< एज्रा 8 >
1 १ आणि बाबेलहून माझ्याबरोबर अर्तहशश्त राजाच्या कारकीर्दीत पूर्वजांच्या घराण्याचे प्रमुख त्यांची नावे ही आहेत.
2 २ फिनहासाच्या वंशातला गर्षोम, इथामारच्या वंशातला दानीएल, दावीदाच्या वंशातला हट्टूश,
3 ३ शखन्याच्या वंशातील परोशाच्या वंशातला जखऱ्या, आणि त्याच्याबरोबर पुरुषातले एकशे पन्नास.
4 ४ पहथ-मवाबाच्या वंशातला जरह्या याचा मुलगा एल्यहोवेनय आणि त्याच्याबरोबरचे दोनशे पुरुष,
5 ५ शखन्याच्या वंशतला यहजोएलचा मुलगा आणि त्याच्याबरोबर तीनशे पुरुष,
6 ६ आदीनच्या वंशतला योनाथानाचा मुलगा एबद आणि त्याच्याबरोबचे पन्नास पुरुष,
7 ७ एलामाच्या वंशातला अथल्याचा मुलगा यशाया आणि त्याच्याबरोबरचे सत्तर पुरुष.
8 ८ शफाट्याच्या वंशातला मीखाएलचा मुलगा जबद्या आणि त्याच्याबरोबरचे ऐंशी पुरुष,
9 ९ यवाबाच्या वंशातील यहीएलचा मुलगा ओबद्या आणि त्याच्याबरोबर दोनशे अठरा पुरुष,
10 १० बानीच्या वंशातला योसिफ्याचा मुलगा शलोमिथ आणि त्याच्याबरोबरचे एकशे साठ पुरुष,
11 ११ बेबाईच्या वंशातील बेबाईचा मुलगा जखऱ्या आणि त्याच्याबरोबरचे अठ्ठावीस पुरुष.
12 १२ अजगादच्या वंशातला हक्काटानाचा मुलगा योहानान आणि त्याच्याबरोबरचे एकशेदहा पुरुष,
13 १३ अदोनीकामच्या वंशातले शेवटचे म्हणजे अलीफलेट, येऊएल, शमाया आणि त्यांच्याबरोबरचे साठ पुरुष,
14 १४ आणि बिग्वईच्या वंशातले उथई, जब्बूद त्यांच्याबरोबरचे सत्तर पुरुष.
15 १५ मी त्यांना अहवाकडे वाहणाऱ्या कालव्याजवळ जमवले. त्याठिकाणी आमचा तीन दिवस मुक्काम होता. तेथे मी लोकांची व याजकांची तपासणी केली पण तेथे लेवीचे कोणीही वंशज सापडले नाहीत.
16 १६ तेव्हा, अलियेजर, अरीएल, शमाया, एलनाथान, यारीब, एलनाथान, नाथान, जखऱ्या, आणि मशुल्लाम या प्रमुखांना आणि योयारीब व एलनाथान या शिक्षकांना मी निरोप पाठवून बोलवून आणले.
17 १७ कासिफ्याचा मुख्य इद्दो याच्याकडे मी त्यांना पाठवले. त्यास आणि त्याच्या नातलगांना काय सांगायचे हे मी त्यांना सांगितले. जे मंदिरात सेवाचाकरी करणारे कासिफ्यात राहत होते त्यांनी देवाच्या घरात सेवाचाकरी करण्यासाठी आमच्याकडे माणसे पाठवावीत.
18 १८ देवाचा आमच्यावर चांगला हाथ असल्यामुळे इद्दोच्या नातलगांनी आमच्याकडे इस्राएलाचा मुलगा लेवी याचा मुलगा महली याच्या वंशातला एक शहाणा मनुष्य आणला, आणि शेरेब्याचे पुत्र आणि त्याचे भाऊ असे एकंदर अठराजण आले.
19 १९ मरारी वंशातील हशब्या आणि यशाया आणि त्यांचे भाऊ व त्यांचे मुले असे एकंदर वीस जण आणले.
20 २० शिवाय त्यांनी मंदिरातल्या सेवा चाकरीसाठी दोनशे वीस जणांना पाठवले. या लोकांच्या पूर्वजांना दावीदाने आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी लेवीचे मदतनीस म्हणून निवडले होते. त्या सर्वांची नावे यादीत लिहिलेली होती.
21 २१ तिथे अहवा कालव्याजवळ मी सर्वांनी उपवास करावा अशी घोषणा केली. देवापुढे नम्र व्हावे आणि आमची मुलेबाळे, साधनसंपत्ती यांच्यासह आमचा पुढचा प्रवास सुखरुप व्हावा.
22 २२ प्रवासातल्या सुरक्षिततेसाठी राजाकडे सैनिक आणि घोडेस्वार मागायचा मला संकोच वाटला. कारण आम्ही राजा अर्तहशश्तला म्हणालो होतो, “जो देवावर विश्वास ठेवतो त्याची देव पाठराखण करतो. पण देवाकडे पाठ फिरवली तर देवाचा कोप होतो.”
23 २३ म्हणून आम्ही उपवास आणि देवाची प्रार्थना केली. देवाने आमचा धावा ऐकला.
24 २४ तेव्हा मी याजकांमध्ये जे प्रमुख होते अशा बारा जणांची निवड केली. मी शेरेब्या, हशब्या आणि त्यांचे आणखी दहा भाऊ यांची निवड केली.
25 २५ मंदिरासाठी देण्यात आलेले सोने, चांदी आणि इतर वस्तू देवाच्या घरासाठी जे अर्पण राजा अर्तहशश्त, त्याचे मंत्री, प्रमुख अधिकारी, आणि इस्राएल लोकांनी स्वखुशीने अर्पिले होते ते तोलून दिले.
26 २६ मी त्यांच्याकडे सहाशे किक्कार चांदी, शंभर किक्कार चांदीची तबके, शंभर किक्कार सोने.
27 २७ शिवाय एक हजार दारिकांचे सोन्याच्या वीस वाट्या व चांगली चकचकीत पितळेची सोन्याएवढी मोलवान दोन पात्रे ही तोलून दिली.
28 २८ मग मी त्यांना म्हणालो, “तुम्ही तसेच या वस्तू देखील परमेश्वर देवाच्या दृष्टीने पवित्र आहेत. लोकांनी हे सोने व चांदी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यासाठी स्वखुशीचे अर्पण आहे.
29 २९ या गोष्टी यरूशलेममधील परमेश्वराच्या मंदिराच्या प्रमुखांच्या हवाली करेपर्यंत त्यांची जबाबदारी तुमच्यावरच आहे. तुम्ही या वस्तू मुख्य लेवी आणि इस्राएलाच्या वडिलांच्या घराण्यांच्या हाती सोपवा. त्यांचे वजन करून त्या गोष्टी यरूशलेमेमधील मंदिराच्या खोल्यांमध्ये ठेवतील.”
30 ३० यावर, एज्राने वजन करून दिलेल्या खास भेटवस्तू आणि सोने व चांदी याजकांनी व लेवींनी ताब्यात घेतल्या. यरूशलेमेमधील देवाच्या घरात त्यांना घेऊन जाण्यास सांगण्यात आले.
31 ३१ पहिल्या महिन्याच्या बाराव्या दिवशी आम्ही अहवा कालव्यापासून यरूशलेमेला जायला निघालो. देवाची आमच्यावर कृपा असल्यामुळे त्याने वैरी आणि वाटमारे यांच्यापासून आमचे संरक्षण केले.
32 ३२ आम्ही यरूशलेमेला पोहचलो. तेथे तीन दिवस विश्रांती घेतली.
33 ३३ चौथ्या दिवशी देवाच्या मंदिरात ते सोने, चांदी व इतर वस्तू वजन करून उरीया याजकाचा मुलगा मरेमोथ यांच्याकडे देण्यात आल्या. तेव्हा फिनहासचा मुलगा एलाजार तसेच येशूवाचा मुलगा योजाबाद आणि बिन्नुईचा मुलगा नोअद्या हे लेवी, एवढे जण मरेमोथ बरोबर होते.
34 ३४ आम्ही प्रत्येक गोष्टीची मोजणी, वजन केले आणि एकंदर वजनाची नोंद केली.
35 ३५ त्यानंतर बंदिवासातून परत आलेल्या यहूद्यांनी इस्राएलाच्या देवाला होमार्पणे वाहिली. सर्व इस्राएलाकरीता बारा बैल, शहाण्णव मेंढे, सत्याहत्तर नर कोकरे, पापार्पणासाठी बारा बोकड एवढे सगळे त्यांनी परमेश्वरास होमार्पण केले.
36 ३६ मग या लोकांनी राजाने दिलेला आदेश राजाच्या अधिकाऱ्यांना तसेच नदीच्या अलीकडे भागावरच्या अधिकाऱ्यांना दिले. तेव्हा या सर्व अधिकाऱ्यांनी इस्राएल लोकांस आणि देवाच्या घराला सहाय्य केले.