< एज्रा 6 >

1 तेव्हा राजा दारयावेशाने बाबेलच्या ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध घेण्याचा आदेश दिला.
آنگاه داریوش پادشاه فرمان داد که در کتابخانهٔ بابِل، که اسناد در آنجا نگهداری می‌شد، به تحقیق بپردازند.
2 मेदी प्रांतातील अखमथा राजवाड्यात एक गुंडाळी सापडली. तिच्यावर लिहिले होते.
سرانجام در کاخ اکباتان که در سرزمین مادهاست طوماری پیدا کردند که روی آن چنین نوشته شده بود:
3 “कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यरूशलेममधील मंदिराच्या बाबतीत राजाने असा आदेश दिला की, जेथे यज्ञ अर्पण करीत त्याठिकाणी देवाचे मंदिर बांधावे. ‘मंदिराचा पाया बांधून काढावा. त्याच्या भिंतीची उंची साठ हात आणि रुंदी साठ हात असावी.
«در سال اول سلطنت کوروش پادشاه، در مورد خانۀ خدا در اورشلیم، این فرمان از طرف پادشاه صادر شد: خانهٔ خدا که محل تقدیم قربانیهاست، دوباره ساخته شود. عرض و بلندی خانه، هر یک شصت ذراع باشد.
4 मोठ्या दगडांचे तीन थर आणि मोठ्या लाकडाचा एक थर असावा. त्याचा खर्च राजाच्या घरातून केला जावा.
دیوار آن از سه ردیف سنگ بزرگ و یک ردیف چوب روی آن، ساخته شود. تمام هزینه آن از خزانهٔ پادشاه پرداخت شود.
5 देवाच्या घरातील सोन्यारुप्याची पात्रे जी नबुखद्नेस्सराने यरूशलेमेच्या मंदिरातून काढून बाबेलला आणली आहेत ती परत करावी. ती तू यरूशलेमास पाठवावी आणि देवाच्या घरात जमा करावी.’
ظروف طلا و نقره‌ای که نِبوکَدنِصَّر از خانهٔ خدا گرفته و به بابِل آورده بود، دوباره به اورشلیم بازگردانیده و مثل سابق، در خانۀ خدا گذاشته شود.
6 आता नदीपलीकडील ततनइ, शथर-बोजनइ आणि तुमचे साथीदार अधिकारी जे नदीपलीकडे आहा ते तुम्ही तेथून दूर व्हा.
پس داریوش پادشاه این فرمان را صادر کرد: «پس اکنون ای تَتِنایی استاندار، شِتَربوزِنای و سایر مقامات غرب رود فرات که همدستان ایشانید، از آنجا دور شوید.
7 देवाच्या घराचे काम चालू द्या. यहूदी अधिकारी आणि यहूदी वडीलांनी हे देवाचे मंदिर त्याच्या जागी पुन्हा बांधावे.
بگذارید خانهٔ خدا دوباره در جای سابقش ساخته شود و مزاحم فرماندار یهودا و سران قوم یهود که دست اندر کار ساختن خانهٔ خدا هستند، نشوید.
8 आता माझा आदेश असा आहे. देवाचे मंदिर बांधण्यासाठी यहूदी वडीलजनांसाठी पूर्ण खर्च राजाच्या निधीतून नदीच्या पलीकडील येणाऱ्या खंडणीतून त्या मनुष्यांना देण्यासाठी वापरावा. यासाठी की, त्यांनी त्यांचे काम थांबवू नये.
بلکه برای پیشرفت کار بی‌درنگ تمام مخارج ساختمانی را از خزانهٔ سلطنتی، از مالیاتی که در طرف غرب رود فرات جمع‌آوری می‌شود، بپردازید.
9 स्वर्गातील देवाच्या होमार्पणासाठी त्या लोकांस जे काही लागेल ते बैल, मेंढे, कोकरे आणि यरूशलेमेमधील याजकांना मागतील तितके गहू, मीठ, द्राक्षरस तेल या वस्तू त्यांना रोजच्या रोज न चुकता द्या.
هر روز، طبق درخواست کاهنانی که در اورشلیم هستند به ایشان گندم، شراب، نمک، روغن زیتون و نیز گاو و قوچ و بره بدهید تا قربانیهایی که مورد پسند خدای آسمانی است، تقدیم نمایند و برای سلامتی پادشاه و پسرانش دعا کنند.
10 १० हे करा यासाठी की, त्यांनी स्वर्गातील देवाला अर्पण आणावे आणि राजासाठी, माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना करावी.
11 ११ मी तुम्हास आज्ञा करतो की, जो कोणी माझ्या आज्ञेचे उल्लंघन करील त्याच्या घराचे लाकूड काढून त्याच्यावर त्यास टांगावे. त्या अपराधामुळे त्याचे घर कचऱ्याचा ढिग करावा.
هر که این فرمان مرا تغییر دهد، چوبه داری از تیرهای سقف خانه‌اش درست شود و بر آن به دار کشیده شود و خانه‌اش به زباله‌دان تبدیل گردد.
12 १२ यरूशलेमेतील देवाच्या या मंदिराचा नाश करण्यास किंवा उल्लंघन करणारा जो कोणी राजा असो किंवा लोक आपले हात लावतील त्यांचा नाश जो देव तेथे राहतो तो करील. मी दारयावेश हा हुकूम करीत आहे. तो पूर्णपणे पाळावा.”
هر پادشاه و هر قومی که این فرمان را تغییر دهد و خانهٔ خدا را خراب کند، آن خدایی که شهر اورشلیم را برای محل خانهٔ خود انتخاب کرده است، او را از بین ببرد. من، داریوش پادشاه، این فرمان را صادر کردم، پس بدون تأخیر اجرا شود.
13 १३ नदीच्या पलीकडील अधिकारी ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांचे सोबती यांनी राजा दारयावेशाच्या आदेशाच्या प्रत्येक गोष्टीचे पालन केले.
تَتِنایی استاندار، شِتَربوزِنای و همدستانش فوری فرمان پادشاه را اجرا کردند.»
14 १४ यहूद्यांचे वडील बांधणीचे काम करीत राहिले. हाग्गय हा संदेष्टा आणि इद्दोचा मुलगा जखऱ्या यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे त्यामध्ये त्यांना यश आले. इस्राएलाच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि पारसाचे राजे कोरेश, दारयावेश व अर्तहशश्त यांच्या आदेशानुसार यांनी मंदिर बांधून पूर्ण केले.
پس سران قوم یهود به بازسازی خانهٔ خدا مشغول شدند و در اثر پیامهای تشویق‌آمیز حَجَّی و زکریای نبی کار را پیش بردند و سرانجام خانهٔ خدا مطابق دستور خدای اسرائیل و فرمان کوروش و داریوش و اردشیر، پادشاهان پارس، ساخته شد.
15 १५ हे मंदिर राजा दारयावेशाच्या कारकिर्दीच्या सहाव्या वर्षी अदार महिन्याच्या तृतीयेला पूर्ण झाले.
به این ترتیب کار بازسازی خانهٔ خدا در روز سوم ماه اَدار از سال ششم سلطنت داریوش پادشاه، تکمیل گردید.
16 १६ इस्राएल लोकांनी, याजक, लेवी, बंदिवासातून आलेले यांनी देवाच्या मंदिराची प्रतिष्ठापना आनंदाने केली.
در این هنگام کاهنان، لاویان و تمام کسانی که از اسیری بازگشته بودند با شادی خانهٔ خدا را تبرک نمودند.
17 १७ प्रतिष्ठापनेच्या वेळी त्यांनी शंभर बैल, दोनशे मेंढे, चारशे कोकरे होमात अर्पण केले. तसेच इस्राएलाच्या पापार्पणासाठी बारा बकरेही अर्पण केले. इस्राएलाच्या बारा घराण्यासाठी प्रत्येकी एक असे ते होते.
برای تبرک خانهٔ خدا، صد گاو، دویست قوچ، و چهارصد بره قربانی شد. دوازده بز نر نیز برای کفارهٔ گناهان دوازده قبیلهٔ اسرائیل قربانی گردید.
18 १८ यरूशलेममधील या मंदिराच्या सेवेसाठी त्यांनी मोशेच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, याजकांची आणि लेव्याची त्यांच्या-त्यांच्या वर्गानुसार योजना केली.
سپس کاهنان و لاویان را سر خدمت خود در خانهٔ خدا در اورشلیم قرار دادند تا طبق دستورهای شریعت موسی به کار مشغول شوند.
19 १९ बंदिवासातून परत आलेल्या लोकांनी पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी वल्हांडण सण पाळला.
یهودیانی که از اسارت بازگشته بودند، در روز چهاردهم ماه اول سال، عید پِسَح را جشن گرفتند.
20 २० वल्हांडण सण साजरा करण्यासाठी याजक आणि लेवी यानी एकचित्ताने स्वत: ला शुद्ध केले. कैदेतून आलेल्या सर्व लोकांसाठी व आपल्यासाठी त्यांनी वल्हांडणाचा कोकरा बली दिला.
تمام کاهنان و لاویان خود را برای این عید تطهیر کردند و لاویان بره‌های عید پِسَح را برای تمام قوم، کاهنان و خودشان ذبح کردند.
21 २१ बंदिवासातून परतून आलेल्या समस्त इस्राएल लोकांनी वल्हांडणाचे भोजन केले. इस्राएलाचा देव परमेश्वर याला शोधायला जे देशातील लोकांच्या अशुद्धतेपासून दूर होऊन त्यांच्याकडे आले होते त्यांनी ते खाल्ले.
پس یهودیانی که از اسارت بازگشته بودند همراه با کسانی که از اعمال قبیح قومهای بت‌پرست دست کشیده بودند تا خداوند، خدای اسرائیل را عبادت کنند، قربانی عید پِسَح را خوردند.
22 २२ बेखमीर भाकरीचा सण त्यांनी उत्साहाने सात दिवस साजरा केला. कारण देवाच्या, इस्राएलाच्या देवाच्या मंदिराच्या कामात त्यांचे हात मजबूत करायला परमेश्वराने अश्शूरच्या राजाचे मन त्यांच्याकडे फिरवून त्यांना आनंदीत केले.
آنها عید نان فطیر را هفت روز با شادی جشن گرفتند، زیرا خداوند، پادشاه آشور را بر آن داشت تا در ساختن خانهٔ خدای حقیقی که خدای اسرائیل باشد، به ایشان کمک کند.

< एज्रा 6 >