबर आशीर्वाद दिला गेला आहे.
Ainsi donc, ceux qui ont la foi sont bénis avec le fidèle Abraham.
10 १० कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके शापाच्या अधीन आहे कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व पाळण्यास जो टिकून राहत नाही तो शापित आहे.’
Car tous ceux qui pratiquent les œuvres de la loi sont sous la malédiction. Car il est écrit: « Maudit est quiconque ne met pas en pratique tout ce qui est écrit dans le livre de la loi. »
11 ११ नियमशास्त्राने कोणीही देवासमोर नीतिमान ठरत नाही, हे उघड आहे; कारण ‘नीतिमान विश्वासाने जगेल.’
Or, il est évident que nul n'est justifié devant Dieu par la loi, car il est écrit: « Le juste vivra par la foi. »
12 १२ आणि नियमशास्त्र तर विश्वासाचे नाही पण ‘जो त्यातील कृत्ये आचरतो तो त्यांच्यायोगे जगेल.’
La loi n'est pas de la foi, mais: « L'homme qui les met en pratique vivra par elles. »
13 १३ आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले; असा शास्त्रलेख आहे ‘जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे’, असा शास्त्रलेख आहे.
Le Christ nous a rachetés de la malédiction de la loi, étant devenu malédiction pour nous. Car il est écrit: « Maudit est quiconque est pendu à un arbre »,
14 १४ ह्यात उद्देश हा की, अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या द्वारे परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपल्या विश्वासाद्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे.
afin que la bénédiction d'Abraham vienne sur les païens par Jésus-Christ, pour que nous recevions par la foi la promesse de l'Esprit.
15 १५ आणि बंधूंनो, मी हे व्यावहारिक दृष्टीने बोलतो. एखाद्या मनुष्याचा करारदेखील तो स्थापित केला गेल्यानंतर कोणी रद्द करीत नाही किंवा त्यामध्ये भर घालीत नाही.
Frères, en termes humains, bien qu'il ne s'agisse que d'une alliance d'homme, quand elle a été confirmée, personne ne l'annule ni n'y ajoute.
16 १६ आता, जी वचने अब्राहामाला व त्याच्या संतानाला दिली होती. तो ‘संतानांना’ असे अनेकाविषयी म्हणत नाही, पण ‘तुझ्या संतानाला’ असे एकाविषयी म्हणतो आणि तो एक ख्रिस्त आहे.
Or les promesses ont été faites à Abraham et à sa descendance. Il ne dit pas: « A une descendance", comme à plusieurs, mais comme à un seul: « A ta descendance », qui est le Christ.
17 १७ आणि, मी हे म्हणतो की, देवाने तो करार आधीच स्थापल्यावर चारशेतीस वर्षांनंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द करू होत नाही.
Or je dis ceci: Une alliance confirmée d'avance par Dieu en Christ, la loi, qui est venue quatre cent trente ans après, ne l'annule pas, au point de rendre la promesse sans effet.
18 १८ कारण वतन जर नियमशास्त्राने प्राप्त होते, तर ते ह्यापुढे अभिवचनाने होणार नाही; परंतु अब्राहामाला देवाने ते कृपेने अभिवचनाद्वारे दिले.
Car si l'héritage vient de la loi, il ne vient plus de la promesse; mais Dieu l'a accordé à Abraham par promesse.
19 १९ तर मग नियमशास्त्र कशाला? कारण, ज्या संतानास वचन दिले होते त्याचे येणे होईपर्यंत ते उल्लंघनामुळे नियमशास्त्र देण्यात आले; ते मध्यस्थाच्या हाती देवदूतांच्याद्वारे नेमून आले.
Alors pourquoi la loi existe-t-elle? Elle a été ajoutée à cause des transgressions, jusqu'à ce que vienne la descendance à laquelle la promesse a été faite. Elle a été ordonnée par des anges, par la main d'un médiateur.
20 २० मध्यस्थ हा एकपेक्षा अधिकांसाठी असतो; तरीही देव तर एकच आहे.
Or, il n'y a pas de médiateur entre les uns et les autres, mais Dieu est unique.
21 २१ तर काय नियमशास्त्र हे देवाच्या वचनाविरुद्ध आहे? कधीच नाही कारण जीवन देण्यास समर्थ असलेले नियमशास्त्र देण्यात आले असते तर, नीतिमत्त्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते.
La loi est-elle donc contre les promesses de Dieu? Certainement pas! Car s'il avait été donné une loi qui pût faire vivre, très certainement la justice aurait été de la loi.
22 २२ तरी त्याऐवजी, नियमशास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले, या उद्देशासाठी की, विश्वास ठेवणार्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे.
Mais l'Écriture a emprisonné toutes choses sous le péché, afin que la promesse par la foi en Jésus-Christ soit accordée à ceux qui croient.
23 २३ परंतु ख्रिस्तात विश्वास आला त्यापुर्वी, हा जो विश्वास प्रकट होणार होता, तो येण्याअगोदर आपण बंदिवान असता आपल्याला नियमशास्त्राखाली असे रखवालीत ठेवले होते.
Mais avant que la foi ne vienne, nous étions gardés sous la loi, enfermés pour la foi qui devait être révélée ensuite.
24 २४ ह्यांवरून आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचवणारे बालरक्षक होते.
De sorte que la loi est devenue notre précepteur pour nous amener au Christ, afin que nous soyons justifiés par la foi.
25 २५ पण आता, विश्वासाचे येणे झाले आहे म्हणून आपण ह्यापुढे बालरक्षकाच्या अधीन राहिलो नाही.
Mais maintenant que la foi est venue, nous ne sommes plus sous un tuteur.
26 २६ पण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्याद्वारे देवाचे पुत्र आहात.
Car vous êtes tous enfants de Dieu, par la foi en Jésus-Christ.
27 २७ कारण ख्रिस्तात तुम्हामधील जितक्यांचा बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे.
Car tous ceux d'entre vous qui ont été baptisés dans le Christ ont revêtu le Christ.
28 २८ यहूदी किंवा ग्रीक, दास किंवा स्वतंत्र नाही, पुरूष किंवा स्त्री हा भेदच नाही कारण ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही सर्वजण एकच आहात.
Il n'y a plus ni Juif ni Grec, il n'y a plus ni esclave ni homme libre, il n'y a plus ni homme ni femme, car vous êtes tous un en Jésus-Christ.
29 २९ आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहा; तर तुम्ही अब्राहामाचे संतान आणि अभिवचनाप्रमाणे वारीस आहात.
Si vous appartenez au Christ, vous êtes donc la postérité d'Abraham et les héritiers selon la promesse.