< यहेज्केल 5 >

1 “मग मानवाच्या मुला, स्वतःसाठी न्हाव्याच्या वस्तऱ्यासारखे धारधार अवजार घे व आपल्या डोक्याच्या केसांचे, दाढीचे मुंडन कर, केस तागडीत मोजून त्याचे वाटप कर
人の子よ、鋭いつるぎを取り、それを理髪師のかみそりとして、あなたの頭と、ひげとをそり、はかりで量って、その毛を分けなさい。
2 वेढा दिलेला समय समाप्त झाल्यावर त्यातील तिसरा भाग शहराच्या मध्य भागी जाळून टाक. आणि तिसरा भाग तलवारीने कापून टाक व तिसरा भाग वाऱ्यावर उडवून टाक आणि या प्रकारे त्या लोकांचा पाठलाग तलवार करेल.
その三分の一は包囲の期間の終る時、町の中で火で焼き、また三分の一を取り、つるぎで町のまわりでこれを打ち、さらに三分の一を風に散らしなさい。わたしはつるぎを抜いて、彼らのあとを追う。
3 थोडेसे केस कापून आपल्या कपड्याला बांधून टाक.
あなたはその毛を少し取って、衣のすそに包み、
4 काही अजून केस घेऊन आगीत टाकून दे, आणि त्यास जाळून टाक, म्हणजे इस्राएलाच्या घराण्यावर आग त्यांच्या मागे बाहेर जाईल.
またそのうちから少しを取って火の中に投げ入れ、火でこれを焼きなさい。火はその中から出て、イスラエルの全家に及ぶ。
5 परमेश्वर देव म्हणतो, ही यरूशलेम नगरी, जी इतर राष्ट्रांमध्ये आहे, जेथे मी तिला स्थापीले, आणि मी तिला इतर देशांनी आजूबाजुने वेढीले आहे.
主なる神はこう言われる、わたしはこのエルサレムを万国の中に置き、国々をそのまわりに置いた。
6 पण तिने वाईट आचरण करून इतर देशांहून माझा धिक्कार केला आहे, आणि त्यांनी माझ्या न्यायीपणाचा व आज्ञाचा विरोध केला आहे.
エルサレムは他の国々よりも悪しく、わたしのおきてにそむき、そのまわりの国々よりもわたしの定めにそむいた。すなわち彼らはわたしのおきてを捨て、わたしの定めに歩まなかった。
7 म्हणून परमेश्वर देव असे सांगतो; तुम्ही आजूबाजुच्या देशांपेक्षा अधिक त्रासदायक आहात. तुम्ही सभोवतालच्या देशाहून अधिक माझ्या फर्मानाचे पालन केले नाही.
それゆえ主はこう言われる、あなたがたはそのまわりにいる異邦人よりも狂暴であって、わたしの定めに歩まず、わたしのおきてを行わず、むしろ、あなたがたの回りにいる異邦人のおきてを守っていた。
8 म्हणूनच परमेश्वर देव म्हणतो; पहा! मीच तुमच्या विरोधात काम करेन! तुम्हास केलेले शासन हे आजूबाजुच्या देशाच्या डोळ्यादेखत तुम्हावर होईल.
それゆえ主なる神はこう言われる、見よ、わたしはあなたを攻め、異邦人の目の前で、あなたの中にさばきを行う。
9 तुझ्या किळस आणणाऱ्या कार्यामुळे, मी आजवर केले नाही, आणि करणार नाही, असे मी तुझ्यासोबत करेल.
あなたのもろもろの憎むべき事のために、わたしがまだした事のないような事、またこの後ふたたびしないような事をあなたに対してする。
10 १० तथापि बाप मुलांना, आणि मुले बापाला खाऊन टाकतील, कारण मी तुझ्यावर न्याय आणला आहे. तुमच्या उरलेल्या अंशाला चारही भागात फेकून देईल.
それゆえ、あなたのうちで父はその子を食い、子はその父を食う。わたしはあなたに対してさばきを行い、あなたのうちの残りの者をことごとく四方の風に散らす。
11 ११ म्हणून जसा मी राहलो, परमेश्वर देव म्हणतो, निश्चितच तुम्ही किळस राग आणणाऱ्या गोष्टी केल्या आहेत. म्हणून तुमची संख्या कमी करून तुमच्यावर दया करणार नाही.
それゆえ、主なる神は言われる、わたしは生きている。あなたはその忌むべき物と、その憎むべき事とをもって、わたしの聖所を汚したので、わたしは必ずあなたの数を減らす。わたしの目はあなたを惜しみ見ず、またわたしはあなたをあわれまない。
12 १२ घातक साथीच्या रोगाने तुम्हातील तिसरा भाग तुमच्या संख्येतून मी नाहीसा करेन, तुम्हामध्ये भयंकर दुष्काळ भुकमरी, सभोवताली तलवारीने तुझे लोक नाश पावतील. सर्व दिशांनी तलवार येऊन तुझा पिच्छा करील.
あなたの三分の一はあなたの中で疫病で死に、ききんで滅び、三分の一はあなたのまわりでつるぎに倒れ、三分の一は四方の風に散らされる。わたしはつるぎを抜いてそのあとを追う。
13 १३ तेव्हा राग पूर्ण होऊन समाधान पावेल, व माझा क्रोध शांत होईल असे त्यांना कळून येईल, परमेश्वर देव हे सर्व त्याच्या विरोधात आवेशाने म्हणाला.
こうしてわたしは怒りを漏らし尽し、憤りを彼らの上に漏らして、満足する。こうして、わたしの憤りを彼らの上に漏らし尽した時、彼らは主であるわたしが熱心に語ったことを知るであろう。
14 १४ तुझ्या आजूबाजुच्या देशांमध्ये तुझा नाश व तुझी खरडपट्टी काढेन, जे तुझ्या आजूबाजूने येणारे जाणारे ते पहातील.
わたしはまわりにある国々の中と、すべてそばを通る者の目の前であなたを滅亡とあざけりに渡す。
15 १५ यरुशलेच्या बाबतीत इतर शेजारी लोकांसाठी चेतावनीचा इशारा असेल. त्यांना निंदा करण्याचे व अपमान करण्याचे कारण मिळेल. त्यांच्यावर शासन करून त्यांचा नाश केला असे परमेश्वर देव म्हणतो.
わたしが怒りと、憤りと、重い懲罰とをもって、あなたに対してさばきを行う時、あなたはそのまわりにある国々のあざけりとなり、そしりとなり、戒めとなり、驚きとなる。これは主であるわたしが語るのである。
16 १६ तुमच्यात कडूपणाचे बाण पाठवेन, त्याचा अर्थ असा होईल मी तुमचा विध्वंस होईल, त्यांच्या वरचा दुष्काळ अजून कठोर करून तुमच्या भाकरीचा आधार काढून टाकेन;
すなわち、わたしがあなたを滅ぼすききんの矢、滅亡の矢をあなたに放つ時、わたしはあなたを滅ぼすために放つのだ。わたしはあなたの上にききんを増し加え、あなたがつえとするパンを打ち砕く。
17 १७ दुष्काळ, रोगराई तुमच्यावर पाठवीन, तुम्ही आपत्यहीन व्हाल, साथीचा रोग, रक्तस्राव आणि तुम्हावर तलवार चालवीन. असे परमेश्वर देव म्हणतो.”
わたしはあなたにききんと野獣を送って、あなたの子を奪い取り、また疫病と流血にあなたの中を通らせ、またつるぎをあなたに送る。主であるわたしがこれを言う」。

< यहेज्केल 5 >