< एज्रा 7 >
1 १ यानंतर, पारसाचा राजा अर्तहशश्त याच्या कारकीर्दीत, एज्रा, जो सरायाचा मुलगा, अजऱ्याचा मुलगा, हिल्कीयाचा मुलगा,
इन बातों के बाद शाह — ए — फ़ारस अरतख़शशता के दौर — ए — हुकूमत में एज्रा बिन सिरायाह बिन अज़रियाह बिन ख़िलक़ियाह
2 २ जो शल्लूमचा मुलगा, जो सादोकाचा मुलगा, जो अहीटूबचा मुलगा,
बिन सलूम बिन सदूक़ बिन अख़ीतोब,
3 ३ जो अमऱ्याचा मुलगा, जो अजऱ्याचा मुलगा आणि जो मरायोथचा मुलगा,
बिन अमरियाह बिन 'अज़रियाह बिन मिरायोत
4 ४ जो जरह्याचा मुलगा, जो उज्जीचा मुलगा, आणि जो बुक्कीचा मुलगा
बिन ज़राख़ियाह बिन 'उज़्ज़ी बिन बुक़्क़ी
5 ५ जो अबीशूवाचा मुलगा, जो फिनहासचा मुलगा आणि जो एलाजाराचा मुलगा, जो प्रमुख याजक अहरोन याचा मुलगा.
बिन अबीसू'आ बिन फ़ीन्हास बिन इली'एलियाज़र बिन हारून सरदार काहिन।
6 ६ हाच एज्रा बाबेलाहून गेला. परमेश्वर इस्राएलचा देव याने जे मोशेचे नियमशास्त्र दिले होते त्यामध्ये एज्रा निपुण नियमशास्त्र शिक्षक होता. परमेश्वर देवाचा हात त्याच्यावर असल्यामुळे त्याने जे काही मागितले ते सर्व राजाने त्यास दिले.
यही 'एज्रा बाबुल से गया और वह मूसा की शरी'अत में, जिसे ख़ुदावन्द इस्राईल के ख़ुदा ने दिया था, माहिर 'आलिम था; और चूँकि ख़ुदावन्द उसके ख़ुदा का हाथ उस पर था, बादशाह ने उसकी सब दरख़्वास्तें मन्ज़ूर कीं।
7 ७ राजा अर्तहशश्त याच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी, काही इस्राएली लोक आणि याजक, लेवी, गायक, व्दारपाल व ज्यांना मंदिराच्या सेवेसाठी नेमले होते, तेसुध्दा वर यरूशलेमेला गेले.
और बनी — इस्राईल और काहिनों और लावियों और गाने वालों और दरबानों नतीनीम में से कुछ लोग, अरतख़शशता बादशाह के सातवें साल येरूशलेम में आए।
8 ८ राज्याच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षाच्या पाचव्या महिन्यात एज्रा यरूशलेमेत आला.
और वह बादशाह की हुकूमत के सातवें बरस के पाँचवे महीने येरूशलेम में पहुंचा।
9 ९ पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी त्याने बाबेल सोडले. देवाचा चांगला हात त्याच्याबरोबर असल्यामुळे, तो पाचव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी यरूशलेमेला पोहोंचला.
क्यूँकि पहले महीने की पहली तारीख़ को तो बाबुल से चला और पांचवें महीने की पहली तारीख़ को येरूशलेम में आ पहुँचा। क्यूँकि उसके ख़ुदा की शफ़क़त का हाथ उसपर था।
10 १० एज्राने परमेश्वराच्या नियमशास्त्राचे मन: पूर्वक अध्ययन करून त्याचे पालन करण्यास, व इस्राएलांस त्यातील नियम व विधी शिकविण्यात आपले मन लावले.
इसलिए कि 'एज्रा आमादा हो गया था कि ख़ुदावन्द की शरी'अत का तालिब हो, और उस पर 'अमल करे और इस्राईल में आईन और अहकाम की तालीम दे।
11 ११ राजा अर्तहशश्ताने, एज्रा, जो याजक व जो परमेश्वर देवाने इस्राएलांस दिलेल्या नियमशास्त्राचा शिक्षक होता, त्यास दिलेला हा आदेश होय;
और एज्रा काहिन और 'आलिम, या'नी ख़ुदावन्द के इस्राईल को दिए हुए अहकाम और आईन की बातों के 'आलिम को जो ख़त अरतख़शशता बादशाह ने 'इनायत किया, उसकी नक़ल ये है:
12 १२ “स्वर्गातील देवाचा नियमशास्त्राचा शिक्षक व याजक एज्रा यास, राजांचा राजा अर्तहशश्त याजकडून,
“अरतख़शशता शहंशाह की तरफ़ से एज्रा काहिन, या'नी आसमान के ख़ुदा की शरी'अत के 'आलिम — ए — कामिल वग़ैरा वग़ैरा को।
13 १३ मी असा आदेश देत आहे की, माझ्या राज्यातील इस्राएल लोक आणि त्यांचे याजक व लेवी, यांच्यापैकी ज्या कोणाला तुझ्याबरोबर यरूशलेमेला जाण्याची इच्छा असेल, त्याने जावे.
मैं ये फ़रमान जारी करता हूँ कि इस्राईल के जो लोग और उनके काहिन और लावी मेरे मुल्क में हैं, उनमें से जितने अपनी ख़ुशी से येरूशलेम को जाना चाहते हैं तेरे साथ जाएँ।
14 १४ तुजजवळ जे देवाचे नियमशास्त्र आहे त्याप्रमाणे यहूदा आणि यरूशलेम याविषयी तपास करावा म्हणून राजा व त्याचे सात सल्लागार तुला पाठवत आहोत.
चूँकि तू बादशाह और उसके सातों सलाहकारों की तरफ़ से भेजा जाता है, ताकि अपने ख़ुदा की शरी'अत के मुताबिक़ जो तेरे हाथ में है, यहूदाह और येरूशलेम का हाल दरियाफ़्त करे;
15 १५ इस्राएलचा देव ज्याचे घर यरूशलेममध्ये आहे. ज्याला तू सोनेचांदी स्वखुशीने अर्पण केले आहे. ते तू न्यावेस.
और जो चाँदी और सोना बादशाह और उसके सलाहकारों ने इस्राईल के ख़ुदा को, जिसका घर येरूशलेम में है, अपनी ख़ुशी से नज़्र किया है ले जाए;
16 १६ जे लोक तसेच याजक आपल्या देवाचे घर जे यरूशलेमेत आहे त्यासाठी स्वखुशीने अर्पण करीत असतील त्यांच्या स्वखुशीच्या अर्पणाबरोबर जे सोनेचांदी सर्व बाबेल प्रांतात तुला मिळेल ते सर्वही न्यावे.
और जिस क़दर चाँदी सोना बाबुल के सारे सूबे से तुझे मिलेगा, और जो ख़ुशी के हदिये लोग और काहिन अपने ख़ुदा के घर के लिए जो येरूशलेम में है अपनी ख़ुशी से दें उनको ले जाए।
17 १७ या पैशातून तू बैल, मेंढे, कोकरे घे. तसेच त्या सोबतची अन्नार्पणे आणि पेयार्पणेही विकत घे. मग ती यरूशलेमेमधील तुमच्या देवाच्या मंदिरातील वेदीवर अर्पण कर.
इसलिए उस रुपये से बैल और मेंढे और हलवान और उनकी नज़्र की क़ुर्बानियाँ, और उनके तपावन की चीज़ें तू बड़ी कोशिश से ख़रीदना, और उनको अपने ख़ुदा के घर के मज़बह पर जो येरूशलेम में है पेश करना।
18 १८ यातून उरलेल्या त्या सोन्यारुप्याचा वापर तू आणि तुझे भाऊबंद यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे आपल्या देवाला आवडेल तसा करा.
और तुझे और तेरे भाइयों को बाक़ी चाँदी सोने के साथ जो कुछ करना मुनासिब मा'लूम हो, वही अपने ख़ुदा की मर्ज़ी के मुताबिक़ करना।
19 १९ तुमच्या देवाच्या मंदिरातील उपासनेसाठी जी पात्रे दिली आहेत, ती तू यरूशलेमेस त्यापुढे सोपवून दे.
और जो बर्तन तुझे तेरे ख़ुदा के घर की इबादत के लिए सौंपे जाते हैं, उनको येरूशलेम के ख़ुदा के सामने दे देना।
20 २० देवाच्या मंदिरासाठी आणखी कश्याची गरज असेल जे तुला द्यावे लागेल तर ते तू माझ्या खजिन्यातून त्याचा खर्च कर.
और जो कुछ और तेरे ख़ुदा के घर के लिए ज़रूरी हो जो तुझे देना पड़े, उसे शाही ख़ज़ाने से देना।
21 २१ आता, मी, राजा अर्तहशश्त, असा आदेश काढतो की नदीपलीकडच्या सर्व खजिनदारांनी जे काही एज्रा तुम्हाजवळ मागेल ते पूर्ण द्यावे,
और मैं अरतख़शशता बादशाह, ख़ुद दरिया पार के सब ख़ज़ान्चियों को हुक्म करता हूँ, कि जो कुछ एज्रा काहिन, आसमान के ख़ुदा की शरी'अत का 'आलिम, तुम से चाहे वह बिना देर किये किया जाए;
22 २२ एज्राला द्यायच्या गोष्टी पुढीलप्रमाणे: चांदी शंभर किक्कारपर्यंत, गहू शंभर कोरपर्यंत, द्राक्षरस शंभर बथपर्यंत, तेल शंभर बथपर्यंत, अमर्याद मीठ द्यावे.
या'नी सौ क़िन्तार चाँदी, और सौ कुर गेहूँ, और सौ बत मय, और सौ बत तेल तक, और नमक बेअन्दाज़ा।
23 २३ स्वर्गीय देवाचा हा आदेश आहे, हे सर्व स्वर्गातील देवाच्या घरासाठी भक्तीने करावे. देवाचा माझ्यावर व माझ्या मुलांच्या राज्यावर कोप का होऊ द्यावा?
जो कुछ आसमान के ख़ुदा ने हुक्म किया है, इसलिए ठीक वैसा ही आसमान के ख़ुदा के घर के लिए किया जाए; क्यूँकि बादशाह और शाहजादों की ममलुकत पर ग़ज़ब क्यूँ भड़के?
24 २४ आम्ही तुम्हास कळवतो की, मंदिरातील सर्व याजक, लेवी, गायक, द्वारपाल, मंदिरातील नेमलेले सेवेकरी आणि देवाच्या मंदिरातील सेवक यांच्याकडून कोणताही कर, खंडणी, जकात घेऊ नये.
और तुम को हम आगाह करते हैं कि काहिनों और लावियों और गानेवालों और दरबानों और नतीनीम और ख़ुदा के इस घर के ख़ादिमों में से किसी पर ख़िराज, चुंगी या महसूल लगाना जायज़ न होगा।
25 २५ एज्रा देवाने जे ज्ञान तुला दिले त्याच्यायोगे तू शास्ते व धार्मिक आणि न्यायाधीश यांची नेमणूक कर. तुझ्या देवाचे नियम जाणणाऱ्या नदीच्या पलीकडील लोकांचे ते न्यायाधीश होतील. आणि ज्यांना देवाचे नियम माहीत नाहीत अशांना ते शिकवतील.
और ऐ 'अज़्रा, तू अपने ख़ुदा की उस समझ के मुताबिक़ जो तुझ को 'इनायत हुई हाकिमों और क़ाज़ियों को मुक़र्रर कर, ताकि दरिया पार के सब लोगों का जो तेरे ख़ुदा की शरी'अत को जानते हैं इन्साफ़ करें; और तुम उसको जो न जानता हो सिखाओ।
26 २६ जो कोणी तुमच्या देवाच्या आज्ञा किंवा राजाचे आदेश पाळणार नाही त्यास शासन झाले पाहिजे. त्यास मृत्युदंड, हद्दपार, मालमत्तेची जप्ती, कैद करायचे ते त्याने केलेल्या गुन्ह्याच्या स्वरुपावर अवलंबून राहील.”
और जो कोई तेरे ख़ुदा की शरी'अत पर और बादशाह के फ़रमान पर 'अमल न करे, उसको बिना देर किये क़ानूनी सज़ा दी जाए, चाहे मौत या जिलावतनी या माल की ज़ब्ती या क़ैद की।”
27 २७ परमेश्वर आमच्या पूर्वजांचा देव धन्यवादित असो. यरूशलेमेमधील जे देवाचे मंदिर ते शोभिवंत करावे अशी इच्छा देवानेच राजाच्या मनात घातली.
ख़ुदावन्द हमारे बाप — दादा का ख़ुदा मुबारक हो, जिसने ये बात बादशाह के दिल में डाली कि ख़ुदावन्द के घर को जो येरूशलेम में है आरास्ता करे;
28 २८ आणि राजा, त्याचे सल्लागार आणि सर्व पराक्रमी अधिकारी यांची माझ्यावर कृपादृष्टी होईल असे केले आहे आणि परमेश्वर माझा देव याचा हात माझ्यावर होता. मी इस्राएलातील पुढारी माझ्याबरोबर जाण्यासाठी जमवले.
और बादशाह और उसके सलाहकारों के सामने, और बादशाह के सब 'आली क़द्र सरदारों के आगे अपनी रहमत मुझ पर की; और मैंने ख़ुदावन्द अपने ख़ुदा के हाथ से जो मुझ पर था, ताक़त पाई और मैंने इस्राईल में से ख़ास लोगों को इकट्ठा किया कि वह मेरे हमराह चलें।