< यहेज्केल 47 >

1 मग त्या मनुष्याने मला पुन्हा मंदिराच्या प्रवेशदाराकडे नेले आणि पाहा! मंदिराच्या उंबरठ्याखालून पाणी पूर्वेकडे वाहत होते, कारण मंदिराचे तोंड पूर्वेला होते. आणि मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस पाणी वाहात होते.
He brought me back to the door of the temple; and behold, waters flowed out from under the threshold of the temple eastward, for the front of the temple faced towards the east. The waters came down from underneath, from the right side of the temple, on the south of the altar.
2 म्हणून त्याने मला उत्तरेच्या दाराने बाहेर आणले आणि बाहेरच्या रस्त्याने सभोवार फिरवून पूर्वेकडील बाहेरच्या दाराकडे नेले. तो पाहा, पाणी दाराच्या दक्षिणेकडून वाहत होते.
Then he brought me out by the way of the gate northward, and led me around by the way outside to the outer gate, by the way of the gate that looks towards the east. Behold, waters ran out on the right side.
3 जसा तो मनुष्य हातात मापनसूत्र घेऊन पूर्वेला जात होता. त्याने एक हजार अंतर मोजून मला त्या पाण्यातून चालायला सांगितले. तो पाणी घोट्यापर्यंत होते.
When the man went out eastward with the line in his hand, he measured one thousand cubits, and he caused me to pass through the waters, waters that were to the ankles.
4 मग त्याने आणखी एक हजार हाताचे अंतर मोजून पुन्हा मला पाण्यातून तेथपर्यंत चालण्यास सांगितले, तो तेथे पाणी गुडघ्यापर्यंत होते. आणि आणखी हजार हात अंतर मोजून मला पाण्यातून चालावयास लावले तो तेथे पाणी कमरेपर्यंत होते.
Again he measured one thousand, and caused me to pass through the waters, waters that were to the knees. Again he measured one thousand, and caused me to pass through waters that were to the waist.
5 त्यानंतर त्याने आणखी हजार हात अंतर मोजले तो त्या नदीतून मला चालता येईना, कारण पाणी फार झाले. मला त्यातून पोहून जाता आले असते; उतरून पार जाता आले नसते. इतकी खोल ती होती.
Afterward he measured one thousand; and it was a river that I could not pass through, for the waters had risen, waters to swim in, a river that could not be walked through.
6 तो मनुष्य मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू हे पाहिले ना?” आणि त्याने मला नदीच्या काठाने परत आणले.
He said to me, “Son of man, have you seen this?” Then he brought me and caused me to return to the bank of the river.
7 जसा मी परत आलो तेव्हा पाहा, नदीच्या तीरांवर एका बाजूस व दुसऱ्या बाजूसही पुष्कळ झाडी असलेली पाहिली.
Now when I had returned, behold, on the bank of the river were very many trees on the one side and on the other.
8 तो मनुष्य मला म्हणाला, “हे पाणी पूर्वप्रदेशाकडे वाहत जाते. आणि तेथून अराबात उतरून क्षारसमुद्राला मिळते, ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी ताजे करते.
Then he said to me, “These waters flow out towards the eastern region and will go down into the Arabah. Then they will go towards the sea and flow into the sea which will be made to flow out; and the waters will be healed.
9 मग असे होईल की, जेथे ही महानदी जाईल तेथे तेथे जो प्रत्येक जिवंत प्राणी राहत असेल तो जगेल, कारण तेथील पाणी क्षारसमुद्रास मिळते त्यामुळे ते ताजे होते आणि तेथे विपुल मासे मिळतात, हे पाणी जेथे जाईल तेथे सर्वकाही निरोगी होईल; जेथे कोठे ही नदी जाते प्रत्येकगोष्ट जिवंत राहते.
It will happen that every living creature which swarms, in every place where the rivers come, will live. Then there will be a very great multitude of fish; for these waters have come there, and the waters of the sea will be healed, and everything will live wherever the river comes.
10 १० तिच्या तीरी कोळी उभे राहून एन-गेदीपासून एन-इग्लाइमपर्यंत जाळी टाकतील. मोठ्या समुद्रातल्या माशांसारखे त्या क्षारसमुद्रात अनेक प्रकारांप्रमाणे विपुल मासे होतील.
It will happen that fishermen will stand by it. From En Gedi even to En Eglaim will be a place for the spreading of nets. Their fish will be after their kinds, as the fish of the great sea, exceedingly many.
11 ११ पण दलदल आणि पाणथळीच्या जागा निर्दोष होणार नाहीत. त्या मिठासारख्या होतील.
But its swamps and marshes will not be healed. They will be given up to salt.
12 १२ नदीच्या दोन्ही काठावर सर्व प्रकाराची खाण्याजोगी फळे देणारे सर्व प्रकारची झाडे वाढतीत. त्यांची पाने कधीच सुकून जाणार नाहीत. त्याचे फळ कधीच थांबणार नाही. ती प्रत्येक महिन्याला फळ देईल, कारण त्या नदीचे पाणी पवित्रस्थानातून निघाले आहे. त्यांची फळे खाण्यासाठी व त्यातील पाने औषधी होतील.”
By the river banks, on both sides, will grow every tree for food, whose leaf won’t wither, neither will its fruit fail. It will produce new fruit every month, because its waters issue out of the sanctuary. Its fruit will be for food, and its leaf for healing.”
13 १३ प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही इस्राएलाच्या बारा वंशासाठी जमिनीची विभागणी याप्रमाणे करून द्याल, तेव्हा योसेफाला दोन भाग मिळतील.
The Lord GOD says: “This shall be the border by which you shall divide the land for inheritance according to the twelve tribes of Israel. Joseph shall have two portions.
14 १४ आणि तुम्ही, प्रत्येक मनुष्य आणि तुमच्यातील बंधु यांचे ते वतन होईल. ज्या देशाविषयी मी तुमच्या पुर्वजांना द्यावा म्हणून आपला हात उंच करून शपथ घेतली त्याच्या सारखी वाटणी करून घ्याल, त्याचप्रमाणे तो तुमचे वतन होईल.
You shall inherit it, one as well as another; for I swore to give it to your fathers. This land will fall to you for inheritance.
15 १५ जमिनीच्या सीमा अशा असतील. उत्तरेला मोठ्या समुद्रापासून, हेथलोनच्या वाटेने हमाथकडे सदादाच्या सीमेपर्यंत,
“This shall be the border of the land: “On the north side, from the great sea, by the way of Hethlon, to the entrance of Zedad;
16 १६ हमाथ, बेरोथा, जे दिमिष्क व हमाथाच्या सीमेवरील सिब्राईम, व हौरानच्या सीमेवरील मध्यहासेर.
Hamath, Berothah, Sibraim (which is between the border of Damascus and the border of Hamath), to Hazer Hatticon, which is by the border of Hauran.
17 १७ समुद्रापासून ही सीमा म्हणजे दिमिष्काच्या सरहद्दीवरील गांव हसर-एनोन पर्यंत असेल. उत्तरेस हमाथ ही सीमा. ही बाजू उत्तर झाली.
The border from the sea shall be Hazar Enon at the border of Damascus; and on the north northward is the border of Hamath. This is the north side.
18 १८ पूर्वेला सीमारेषा हौरान व दिमिष्क, गिलाद व इस्राएल देश याच्यामधून गेलेली यार्देन नदी.
“The east side, between Hauran, Damascus, Gilead, and the land of Israel, shall be the Jordan; from the north border to the east sea you shall measure. This is the east side.
19 १९ मग दक्षिण बाजू, तामारपासून पार मरीबोथ कादेशाच्या पाण्यापर्यंत व तेथून मिसरच्या देशाच्या ओढ्याने पुढे मोठ्यासमुद्रापर्यंत, ही दक्षिण बाजू झाली.
“The south side southward shall be from Tamar as far as the waters of Meriboth Kadesh, to the brook, to the great sea. This is the south side southward.
20 २० पश्चिमबाजू दक्षिण सीमेपासून हमाथाच्या प्रवेशाच्या समोरच्या प्रदेशापर्यंत मोठा समुद्र होईल; ही पश्चिम बाजू आहे.
“The west side shall be the great sea, from the south border as far as opposite the entrance of Hamath. This is the west side.
21 २१ “याप्रकारे तुम्ही हा देश आपसांत इस्राएलाच्या वंशांमध्ये वाटून द्या.
“So you shall divide this land to yourselves according to the tribes of Israel.
22 २२ तुम्ही तुमच्यात आणि तुमच्यामध्ये राहत असलेल्या परक्यांमध्ये अथवा ज्या परक्यांची मुले तुमच्यात राहत आहेत त्यांच्यात वाटाल. हे परके इस्राएलमध्ये जन्मलेल्या लोकांप्रमाणेच इस्राएलचे रहिवासी आहेत. त्यामुळे इस्राएलाच्या वंशांना दिलेल्या जमिनीतील काही भाग तुम्ही या लोकांस द्यावा.
You shall divide it by lot for an inheritance to you and to the aliens who live amongst you, who will father children amongst you. Then they shall be to you as the native-born amongst the children of Israel. They shall have inheritance with you amongst the tribes of Israel.
23 २३ हे परके जेथे राहतात, तेथे राहणाऱ्या इस्राएल लोकांनी त्यांना काही जमीन दिलीच पाहिजे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
In whatever tribe the stranger lives, there you shall give him his inheritance,” says the Lord GOD.

< यहेज्केल 47 >