< यहेज्केल 45 >
1 १ जेव्हा तुम्ही वतनासाठी चिठ्ठ्या टाकून देशाची वाटणी कराल तेव्हा परमेश्वरास अर्पायचा प्रदेश, देशाचा पवित्र विभाग, तुम्ही अर्पण कराल, त्याची लांबी पंचवीस हजार हात व रुंदी वीस हजार हात असावी. त्याच्या सभोवतालचा सर्व प्रदेश पवित्र होईल.
汝ら籤をひき地をわかちて產業となす時は地の一分を取り聖き者となしてヱホバに献ぐべし其長は二萬五千寛は一萬なるべし是は其四方周圍凡て聖し
2 २ यापैकी पांचशे हात लांब व पांचशे हात रुंद एवढी चौरस जागा पवित्रस्थानासाठी ठेवून तिच्याभोवती पन्नास हात खुली जागा राखून ठेवावी, ती सभोवती चौरस असावी.
此中聖所に屬する者は長五百寛五百にして周圍四角なり又五十キユビトの隙地その周圍にあり
3 ३ त्या मोजलेल्या जमिनीतून तू पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद जागा मोजून काढ.
汝この量りたる處より長二萬五千寛一萬の場を度り取るべし此うちに聖所至聖所を設くべし
4 ४ जे याजक पवित्रस्थानाचे सेवा करावयास परमेश्वराजवळ येतील त्यांना हा भूमीचा पवित्र प्रदेश होईल. तो त्यांना त्यांच्या घरासाठी जागा आणि पवित्रस्थानासाठी पवित्र जागा होईल.
是は地の聖場なりヱホバに近づき事ふる聖所の役者なる祭司等に屬すべし是かれらの家を建てまた聖所を設くる聖地なり
5 ५ म्हणून ती पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद, एवढी जागा जे कोणी लेवी मंदिरात सेवा करतात त्यांची व्हावी. वस्तीसाठी हे त्यांचे वतन होय.
又長二萬五千寛一萬の處家に事ふるレビ人に屬し其所有に二十の室あるべし
6 ६ अर्पिलेला पवित्र प्रदेशसुद्धा तुम्ही पाच हजार हात रुंद व पंचवीस हजार हात लांब प्रदेश नगराचा विभाग म्हणून नेमून द्याल; तो इस्राएलाच्या सर्व घराण्याला होईल.
その献げたる聖地に並びて汝ら寛五千長二萬五千の處を分ち邑の所有となすべし是はイスラエルの全家に屬す
7 ७ “अर्पिलेल्या पवित्र प्रदेशाच्या व नगराच्या विभागाच्या एकाबाजूस व दुसऱ्याबाजूस अर्पिलेल्या पवित्र प्रदेशासमोर आणि नगराच्या विभागासमोर पश्चिम सीमेपासून पश्चिमेकडे, आणि पूर्व सीमेपासून पूर्वेकडे अधिपतीस विभाग होईल.
又君たる者の分はかの献げたる聖地と邑の所有の此處彼處にあり献げたる聖地に沿ひ邑の所有に沿ひ西は西にわたり東は東に渉るべし西の極より東の極まで其長は支派の分の一と等し
8 ८ ही जमीन इस्राएलात अधिपतीचे वतन व्हावी म्हणजे यापुढे माझ्या अधिपतींनी माझ्या लोकांवर जुलूम करू नये; तर त्याऐवजी इस्राएल घराण्याला त्यांच्या त्यांच्या वंशाप्रमाणे जमीन द्यावी.
イスラエルの中に彼が有ところの者は地にあり吾君等は重てわが民を虐ぐることなくイスラエルの家にその支派にしたがひて地を與へおかん
9 ९ प्रभू परमेश्वर असे म्हणतो, इस्राएलाच्या अधिपतींनो, हे तुमच्यासाठी पुरे होवो. जबरदस्ती आणि जुलूम दूर करा! न्याय व न्यायीपण आचरा, माझ्या लोकांची हकालपट्टी करण्याचे सोडा.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
主ヱホバかく言たまふイスラエルの君等よ汝ら足ことを知れ虐ぐることと掠むる事を止め公道と公義を行へ我民を逐放すことを止よ主ヱホバこれを言ふ
10 १० तुम्ही खरी तागडी, खरी एफा, खरी बथ वापरा.
汝ら公平き權衡公平きエパ公平きバテを用ふべし
11 ११ एफा व बथ सारख्याच मापाचे असावे. याकरिता बथ होमराचा दहावा भाग; तशीच एफाही होमराचा दहावा भाग; या होमराच्या मापाप्रमाणे असाव्या.
エパとバテとはその量を同じうすべし即ちバテもホメルの十分一を容れエパもホメルの十分一を容るべしホメルに準じてその度量を定むべし
12 १२ शेकेल वीस गेराचा असावा. माने वीस शेकेलाचा, पंचवीस शेकेलाचा किंवा पंधरा शेकेलाचा असावा.
シケルは二十ゲラに當る二十シケル二十五シケル十五シケルを汝等マネとなすべし
13 १३ तुमची जे अर्पणे अर्पावयाचे ती अशी असावीः तुम्ही होमभर गव्हातून एफाचा सहावा भाग गहू व होमरभर जवातून एफाचा सहावा भाग जव द्यावा.
汝らが献ぐべき献物は左のごとし一ホメルの小麥の中よりエパの六分一を献げ一ホメルの大麥の中よりエパの六分一を献ぐべし
14 १४ तेलाचा नियम हाच, तुम्ही तेलाच्या बथाचा म्हणजे खोरभर तेलातून बथाचा दहावा भाग अर्पावा; दहा बथांचा खोर म्हणजे एक होमर, कारण दहा बथ एक होमर आहेत;
油の例油のバテは是のごとし一コルの中よりバテの十分一を献ぐべしコルは十バテを容る者にて即ちホメルなり十バテ一ホメルとなればなり
15 १५ आणि इस्राएल देशातील पाणथळाच्या कुरणातील दोनशे मेंढरांच्या कळपातून एक कोकरू, अन्नार्पण व होमार्पण व शांत्यर्पणे म्हणून त्यांच्यासाठी प्रायश्चित करायला अर्पावे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
又イスラエルの腴なる地より群二百ごとに一箇の羊を出して素祭および燔祭 酬恩祭の物に供へ民の罪を贖ふことに用ひしむべし主ヱホバこれを言ふ
16 १६ देशातील सर्व लोकांनी इस्राएलातल्या अधिपतीस ही अर्पणे दिली पाहिजेत.
國の民みなこの獻物をイスラエルの君にもちきたるべし
17 १७ उत्सव, व चंद्रदर्शने, शब्बाथ आणि इस्राएलाच्या घराण्याचे सर्व सण यामध्ये अन्नार्पण, होमार्पण व पेयार्पण याची तरतूद करणे हे अधिपतींचे काम आहे. इस्राएल घराण्यासाठी प्रायश्चित करण्यासाठी त्याने अन्नार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे ही सिद्ध करावी.
又君たる者は祭日朔日安息日およびイスラエルの家の諸の節期に燔祭 素祭 灌祭を奉ぐべし即ち彼イスラエルの家の贖罪をなすために罪祭 素祭 燔祭 酬恩祭を執行なふべし
18 १८ प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “पहिल्या महिन्यात, महिन्याच्या पहिल्या दिवशी, तू निर्दोष तरुण गोऱ्हा घेऊन पवित्रस्थानाची शुद्धी कर.
主ヱホバかく言たまふ正月の元日に汝犢なる全き牡牛を取り聖所を淸むべし
19 १९ तेव्हा याजकाने पापार्पणाच्या पशूचे रक्त घेऊन ते मंदिराच्या दरवाजाच्या चौकटीला, वेदीच्या बैठकीच्या चाऱ्ही कोपऱ्यांवर व आंतील अंगणाच्या दरवाजाच्या चौकटीला लावावे.”
又祭司は罪祭の牲の血を取りて殿の門柱にぬり壇の層の四隅と内庭の門の柱に塗べし
20 २० पहिल्या महिन्याच्या सातव्या दिवशी, प्रत्येक चुकलेल्या किंवा भोळ्या मनुष्याकरता तू तसेच करशील आणि तुम्ही याप्रकारे मंदिरासाठी प्रायश्चित करावे.
月の七日に汝等また迷ふ人および拙き者のために斯なして殿のために贖をなすべし
21 २१ पहिल्या महिन्यात, महिन्याच्या चौदाव्या दिवशी तुम्हास सात दिवसाचा वल्हांडण सण होईल, त्यामध्ये बेखमीर भाकर खावी.
正月の十四日に汝ら逾越節を守り七日の間祝をなし無酵パンを食ふべし
22 २२ त्यादिवशी अधिपती आपणासाठी आणि देशातील सर्व लोकांसाठी पापार्पणासाठी एक गोऱ्हा सिद्ध करील.
その日に君は己のため又國の諸の民のために牡牛を備へて罪祭となし
23 २३ परमेश्वरास होमार्पण करण्यासाठी सणाचे सात दिवस त्याने सात निर्दोष गोऱ्हे व सात मेंढे सिद्ध करावे आणि पापर्पणासाठी रोज एक बोकड सिद्ध करावा.
七日の節筵の間七箇の牡牛と七箇の牡羊の全き者を日々に七日の間備へてヱホバに燔祭となし又牡山羊を日々に備へて罪祭となすべし
24 २४ मग अधिपती एका गोऱ्ह्यासाठी एफाभर व एका मेंढ्यासाठी एफाभर अन्नार्पण आणि एफासाठी हीनभर तेल सिद्ध करील, पापार्पण म्हणून बैल देईल.
彼また素祭として一エパを牡牛のために一エパを牡山羊のために備へ油一ヒンをエパに加ふべし
25 २५ सातव्या महिन्यात, महिन्याच्या पंधराव्या दिवशी, सणात, सात दिवसपर्यंत तो पापबली, होमबली, अन्नबली आणि तेल ही याप्रमाणेच सिद्ध करील.
七月の十五日の節筵に彼また罪祭 燔祭 素祭および油を是のごとく七日の間備ふべし