< यहेज्केल 1 >
1 १ माझ्या आयुष्याच्या तिसाव्या वर्षाच्या चौथ्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, मी खबार नदीच्या तीरी दास्यात गेलेल्या लोकांसोबत राहत होतो. तेव्हा स्वर्ग उघडला आणि मी देवाचा दृष्टांत पाहिला.
And it was don, in the thrittithe yeer, in the fourthe monethe, in the fyuethe dai of the moneth, whanne Y was in the myddis of caitifs, bisidis the flood Chobar, heuenes weren openyd, and Y siy the reuelaciouns of God.
2 २ तो त्या महिन्याच्या पाचवा दिवस होता, आणि ते यहोयाखीन राजाच्या बंदिवासाचे पाचवे वर्ष होते.
In the fyueth dai of the monethe; thilke is the fyuethe yeer of passing ouer of Joachym, kyng of Juda;
3 ३ खबार नदिच्या जवळ, खास्द्यांच्या देशात बूजीचा मुलगा यहेज्केल याजकाकडे परमेश्वर देवाचे वचन सामर्थ्याने आले व परमेश्वर देवाचा हात त्याच्यावर आला.
the word of the Lord was maad to Ezechiel, preest, the sone of Busi, in the lond of Caldeis, bisidis the flood Chobar; and the hond of the Lord was maad there on hym.
4 ४ तेव्हा मी पाहिले उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला, तो एक अग्नीने धुमसणारा, मध्य भागात विजांचा पिवळसर प्रकाश मध्यभागी चमकत असलेला विशाल मेघ होता.
And Y siy, and lo! a whirlewynd cam fro the north, and a greet cloude, and fier wlappynge in, and briytnesse in the cumpas therof; and as the licnesse of electre fro the myddis therof, that is, fro the myddis of the fier.
5 ५ मध्यभागी चार जिवंत प्राण्याच्या आकाराचे काही नजरेस पडले; ते माणसासारखे दिसत होते,
And of myddis therof was a licnesse of foure beestis. And this was the biholdyng of tho, the licnesse of a man in tho.
6 ६ पण त्यांना चार तोंडे होती, आणि प्रत्येक प्राण्याला चार पंख होते.
And foure faces weren to oon, and foure wyngis weren to oon.
7 ७ त्यांचे पाय सरळ होते पण तळवे वासरांच्या तळव्यासारखे आणि पितळेसारखे चकाकणारे होते.
And the feet of tho weren streiyt feet, and the soole of the foote of tho was as the soole of a foot of a calf, and sparclis, as the biholdynge of buylynge bras.
8 ८ त्यांच्या चोहोबाजूंना पंखाखाली त्यांना मनुष्याचे हात होते. त्या चौघांना त्यांचे मुखे व पंख याप्रमाणे होतेः
And the hondis of a man weren vndur the wyngis of tho, in foure partis. And tho hadden faces and wyngis bi foure partis;
9 ९ त्यांचे पंख त्यांच्या बाजूच्या प्राण्याच्या पंखांना स्पर्श करीत आणि पुढे जाण्यासाठी ते वळत नव्हते; त्याऐवजी त्यांच्यापैकी प्रत्येक आपल्यापुढे नीट सरळ चालत असे.
and the wyngis of tho weren ioyned togidir of oon to another. Tho turneden not ayen, whanne tho yeden, but eche yede bifore his face.
10 १० त्या चौघांच्या मुखापैकी एकाचे मुख मनुष्याच्या तोंडासारखे दिसत होते, दुसऱ्याचे मुख सिंहाच्या तोंडासारखे, तिसऱ्याचे मुख बैलासारखे आणि चौथ्याचे मुख गरुडाच्या तोंडासारखे होते.
Forsothe the licnesse `of the face of tho was the face of a man and the face of a lioun at the riythalf of tho foure. Forsothe the face of an oxe was at the left half of tho foure; and the face of an egle was aboue tho foure.
11 ११ त्यांची मुखे अशाप्रकारची होती आणि त्यांचे पंख एकमेकापासून वेगळे होते, प्रत्येक प्राण्याचे पंख दुसऱ्या प्राण्याच्या पंखांना स्पर्श करत होते.
And the faces of tho and the wengis of tho weren stretchid forth aboue. Twei wyngis of eche weren ioyned togidere, and tweyne hiliden the bodies of tho.
12 १२ प्रत्येक जण सरळ जात होता, जसा आत्मा त्यांना जाण्यासाठी सांगत तसे ते न वळता, सरळ पुढे जात.
And ech of tho yede bifore his face. Where the fersnesse of the wynd was, thidur tho yeden, and turneden not ayen, whanne tho yeden.
13 १३ ते जिवंत प्राणी जळत्या कोलीतासमान किंवा मशालीसमान दिसत होते; त्यांच्यातून प्रखर अग्नी निघत होता व विजा चकाकत होत्या.
And the licnesse of the beestis, and the biholdyng of tho, was as of brennynge coolis of fier, and as the biholdyng of laumpis. This was the siyt rennynge aboute in the myddis of beestis, the schynyng of fier, and leit goynge out of the fier.
14 १४ हे जिवंत प्राणी चपळतेने पुढे मागे हालचाल करीत होते आणि ते विजेसारखे दिसत होते!
And the beestis yeden, and turneden ayen at the licnesse of leit schynynge.
15 १५ मग मी त्या प्राण्यांकडे पाहिले त्या जिवंत प्राण्यांच्या बाजूला भूमीवर एक एक चाक होते.
And whanne Y bihelde the beestis, o wheel, hauuynge foure faces, apperide on the erthe, bisidis the beestis.
16 १६ त्या चाकांचे स्वरूप असे दिसत होतेः चारही चाके एक समान व वैडूर्य मण्यांसारखी होती; आणि जणूकाही चाकात चाक घातलेले असून त्यांना एकमेकांस छेदलेले असावे असा त्यांचा आकार होता.
And the biholdyng of the wheelis and the werk of tho was as the siyt of the see; and o licnesse was of tho foure; and the biholdyng and the werkis of tho, as if a wheel be in the myddis of a wheel.
17 १७ जेव्हा चाक चालत तेव्हा ते कोणत्याही दिशेने वळण न घेता चालत.
Tho goynge yeden bi foure partis of tho, and turneden not ayen, whanne tho yeden.
18 १८ त्यांच्या धावा या भयावह व उंच होत्या, कारण त्या धावांसभोवती सर्वत्र डोळे होते!
Also stature, and hiynesse, and orible biholdyng was to the wheelis; and al the bodi was ful of iyen in the cumpas of tho foure.
19 १९ जेव्हा ते जिवंत प्राणी चालत तेव्हा त्याच्या सोबत चाके चालत जेव्हा ते प्राणी पृथ्वीपासून उंच उडत तेव्हा त्यांची चाकेही त्यांच्या सोबत उंचावत होती.
And whanne the beestis yeden, the wheelis also yeden togidere bisidis tho. And whanne the beestis weren reisid fro the erthe, the wheelis also weren reisid togidere.
20 २० जेथे जिवंत प्राण्यांचा आत्मा त्यांना नेऊ इच्छित होता ते तिकडे जात होते. आत्मा त्यांना उंचावत होता आणि त्यांच्या चाकात त्यांचा आत्मा होता.
Whidur euere the spirit yede, whanne the spirit yede thedur, also the wheelis suynge it weren reisid togidere; for whi the spirit of lijf was in the wheelis.
21 २१ जेव्हा केव्हा ते प्राणी चालत चाकेही हालचाल करीत, जेव्हा ते थांबत चाकेही थांबत, जेव्हा ते उंच उडत त्यांच्या सोबत चाकेही उंच उडत होती कारण त्यांचा आत्मा त्यांच्या चाकांत वास करीत होता.
Tho yeden with the beestis goynge, and tho stoden with the beestis stondynge. And with the beestis reisid fro erthe, also the wheelis suynge tho beestis weren reisid togidere; for the spirit of lijf was in the wheelis.
22 २२ त्या जिवंत प्राण्यांच्या मस्तकावर महागड्या घुमटासारखे चकाकणारे दिसत होते, त्यांच्या कपाळावर स्फटिकासारखे चमकत होते.
And the licnesse of the firmament was aboue the heed of the beestis, and as the biholdyng of orible cristal, and stretchid abrood on the heed of tho beestis aboue.
23 २३ घुमटाखाली प्राणी आपले पंख सरळ लांब पसरवत होते आणि एकमेकांच्या पंखांना ते स्पर्श करीत होते. प्रत्येक प्राण्याच्या पंखांच्या जोडीने आपले शरीर झाकीत आणि दोन-दोन पंखांनी स्वतःला आवरण करीत.
Forsothe vndur the firmament the wyngis of tho beestis weren streiyt, of oon to anothir; ech beeste hilide his bodi with twei wyngis, and an other was hilid in lijk maner.
24 २४ तेव्हा मी त्यांच्या पंखांचा पाण्याच्या धबधब्यासारखा मोठा आवाज ऐकला. तो सर्वसामर्थ्य देवाच्या वाणीसारखा होता. ते चालत तेव्हा जोरदार पर्जन्यवृष्टीयुक्त वादळासमान ध्वनी होता. तो ध्वनी मोठ्या सेनेसारखा होता. जेव्हा ते थांबत असे तेव्हा ते आपले पंख खाली करत होते.
And Y herde the sown of wyngis, as the sown of many watris, as the sown of hiy God. Whanne tho yeden, ther was as a sown of multitude, as the sown of oostis of batel; and whanne tho stoden, the wyngis of tho weren late doun.
25 २५ जेव्हा ते थांबत व आपले पंख खाली स्तब्ध ठेवीत तेव्हा त्यांच्या माथ्यावरील घुमटातून आवाज येत होता.
For whi whanne a vois was maad on the firmament, that was on the heed of tho, tho stoden, and leten doun her wyngis.
26 २६ त्यांच्या माथ्याच्या वरील घुमटाच्या भागात नीलरत्न जडीत सिंहासन दिसत होते, आणि सिंहासनावर मनुष्याच्या चेहऱ्या समान कोणी असल्याची जाणीव होत होती.
And on the firmament, that was aboue the heed of tho, was as the biholdyng of a saphire stoon, the licnesse of a trone; and on the licnesse of the trone was a licnesse, as the biholdyng of a man aboue.
27 २७ त्याच्या ठायी सर्वत्र तृणमण्याच्या तेजासारखा प्रकाश मी पाहिला, त्याच्या कमरेपासून खाली अग्नीचा भास झाला, व त्याच्या भोवती प्रभा चमकत होती.
And Y siy as a licnesse of electre, as the biholding of fier with ynne, bi the cumpas therof; fro the lendis of hym and aboue, and fro the lendis of him til to bynethe, Y siy as the licnesse of fier schynynge in cumpas,
28 २८ पाऊस पडतांना दिसणाऱ्या मेघधनुष्यासारखा तो भासत होता त्याच्या भोवती प्रखर तेजोमय प्रकाश होता. हे परमेश्वर देवाचे गौरवयुक्त तेज दिसत होते. जेव्हा मी हे पाहिले व माझ्यासोबत बोलणारी वाणी ऐकली तेव्हा मी उपडा पडलो.
as the biholdynge of the reynbowe, whanne it is in the cloude in the dai of reyn. This was the biholdyng of schynyng bi cumpas. This was a siyt of the licnesse of the glorie of the Lord. And Y siy, and felle doun on my face; and Y herde the vois of a spekere.