< यहेज्केल 48 >

1 ही वंशाची नावे आहेत. दानाचा वंश देशाचा एक विभाग स्विकारील. त्याची सीमा उत्तर सीमेपासून हेथलोनाकडच्या वाटेजवळ, हामाथाच्या प्रवेशापर्यंत दिमिष्काच्या सीमेवरील हसर-एनान, उत्तरेकडे हमाथाजवळ. दानाची सीमा त्याच्या पूर्वेकडून सर्व मार्गाने महासमुद्राकडे जाईल.
«وَهَذِهِ أَسْمَاءُ ٱلْأَسْبَاطِ: مِنْ طَرَفِ ٱلشِّمَالِ، إِلَى جَانِبِ طَرِيقِ حِثْلُونَ إِلَى مَدْخَلِ حَمَاةَ حَصْرُ عِينَانَ تُخْمُ دِمَشْقَ شِمَالًا إِلَى جَانِبِ حَمَاةَ لِدَانٍ. فَيَكُونُ لَهُ مِنَ ٱلشَّرْقِ إِلَى ٱلْبَحْرِ قِسْمٌ وَاحِدٌ.١
2 दानाच्या दक्षिण सीमेपाशी पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत एक विभाग तो आशेराचा.
وَعَلَى تُخْمِ دَانٍ مِنْ جَانِبِ ٱلْمَشْرِقِ إِلَى جَانِبِ ٱلْبَحْرِ لِأَشِيرَ قِسْمٌ وَاحِدٌ.٢
3 आशेराबरोबर दक्षिण सीमेचा एक विभाग नफतालीचा, त्याच्या पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत पसरलेला.
وَعَلَى تُخْمِ أَشِيرَ مِنْ جَانِبِ ٱلشَّرْقِ إِلَى جَانِبِ ٱلْبَحْرِ لِنَفْتَالِي قِسْمٌ وَاحِدٌ.٣
4 नफतालीबरोबर दक्षिण सीमेचा एक विभाग मनश्शेचा, पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंतचा विस्तारीत प्रदेश.
وَعَلَى تُخْمِ نَفْتَالِي مِنْ جَانِبِ ٱلشَّرْقِ إِلَى جَانِبِ ٱلْبَحْرِ لِمَنَسَّى قِسْمٌ وَاحِدٌ.٤
5 मनश्शेबरोबर त्याच्या दक्षिण सीमेचा एक विभाग पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत तो एफ्राईमाचा.
وَعَلَى تُخْمِ مَنَسَّى مِنْ جَانِبِ ٱلشَّرْقِ إِلَى جَانِبِ ٱلْبَحْرِ لِأَفْرَايِمَ قِسْمٌ وَاحِدٌ.٥
6 एफ्राईमाच्या दक्षिण सीमेच्या पूर्वबाजूपासून ते पश्चिमबाजूपर्यंत एक विभाग रऊबेनाचा.
وَعَلَى تُخْمِ أَفْرَايِمَ مِنْ جَانِبِ ٱلشَّرْقِ إِلَى جَانِبِ ٱلْبَحْرِ لِرَأُوبَيْنَ قِسْمٌ وَاحِدٌ.٦
7 रऊबेनाबरोबरच्या बाजूच्या सीमेच्या पूर्व ते पश्चिम एक विभाग तो यहूदाचा.
وَعَلَى تُخْمِ رَأُوبَيْنَ مِنْ جَانِبِ ٱلشَّرْقِ إِلَى جَانِبِ ٱلْبَحْرِ لِيَهُوذَا قِسْمٌ وَاحِدٌ.٧
8 यहूदाच्या सीमेस लागून असलेला जो पूर्व बाजूपासून ते पश्चिम बाजूपर्यंत विस्तारलेला प्रदेश पंचवीस हजार हात रुंद व इतर वंशांना मिळालेल्या विभागाइतका पूर्व बाजूपासून ते पश्चिम बाजूपर्यंत लांब तो समर्पित अंश म्हणून अर्पाल आणि त्याच्या मध्यभागी पवित्रस्थान होईल.
وَعَلَى تُخْمِ يَهُوذَا مِنْ جَانِبِ ٱلشَّرْقِ إِلَى جَانِبِ ٱلْبَحْرِ تَكُونُ ٱلتَّقْدِمَةُ ٱلَّتِي تُقَدِّمُونَهَا خَمْسَةً وَعِشْرِينَ أَلْفًا عَرْضًا، وَٱلطُّولُ كَأَحَدِ ٱلْأَقْسَامِ مِنْ جَانِبِ ٱلشَّرْقِ إِلَى جَانِبِ ٱلْبَحْرِ، وَيَكُونُ ٱلْمَقْدِسُ فِي وَسْطِهَا.٨
9 तुम्ही जो प्रदेश परमेश्वरास अर्पण कराल तो लांबीला पंचवीस हजार हात व रुंदीला वीस हजार हात असावा.
ٱلتَّقْدِمَةُ ٱلَّتِي تُقَدِّمُونَهَا لِلرَّبِّ تَكُونُ خَمْسَةً وَعِشْرِينَ أَلْفًا طُولًا، وَعَشَرَةَ آلَافٍ عَرْضًا.٩
10 १० पवित्र प्रदेशाचा विभाग हा नेमून दिला होता, हा समर्पित प्रदेश याजकांचा; ही जमीन उत्तरेला पंचवीस हजार हात लांबीची, पूर्वेला व पश्चिमेला दहा-दहा हजार हात रुंदीची असेल. तिची दक्षिणेला लांबी पंचवीस हजार हात असावी. त्याच्या बरोबर मध्यावर परमेश्वराचे मंदिर असेल.
وَلِهَؤُلَاءِ تَكُونُ تَقْدِمَةَ ٱلْقُدْسِ لِلْكَهَنَةِ. مِنْ جِهَةِ ٱلشِّمَالِ خَمْسَةٌ وَعِشْرُونَ أَلْفًا فِي ٱلطُّولِ، وَمِنْ جِهَةِ ٱلْبَحْرِ عَشَرَةُ آلَافٍ فِي ٱلْعَرْضِ، وَمِنْ جِهَةِ ٱلشَّرْقِ عَشَرَةُ آلَافٍ فِي ٱلْعَرْضِ، وَمِنْ جِهَةِ ٱلْجَنُوبِ خَمْسَةٌ وَعِشْرُونَ أَلْفًا فِي ٱلطُّولِ. وَيَكُونُ مَقْدِسُ ٱلرَّبِّ فِي وَسْطِهَا.١٠
11 ११ सादोकाच्या वंशजातले जे याजक पवित्र झालेले आहेत ज्या कोणी माझी सेवा निष्ठेने केली, त्यांच्यासाठी तो होईल. जेव्हा इस्राएली लोक बहकून गेली तेव्हा जसे लेवी बहकले तसे ते बहकले नाहीत. इस्राएलाच्या लोकांबरोबर बहकले नाहीत.
أَمَّا ٱلْمُقَدَّسُ فَلِلْكَهَنَةِ مِنْ بَنِي صَادُوقَ ٱلَّذِينَ حَرَسُوا حِرَاسَتِي، ٱلَّذِينَ لَمْ يَضِلُّوا حِينَ ضَلَّ بَنُو إِسْرَائِيلَ كَمَا ضَلَّ ٱللَّاوِيُّونَ.١١
12 १२ त्यास देशातील अर्पिलेल्या प्रदेशातून हा एक प्रदेश त्यांना परमपवित्र होईल; तो लेवींच्या सीमेपाशी असेल.
وَتَكُونُ لَهُمْ تَقْدِمَةً مِنْ تَقْدِمَةِ ٱلْأَرْضِ، قُدْسُ أَقْدَاسٍ عَلَى تُخْمِ ٱللَّاوِيِّينَ.١٢
13 १३ याजकांच्या सीमेपाशी लेव्यांना पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद प्रदेश मिळावा. त्यांना पूर्ण लांबी रुंदीची, म्हणजे पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद जमीन असावी.
«وَلِلَّاوِيِّينَ عَلَى مُوَازَاةِ تُخْمِ ٱلْكَهَنَةِ خَمْسَةٌ وَعِشْرُونَ أَلْفًا فِي ٱلطُّولِ، وَعَشَرَةُ آلَافٍ فِي ٱلْعَرْضِ. ٱلطُّولُ كُلُّهُ خَمْسَةٌ وَعِشْرُونَ أَلْفًا، وَٱلْعَرْضُ عَشَرَةُ آلَافٍ.١٣
14 १४ त्यांनी या जमिनीची विक्री वा अदलाबदली करु नये. इस्राएल देशातील कोणतेही प्रथमफळे वेगळे करून इतर प्रदेशाकडे जाऊ देऊ नये. कारण तो भाग परमेश्वरास पवित्र आहे.
وَلَا يَبِيعُونَ مِنْهُ وَلَا يُبَدِّلُونَ، وَلَا يَصْرِفُونَ بَاكُورَاتِ ٱلْأَرْضِ لِأَنَّهَا مُقَدَّسَةٌ لِلرَّبِّ.١٤
15 १५ उरलेली जमीन, पंचवीस हजार हात लांबीच्या प्रदेशापैकी जो पांच हजार हात रुंदीचा भाग राहील तो नगरासाठी सार्वजनिक, कुरणासाठी, घरे बांधण्यासाठी उपयोगात येईल. नगर ह्याच्या मध्यावर असावे.
وَٱلْخَمْسَةُ ٱلْآلَافِ ٱلْفَاضِلَةُ مِنَ ٱلْعَرْضِ قُدَّامَ ٱلْخَمْسَةِ وَٱلْعِشْرِينَ أَلْفًا هِيَ مُحَلَّلَةٌ لِلْمَدِينَةِ لِلسُّكْنَى وَلِلْمَسْرَحِ، وَٱلْمَدِينَةُ تَكُونُ فِي وَسْطِهَا.١٥
16 १६ नगरीची मापे पुढीलप्रमाणे असतील, उत्तर बाजू चार हजार पाचशे हात, दक्षिण बाजू चार हजार पाचशे हात पूर्व व पश्चिम बाजूही तेवढ्याच म्हणजे चार हजार पाचशे हात.
وَهَذِهِ أَقْيِسَتُهَا: جَانِبُ ٱلشِّمَالِ أَرْبَعَةُ آلَافٍ وَخَمْسُ مِئَةٍ، وَجَانِبُ ٱلْجَنُوبِ أَرْبَعَةُ آلَافٍ وَخَمْسُ مِئَةٍ، وَجَانِبُ ٱلشَّرْقِ أَرْبَعَةُ آلَافٍ وَخَمْسُ مِئَةٍ، وَجَانِبُ ٱلْغَرْبِ أَرْبَعَةُ آلَافٍ وَخَمْسُ مِئَةٍ.١٦
17 १७ नगरासाठीचे कुरण उत्तरेकडे अडीचशे हात, दक्षिणेकडे अडीचशे हात, व पूर्वेकडे अडीचशे हात व पश्चिमेकडे अडीचशे हात असावे.
وَيَكُونُ مَسْرَحٌ لِلْمَدِينَةِ نَحْوَ ٱلشِّمَالِ مِئَتَيْنِ وَخَمْسِينَ، وَنَحْوَ ٱلْجَنُوبِ مِئَتَيْنِ وَخَمْسِينَ، وَنَحْوَ ٱلشَّرْقِ مِئَتَيْنِ وَخَمْسِينَ، وَنَحْوَ ٱلْغَرْبِ مِئَتَيْنِ وَخَمْسِينَ.١٧
18 १८ आणि पवित्र अर्पिलेल्या प्रदेशासमोर जो उरलेला प्रदेश तो लांबीने पूर्वेकडे दहा हजार हात. व पश्चिमेला दहा हजार हात होईल; आणि तो पवित्र अर्पिलेल्या प्रदेशासमोर होईल; त्याचे उत्पन्न नगरातील कामगारांसाठी अन्नासाठी होईल.
وَٱلْبَاقِي مِنَ ٱلطُّولِ مُوازِيًا تَقْدِمَةَ ٱلْقُدْسِ عَشَرَةُ آلَافٍ نَحْوَ ٱلشَّرْقِ، وَعَشَرَةُ آلَافٍ نَحْوَ ٱلْغَرْبِ. وَيَكُونُ مُوازِيًا تَقْدِمَةَ ٱلْقُدْسِ، وَغَلَّتُهُ تَكُونُ أَكْلًا لِخِدْمَةِ ٱلْمَدِينَةِ.١٨
19 १९ सर्व इस्राएलाच्या वंशांतून जे कोणी नगरात काम करतील त्या लोकांनी त्या जागेची मशागत करावी.
أَمَّا خَدَمَةُ ٱلْمَدِينَةِ فَيَخْدِمُونَهَا مِنْ كُلِّ أَسْبَاطِ إِسْرَائِيلَ.١٩
20 २० सर्व अर्पिलेला प्रदेश पंचवीस हजार हात लांब आणि पंचवीस हजार रुंद होईल; ह्याप्रकारे तुम्ही प्रदेशाचे पवित्र अर्पण एकत्रितपणे नगराच्या विभागासाठी द्यावे.
كُلُّ ٱلتَّقْدِمَةِ خَمْسَةٌ وَعِشْرُونَ أَلْفًا بِخَمْسَةٍ وَعِشْرِينَ أَلْفًا. مُرَبَّعَةً تُقَدِّمُونَ تَقْدِمَةَ ٱلْقُدْسِ مَعَ مُلْكِ ٱلْمَدِينَةِ.٢٠
21 २१ “तो अर्पिलेला भाग व नगराचे विभाग यांच्या एका बाजूला व दुसऱ्या बाजूला जो उरलेला भाग आहे तो अधिपतीचा असावा. अर्पिलेल्या प्रदेशाच्या पंचवीस हजार हातांच्यासमोर पूर्व सीमेकडे आणि पश्चिमेकडे पंचवीस हजार हातांच्यासमोर पश्चिम सीमेकडे, वंशाच्या विभागासमोर जो प्रदेश आहे तो अधिपतीसाठी असावा आणि पवित्र अर्पिलेला प्रदेश व मंदिराचे पवित्रस्थान त्याच्या मध्यभागी असावे.
وَٱلْبَقِيَّةُ لِلرَّئِيسِ مِنْ هُنَا وَمِنْ هُنَاكَ لِتَقْدِمَةِ ٱلْقُدْسِ وَلِمُلْكِ ٱلْمَدِينَةِ قُدَّامَ ٱلْخَمْسَةِ وَٱلْعِشْرِينَ أَلْفًا لِلتَّقْدِمَةِ إِلَى تَخْمِ ٱلشَّرْقِ، وَمِنْ جِهَةِ ٱلْغَرْبِ قُدَّامَ ٱلْخَمْسَةِ وَٱلْعِشْرِينَ أَلْفًا عَلَى تُخْمِ ٱلْغَرْبِ مُوازِيًا أَمْلَاكَ ٱلرَّئِيسِ، وَتَكُونُ تَقْدِمَةُ ٱلْقُدْسِ وَمَقْدِسُ ٱلْبَيْتِ فِي وَسْطِهَا.٢١
22 २२ ह्यातील काही हिस्सा याजकाचा, काही लेवींचा व काही मंदिराकरिता आहे. मंदिर या भागाच्या मध्यभागी आहे. शिल्लक राहिलेली जमीन देशाच्या राजाच्या मालकीची आहे. राजाला, बन्यामीनची जमीन व यहूदाची जमीन यांच्यामधील जमीन मिळेल.
وَمِنْ مُلْكِ ٱللَّاوِيِّينَ مِنْ مُلْكِ ٱلْمَدِينَةِ فِي وَسْطِ ٱلَّذِي هُوَ لِلرَّئِيسِ، مَا بَيْنَ تُخْمِ يَهُوذَا وَتُخْمِ بَنْيَامِينَ، يَكُونُ لِلرَّئِيسِ.٢٢
23 २३ आणि बाकीच्या वंशास, पूर्व बाजूपासून पश्चिमबाजूपर्यंत, त्यातला एक बन्यामीनाचा भाग.
وَبَاقِي ٱلْأَسْبَاطِ: فَمِنْ جَانِبِ ٱلشَّرْقِ إِلَى جَانِبِ ٱلْبَحْرِ لِبَنْيَامِينَ قِسْمٌ وَاحِدٌ.٢٣
24 २४ बन्यामिनाच्या सीमेपाशी त्याच्या पूर्वबाजूपासून पश्चिमबाजूपर्यंत तो शिमोनाचा विभाग.
وَعَلَى تُخْمِ بَنْيَامِينَ، مِنْ جَانِبِ ٱلشَّرْقِ إِلَى جَانِبِ ٱلْبَحْرِ لِشِمْعُونَ قِسْمٌ وَاحِدٌ.٢٤
25 २५ शिमोनाच्या सीमेपाशी पूर्व बाजूपासून पश्चिमबाजूपर्यंत तो इस्साखाराचा विभाग.
وَعَلَى تُخْمِ شِمْعُونَ مِنْ جَانِبِ ٱلشَّرْقِ إِلَى جَانِبِ ٱلْبَحْرِ لِيَسَّاكَرَ قِسْمٌ وَاحِدٌ.٢٥
26 २६ इस्साखाराच्या सीमेपाशी पूर्वबाजूस पश्चिमबाजूपर्यंत तो जबुलूनाचा विभाग.
وَعَلَى تُخْمِ يَسَّاكَرَ مِنْ جَانِبِ ٱلشَّرْقِ إِلَى جَانِبِ ٱلْبَحْرِ لِزَبُولُونَ قِسْمٌ وَاحِدٌ.٢٦
27 २७ जबुलूनाच्या सीमेपाशी पूर्वबाजूपासून पश्चिमबाजूपर्यंत, गादाचा, एक विभाग.
وَعَلَى تُخْمِ زَبُولُونَ مِنْ جَانِبِ ٱلشَّرْقِ إِلَى جَانِبِ ٱلْبَحْرِ لِجَادٍ قِسْمٌ وَاحِدٌ.٢٧
28 २८ गादाच्या सीमेपाशी दक्षिण बाजूस, दक्षिणेकडे, तामारापासून मरीबोथ कादेशाच्या जलापर्यंत, नदीकडे मोठ्या समुद्रापर्यंत सीमा होईल.
وَعَلَى تُخْمِ جَادٍ مِنْ جَانِبِ ٱلْجَنُوبِ يَمِينًا يَكُونُ ٱلتُّخْمُ مِنْ ثَامَارَ إِلَى مِيَاهِ مَرِيبَةِ قَادِشِ ٱلنَّهْرِ إِلَى ٱلْبَحْرِ ٱلْكَبِيرِ.٢٨
29 २९ ज्या देशाची वाटणी तुम्ही चिठ्ठ्या टाकून इस्राएलाच्या वंशास वतनासाठी विभागणी कराल तो हाच आहे. त्यांचे विभाग हेच आहेत.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
هَذِهِ هِيَ ٱلْأَرْضُ ٱلَّتِي تَقْسِمُونَهَا مُلْكًا لِأَسْبَاطِ إِسْرَائِيلَ، وَهَذِهِ حِصَصُهُمْ، يَقُولُ ٱلسَّيِّدُ ٱلرَّبُّ.٢٩
30 ३० ही नगराची बाहेर निघण्याची ठिकाणे आहेत. उत्तर बाजूस मापाने चार हजार पाचशे हात लांब असेल.
«وَهَذِهِ مَخَارِجُ ٱلْمَدِينَةِ: مِنْ جَانِبِ ٱلشِّمَالِ أَرْبَعَةُ آلَافٍ وَخَمْسُ مِئَةِ مِقْيَاسٍ.٣٠
31 ३१ नगराच्या वेशी, तिला तीन द्वारे असतील, इस्राएल वंशाच्या नावाप्रमाणे त्यांची नावे, रऊबेनचे द्वार, यहूदाचे द्वार व लेवीचे द्वार.
وَأَبْوَابُ ٱلْمَدِينَةِ عَلَى أَسْمَاءِ أَسْبَاطِ إِسْرَائِيلَ. ثَلَاثَةُ أَبْوَابٍ نَحْوَ ٱلشِّمَالِ: بَابُ رَأُوبَيْنَ وَبَابُ يَهُوذَا وَبَابُ لَاوِي.٣١
32 ३२ पूर्व बाजू चार हजार पाचशे हात लांब असेल. तिला तीन द्वारे असतील. योसेफाचे द्वार, बन्यामीनाचे द्वार व दानाचे द्वार.
وَإِلَى جَانِبِ ٱلشَّرْقِ أَرْبَعَةُ آلَافٍ وَخَمْسُ مِئَةٍ، وَثَلَاثَةُ أَبْوَابٍ: بَابُ يُوسُفَ وَبَابُ بَنْيَامِينَ وَبَابُ دَانٍ.٣٢
33 ३३ दक्षिण बाजूसुद्धा चार हजार पाचशे हात लांब असेल. तिलाही शिमोनाचे द्वार, इस्साखाराचे द्वार व जबुलूनाचे द्वार अशी तीन द्वारे असतील.
وَجَانِبُ ٱلْجَنُوبِ أَرْبَعَةُ آلَافٍ وَخَمْسُ مِئَةِ مِقْيَاسٍ، وَثَلَاثَةُ أَبْوَابٍ: بَابُ شِمْعُونَ وَبَابُ يَسَّاكَرَ وَبَابُ زَبُولُونَ.٣٣
34 ३४ पश्चिम बाजूही चार हजार पाचशे हात लांब असेल. तिच्या तीन द्वारांची नावे पुढीलप्रामाणे असतील. गादाचे द्वार, आशेराचे द्वार व नफतालीचे द्वार.
وَجَانِبُ ٱلْغَرْبِ أَرْبَعَةُ آلَافٍ وَخَمْسُ مِئَةٍ، وَثَلَاثَةُ أَبْوَابٍ: بَابُ جَادٍ وَبَابُ أَشِيرَ وَبَابُ نَفْتَالِي.٣٤
35 ३५ ते सभोवतीचे अंतर अठरा हजार हात असेल. त्या दिवसापासून नगरीचे नाव ‘परमेश्वर तेथे आहे’ असे पडेल.
ٱلْمُحِيطُ ثَمَانِيَةَ عَشَرَ أَلْفًا، وَٱسْمُ ٱلْمَدِينَةِ مِنْ ذَلِكَ ٱلْيَوْمِ: يَهْوَهْ شَمَّهْ».٣٥

< यहेज्केल 48 >