< यहेज्केल 48 >
1 १ ही वंशाची नावे आहेत. दानाचा वंश देशाचा एक विभाग स्विकारील. त्याची सीमा उत्तर सीमेपासून हेथलोनाकडच्या वाटेजवळ, हामाथाच्या प्रवेशापर्यंत दिमिष्काच्या सीमेवरील हसर-एनान, उत्तरेकडे हमाथाजवळ. दानाची सीमा त्याच्या पूर्वेकडून सर्व मार्गाने महासमुद्राकडे जाईल.
2 २ दानाच्या दक्षिण सीमेपाशी पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत एक विभाग तो आशेराचा.
3 ३ आशेराबरोबर दक्षिण सीमेचा एक विभाग नफतालीचा, त्याच्या पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत पसरलेला.
4 ४ नफतालीबरोबर दक्षिण सीमेचा एक विभाग मनश्शेचा, पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंतचा विस्तारीत प्रदेश.
5 ५ मनश्शेबरोबर त्याच्या दक्षिण सीमेचा एक विभाग पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत तो एफ्राईमाचा.
6 ६ एफ्राईमाच्या दक्षिण सीमेच्या पूर्वबाजूपासून ते पश्चिमबाजूपर्यंत एक विभाग रऊबेनाचा.
7 ७ रऊबेनाबरोबरच्या बाजूच्या सीमेच्या पूर्व ते पश्चिम एक विभाग तो यहूदाचा.
8 ८ यहूदाच्या सीमेस लागून असलेला जो पूर्व बाजूपासून ते पश्चिम बाजूपर्यंत विस्तारलेला प्रदेश पंचवीस हजार हात रुंद व इतर वंशांना मिळालेल्या विभागाइतका पूर्व बाजूपासून ते पश्चिम बाजूपर्यंत लांब तो समर्पित अंश म्हणून अर्पाल आणि त्याच्या मध्यभागी पवित्रस्थान होईल.
9 ९ तुम्ही जो प्रदेश परमेश्वरास अर्पण कराल तो लांबीला पंचवीस हजार हात व रुंदीला वीस हजार हात असावा.
10 १० पवित्र प्रदेशाचा विभाग हा नेमून दिला होता, हा समर्पित प्रदेश याजकांचा; ही जमीन उत्तरेला पंचवीस हजार हात लांबीची, पूर्वेला व पश्चिमेला दहा-दहा हजार हात रुंदीची असेल. तिची दक्षिणेला लांबी पंचवीस हजार हात असावी. त्याच्या बरोबर मध्यावर परमेश्वराचे मंदिर असेल.
11 ११ सादोकाच्या वंशजातले जे याजक पवित्र झालेले आहेत ज्या कोणी माझी सेवा निष्ठेने केली, त्यांच्यासाठी तो होईल. जेव्हा इस्राएली लोक बहकून गेली तेव्हा जसे लेवी बहकले तसे ते बहकले नाहीत. इस्राएलाच्या लोकांबरोबर बहकले नाहीत.
12 १२ त्यास देशातील अर्पिलेल्या प्रदेशातून हा एक प्रदेश त्यांना परमपवित्र होईल; तो लेवींच्या सीमेपाशी असेल.
13 १३ याजकांच्या सीमेपाशी लेव्यांना पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद प्रदेश मिळावा. त्यांना पूर्ण लांबी रुंदीची, म्हणजे पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद जमीन असावी.
14 १४ त्यांनी या जमिनीची विक्री वा अदलाबदली करु नये. इस्राएल देशातील कोणतेही प्रथमफळे वेगळे करून इतर प्रदेशाकडे जाऊ देऊ नये. कारण तो भाग परमेश्वरास पवित्र आहे.
15 १५ उरलेली जमीन, पंचवीस हजार हात लांबीच्या प्रदेशापैकी जो पांच हजार हात रुंदीचा भाग राहील तो नगरासाठी सार्वजनिक, कुरणासाठी, घरे बांधण्यासाठी उपयोगात येईल. नगर ह्याच्या मध्यावर असावे.
16 १६ नगरीची मापे पुढीलप्रमाणे असतील, उत्तर बाजू चार हजार पाचशे हात, दक्षिण बाजू चार हजार पाचशे हात पूर्व व पश्चिम बाजूही तेवढ्याच म्हणजे चार हजार पाचशे हात.
17 १७ नगरासाठीचे कुरण उत्तरेकडे अडीचशे हात, दक्षिणेकडे अडीचशे हात, व पूर्वेकडे अडीचशे हात व पश्चिमेकडे अडीचशे हात असावे.
18 १८ आणि पवित्र अर्पिलेल्या प्रदेशासमोर जो उरलेला प्रदेश तो लांबीने पूर्वेकडे दहा हजार हात. व पश्चिमेला दहा हजार हात होईल; आणि तो पवित्र अर्पिलेल्या प्रदेशासमोर होईल; त्याचे उत्पन्न नगरातील कामगारांसाठी अन्नासाठी होईल.
19 १९ सर्व इस्राएलाच्या वंशांतून जे कोणी नगरात काम करतील त्या लोकांनी त्या जागेची मशागत करावी.
20 २० सर्व अर्पिलेला प्रदेश पंचवीस हजार हात लांब आणि पंचवीस हजार रुंद होईल; ह्याप्रकारे तुम्ही प्रदेशाचे पवित्र अर्पण एकत्रितपणे नगराच्या विभागासाठी द्यावे.
21 २१ “तो अर्पिलेला भाग व नगराचे विभाग यांच्या एका बाजूला व दुसऱ्या बाजूला जो उरलेला भाग आहे तो अधिपतीचा असावा. अर्पिलेल्या प्रदेशाच्या पंचवीस हजार हातांच्यासमोर पूर्व सीमेकडे आणि पश्चिमेकडे पंचवीस हजार हातांच्यासमोर पश्चिम सीमेकडे, वंशाच्या विभागासमोर जो प्रदेश आहे तो अधिपतीसाठी असावा आणि पवित्र अर्पिलेला प्रदेश व मंदिराचे पवित्रस्थान त्याच्या मध्यभागी असावे.
22 २२ ह्यातील काही हिस्सा याजकाचा, काही लेवींचा व काही मंदिराकरिता आहे. मंदिर या भागाच्या मध्यभागी आहे. शिल्लक राहिलेली जमीन देशाच्या राजाच्या मालकीची आहे. राजाला, बन्यामीनची जमीन व यहूदाची जमीन यांच्यामधील जमीन मिळेल.
23 २३ आणि बाकीच्या वंशास, पूर्व बाजूपासून पश्चिमबाजूपर्यंत, त्यातला एक बन्यामीनाचा भाग.
24 २४ बन्यामिनाच्या सीमेपाशी त्याच्या पूर्वबाजूपासून पश्चिमबाजूपर्यंत तो शिमोनाचा विभाग.
25 २५ शिमोनाच्या सीमेपाशी पूर्व बाजूपासून पश्चिमबाजूपर्यंत तो इस्साखाराचा विभाग.
26 २६ इस्साखाराच्या सीमेपाशी पूर्वबाजूस पश्चिमबाजूपर्यंत तो जबुलूनाचा विभाग.
27 २७ जबुलूनाच्या सीमेपाशी पूर्वबाजूपासून पश्चिमबाजूपर्यंत, गादाचा, एक विभाग.
28 २८ गादाच्या सीमेपाशी दक्षिण बाजूस, दक्षिणेकडे, तामारापासून मरीबोथ कादेशाच्या जलापर्यंत, नदीकडे मोठ्या समुद्रापर्यंत सीमा होईल.
29 २९ ज्या देशाची वाटणी तुम्ही चिठ्ठ्या टाकून इस्राएलाच्या वंशास वतनासाठी विभागणी कराल तो हाच आहे. त्यांचे विभाग हेच आहेत.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
30 ३० ही नगराची बाहेर निघण्याची ठिकाणे आहेत. उत्तर बाजूस मापाने चार हजार पाचशे हात लांब असेल.
31 ३१ नगराच्या वेशी, तिला तीन द्वारे असतील, इस्राएल वंशाच्या नावाप्रमाणे त्यांची नावे, रऊबेनचे द्वार, यहूदाचे द्वार व लेवीचे द्वार.
32 ३२ पूर्व बाजू चार हजार पाचशे हात लांब असेल. तिला तीन द्वारे असतील. योसेफाचे द्वार, बन्यामीनाचे द्वार व दानाचे द्वार.
33 ३३ दक्षिण बाजूसुद्धा चार हजार पाचशे हात लांब असेल. तिलाही शिमोनाचे द्वार, इस्साखाराचे द्वार व जबुलूनाचे द्वार अशी तीन द्वारे असतील.
34 ३४ पश्चिम बाजूही चार हजार पाचशे हात लांब असेल. तिच्या तीन द्वारांची नावे पुढीलप्रामाणे असतील. गादाचे द्वार, आशेराचे द्वार व नफतालीचे द्वार.
35 ३५ ते सभोवतीचे अंतर अठरा हजार हात असेल. त्या दिवसापासून नगरीचे नाव ‘परमेश्वर तेथे आहे’ असे पडेल.