< यहेज्केल 8 >

1 मग बाबेलातील बंदिवासाच्या सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी मी माझ्या घरात बसलो असता यहूदाचे वडील माझ्या पुढे बसले होते, तेव्हा पुन्हा परमेश्वर देवाचा वरदहस्त माझ्यावर आला.
And it came to pass in the sixth year, in the fifth month, on the fifth [day] of the month, I was sitting in the house, and the elders of Juda were sitting before me: and the hand of the Lord came upon me.
2 मग मी पाहिले की मनुष्याच्या आकृतीसारखे मला दिसले, त्यांच्या कमरेच्या खाली अग्नी भासला, त्याच्या कमरेच्या वरच्या भागात चकाकणाऱ्या धातूसारखे मला दिसले.
And I looked, and, behold, the likeness of a man: from his loins and downwards [there was] fire, and from his loins upwards [there was] as the appearance of amber.
3 मग देवाने दाखवलेल्या दृष्टांतात हाताच्या आकृती प्रमाणे येऊन माझ्या डोक्याच्या केसास धरुन देवाच्या आत्म्याने मला स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्यभागी उचलून घेतले, त्याने मला यरूशलेमेला नेले उत्तरेच्या आतील भागाच्या वेशी जवळ तेथे एक मूर्ती चिडवण्यासाठी उभी होती.
And he stretched forth the likeness of a hand, and took me by the crown of my head; and the Spirit lifted me up between the earth and sky, and brought me to Jerusalem in a vision of God, to the porch of the gate that looks to the north, where was the pillar of the Purchaser.
4 आणि इस्राएलाच्या देवाचे गौरव कायम होते, जे मी पाहिले होते.
And, behold, the glory of the Lord God of Israel was there, according to the vision which I saw in the plain.
5 मग तो मला म्हणाला “मानवाच्या मुला, उत्तरेकडे आपली नजर लाव जी वेदीकडे जाते,” प्रवेशव्दारातही चिडवणारी मूर्ती होती.
And he said to me, Son of man, lift up your eyes toward the north. So I lifted up mine eyes toward the north, and, behold, [I looked] from the north toward the eastern gate.
6 तेव्हा तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ते काय करत आहेत हे तू पाहिले काय? तेथे मोठे घृणा आणणारे कृत्ये करीत आहे, मी आपल्या पवित्र ठिकाणाहून निघून जाण्यासाठी इस्राएल घराणे करीत आहे, तुम्ही जाऊन पाहा ते मोठे घृणास्पद आहे.”
And he said to me, Son of man, have you seen what these do? They commit great abominations here so that I should keep away from my sanctuary: and you shall see yet greater iniquities.
7 मग त्याने मला मैदानाच्या प्रवेश व्दारात नेले, मग मी पाहिले तेथे भिंतीला मोठे छिद्र पडलेले मला दिसले.
And he brought me to the porch of the court.
8 तो मला म्हणाला, मानवाच्या मुला, भिंतीला खोदकाम कर. म्हणून मी भिंतीत खोदले तेव्हा पाहा, तेथे दरवाजा होता.
And he said to me, Son of man, dig: so I dug, and behold a door.
9 तेव्हा तो मला म्हणाला, “जा आणि दुष्ट घृणास्पद गोष्टी होतांना आपल्या डोळ्यांनी पाहा.”
And he said to me, Go in, and behold the iniquities which they practise here.
10 १० मग मी बघण्यासाठी गेलो, आणि पाहा! तेथे सर्व प्रकारचे सरपटणारे आणि अशुद्ध प्राणी होते, इस्राएल घराण्याच्या सर्व मूर्ती यांची चित्रे यरूशलेमेच्या भितींवर टांगलेल्या होत्या.
So I went in and looked; and saw vain abominations, and all the idols of the house of Israel, portrayed upon them round about.
11 ११ तेव्हा इस्राएलाच्या घराण्याचे सत्तर वडील मी पाहिले त्यामध्ये याजन्या चा मुलगा शाफान हा त्यांच्यामध्ये उभा होता, प्रत्येक मनुष्याजवळ धूप जाळण्याचे भांडे होते त्यांचा सुंगध वर घेतल्या जात होता.
And seventy men of the elders of the house of Israel, and Jechonias the son of Saphan stood in their presence in the midst of them, and each one held his censer in his hand; and the smoke of the incense went up.
12 १२ मग तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू पाहिलेस का इस्राएलाच्या घराण्याचे वडील अंधारात काय करतात ते? प्रत्येक मानव मूर्तीच्या गृहात लपून काय करतात, ते म्हणतात, परमेश्वर देव आम्हास बघत नाही, म्हणून परमेश्वर देवाने त्यांचा त्याग केला आहे.
And he said to me, You have seen, son of man, what the elders of the house of Israel do, each one of them in their secret chamber: because they have said, The Lord see not; The Lord has forsaken the earth.
13 १३ आणि तो मला म्हणाला, ‘पुन्हा वळून पहा, दुसरी मोठी घृणास्पद बाब ते करीत आहे.”
And he said to me, You shall see yet greater iniquities which these do.
14 १४ पुन्हा त्याने मला परमेश्वर देवाच्या मंदिराच्या दरवाज्याच्या उत्तर भागात नेले, आणि पहा! स्त्रिया बसून तम्मुजासाठी दुःख करीत होत्या.
And he brought me in to the porch of the house of the Lord that looks to the north; and, behold [there were] women sitting there lamenting for Thammuz.
15 १५ तेव्हा तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू हे बघितलेस का? पुन्हा वळून पहा! यापेक्षा अधिक घृणा येणारे काम तू डोळ्यांनी पहाशील.”
And he said to me, Son of man, you have seen; but you shall yet see [evil] practices greater then these.
16 १६ परमेश्वर देवाच्या देवळाच्या आतील प्रांगणात त्याने मला आणले, आणि पहा! परमेश्वर देवाच्या देवळाच्या प्रवेश व्दारात देवडी आणि वेदीवर पंचवीस माणसे परमेश्वर देवाच्या वेदीकडे पूर्वेला तोंड व परमेश्वर देवाच्या देवळाकडे पाठमोरे करून सुर्याची उपासना करीत होते.
And he brought me into the inner court of the house of the Lord, and at the entrance of the temple of the Lord, between the porch and the altar, were about twenty men, with their back parts toward the temple of the Lord, and their faces [turned] the opposite way; and these were worshipping the sun.
17 १७ तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू हे पाहिलेस का? यहूदाचे घराणे याही ठिकाणी घृणास्पद गोष्टी करीत आहे. ते कमी आहे का? म्हणून त्यांची भूमी अहिंसेने भरुन गेली आहे, त्यांनी पुन्हा माझ्या रागाला चिथवीले आहे, त्यांनी आपल्या नाकांनी फांद्या धरुन ठेवल्या आहे.
And he said to me, Son of man, you have seen this. [Is it] a little thing to the house of Juda to practise the iniquities which they have practised here? for they have filled the land with iniquity: and, behold, these are as scorners.
18 १८ म्हणून मीही त्यांच्या विरुध्द कार्य करेन, त्यांच्यावर मी कृपादृष्टी करणार नाही आणि त्यांची मी दाणादाण करणार आहे, ते माझ्या कानी आरोळी मारतील तरी मी त्यांचे ऐकणार नाही.”
Therefore will I deal with them in wrath: mine eye shall not spare, nor will I have any mercy.

< यहेज्केल 8 >