< एज्रा 4 >

1 यहूदा आणि बन्यामीन यांचे काही शत्रू होते. त्यांनी ऐकले की, बंदिवासातून आलेले लोक इस्राएलाचा देव परमेश्वर याचे मंदिर बांधत आहेत.
犹大和便雅悯的敌人听说被掳归回的人为耶和华—以色列的 神建造殿宇,
2 तेव्हा ते जरुब्बाबेल आणि घराण्यांचे प्रमुख यांच्याकडे येऊन म्हणाले, “आम्हासही तुम्हासोबत बांधकाम करु द्या. तुमच्याप्रमाणेच आम्हीही तुमच्या देवाला शोधतो. आणि अश्शूरचा राजा एसरहद्दोन याने आम्हास या जागी आणल्यापासून तुमच्या देवासाठी आम्ही अर्पण करीत आलो आहोत.”
就去见所罗巴伯和以色列的族长,对他们说:“请容我们与你们一同建造;因为我们寻求你们的 神,与你们一样。自从亚述王以撒哈顿带我们上这地以来,我们常祭祀 神。”
3 पण जरुब्बाबेल, येशूवा आणि त्यांच्या वडिलांच्या घराण्याचे प्रमुख त्यांना म्हणाले, “तुम्ही नव्हे तर इस्राएलचा देव परमेश्वर याचे मंदिर फक्त आम्हासच बांधायचे आहे. पारसाचा राजा कोरेश याची तशी आज्ञा आहे.”
但所罗巴伯、耶书亚,和其余以色列的族长对他们说:“我们建造 神的殿与你们无干,我们自己为耶和华—以色列的 神协力建造,是照波斯王塞鲁士所吩咐的。”
4 त्या देशाचे लोक यहूदी लोकांचे हात कमजोर करू लागले. ते बांधकामाविषयी यहूदी लोकांस भीती घालू लागले.
那地的民,就在犹大人建造的时候,使他们的手发软,扰乱他们;
5 पारसाच्या कोरेश राजाची सर्व कारकीर्द संपून दारयावेश राजा सत्तेवर येईपर्यंत त्यांची योजना उधळून लावण्यासाठी ते वकीलाला लाचही देत.
从波斯王塞鲁士年间,直到波斯王大流士登基的时候,贿买谋士,要败坏他们的谋算。
6 नंतर अहश्वेरोशाच्या राज्याच्या सुरवातीलाच त्यांनी यहूदा व यरूशलेम यातल्या राहणाऱ्यांविरूद्ध आरोप पत्र लिहून पाठवले.
在亚哈随鲁才登基的时候,上本控告犹大和耶路撒冷的居民。
7 अर्तहशश्ताच्या दिवसात बिश्लाम, मिथ्रदाथ, ताबेल व त्यांचे साथीदार यांनी पारसाच्या राजाला पत्र लिहिले. हे पत्र अरामी लिपीत लिहीले असून व अरामी भाषांतरीत केले होते.
亚达薛西年间,比施兰、米特利达、他别,和他们的同党上本奏告波斯王亚达薛西。本章是用亚兰文字,亚兰方言。
8 यानंतर मुख्य सेनापती रहूम आणि लेखक शिमशय यांनी यरूशलेम येथील लोकांविरूद्ध अर्तहशश्त राजाला लिहीले.
省长利宏、书记伸帅要控告耶路撒冷人,也上本奏告亚达薛西王。
9 मुख्य अधिकारी रहूम, लेखक शिमशय आणि त्यांचे बाकीचे सहभागी दिनाई लोक, टर्पली, अफर्शी, अर्खवी, बाबेली, सुसा येथील एलामी, यांनी एक पत्र लिहिले;
省长利宏、书记伸帅,和同党的底拿人、亚法萨提迦人、他毗拉人、亚法撒人、亚基卫人、巴比伦人、书珊迦人、底亥人、以拦人,
10 १० आणि, जे त्यांना जाऊन मिळाले ज्यांना आसनपर या थोर आणि बलाढ्य राजाने शोमरोनात आणि नदीच्या प्रदेशात आणून वसवलेले होते.
和尊大的亚斯那巴所迁移、安置在撒马利亚城,并大河西一带地方的人等,
11 ११ जे पत्र त्यांनी राजा अर्तहशश्त यास पाठवले त्याची प्रत हीच आहे: “नदीच्या प्रदेशात राहणारे आम्ही तुमचे सेवक:
上奏亚达薛西王说:“河西的臣民云云:
12 १२ राजा अर्तहशश्त यास, आम्ही तुम्हास कळवू इच्छितो की, तुम्ही पाठवून दिलेले यहूदी कैदी येथे यरूशलेमेस आले आहेत. ते बंडखोर नगर बांधत आहे. त्यांनी भिंतीचे काम पूर्ण केले आहे आणि पायाची दुरुस्ती केली आहे.
王该知道,从王那里上到我们这里的犹大人,已经到耶路撒冷重建这反叛恶劣的城,筑立根基,建造城墙。
13 १३ आता राजाला हे समजावे की, जर हे नगर बांधले आणि हे भिंतीचे काम पूर्ण झाले की, ते लोक तुम्हास खंडणी व कर देणार नाहीत, परंतु त्यामुळे राजाची हानी होईल.
如今王该知道,他们若建造这城,城墙完毕就不再与王进贡,交课,纳税,终久王必受亏损。
14 १४ खचित आम्ही राजाचे मीठ खातो. कारण राजाचा कोणताही अपमान झालेला पाहणे आम्हास योग्य वाटत नाही. म्हणून आम्ही तुला कळवीत आहोत.
我们既食御盐,不忍见王吃亏,因此奏告于王。
15 १५ तुझ्या पित्याच्या नोंद-पुस्तकात शोधून पाहा आणि त्यावरुन हे नगर बंडखोर आहे राजांना व प्रांताला उपद्रव करणारे आहे आणि पुरातन काळापासून यामध्ये लोक बंड करीत असत. या कारणासाठी त्या नगराचा नाश करण्यात आला होता.
请王考察先王的实录,必在其上查知这城是反叛的城,与列王和各省有害;自古以来,其中常有悖逆的事,因此这城曾被拆毁。
16 १६ आम्ही राजाला कळवतो की, हे नगर आणि त्यासभोवतालची भिंत बांधून पूर्ण झाली की नदीच्या पलीकडे तुमचे काहीच राहणार नाही.”
我们谨奏王知,这城若再建造,城墙完毕,河西之地王就无分了。”
17 १७ यावर राजाने पुढील उत्तर पाठवले रहूम, शिमशय आणि त्याचे शोमरोनातले साथीदार व नदीच्या पलीकडे राहणारे बाकीचे लोक, “यांना शांती असो.
那时王谕复省长利宏、书记伸帅,和他们的同党,就是住撒马利亚并河西一带地方的人,说:“愿你们平安云云。
18 १८ तुम्ही पाठवलेल्या पत्राचा अनुवाद करून मला वाचून दाखवण्यात आले.
你们所上的本,已经明读在我面前。
19 १९ याकरीता मी चौकशी करण्याचा आदेश दिला आणि तेव्हा असा शोध लागला की, मागील दिवसात राजाच्या विरूद्ध बंड करीत आणि त्यामध्ये बंड व फितुरी केल्याचे प्रकार तेथे सतत घडत आले आहेत.
我已命人考查,得知此城古来果然背叛列王,其中常有反叛悖逆的事。
20 २० यरूशलेमेवर पराक्रमी राजांनी राज्य केले आणि नदीपलीकडच्या सर्व देशावर अधिकार करीत होते. त्या राजांना लोक कर व खंडणी देत असत.
从前耶路撒冷也有大君王统管河西全地,人就给他们进贡,交课,纳税。
21 २१ आता तुम्ही त्या लोकांस काम थांबवण्याचा हुकूम दिला पाहिजे. मी आज्ञा देईपर्यंत या नगराचे बांधकाम होऊ नये.
现在你们要出告示命这些人停工,使这城不得建造,等我降旨。
22 २२ तर हे करण्याची हयगय करू नका म्हणून काळजीपूर्वक राहा. राजाचे नुकसान होईपर्यंत हानी का वाढू द्यावी?”
你们当谨慎,不可迟延,为何容害加重,使王受亏损呢?”
23 २३ मग राजा अर्तहशश्तने पाठवलेले फर्मान रहूम, शिमशय आणि त्यांच्याबरोबरचे लोक यांना वाचून दाखवण्यात आली. त्यांचे साथीदार ताबडतोब यरूशलेममधील यहूद्याकडे गेले आणि त्यांनी सक्तीने बांधकाम थांबवले.
亚达薛西王的上谕读在利宏和书记伸帅,并他们的同党面前,他们就急忙往耶路撒冷去见犹大人,用势力强迫他们停工。
24 २४ त्यामुळे यरूशलेममधील मंदिराचे काम स्थगित झाले. पारसाचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षापर्यंत ते तसेच राहिले.
于是,在耶路撒冷 神殿的工程就停止了,直停到波斯王大流士第二年。

< एज्रा 4 >