< एज्रा 10 >
1 १ एज्रा प्रार्थना करत असतांना आणि पापांची कबुली देत असतांना देवाच्या मंदिरापुढे पडून रडत व आक्रोश करत होता त्यावेळी इस्राएली बायका-पुरुष, मुले यांचा मोठा समुदाय त्याच्या भोवती जमला होता ते लोक मोठ्याने रडत होते
sic ergo orante Ezra et inplorante eo et flente et iacente ante templum Dei collectus est ad eum de Israhel coetus grandis nimis virorum et mulierum puerorumque et flevit populus multo fletu
2 २ त्यावेळी एलाम वंशातल्या यहीएलाचा मुलगा शखन्या एज्राला म्हणाला, “आपण देवाविरूद्ध अपराध केला आहे आणि दुसऱ्या देशातील परक्या स्त्रियांसोबत राहत आहो. तरी आता याविषयी इस्राएलाला अजून आशा आहे.
et respondit Sechenia filius Iehihel de filiis Helam et dixit Ezrae nos praevaricati sumus in Deum nostrum et duximus uxores alienigenas de populis terrae et nunc si est paenitentia Israhel super hoc
3 ३ तर आता, प्रभूच्या मसलतीप्रमाणे आणि आमच्या देवाच्या आज्ञेवरून थरथर कापतात त्यांच्या मताप्रमाणे सर्व त्या स्त्रिया आणि त्यांची संतती यांना देशाबाहेर घालवून देण्याची आपल्या देवाशी करार करावा. हे नियमशास्त्राप्रमाणे करावे.
percutiamus foedus cum Deo nostro ut proiciamus universas uxores et eos qui de his nati sunt iuxta voluntatem Domini et eorum qui timent praeceptum Dei nostri secundum legem fiat
4 ४ आता ऊठ ही तुझी जबाबदारी आहे. आम्ही तुझ्याबरोबर आहोत. धैर्य धर आणि हे कर.”
surge tuum est decernere nosque erimus tecum confortare et fac
5 ५ तेव्हा एज्रा उठला, प्रमुख यजाक, लेवी आणि सर्व इस्राएली लोक यांच्याकडून त्यांनी त्या वचनाप्रमाणे वागावे अशी शपथ घेतली. त्यांनी वचन दिले.
surrexit ergo Ezras et adiuravit principes sacerdotum Levitarum et omnem Israhel ut facerent secundum verbum hoc et iuraverunt
6 ६ मग एज्रा देवाच्या मंदिराच्या समोरच्या भागातून उठून एल्याशीबाचा मुलगा यहोहानान याच्या खोलीत गेला. यहोहानाने एज्रा समोर अन्नपाण्याला स्पर्शही केला नाही. कारण तो बंदीवासातून आलेल्या अविश्वासणाऱ्यासाठी शोक करीत होता.
et surrexit Ezras ante domum Dei et abiit ad cubiculum Iohanan filii Eliasib et ingressus est illuc panem non comedit et aquam non bibit lugebat enim in transgressione eorum qui de captivitate venerant
7 ७ मग त्याने यहूदा आणि यरूशलेमेच्या प्रत्येक ठिकाणी बोलावणे पाठवले. बंदिवासातून आलेल्या समस्त यहूदी लोकांस त्याने यरूशलेमेमध्ये जमायला सांगितले.
et missa est vox in Iuda et in Hierusalem omnibus filiis transmigrationis ut congregarentur in Hierusalem
8 ८ आणि जो कोणी अधिकाऱ्यांच्या आणि वडीलांच्या मसलतीप्रमाणे तीन दिवसाच्या आत यरूशलेमेला येणार नाही त्याची सर्व मालमत्ता जप्त होईल आणि पकडून नेलेल्या अशा मोठ्या मंडळीतून त्या लोकांस हद्दपार करावे.
et omnis qui non venerit in tribus diebus iuxta consilium principum et seniorum auferetur universa substantia eius et ipse abicietur de coetu transmigrationis
9 ९ त्यानुसार यहूदा आणि बन्यामीन यांच्या घराण्यातील सर्व पुरुषमंडळी तीन दिवसाच्या आत यरूशलेमात जमली. तो नवव्या महिन्याचा विसावा दिवस होता. हे सर्व लोक देवाच्या घराच्या चौकातील प्रचंड पाऊसामुळे आणि देवाच्या वचनामुळे थरथर कापत उभे होते.
convenerunt igitur omnes viri Iuda et Beniamin in Hierusalem tribus diebus ipse est mensis nonus vicesimo die mensis et sedit omnis populus in platea domus Dei trementes pro peccato et pluviis
10 १० एज्रा याजक त्यांच्यासमोर उभा राहून म्हणाला, “तुम्ही देवाचे वचन पाळले नाही. परक्या स्त्रियांशी तुम्ही विवाह केलेत. या कृत्यामुळे इस्राएलाच्या अपराधात तुम्ही भर टाकली आहे.
et surrexit Ezras sacerdos et dixit ad eos vos transgressi estis et duxistis uxores alienigenas ut adderetis super delictum Israhel
11 ११ तर आता तुम्ही परमेश्वर आपल्या पूर्वजांचा देव याच्याजवळ पाप कबूल करून त्यास इच्छेप्रमाणे ते करा. देशातल्या लोकांपासून आणि परक्या स्त्रिया यांच्यापासून वेगळे व्हा.”
et nunc date confessionem Domino Deo patrum vestrorum et facite placitum eius et separamini a populis terrae et ab uxoribus alienigenis
12 १२ यावर त्या जमावाने मोठ्या आवाजात उत्तर दिले की, “तू जसे सांगितले तसे आम्ही करू.
et respondit universa multitudo dixitque voce magna iuxta verbum tuum ad nos sic fiat
13 १३ पण आम्ही पुष्कळजण आहोत शिवाय हा पावसाळा आहे त्यामुळे आम्हास बाहेर थांबण्याची शक्ती नाही. हे काम एकदोन दिवसाचे नाही. कारण या प्रकरणात आम्ही मोठ्या प्रमाणात मर्यादेचे उल्लंघन केले आहे.
verumtamen quia populus multus est et tempus pluviae et non sustinemus stare foris et opus non est diei unius vel duorum vehementer quippe peccavimus in sermone isto
14 १४ या समुदायाच्यावतीने आमच्यातूनच काहींना अधिकारी नेमावे. प्रत्येक नगरात ज्यांनी परक्या बायकांशी लग्ने केली आहेत त्यांनी यरूशलेमेला नेमलेल्या वेळी यावे त्या नगरातील न्यायाधीश आणि वडील मंडळी यांनीही त्यांच्याबरोबर यावे. असे झाले की मग देवाचा आमच्यावरचा क्रोध जाईल.”
constituantur principes in universa multitudine et omnes in civitatibus nostris qui duxerunt uxores alienigenas veniant in temporibus statutis et cum his seniores per civitatem et civitatem et iudices eius donec avertatur ira Dei nostri a nobis super peccato hoc
15 १५ असाएलाचा मुलगा योनाथान आणि तिकवाचा मुलगा यहज्या या गोष्टी विरूद्ध उभे राहिले आणि तसेच मशुल्लाम व शब्बथई लेव्यांनी त्यांना पाठिंबा दिला.
igitur Ionathan filius Asahel et Iaazia filius Thecuae steterunt super hoc et Mesollam et Sebethai Levites adiuverunt eos
16 १६ बंदीवासातून आलेल्या लोकांनी हे केले. एज्राने प्रत्येक घराण्यातून एकेका प्रमुख व्यक्तीची नेमणूक केली. त्या प्रत्येकाच्या नावाने निवडले गेली. हे नियुक्त केलेले सर्वजण दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येक प्रकरणाचा बारकाईने विचार करायला बसले
feceruntque sic filii transmigrationis et abierunt Ezras sacerdos et viri principes familiarum in domum patrum suorum et omnes per nomina sua et sederunt in die primo mensis decimi ut quaererent rem
17 १७ आणि पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी मिश्रविवाहांची चौकशी समाप्त झाली.
et consummati sunt omnes viri qui duxerant uxores alienigenas usque ad diem primam mensis primi
18 १८ याजकांच्या ज्या वंशजांनी परकीय स्त्रियांशी विवाह केले त्यांची नावे पुढीलप्रमाणे, योसादाकाचा मुलगा येशूवा याच्या वंशातील आणि त्याच्या भाऊबंदांच्या वंशातील मासेया, अलियेजर, यारीब, गदल्या.
et inventi sunt de filiis sacerdotum qui duxerant uxores alienigenas de filiis Iosue filii Iosedech et fratres eius Maasia et Eliezer et Iarib et Godolia
19 १९ यासर्वांनी आपापल्या बायकांना पाठवून द्यायचे कबूल केले आणि दोषाबद्दल कळपातला एडका अर्पण केला.
et dederunt manus suas ut eicerent uxores suas et pro delicto suo arietem de ovibus offerrent
20 २० इम्मेरच्या वंशातले हनानी व जबद्या,
et de filiis Emmer Anani et Zebedia
21 २१ हारीमच्या वंशातले मासेया, एलीया, शमाया, यहीएल व उज्जीया,
et de filiis Erim Masia et Helia et Semeia et Hiehihel et Ozias
22 २२ पशूहरच्या वंशातले एल्योवेनय, मासेया, इश्माएल, नथनेल, योजाबाद, एलासा.
et de filiis Phessur Helioenai Maasia Ismahel Nathanahel Iozabeth et Elasa
23 २३ लेव्यांपैकी योजाबाद, शिमी, कलाया उर्फ कलीता, पथह्या, यहूदा आणि अलियेजर.
et de filiis Levitarum Iozabeth et Semei et Celaia ipse est Calita Phataia Iuda et Eliezer
24 २४ गायकांपैकी एल्याशीब, द्वारपालांमधले, शल्लूम, तेलेम, ऊरी.
et de cantoribus Eliasub et de ianitoribus Sellum et Telem et Uri
25 २५ इस्राएलामधले परोशाच्या वंशातले रम्या व यिज्जीया, मल्कीया, मियानीन, एलाजार, मल्कीया, बनाया.
et ex Israhel de filiis Pharos Remia et Ezia et Melchia et Miamin et Eliezer et Melchia et Banea
26 २६ एलामच्या वंशातले मत्तन्या, जखऱ्या, यहीएल, अब्दी, यरेमोथ व एलीया,
et de filiis Helam Mathania Zaccharias et Hiehil et Abdi et Irimoth et Helia
27 २७ जत्तूच्या वंशातले एल्योवेनय, एल्याशीब, मत्तन्या, यरेमोथ, जाबाद, अजीजा,
et de filiis Zethua Helioenai Eliasib Mathania et Ierimuth et Zabeth et Aziza
28 २८ बेबाईच्या वंशातील यहोहानान, हनन्या, जब्बइ, अथलइ
et de filiis Bebai Iohanan Anania Zabbai Athalai
29 २९ बानीच्या वंशातील मशुल्लाम, मल्लूख, अदाया, याशूब, शाल आणि रामोथ.
et de filiis Bani Mosollam et Melluch et Adaia Iasub et Saal et Ramoth
30 ३० पहथ-मवाबच्या वंशातील अदना, कलाल, बनाया, मासेया, मत्तन्या, बसालेल, बिन्नुई, मनश्शे,
et de filiis Phaethmoab Edna et Chalal Banaias Maasias Mathanias Beselehel et Bennui et Manasse
31 ३१ आणि हारीमच्या वंशातील अलियेजर, इश्शीया, मल्कीया, शमाया, शिमोन,
et de filiis Erem Eliezer Iesue Melchias Semeias Symeon
32 ३२ बन्यामीन, मल्लूख, शमऱ्या.
Beniamin Maloch Samarias
33 ३३ हाशूमच्या वंशातील मत्तनई, मत्तथा, जाबाद, अलीफलेट, यरेमई, मनश्शे, शिमी,
de filiis Asom Matthanai Matthetha Zabed Elipheleth Iermai Manasse Semei
34 ३४ बानीच्या वंशातले मादइ, अम्राम, ऊएल
de filiis Bani Maaddi Amram et Huhel
35 ३५ बनाया, बेदया, कलूही,
Baneas et Badaias Cheiliau
36 ३६ वन्या, मरेमोथ, एल्याशीब.
Vannia Marimuth et Eliasib
37 ३७ मत्तन्या, मत्तनई, व यासू
Matthanias Mathanai et Iasi
38 ३८ बानी व बिन्नइ, शिमी,
et Bani et Bennui Semei
39 ३९ शलेम्या, नाथान, अदाया,
et Salmias et Nathan et Adaias
40 ४० मखनदबइ, शाशइ, शारइ.
Mechnedabai Sisai Sarai
41 ४१ अजरएल, शेलेम्या, शमऱ्या
Ezrel et Selemau Semeria
42 ४२ शल्लूम, अमऱ्या, योसेफ,
Sellum Amaria Ioseph
43 ४३ नबोच्या वंशातील ईयेल, मत्तिथ्या, जाबाद, जबिना, इद्दो, योएल, बनाया.
de filiis Nebu Iaihel Matthathias Zabed Zabina Ieddu et Iohel Banaia
44 ४४ वरील सर्वांनी परराष्ट्रीय बायकांशी लग्ने केली होती. त्यापैकी काहींना आपल्या बायकांकडून संतती झाली होती.
omnes hii acceperunt uxores alienigenas et fuerunt ex eis mulieres quae pepererant filios