< यहेज्केल 46 >
1 १ प्रभू परमेश्वर असे म्हणतो, आतल्या अंगणाचे पूर्वेकडचे दार कामाच्या सहा दिवसात बंद असेल. पण शब्बाथ व चंद्रदर्शन या दिवशी ते उघडले जाईल.
haec dicit Dominus Deus porta atrii interioris quae respicit ad orientem erit clausa sex diebus in quibus opus fit die autem sabbati aperietur sed et in die kalendarum aperietur
2 २ अधिपती, त्या द्वाराच्या द्वारमंडपाच्या वाटेने बाहेरून आत येईल आणि तो द्वाराच्या खांबाजवळ उभा राहील तेव्हा याजक त्याचे होमार्मण व शांत्यर्पण करील. मग त्याने दाराच्या उंबरठ्यावरून परमेश्वरास दंडवत घालून बाहेर जावे. पण द्वार संध्याकाळपर्यंत बंद केले जाणार नाही.
et intrabit princeps per viam vestibuli portae de foris et stabit in limine portae et facient sacerdotes holocaustum eius et pacifica eius et adorabit super limen portae et egredietur porta autem non claudetur usque ad vesperam
3 ३ देशातील लोकांनी शब्बाथ व नवचंद्रदिनी या दोन दिवशी दारातूनच परमेश्वराची उपासना करावी.
et adorabit populus terrae ad ostium portae illius in sabbatis et in kalendis coram Domino
4 ४ शब्बाथ दिवशी अधिपतीने परमेश्वरास जे अर्पण करायचे ते सहा निर्दोष कोकरे व निर्दोष मेंढा यांचे होमार्पण असे करावे.
holocaustum autem hoc offeret princeps Domino in die sabbati sex agnos inmaculatos et arietem inmaculatum
5 ५ त्याने मेंढ्यासाठी एक एफा अन्नार्पण करावे व कोकरांसाठी जसे त्यांची देण्याची इच्छा आहे तसे त्यांनी अन्नार्पण द्यावे. आणि प्रत्येक एफाबरोबर एक हीनभर तेल अर्पावे.
et sacrificium oephi per arietem agnis autem sacrificium quod dederit manus eius et olei hin per singula oephi
6 ६ नवचंद्रदिनी त्याने एक निर्दोष गोऱ्हा, सहा निर्दोष कोकरे व एक निर्दोष मेंढा अर्पण करावा.
in die autem kalendarum vitulum de armento inmaculatum et sex agni et arietes inmaculati erunt
7 ७ त्याने बैलासाठी व मेंढ्यासाठी प्रत्येकी एक एफा अन्नार्पण सिद्ध करावे. एका कोकरांसाठी त्याच्या इच्छेप्रमाणे त्याने द्यावे. आणि प्रत्येक एफाबरोबर एक हीनभर तेल अर्पावे.
et oephi per vitulum oephi quoque per arietem faciet sacrificium agnis autem sicut invenerit manus eius et olei hin per singula oephi
8 ८ जेव्हा अधिपती दरवाजा व देवडीच्या मार्गाने आत प्रवेश करील तेव्हा त्याने त्याच मार्गाने बाहेर जावे.
cumque ingressurus est princeps per viam vestibuli portae ingrediatur et per eandem viam exeat
9 ९ पण देशातले लोक नेमलेल्या सणांच्या दिवसात परमेश्वरासमोर येतील. त्यावेळी उत्तरेकडच्या दारातून आत आलेल्याने दक्षिणेकडील दारातून बाहेर जावे व दक्षिणेकडच्या दारातून आत आलेल्याने उत्तरेच्या दारातून बाहेर जावे. कोणीही आलेल्या दारानेच बाहेर जाऊ नये. तर सरळ पुढे बाहेर जावे.
et cum intrabit populus terrae in conspectu Domini in sollemnitatibus qui ingreditur per portam aquilonis ut adoret egrediatur per viam portae meridianae porro qui ingreditur per viam portae meridianae egrediatur per viam portae aquilonis non revertetur per viam portae per quam ingressus est sed e regione illius egredietur
10 १० आणि ते प्रवेश करीत असता अधिपती त्यांच्यामध्ये आत जाईल ते बाहेर जात असता त्याने त्यांच्याबरोबर बाहेर जावे.
princeps autem in medio eorum cum ingredientibus ingredietur et cum egredientibus egredietur
11 ११ सणांच्या आणि उत्सवाच्या दिवशी, एका गोऱ्ह्यामागे एक एफा अन्नार्पण व एक एडक्यामागे अन्नार्पण करावे. एक कोकरामागे जी काही त्याची देण्याची इच्छा असेल तसे करावे. आणि एफासाठी एक हीनभर तेल द्यावे.
et in nundinis et in sollemnitatibus erit sacrificium oephi per vitulum et oephi per arietem agnis autem erit sacrificium sicut invenerit manus eius et olei hin per singula oephi
12 १२ जेव्हा अधिपती परमेश्वरासाठी स्वसंतोषाचे अर्पण म्हणून होमबली व शांत्यर्पणे करील तेव्हा पूर्वेचे दार त्याच्यासाठी उघडावे. मग शब्बाथाच्या दिवसाप्रमाणे त्याने होमार्पणे व शात्यर्पणे करावी. मग त्याने बाहेर जावे आणि तो बाहेर गेल्यावर दार बंद करावे.
cum autem fecerit princeps spontaneum holocaustum aut pacifica voluntaria Domino aperietur ei porta quae respicit ad orientem et faciet holocaustum suum et pacifica sua sicut fieri solet in die sabbati et egredietur claudeturque porta postquam exierit
13 १३ “परमेश्वरास रोज होमार्पण करण्यासाठी तू एक वर्षांचे निर्दोष असे कोकरु द्यावे. तू दररोज सकाळी हे करावे.
et agnum eiusdem anni inmaculatum faciet holocaustum cotidie Domino semper mane faciet illud
14 १४ आणि दररोज सकाळी त्याबरोबर तुम्ही अन्नार्पण द्यावे. गव्हाचे पीठ एफाचा सहावा भाग व ते नरम करण्यासाठी हीनाचा तिसरा भाग तेल, असे अन्नार्पण परमेश्वरास करावे. हा सर्वकाळचा विधी सतत चालावयाचा आहे.
et sacrificium faciet super eo cata mane mane sextam partem oephi et de oleo tertiam partem hin ut misceatur similae sacrificium Domino legitimum iuge atque perpetuum
15 १५ याप्रमाणे ते रोज सकाळी निरंतरच्या होमार्पणासाठी कोकरू, अन्नार्पण व तेल रोज सकाळी सिद्ध करतील.”
faciet agnum et sacrificium et oleum cata mane mane holocaustum sempiternum
16 १६ प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “जर अधिपतीने आपल्या मुलापैकी एकाला काही इनाम दिले तर ते त्याच्या वतनातले असल्यामुळे त्याच्या मुलाचे होईल. ते त्याचे वतन आहे.
haec dicit Dominus Deus si dederit princeps donum alicui de filiis suis hereditas eius filiorum suorum erit possidebunt ea hereditarie
17 १७ पण त्याने जर आपल्या वतनाचा काही भाग, आपल्या एखाद्या सेवकाला दिला, तर स्वातंत्र्याच्या वर्षापर्यंत तो त्या सेवकाचा होईल. मग तो अधिपतीकडे परत जाईल. त्याचे वतन त्याच्या मुलासच मिळेल.
si autem dederit legatum de hereditate sua uni servorum suorum erit illius usque ad annum remissionis et revertetur ad principem hereditas autem eius filiis eius erit
18 १८ आणि अधिपतीने लोकांचे कोणतेही वतन घेऊन त्यास घालवून देऊ नये. त्याने आपल्या मालकीच्या जमिनीचा काही भाग आपल्या मुलांना द्यावा. म्हणजे माझ्या लोकांपैकी प्रत्येक मनुष्य आपआपल्या वतनातून विखरला जाऊ नये.”
et non accipiet princeps de hereditate populi per violentiam et de possessione eorum sed de possessione sua hereditatem dabit filiis suis ut non dispergatur populus meus unusquisque a possessione sua
19 १९ मग त्या मनुष्याने मला दाराच्या जवळून पलीकडे नेले. उत्तरेकडे तोंड असलेल्या याजकाच्या पवित्र खोल्याकडे त्याने मला नेले. आणि पाहा! तेथे अगदी पश्चिमेकडे एक जागा दिसली.
et introduxit me per ingressum qui erat ex latere portae in gazofilacia sanctuarii ad sacerdotes quae respiciebant ad aquilonem et erat ibi locus vergens ad occidentem
20 २० तो मला म्हणाला, “येथे याजक दोषार्पणे व पापार्पणे शिजवतील, ज्यात ते अन्नार्पण भाजतील ते हेच आहे यासाठी की, लोकांस पवित्र करायला त्यांनी ती अर्पणे घेऊन बाहेरच्या अंगणात जाऊ नये.”
et dixit ad me iste est locus ubi coquent sacerdotes pro delicto et pro peccato ubi coquent sacrificium ut non efferant in atrio exteriori et sanctificetur populus
21 २१ मग मला त्याने बाहेरच्या अंगणात आणले आणि त्याने मला अंगणाच्या चारी कोपऱ्यात नेले. आणि पाहा! अंगणाच्या प्रत्येक कोपऱ्यात एक अंगण होते.
et eduxit me in atrium exterius et circumduxit me per quattuor angulos atrii et ecce atriolum erat in angulo atrii atriola singula per angulos atrii
22 २२ अंगणाच्या चारी कोपऱ्यात चाळीस हात लांब व तीस हात रुंदीची आवारे होती. चारी कोपरे सारख्याच मापाचे होते.
in quattuor angulos atrii atriola disposita quadraginta cubitorum per longum et triginta per latum mensurae unius quattuor erant
23 २३ त्यामध्ये चाऱ्हींच्या भोवताली दगडाची भिंत होती. त्या भिंतीत दगडाच्या रांगाखाली स्वयंपाकासाठी जागा केलेली होती.
et paries per circuitum ambiens quattuor atriola et culinae fabricatae erant subter porticus per gyrum
24 २४ तो मनुष्य मला म्हणाला, “या पाकशाला आहेत, त्यामध्ये येथे मंदिराचे सेवक लोकांकडचा यज्ञ शिजवतील.”
et dixit ad me haec est domus culinarum in qua coquent ministri domus Domini victimas populi