< एज्रा 9 >
1 १ या सर्व गोष्टी झाल्यावर अधिकारी माझ्याकडे येऊन म्हणाले, “इस्राएल लोक, याजक आणि लेवी हे इतर देशाच्या लोकांपासून वेगळे राहत नसून व ते कनानी, हित्ती, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मवाबी, मिसरी आणि अमोरी यांच्याप्रमाणेच घृणास्पद कृत्ये करतात.
जब यी कुराहरू भए तब अधिकारीहरू मकहाँ आए र भने, “इस्राएलका मानिसहरू, पुजारीहरू र लेवीहरूले अन्य देशमा बस्ने जातिहरू अर्थात् कनानी, हित्ती, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मोआबी, मिश्री र एमोरीहरू अनि तिनीहरूका घिनलाग्दा कुराहरूदेखि आफैलाई अलग गरेका छैनन् ।
2 २ कारण त्यांनी आपणाला व आपल्या मुलांना त्यांच्या काही स्त्रिया करून घेतल्या आहेत आणि पवित्र लोक इतर देशाच्या लोकांबरोबर मिसळून गेले आहेत. आणि अधिकारी व नेते हेच प्रथम यामध्ये अप्रामाणिक आहेत.”
किनकि तिनीहरूले उनीहरूका केही छोराछोरीसित विहेवा गरेका छन् र अरू देशका जातिहरूसित पवित्र जातिलाई मिसाएका छन्, अनि अधिकारीहरू र अगुवाहरूले नै पहिले यस्तो अविश्वासको काम गरेका छन् ।”
3 ३ जेव्हा हे मी ऐकले, मी माझा अंगरखा आणि वस्त्रे फाडली. डोक्यावरचे आणि दाढीचे केस उपटले. नंतर मी शरमेने खाली बसलो.
जब मैले यो सुनें तब मैले मेरो लुगा र खास्टो च्यातें अनि मेरो शिरको कपाल र दाह्री उखेलें र दुःखित भई बसें ।
4 ४ तेव्हा या अविश्वासूपणाविषयी ऐकून जे सर्व इस्राएली लोक देवाच्या वचनाने थरथर कापत होते ते माझ्याभोवती जमले आणि संध्याकाळची अर्पणांची वेळ होईपर्यंत मी तिथे शरमेने खाली बसून राहिलो.
साँझको बलिदान चढाउने समयसम्म नै म बसिरहँदा यस अविश्वासयोग्य कामको बारेमा इस्राएलका परमेश्वरको वचनदेखि डराउने सबै जना मकहाँ भेला भए ।
5 ५ संध्याकाळची अर्पणांची वेळ झाली तेव्हा मी अंगावरची वस्त्रे आणि अंगरखा फाटलेला अशा अपमानीत स्थितीत मी गुडघे टेकून व माझा देव परमेश्वर याच्यापुढे हात पसरुन बसलो.
तर साँझको बलिदानको समयमा आफ्नो च्यातिएकै लुगा र खास्टोमा विनम्र भएकै अवस्थामा म उठें, र घुँडा टेकें अनि परमप्रभु मेरा परमेश्वर हुनुभएतिर आफ्ना हात फैलाएँ ।
6 ६ मी म्हणालो, “हे देवा, तुझ्याकडे पाहण्याची मला लाज वाटत आहे; मला लाज वाटते कारण आमच्या पापांची संख्या आमच्या मस्तकावरून गेली आहे; आमचे अपराध वाढून स्वर्गापर्यंत पोहचले आहेत.
मैले भने, “हे मेरा परमेश्वर, मेरो अनुहार तपाईंकहाँ उठाउन म लज्जित र अयोग्य भएको छु, किनकि हाम्रा अपराध हाम्रा शिरमाथि पुगेका छन्, र हाम्रा दोष स्वर्गसम्मै पुगेका छन् ।
7 ७ आमच्या वाडवडिलांच्या वेळेपासून आतापर्यंत आम्ही महान पापांचे दोषी आहोत. आमच्या अपराधांमुळे आमचे राजे आणि याजक यांना या जगिक राजाच्या हाती तलवार व बंदीवास, लुटालुट आणि मुखलज्जेला, आज आम्ही जसे आहोत तसे दिलेत.
हाम्रा पुर्खाहरूको समयदेखि अहिलेसम्म हामी ठुलो दोषमा छौं । हाम्रा अपराधहरूको कारणले हामी, हाम्रा राजाहरू, हाम्रा पुजारीहरूलाई यस संसारका राजाहरूका हातमा, तरवारको धारमा, निर्वासनमा, लुट र बेइज्जतको लागि सुम्पिदियो जस्तो आज हामी छौं ।
8 ८ आमच्या देवाने आमचे डोळे प्रकाशीत केले आहेत. आमच्या दास्यपणात आम्हास दिलासा दिलास. परमेश्वर आमचा देव याने आम्हावर कृपा केली आहे. तू आमच्यापैकी काहीजणांना वाचवून अवशेष ठेवले आहे. आणि त्याच्या पवित्रस्थानात आमच्या पायांना खुंटीचा आधार दिला आहे.
तरै पनि अब परमप्रभु हाम्रा परमेश्वरले केही जीवित रहेकाहरूलाई हामीकहाँ दिएर र आफ्नो पवित्रस्थानमा सुरक्षित ठाउँ दिएर हामीलाई छोटो समयको लागि भए पनि कृपा देखाउनुभएको छ । हाम्रा आँखा खोल्न र हाम्रो दासत्वमा हामीलाई थोरै राहत दिन परमेश्वरले यसो गर्नुभयो ।
9 ९ आम्ही गुलामच आहोत. तरी आमचा देव आम्हास विसरला नाही. पण त्याने आमच्यावर कराराप्रमाणे विश्वास योग्यता दाखवली. आमच्या देवाचे उद्ध्वस्त झालेले मंदिर पुन्हा बांधण्यास त्यांना नवीन शक्ती दिली यासाठी पारसाच्या राजाची आमच्यावर कृपा होईल असे केलेस. यहूदा आणि यरूशलेमेच्या संरक्षणासाठी भिंत बांधावी म्हणून तू साह्यकारी झालास.
हामी दासहरू हौं, तर हाम्रा परमेश्वरले हामीलाई बिर्सनुभएको छैन, तर हामीसम्म करारको विश्वासनीयता फैलाउनुभएको छ । हामीले हाम्रा परमेश्वरको मन्दिर पुनर्निर्माण गर्न सकौं र यसका भग्नावशेषहरूलाई उठाउन सकौं भनेर हामीलाई नयाँ शक्ति प्रदान गर्न उहाँले फारसका राजाको दृष्टिमा यसो गर्नुभएको छ । उहाँले हामीलाई यहूदा र यरूशलेममा सुरक्षाको पर्खाल दिनलाई उहाँले यसो गर्नुभयो ।
10 १० परंतु आमच्या देवा, आता यानंतर आम्ही काय बोलावे? कारण आम्ही तुझ्या आज्ञा विसरून गेलो आहोत.
तर अब हे हाम्रा परमेश्वर, यसपछि हामी के भन्न सक्छौं र? हामीले तपाईंका आज्ञाहरू भुलेका छौं ।
11 ११ त्या आज्ञा, तुझे सेवक जे संदेष्टे यांच्यामार्फत तू आम्हास दिल्यास. जेव्हा तू म्हणालास, तुम्ही ज्या देशात प्रवेश करून ताब्यात घेण्यास जात आहात तो अशुद्ध देश आहे. तो त्या देशाच्या लोकांच्या अमंगळ कृत्यांनी अशुद्ध झाला आहे. त्यांनी तो देश या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्या अशुद्धतेने भरून टाकला आहे.
ती आज्ञाहरू जुन तपाईंले आफ्ना सेवक अगमवक्ताहरूलाई तपाईंले भनेर दिनुभयो, “तिमीहरू जुन देश अधिकार गर्न लाग्दैछौ, त्यो अशुद्ध देश हो । त्यस देशका जातिहरूका घिनलाग्दा कुराहरूले यो देश दूषित भएको छ । तिनीहरूले यसको एउटा कुनादेखि अर्को कुनासम्म अशुद्धताले भरेका छन् ।
12 १२ त्यामुळे आता तुमच्या मुली त्यांच्या मुलांना देऊ नका. त्यांच्या मुली तुमच्या मुलांना करू नका आणि कधी त्यांची शांती आणि सुस्थिती मिळवण्याचा प्रयत्न करू नका यासाठी की, तुम्ही बलशाली होऊन त्या देशाचे उत्तम फळ खावे, अशा रीतीने आपल्या मुलांबाळासाठी तो प्रदेश सर्वकाळासाठी ताब्यात घ्यावा.
त्यसैले अब आफ्ना छोरीहरू तिनीहरूका छोराहरूलाई नदिनू । तिनीहरूका छोरीहरू आफ्ना छोराहरूका लागि नलिनू, र तिनीहरूका जारी शान्ति र भलाइको खोजी नगर्नू, जसको कारणले तिमीहरू बलिया हुनेछौ, र त्यस देशका असल थोकहरूको उपभोग गर्नेछौ अनि तिमीहरूले आफ्ना छोराछोरीका लागि सदाको लागि यो देश अधिकार गर्नेछौ ।”
13 १३ आमच्या वाईट कृत्यामुळे आणि महान दोषामुळे हे सर्व आम्हावर आल्यानंतर, हे आमच्या देवा आमच्या अपराधांच्या मानाने तू आम्हास केलेले शासन कमीच आहे आणि तू आम्हास वाचवून अवशेष ठेवले.
तापनि हाम्रो दुष्ट अभ्यास र हाम्रो ठुलो दोषको कारणले हामीमाथि हरेक कुरा आइपरे पनि तपाईं हाम्रा परमेश्वरले हामीलाई हाम्रा अपराधअनुसार कम दण्ड दिनुभएको छ र हामीलाई बाँचेकाहरू छाड्नुभएको छ,
14 १४ आम्ही पुन्हा तुझ्या आज्ञा मोडून अमंगळ लोकांशी सोयरीक करावी काय? काहीही शिल्लक राहणार नाही, कोणीही निसटणार नाही असा आमचा संपूर्ण नाश करीपर्यंत तुझा क्रोध आमच्यावर पेटणार नाही काय?
हामीले फेरि तपाईंका आज्ञाहरू भङ्ग गर्न र यी घिनलाग्दा जातिहरूसित मिश्रित विवाह गर्न हुन्छ र? के तपाईं क्रोधित भएर कोही पनि नरहने गरी हामीलाई निमिट्यान्न पार्नुहुन्न र?
15 १५ हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तू न्यायी आहेस. तू आजच्याप्रमाणे आम्हास वाचवून अवशेष ठेवले आहेस. पाहा, आम्ही इथे तुझ्यापुढे आमच्या अपराधामुळे आहोत, यामुळे तुझ्यापुढे कोणालाहि उभे राहता येत नाही.”
हे इस्राएलका परमप्रभु परमेश्वर, तपाईं धर्मी हुनुहुन्छ, किनकि आजको दिनसम्म हामी केही बाँचेकाहरू अझै छौं । हाम्रो दोषको कारणले कोही पनि तपाईंको सामु खडा हुन नसक्ने भए तापनि हामी हाम्रा दोषमा तपाईंको सामु छौं ।